Showing posts with label कर्नाळा किल्याची माहिती Karnala Fort Information in Marathi. Show all posts
Showing posts with label कर्नाळा किल्याची माहिती Karnala Fort Information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

कर्नाळा किल्याची माहिती Karnala Fort Information in Marathi

 कर्नाळा किल्याची माहिती
Karnala Fort Information in Marathi
कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


स्थान :

• महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात कर्नाळा हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. हा एक गिरिदुर्ग किल्ला आहे.

समुद्र सपाटी पासून उंची : ४४५ मीटर उंच हा किल्ला आहे.

कर्नाळा किल्याकडे जाण्याचा प्रवासी मार्ग :

• मुंबई हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेलेलं ठिकाण आहे.

• मुंबईतून – नवीमुंबई – विचुंबे – शिरढोण – चींचावन येथून कर्नाळा पक्षी अभयारण्यातून कर्नाळा किल्याकडे जाता येते.

• अलिबाग येथून पेण – जिते – खारपाडा – तारा मार्गे कर्नाळा येथे जाता येते.

• पुणे येथून आपण लोणावळा – खालापूर – पेण – मार्गे कर्नाळा येथे जाऊ शकतो.

• मुंबई गोवा रोडवर पनवेल पासून कर्नाळा हे ठिकाण१६ किलोमीटर अंतरावर आहे.

• मुंबई पासून ६२ किलोमीटर तर पुणे येथून १०४ किलोमीटर अंतरावर कर्नाळा हे ठिकाणं आहे.

कर्नाळा किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• डोंबिवली या रेल्वे ठिकाणावरून आपण पनवेलला आल्यावर तेथून साई या ठिकाणी जाणाऱ्या बसने आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील थांब्यावर उतरु शकतो. या ठिकाणी असणाऱ्या वन विभाग चेक् पोस्ट नाक्यावर येवून तेथून आपण पक्षी अभयारण्यातून परवानगी घेऊन कर्नाळा किल्ल्याकडे जाऊ शकतो.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


• चेक नाक्यावरून पुढे गेल्यावर एक पक्षी संग्रहालय आपणांस पाहायला मिळते. जंगलातील पक्षांची थोडीफार ओळख येथे होऊ शकते. येथून पुढे गेल्यावर महिला बचत गटाच्या माध्यमातून चालू केलेले उपहारगृह आपणास लागते. या ठिकाणीं आपणासाठी योग्य आहाराची सोय माफक दरात होते.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


• पुढें जंगल वाटेने आपला खडतर मार्ग सुरु होतो. जंगली झाडा- झुडपातून पुढें पाय वाटेने जाताना एकटे जाणे टाळावे. या परिसरात अनेक जंगली प्राण्यांचा वावर आढळून येतो. वाटेतील झाडे झुडपे, जंगली ओढे नाले पार करत आपण खूप अंतर चालून गडाच्या पायथ्याशी असलेल्या कर्नाळा देवी मंदीरापाशी पोहोचतो.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


कर्नाळा देवी मंदीर:

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


आजू बाजूला बांधकामांचे पडलेले अवशेष पाहायला मिळतात. सध्या इथे फक्त चौथरा शिल्लक आहे. मध्यभागीं एक छोटेसे मंदिर आपणांस पाहायला मिळते. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली सिंहारुढ असणारी अनेक भुजा असणारी शस्त्र सज्ज अशी देवीची मूर्ती आपणांस पाहायला मिळते.

• कर्नाळा हे एक पक्षी अभयारण्य आहे. या ठिकाणीं अनेक प्रकारची झाडे आहेत. यामधे जांभूळ, साग, उंबर, बहावा, टेंभुर्णी, पांगारा, काटेसावर, तसेच ताम्हण हा महाराष्ट्र राज्याचा वृक्ष देखिल पाहायला मिळतो.यासारखी झाडे आढळतत. तसेच १४० स्थानिक प्रकारचे पक्षी व अनेक परदेशी पक्षी याठिकाणी आपणांस पाहायला मिळतात.

अवघड पायरी मार्ग :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


कर्नाळा देवीचे दर्शन घेऊन आपण पुढें चालत जंगल वाटेने पायरी मार्गाजवळ येवून पोहोचतो. हा मार्ग फार खडतर आहे. चढण्यासाठी रेलिंग लावलेले पाहायला मिळते . शत्रूला गड चढताना दमछाक व्हावी यासाठी या ठिकाणी पायऱ्या उंच सखल लहान मोठ्या आकाराच्या बनवलेल्या आहेत.

टेहळणी बुरुज

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


किल्याच्या परिसरात एक बुरुज देखील आपणांस पाहायला मिळतो. जेथून परिसरातील टेहळणी करता येवू शकत असे.

खडतर कातळ मार्ग :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


पूढे आपल्याला किल्याच्या चढणीचा कात्याळ अरुंद मार्ग लागतो. जो खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून वर जावा लागतो. दोन्ही बाजुस तीव्र उतार व मध्ये हा मार्ग या मार्गाने आपण किल्याच्या दरवाजाकडे जाऊ शकतो. जागोजागी चढण्यासाठी रेलिंग लावलेले पाहायला मिळते. त्याच्या आधाराने चढण सुकर होते.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi
भग्न दरवाजा 


प्रथम दरवाजा :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


वर चढून आल्यावर एक छोटे खानी प्रथम दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. बाजूला भिंत व मध्यभागी दरवाजा येथून आतमध्ये प्रवेश होतो.

दुसरा दरवाजा :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


प्रथम दरवाजा पार केल्यावर गोमुख चढणीचे वळण चढल्यावर लगेचच दुसरा मोठा दरवाजा आपणांस पाहायला मिळतो. या दरवाजातून आपण किल्यात प्रवेश करतो. या दरवाजातून पायरी मार्गाने गडावर पोहोचतो.

जंग्या व फांज्या :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


• किल्यावर जागोजागी आपणास जंग्या व फांज्या पाहायला तटबंदीत मिळतात. काळाच्या ओघात बराचसा किल्याचा भाग ढासळलेला पाहायला मिळतो.

वाडा:

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


गडाच्या वरील बाजूस छत नसलेली एक वास्तू पाहायला मिळते. ती एक वाडा असावा. किंवा एखादं धान्य कोठार सुद्धा असावे असे मानले जाते.

इतर वास्तू अवशेष :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


गडावर अनेक भग्न अवशेष पाहायला मिळतात यातील काही निवासी वास्तूचे असावेत. तसेच शिबंदीत राहणाऱ्या लोकांसाठी निवारा खोलीचे असावेत.

लिंगोबाचा सुळका :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


या परिसरात राहणाऱ्या ठाकर, कातकरी आदिवासी या डोंगराच्या उंच सुळक्याला लींगोबा म्हणजेच महादेवाची पिंडी समजून पूजा करतात. व या डोंगराचा आकार ही महादेव पिंडी सारखा आहे. अत्यंत कठीण कात्याळ सुळका. हा सुळका सर करण्यास मनाई आहे. कारण येथे मधाची पोळी, तसेच अनेक पक्षी घरटी पाहायला मिळतात.

पाण्याची टाकी :

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi


लिंगोबाच्या सुळक्या खाली आपणास अनेक पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. जी येथे बारमाही पाणी पुरवठा करण्याचे काम करतात.

गुहा :

पाण्याच्या टाक्याच्या वरील बाजूस अनेक गुहा पाहायला मिळतात. ही एक प्रकारची लेणी असावीत. यावरून हा किल्ला यादव किंवा त्यापूर्वीच्या काळातील राजवटीत बांधला असल्याचे समजते.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi
तटबंदी व वास्तू


कर्नाळा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती :

• कर्नाळा या परिसरात असणाऱ्या कातकरी व ठाकर या आदिम जमातीची या ठिकाणी सत्ता होती. ते या ठिकाणास नैसर्गिक लिंगोबा डोंगर या नावाने ओळखत असतं. त्यांची सत्ता प्राचीन काळापासून येथे होती.

• त्यानंतर या परिसरात झालेल्या प्राचीन राजवटी सातवाहन या सत्तेच्या अंमलाखाली हा प्रदेश होता.

• इसवी सन १२४८ ते इसवी सन १३१८ साली या ठिकाणीं यादव राजांची सत्ता होती. या काळातच येथे पाण्याची टाकी व गुहा खोदल्या गेल्याचे सांगितले जाते.

• यादव सत्तेच्या र्हासा नंतर येथे इसवी सन १३१८ ते इसवी सन १३१४ साली तुघलक, व नंतर खिलजी घराण्याची सत्ता होती.

• त्यानंतर काही काळ या ठिकाणीं गुजरातच्या सुलतानाची सत्ता या ठिकाणीं होती.

• इसवी सन १५४० नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत दाखल झाला.

• निजामशाहीच्या र्हासा नंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे काही काळ होता.

• इसवी सन १६५७ साली छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला.

• इसवी सन १६६५ साली झालेल्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मुघलांना देण्यात आला.

• इसवी सन १६७० साली पुन्हा मराठ्यांनी हा किल्ल स्वराज्यात दाखल करुन घेतला.

• छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशहाने इसवी सन१६८० नंतर हा किल्ला जिंकून घेतला.

• इसवी सन १७४० नंतर पेशव्यांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात पुन्हा जिंकून घेतला.

• इसवी सन १८१८ साली हा किल्ला इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथरने पेशव्यांकडून जिंकून इंग्रज राजवटीत दाखल करुन घेतला.

• इसवी सन १९४७ नंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.

• भारत सरकारच्या प्राणी व पक्षी यांसाठी राखीव असलेल्या वन अभयारण्यामध्ये कर्नाळा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित आहे. अनेक पक्षी निरीक्षक येथे येत असतात.

• मराठी फिल्म जैत रे जैत या फिल्मची निर्मिती याचं किल्याच्या परिसरात झाली. व हा किल्ला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाला.

कर्नाळा किल्याची माहिती  Karnala Fort Information in Marathi
किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य 


• अशी आहे कर्नाळा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती.

Karnala Fort Information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...