भाजे लेणी (bhaje Leni)
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात लोणावळ्यापासून काही अंतरावर असलेल्या मळवली स्थानकापासून जवळच भाजे गावी असणाऱ्या सह्याद्री डोंगर रांगेत आपणास भाजे लेणी पाहायला मिळतात.
उंची :
सदर लेणी भाजे गावापासून डोंगरात ४०० फूट उंचीवर आहेत.
• भाजे लेणी पाहायला जाण्यासाठीचा प्रवाशी मार्ग:
• महाराष्ट्र राज्यातील पुणे व मुंबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणापासून काही अंतरावर आपणांस भाजे लेणी पाहायला मिळतात.
• पुणे येथून लोणावळा तेथून पुढे मळवली स्टेशन तेथून पुढे तिन किलोमीटर अंतरावर भाजे लेणी आहेत.
• मुंबई येथून रेल्वेने तसेच रस्ते मार्गे आपण लोणावळ्याला येवू शकतो. तेथून भाजे लेणी पाहायला जाता येते.
• भाजे लेणी परीसरात पाहण्यासारखी ठिकाणे:
• पायरी मार्ग:
भाजे गावी आल्यावर आपणास लेणी परीसरात जाताना पायरी मार्ग लागतो. या मार्गानें आपण चढून भाजे लेणी आवारात येवून पोहोचतो . हा मार्ग बांधीव पायरी मार्ग आहे.
• चैत्य गृह :
पायरी मार्गानें आपण जेव्हा वरील बाजुस येतो. तेव्हा प्रथम आपणास तिकिट काढावे लागते. तेथून पुढे गेल्यावर आपणास विशाल चैत्य लागतो. बाहेरील बाजूस यक्षिनी शिल्पाकृती दिसून येते.चैत्याची रचना पिंपळ पानाच्या आकाराची कमान असणारी रचना, सुरेख वेदिका पट्टी आपणांस पाहायला मिळते. त्यावर सुंदर नक्षी कोरलेली दिसून येते. चैत्याचे छत गज पृष्ठ आकाराचे असून ते २२०० वर्ष जुने आहे. चैत्याच्या आतील बाजूस मध्यभागीं स्तूप असून दोन्ही बाजूला अष्टकोनी आकाराचे स्तंभ आहेत. एकूण २७ स्तंभ आपणांस पहायला मिळतात. स्तंभाच्या मागील बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. स्तंभावर कमळ पुष्प, चक्र, एका ठिकाणी खुंटी व त्यास अडकलेला हार अशी नक्षी कोरलेली आहे. खांबावर अस्पष्ट चित्रे दिसतात. ती बुद्धांची आहेत. असे जाणवते. वरील लाकडी तुळया आजही सुस्थितीत आहेत.
![]() |
खांबावरील नक्षी |
या ठिकाणीं बुध्द भिक्षू धार्मिक चर्चा, सुसंवाद तसेच अध्ययन करत असत. हा चैत्य १७ मिटर लांब , ८मीटर रुंद असा आहे. चैत्यकमानीवर जवळ जवळ १७२ छिद्रे पहायला मिळतात.
• दुमजली विश्रांती कक्ष:
चैत्याच्या बाजूला आपणांस उंच डोंगरात आतील बाजूस खोदून तयार केलेल्या खोल्या पाहायला मिळतात. यामध्ये आपणास बैठक व्यवस्था केलेली पाहायला मिळतें.तसेच जागोजागी गवाक्षे ठेवलेली दिसतात. वर्षा ऋतू काळात तसेच चारिका करत बुध्द धर्म प्रसार करणारे भिखु यांना राहण्यासाठी या बनवल्या गेल्या असाव्यात. यामध्ये वरील बाजूस चढून जाण्यासाठी आपणास पायरी मार्ग देखील खोदून केलेला आढळतो.
• अशी एकूण २२ लेणी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील एक चैत्य व उरलेली विहारे आहेत.
• विहारात विश्रांती कक्ष, आसन कक्ष पाहायला मिळतात.
• पिण्याच्या पाण्यासाठी हौद:
जागोजागी आपणांस पिण्याच्या पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. त्यातील पाणी अत्यंत शुध्द पिण्यायोग्य आहे. अत्यंत कोरीव अशी ही टाकी विहाराच्या बाजूस आढळतात. या टाक्यांमध्ये पावसाळा ऋतूत वरील डोंगरावरून खाली पडणारे पाणी साठते व ते वर्षभर उपयोगात आणले जात असे.
• ध्यान धारणा कक्ष:
काही लेण्यांमध्ये आपणांस आतील बाजूस छोट्या खोल्या खोदलेल्या पहायला मिळतात. ते ध्यान धारणा करण्यासाठी बनवले गेले आहेत. बुध्द धर्म प्रसारक जेव्हा या ठिकाणीं रहात असत त्यावेळी ध्यान करण्यासाठी या कक्षाचा वापर करत असत.
• स्तूप :
लेणी पहात असताना आपणास एका ठिकाणीं अनेक स्तूप बांधलेले पाहायला मिळतात. यातील बरेच स्तूप हे अत्यंत सुस्थितीत आहेत. बुद्ध भिखुंच्या आठवणी प्रीत्यर्थ प्रतीकात्मक उभारले असावेत असे सांगितले जाते.
• सूर्य लेणे :
![]() |
बुद्ध शिल्पाकृती |
भाजे लेणी पहात जाताना आपणास एक सुंदर लेणे लागते. ज्याच्या बाहेरील बाजूस अनेक खांब असून सुंदर शस्त्रधारी द्वारपाल कोरलेले दिसतात. ते शस्त्र धारण केलेले असून त्याबरोबर अनेक वन्यप्राणी लेणी भिंतीवर काढलेले दिसतात. या ठिकाणी चंद्र सूर्य यांचा देखावा व अनेक शिल्पाकृती दिसून येतात.
पहिले शिल्प चार घोडे रथावर स्वार झालेले सूर्य देव त्यांच्या छाया व संध्या या दोन पत्नीसह दिसून येतात. त्याच बरोबर सोबत दासी असून त्यांनी छत्र, चामरे हातात धारण करुन त्या सूर्य देवतेवर चवऱ्या ढाळत आहेत. अशी रचना दिसून येते. हे शिल्प हिंदू व बुध्द धर्माच्या संक्रमण काळात बनवले गेले असावे.