प्रबळगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती
Prabalgad Fort information in Marathi
![]() |
प्रबळगड |
• स्थान:
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील ठाकूरवाडी गावाजवळ सहयाद्री पर्वतात प्रबळगड किल्ला आहे.
• उंची :
या किल्याची सरासरी उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे २३०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.
• या किल्याचे तीन भाग आहेत.
• प्रबळगड माची : १२७९ फूट उंचीवर
• कलावंतीण सुळका : २२५० फूट उंचीवर.
• प्रबळगड बालेकिल्ला माथा : २३०० फूट उंचीवर,
• प्रबळगड किल्ल्याची नावे:
• प्रबळगड किल्ल्याकडे जाण्यासाठीचा प्रवाशी मार्ग :
• प्रबळगड हा किल्ला पुण्यापासून ११९ किलोमीटर, तर मुंबई पासून ५० किलो मीटर अंतरावर आहे.
• पनवेल हे रेल्वेस्थानक येथून जवळ आहे.
• पनवेल स्टेशन – शेडुंग – ठाकूरवाडी मार्गे प्रबळगडाच्या पायथ्याला आपण पोहोचू शकतो.
• दुसरा मार्ग माथेरान मार्गे प्रबळगडाला जाता येते.
• प्रबळगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• माथेरान किंवा पनवेल येथून आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाहन तळावर येवून पोहोचतो. या ठिकाणी पार्किंग पेमेंट करून आपण गडाच्या दिशेने पायी वाटचाल करू शकतो. कच्च्या रस्त्याने आजू बाजूच्या सहयाद्री पर्वतातील हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत गडचढणी सुरू होते.
• पायरी मार्ग व हनुमंत व गणपती देवतेची शिल्पे :
गडाची चढाई करू लागल्यावर आपणास सुरवातीस हनुमंत व गणपती देवतेची शिल्पाकृती कोरलेली खडकात दिसून येते. शेंदरी रंगात रंगवलेल्या या मुर्त्या हिंदू धार्मिक अस्मितेची प्रतीके आहेत. संकट, विघ्न नाश करणाऱ्या देवता असल्याने कोणत्याही गडावर यांची प्रथम पूजा व उपासना होत असते. एक स्पिरीट म्हणजेच उत्तेजना देणाऱ्या या देवता हिंदू धर्मात पूजनीय आहेत. या शिल्पमुर्ती पासून पुढे पायरी मार्ग लागतो. जो चढून पुढे आपण गडाच्या वरील भागाकडे जाऊ शकतो.
• प्रबळगड माची :
पायी चालत आपण प्रबळगडाच्या माचीवर पोहोचतो. तिथे मनुष्य वस्ती आपणास पाहायला मिळते. अनेक उपहारगृहात आपल्या भोजनाची व्यवस्था होऊ शकते. या ठिकाणाहून आपणास दोन मार्ग लागतात एक कलावंतीण दुर्गाकडे घेवून जातो. तर दुसरा प्रबळगडावर,
• अवघड मार्ग : येथून पुढे दगड धोंडे असणारा अवघड ट्रेक लागतो. ८० अंश कोनातील हा चढ चढून जाताना दमछाक होते.
• गडाचा माथा :
अवघड चढाई करून आपण गडाच्या माथ्यावर येतो. या किल्याचा विस्तार पूर्व – पश्चिम विस्तार हा ५ किलोमीटर तर उत्तर – दक्षिण विस्तार हा ६ किलोमीटर आहे. गड माथ्यावर आल्यावर आपणास दोन वाटा लागतात. त्यातील एक वाट आपणास कलावंतीण बुरजाकडे घेवून जाते. तर दुसरी काळ्या बुरुजाकडे घेवून जाते.
• कलावंतीण बुरूज :
कलावंतीण बुरूज हा कलावंतीण सुळाक्या समोर येत असल्याने त्यास कलावंतीण बुरूज असे म्हणतात. या ठिकाणी उभे राहून कलावंतीण दुर्ग व आसपासच्या परिसरावर देखरेख करता येत असे.
• चार वाड्यांचे अवशेष :
काळया बुरुजाकडे जाताना आपणास वाटेत भग्न इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. आज छताची पडझड झालेल्या या वाड्याच्या भिंती आज ही तग धरून आहेत. इमारतींच्या चौकटी व खिडक्यांच्या रचनेतून व त्यावरील नक्षितून मध्ययुगीन स्थापत्य कलेचे दर्शन घडते. भिंतीवर उगवलेली झाडे झुडपे त्यांकडे झालेल्या दुर्लक्षतेची आठवण करून देते. उंच ज्योत्यावरील बांधकाम पाहिल्यावर तत्कालीन वैभवाची कल्पना येते. असे हे एकामागोमाग एक असे चार वाडे आहेत. जे तत्कालीन गडाच्या रहिवाशांसाठी बांधल्याचे जाणवतात.
• गणेश व शिव मंदिर :
काळया बुरुजाकडे जाताना आपणास एक भग्न अवस्थेत असलेले मंदिर लागते. जे काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. या ठिकाणी हिंदू देवता गणपती व अन्य देवतेच्या मुर्ती पाहायला मिळतात. तसेच भग्न शिवपिंड व नंदी देखील पाहायला मिळतो. परकीय आक्रंतानी या मंदिराची नासधूस केलेली असावी.
• पाण्याची टाकी :
काळ्या बुरुजाकडे जाताना एकामागोमाग एक अशी दोन पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. जी पिण्याच्या पाण्याची व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली असावीत.
• काळा बुरूज :
पाण्याची टाकी पाहून आपण गडाच्या चढेल भागाकडे जातो तेव्हा आपणास तिथे एक बुरूज लागतो. तो काळाबुरुज आहे. येथून आपणास सहयाद्री पर्वतातील अनेक ठिकाणांचे दर्शन घडते.
• प्रबळगडाच्या पुर्वेकडे उल्हास नदी, पश्चिमेस गड नदी, दक्षिण बाजूस पाताळगंगा नदी तर नैऋत्येस कर्नाळा किल्ला आहे.
• प्रबळगडावरून आपण इशाळगड, मोरपे धरण,चंदेरी, विकंडगड, माणिकगड, माथेरान पठार, सोंडाई गड, म्हैसमाळ सुळका, आपणं पाहू शकतो.
• तटबंदी व दरवाजा : गडाच्या काही भागाची तटबंदी व दरवाजे सुरक्षित आहेत. त्यावरून या किल्याच्या प्रबळतेची कल्पना येते.
• भुयारी गुहा:
प्राचीनकाळी या ठिकाणी एकांत ध्यान धारणेसाठी भुमिगत भुयारे बांधलेली पाहायला मिळतात. बुध्द काळात ती बांधली गेली असावीत.
• कलावंतीण सुळका :
प्रबळगड पठारावरील माची वरून आपण दुसऱ्या मार्गाने कलावंतीण सुळक्याकडे जाऊ शकतो. ही वाट अवघड चढणीची आहे.
• पायथा गुहा :
कलावंतीन सुळक्याच्या पायथ्यास एक भूमिगत भुयार व गुहा आपणास पाहायला मिळतें. जी तत्कालीन बुध्द व हिंदू साधूंच्या ध्यान धारणेसाठी खोदली असावी.
• कठीणकात्याळ पायरी मार्ग :
पुढे ८० अंश कोणातील खडा चढ लागतो. जो चढून जाण्यासाठी दोर बांधून ठेवलेला आपणास पाहायला मिळतो. तेथून पुढे खडा पायरी मार्ग लागतो. तो ही ८० अंश कोनातच बनवलेला दिसून येतो. शत्रूस गड चढाई अवघड जावी व गड जिंकणे कठीण जावे म्हणून अशी रचना केलेली दिसून येते.
• सुळका माथा :
आपणं गडाच्या वरील सुळक्याच्या थोड खालील बाजूस येतो. जिथे थोडी सपाट माची दिसून येते. ज्या ठिकाणी शेल्पी घेताना अपघात घडल्याच्या घटना ऐकायला लोकांकडून मिळतात.
• अवघड चढाई व माथा :
पुढे आपणास एक उंच शिखर माथ्याकडे जाणारा कात्याळ सुळका दिसून येतो. जो चढणे कठीण आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तेथे एक दोर बांधलेला आपणास दिसून येतो. ज्यावरून चढाई करता येते. यासाठी प्रत्येक व्यक्तीस तीस रुपये द्यावे लागतात.
• छत्रपती शिवराय पुतळा व ध्वज स्तंभ :
वर माथ्यावर आपणास छत्रपती शिवराय यांचा पुतळा पाहायला मिळतो. ज्यांच्या दर्शनाने संपूर्ण गड चढाईचे सार्थक होते. या ठिकाणी भगवा ध्वज स्तंभ देखील पाहायला मिळतो.
छत्रपती शिवपुतळा व ध्वजस्तंभाचे दर्शन घेवून आपण परतीच्या प्रवासाला लागतो.
• या गडाची चढाई मध्यम स्वरूपाची असून ती दोन टप्प्यात करावी लागते. पहिला टप्पा प्रबळगड माची व बालेकिल्ला तर दुसरा कलावंतीण सुळका.
• प्रबळगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• प्रबळगडाला प्राचीन काळापासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी सापडणाऱ्या गुहा या प्राचीन बुध्द व हिंदू धर्म कालीन आहेत. येथे हिंदू तथा बुद्ध धर्मीय साधू ध्यानधारणा करत असत.
• पुढे या ठिकाणी सातवाहन चालुक्य काळात कल्याण - पनवेल परिसरातील व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी येथे लष्करी चौकी बांधली गेली. याकाळात या किल्यास मुरंजन हे नाव देण्यात आले. मुरंजन याचा अर्थ चमत्कारिक असा होतो.
• पुढे हा परिसर यादव राजवटीत होता.
• सुलतानशाही नंतर बहामनी शासनाच्या काळात मलिक अहमद याने कोकण प्रदेश जिंकताना हा किल्ला बहामनी शासकांनी जिंकून घेतला.
• इसवी सन १४५८ साली हा किल्ला मलिक अहमद याने अहमदनगरच्या निजामशाहीत दाखल करुन घेतला.
• निजामशाहीच्या शेवटच्या काळात १६३६ सालादरम्यान शहाजी राजे, छत्रपती शिवराय व राजमाता जिजाबाई यांचे वास्तव्य या किल्ल्यावर काही काळ होते.
• माहुली तहाने हा किल्ला मुघलांना दिला गेला. हा तह निजामशाहीच्या वतीने शहाजीराजे यांनी केला.
• पुढे स्वराज्य स्थापन केल्यावर छत्रपती शिवराय यांनी इसवी सन १६५७ साली हा किल्ला स्वराज्यात दाखल करुन घेतला. व याचे नाव याचा प्रचंड विस्तार पाहून प्रबळगड ठेवण्यात आले.तर जवळील सुळक्याचे नाव कलावंतीण दुर्ग ठेवण्यात आले.
• इसवी सन १६६५ साली पुरंदर तहाने हा किल्ला मुघलांना देण्यात आला.
• आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवराय यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला..
• पुढे इसवी सन १८१८ साली मराठे शाहीच्या अस्तानंतर इंग्रजांनी या किल्याची नासधूस केली. त्यांना हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करायचे होते. पण पाण्याच्या अभावामुळे त्यांनी माथेरान येथे थंड हवेचे ठिकाण विकसित केले.
• शिवकाळात या ठिकाणी दोन मुख्य दरवाजे, अकरा बुरूज व चार मोठे वाडे तसेच पाण्याची टाकी होती. आज फक्त अवशेष शिल्लक आहेत.
• अशी आहे प्रबळगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती.
Prabalgad Fort information in Marathi