सतीगळ / सतिकल्लू/ ledy stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती
Satigal vishyi mahiti
• सती :
हिंदू धर्मीय देवताशिव शंकर यांची पत्नी सती त्यांचा पित्याने दक्ष राजाने केलेला शंकराचा अपमान सहन झाला नाही म्हणून तिने अंतरंग अग्नी प्रज्वलित करून स्वतःस दहन करून घेतले.
• सती प्रथा :
आपल्या पतिवर नितांत प्रेम असणारी स्त्री आपल्या पती निधनानंतर त्याच्या जळत्या चितेवर स्वतःला जाळून आपला देह नष्ट करते. ती प्रथा म्हणजे सती प्रथा होय. यावेळी ती वेगवेगळे सौभाग्य अलंकार धारण करते. हिरवा शालू, हिरवा चुडा, कपाळी कुंकू, हातात बाजूबंद, पायात जोडवी व पैंजण, अशी आभूषणे धारण करून, आपली सर्व संपत्ती मागील व्यक्तींना व समाजास दानधर्म करून ती सती जाण्यासाठी तयार होते. यावेळी ती अग्नी ग्रहण करताना वेदना होऊ नयेत म्हणून तांबूल सेवन करते. ज्याने तिला गुंगी चढते. व ती सती जाते.या क्रियेस सहमरण किंवा अनुमरण सुध्दा म्हंटले जाते. अशा वेळी ढोलताशे वाजवले जातात.
• रामायण काळात ही प्रथा अस्तित्वात नव्हती. मात्र महाभारत काळात पांडू राजाची पत्नी माद्री सती गेली. हा प्रथम पौराणिक दाखला सती प्रथेचा दिसून येतो.
• पण ही प्रथा ऐच्छिक होती.
• सतिगळ :
एखादा वीर पुरुष मरण पावल्यास त्याच्या मागे त्याची पत्नी त्याच्या चितेवर स्वतला जाळून घेते. तिच्या स्मरणार्थ उभारलेली स्तंभ शिल्पाकृती म्हणजे सतीगळ होय.
• सतीगळचे प्रकार :
• वीर पत्नी सतीगळ किंवा स्मृती शिळा :
पती युद्धात मरण पावल्यास त्याची पत्नी सती जाते. ती वीरपत्नी सतीगळ होय.
• राज सतीगळ:
एखादा राजा किंवा मंत्र्यांच्या मृत्य नंतर उभारलेली सतीगळ राजसती गळ होय. यामध्ये आपणास राज दरबार व इतर दासी शिल्पाकृती केल्या जातात.
• एक सती गळ :
गावातील एखादी स्त्री आपल्या पती निधनानंतर त्याच्या चितेवर सती गेली असेल तर फक्त एक सतीगळ उभा केली जाते. यामध्ये एक शृंगार केलेला हात आशीर्वाद देत आहेत असा असतो.
• सतीगळावरील भाग :
विरगळ प्रमाणेच सतीगळचे भाग पडतात.
• वीरमरण व सती स्त्री :
हा सतीगळ स्तंभाचा खालील भाग आहे. यामध्ये सती जाणारी स्त्री बसलेली, व तिचा पती मृत झालेला झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. किंवा सती त्या मृत शरिरासमोर हात जोडून उभा आहे. अथवा ती चितेवर बसलेली व तिच्या पतीचा मृतदेह जवळ आडवा चितेवर असलेला दाखवला जातो.
• वीर शौर्य शिल्पाकृती :
सती जाणाऱ्या स्त्रीचा पती जर युद्धात मरण पावला असेल तर युद्ध प्रसंग कोरलेला सती शिळेवर पाहायला मिळतो. ही एक जोड स्मृतीशिळा असते.
• स्वर्गारोहन :
वीर पुरुषावरील बाजूस आपणास वीर व त्याची पत्नी यांना स्वर्गात नेण्यासाठी अप्सरा घेवून जातानाचे दृश्य कोरलेले पाहायला मिळते.
• सती दंड :
स्वर्गारोहन या शिल्पाकृतीच्यावरती आपणास दंड काढलेला दिसून येतो. यामध्ये एक हात काढलेला दिसून येतो. त्या हातात बाजूबंद, चुडा व अंगठ्या अशी आभूषणे घातलेली आपणास पाहायला मिळतात. तसेच हातावर पुष्प, पान व सुपारी काहीवेळा कोरलेली असते. कुंकू करंडा देखील काढलेला पाहायला मिळतो. त्याखाली काहीवेळा अश्वारूढ स्त्री, किंवा वाघावर बसलेली स्त्री काढली जाते. तसेच पालखीत बसलेली स्त्री देखील काढली जाते. तसेच ती दानधर्म करत आहे असे दृश्य काढलेले असते.व हा काढलेला हात आशीर्वाद देत आहे. असे दृश्य कोरलेले पाहायला मिळते.
• काही सतीगळमध्ये दोन किंवा चार हात देखील काढलेले असतात. ते जर लढावू वीराची दोन किंवा अधिक लग्ने झाली असतील तर त्या सतीगळीवर आपणास दोन किंवा जास्त हात काढलेले पाहायला मिळतात.
• स्वर्ग प्राप्ती :
विरगळी प्रमाणेच सतीगळ मध्ये आपणास तिसरा टप्पा सतीगळीचा पाहायला मिळतो. यामध्ये एका बाजूस पुरोहित असतो व मध्यभागीं जर मरणारी व्यक्ती शैव पंथीय असेल तर शिवपिंड अन जर मृत वैष्णव असेल तर मध्यभागीं विष्णू शिल्प असते. व त्याच्या बाजूला आपणास वीर व त्याची पत्नी नमस्कार मुद्रेत देव पूजा करत असताना दाखवले जातात. त्यांना स्वर्ग प्राप्ती होते असे समजले जाते.
• अमृत कलशारोहण :
सतीगळ मध्ये देखील वरील शीर्षभागी आपणास अमृत कलश पाहायला मिळतो. त्या शेजारी चंद्र सूर्य कलाकृती कोरलेली दिसून येते. याचा अर्थ जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत ती सती व तिचा पती अमर राहणार आहेत. तसेच त्या दोघांना पुन्हा परमेश्वर भेटवतो. असे मानले जाते. अशा स्त्रिस सन्मान व देवरूप स्थान प्राप्त होते.
• सतीगळ कोठे पाहायला मिळते?
• भारत, जर्मनी, नॉर्वे, इजिप्त या ठिकाणी सतीगळ वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या पाहायला मिळतात.
• कल्हण याच्या राजतरंगीनी, बाणभट्टाचे हर्ष चरित्रमध्ये सतीप्रथेचा उल्लेख आढळतो.
• रामदेव राय राजाची पत्नी सती गेली होती. छत्रपति शिवाजी महाराज यांची पत्नी पुतळाबाई सती गेली होती. छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र शाहू महाराज यांची सकवारबाई, माधवराव पेशवे यांची रमाबाई, तसेच इंग्रज राजवटी मध्ये बर्नियर या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाहोर शहरात एक मुलगी सती गेलेली पहिली होती.
• पुढे लॉर्ड बेंटींग यांनी इसवी सन १८२९ साली सती प्रथा कायद्याने बंद केली.
• अशी आहे सतीगळ विषयी ऐतिहासिक माहिती.
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l