माहुली, पळसगड ,भंडारगड किल्ला माहितीMahauli palasgad,Bhandargad Fort Information in Marathi
• स्थान:
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील आसनगाव जवळ आपणांस एका ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये तीन जोडकिल्ले पाहायला मिळतात. त्यापैकी माहुली, पळसगड व भंडारगड असे हे जोड किल्ले आहेत.
• उंची :
माहुली किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची सुमारे २८१५ फूट असून हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर असलेला किल्ला आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग:
• मुंबई येथून ठाणे व तेथून पडघा मार्गे आसनगाव व तेथून आपण माहुली गडावर जाऊ शकतो.
• नाशिक मार्गे आल्यास इगतपुरी – कसारा घाट मार्गे शहापूर तेथून पुढे आसनगाव मार्गे माहुली गडावर जाऊ शकतो.
• माहुली किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• माहुली गडाच्या पायथ्याशी एक गणेश मंदिर आहे. त्या ठिकाणी आपणांस दोन प्रवाशी मार्ग पाहायला मिळतात. तेथील कमानी प्रवेश मार्गानें आपण माहुली गडाच्या दिशेने जाऊ शकतो. पुढे आपणास वन विभाग चे ऑफिस लागते. तेथे आपण प्रवेश तिकीट काढून पुढे गडाच्या दिशेने जाऊ शकतो.
• निसर्ग पर्यटन केंद्राजवळून आपण पुढे रान वाटेने माहुली गडाकडे जाताना निसर्गरम्य अशा सह्याद्रीचे दर्शन घडते. तसेच वन संपदेची माहिती मिळतें.
• लाकडी पूल : जंगलातून किल्ल्याकडे जाण्यासाठी जंगलातून वाहणार्या ओढ्यावर लाकडी पूल बांधण्यात आला आहे. तो पार करुन आपण गडाकडे जाऊ शकतो.
• तटबंदी :
![]() |
बुरूज व तटबंदी |
पायी दोन तासाची चढण चढून आपण किल्ल्याच्या तटबंदी जवळ येवून पोहोचतो. तिथं आल्यावर वरील भागातील ध्वज स्तंभावरील भगवा ध्वज फडकताना आपल्याला दिसतो.
• शीडी मार्ग :
तटबंदीला लागूनच किल्याच्या वरील बाजूस जाण्यासाठी एक लोखंडी शिडी लावलेली आहे. त्या मार्गानें आपणं गडावर जाऊ शकतो.
• पाण्याचे टाके :
गडावरील बांधकाम करताना सखल भागातील दगड काढून ते येथील वास्तू तटबंदी बांधताना वापरले गेले. त्या ठिकाणी पानी साठवण्याची टाकी बनवली गेली. त्यामधील साठलेले पाणी हे वर्षभर उपयोगात आणले जात असे.
• मंदिर वास्तू अवशेष महादेव पिंडी :
माहुली गडावरील पानी टाक्यापासून आपणं पुढे गेल्यास काही अंतरावर एक महादेव पिंडी व काही अवशेष पहायला मिळतात. जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेली पाहायला मिळतात.
• छत्रपती शिवराय पुतळा :
पुढे आपणं किल्ल्याच्या महादरवाजाकडे जाताना आपल्याला अलीकडेच स्थापन केलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा पहायला मिळतो. त्यांचे दर्शन घेऊन आपण पुढे महादरवाजा कडे जाऊ शकतो.
• माहुली किल्ला महादरवाजा :
![]() |
गोमुख पद्धतीची वाट |
![]() |
पहारेकरी देवड्या |
किल्याच्या महादरवाजाची बरीचशी पडझड झालेली पाहायला मिळते. या दरवाजाची बांधणी गोमुख पद्धतीची आहे. या बांधणीमुळे शत्रूला किल्याचा दरवाजा भेदने अवघड जातं असे. गोमुख म्हणजे गाय वासराला चाटतानाचे वळण. यामुळे किल्याचा दरवाजा आतील बाजूस सुरक्षित राहतो. व बुरुजातून दरवाजा लवकर दिसत नाही. दरवाजाच्या वरील भाग कोसळलेला आहे. उभे पाडतर शिल्लक आहे. वरील भागाचे तसेच तटबंदीच्या दगडाचे अवशेष बाजूला पडलेले पाहायला मिळतात. दरवाजा हा उंच दरडी जवळ असल्याने त्यामध्ये आत खोदून पहारेकऱ्यांसाठी देवड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच दरवाजाच्या बाहेरील बाजूस शरब या प्राण्याची शिल्पाकृती पहायला मिळते.
दरवाजा लावण्यासाठी लाकडी अडसर अडकवण्याची खोबणी देखील दिसून येते. काही दगडावर सुंदर नक्षी कोरलेली आहे.
• वाडे व मंदिरे यांचे अवशेष:
![]() |
विरगळ व मंदिर अवशेष |
माहुली गडावर फिरताना आपण जेव्हा भंडारगडाकडे जाणाऱ्या मार्गानें जाताना आपणास वाटेत एके ठिकाणीं वाड्याचे तसेच मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात.
• राजसदरेचे अवशेष :
किल्ला भ्रमंती करत आपणं पुढे गेल्यावर आपणास चार पाच पायरी असणारा उंच जोता असणारे बांधकाम दिसून येते. यासाठी अनेक घडीव दगड वापरले गेले असावेत. वरील बाजूस बैठक व्यवस्था असलेली रचनेवरून जाणवते. हे राजसदरेचे अवशेष आहेत. या ठिकाणीं प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठका होत असत. या वास्तू शेजारी एक तुळशी वृंदावन असल्याचे आढळते.
• वास्तू अवशेष:
सदरेचे मागील बाजूस आपणांस एक वास्तू अवशेष दिसतात. ती एक रहिवासी वास्तू असल्याचे जाणवते. तिची बरीच पडझड झालेली आहे.
• प्राचीन शिवमंदिर माहुलीश्वर :
• माहुली किल्यावर आपणांस एक शिवमंदिर आढळते. याच्या तिन्ही बाजूच्या भिंती सुस्थितीत असल्याच्या दिसून येतात. आतील गर्भगृह खुले असून तेथे एक शिवलिंग पाहायला मिळते. येथे एक भगवा ध्वज देखील पाहायला मिळतो.
• दारुगोळा कोठार :
किल्याच्या एका बाजूला नामशेष होण्याच्या अवस्थेत असलेले एक बांधकाम दिसते. ते किल्ल्यावरील दारुगोळा ठेवण्याचे ठिकाणं म्हणजेच दारुगोळा कोठार होते.
• भंडार गड :
माहुलीस्वराचे दर्शन घेवून आपण जेव्हा महादरवाजा कडे जाणाऱ्या वाटेस येतो त्यावेळी तिथं एक जोड रस्ता लागतो. त्या वाटेने आपणं भंडार गडाकडे जाऊ शकतो.
भंडारगड हा माहुली गडाच्या दक्षिण पश्चिम दिशेस कोकण बाजूस लागतो.
या वाटेने निघाल्यावर आपणांस वाटेत काही वीरगळी लागतात.
![]() |
तसेच काही शिल्पे देखील पाहायला मिळतात. पुढे या ठिकाणीं जाण्यासाठी आपणास वाटेत खिंड लागते. या ठिकाणी वर चढून भंडार गडावर जाण्यासाठी लोखंडी शिडी लावलेली पहायला मिळते. या सीडीने आपणं भंडार गडावर जाऊ शकतो.
भंडार गडावर आपणास हत्ती खाण्याचे अवशेष पहायला मिळतात. तसेच कोकण बाजूला असणारा कल्याण दरवाजा पहायला मिळतो.
•
गड माथा व कोकण (कल्याण)दरवाजा –
सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या गडाचा माथा चढने कठीण जाते. जागोजगी लोखंडी शिडी लावलेली पहायला मिळते. यावरून वरील भागात चढून गेल्यावर आपणास दूरवर वजीर सुळका तसेच भटजी व नवरा नवरी सुळके देखील पहायला मिळतात. तसेच तानसा अभयारण्याचे दर्शन होते.
• कल्याण दरवाजा :
हा दरवाजा कोकणाकडील बाजूला असून तो पाहायला जाताना खोल घळीच्या टोकास उतरून जावे लागते. हल्ली हा मार्ग खडतर असा असलेला दिसून येतो. आजही हा दरवाजा काळाच्या ओघात आपले अस्तित्त्व टिकवून ठेवून आहे.
• कल्याण दरवाजा हा खरा भंडार गडावर येण्याचा मार्ग मात्र अनेक शिवप्रेमी हे माहुली मार्गे येतात. कल्याण दरवाजाची वाट खड्या पायऱ्यांची असून ती खोल घळीतून दरीत उतरत असल्याने गिर्यारोहक या वाटेचा वापर करतात. ती चढताना दमछाक होते.
• हनुमान दरवाजा :
कल्याण दरवाजा पाहून पुन्हा मागे वळून शिडी मार्गानें उतरुन खोल घळीतील अरुंद वाटेने आपण हनुमान दरवाजाकडे जाऊ शकतो. वाटेत आपणास खडकात कोरलेली हनुमान मुर्ती देखील पहायला मिळते.
पळसदुर्ग (Palasdurg)
वाड्याच्या अवशेषापासून खालील दिशेने गेलेल्या वाटेने पुढे गेल्यास पुढे मोठमोठ्या शिळा लागतात. त्या ठिकाणी दोन मार्ग जातात. एक भंडारगडावर तर दुसरा पळसदुर्ग कडे जातो.
पळसदुर्ग किल्याच्या वाटेने पुढे आल्यावर आपणास उंच चढ लागतो. काळाच्या ओघात येथील वास्तू नामशेष झालेल्या आहेत.
![]() |
पळस दुर्ग वास्तू अवशेष असलेले पठार |
• दगडी तटबंदी :
पुढे आपण चढून गेल्यावर दगडी तटबंदी पहायला मिळते.
• घळ :
पुढे आपणास एक घळई पहायला मिळते. हे ठिकाणं उंचावर असल्याने आपणास तानसा धरणातील पाणीसाठा व अभयारण्याचे दर्शन घडते.
• गणेश दरवाजा :
सदर किल्याचा परीसरात अनेक झाडे झुडपे उगवल्याने येथील बांधकाम पाहण्यास अडचणी येतात. मात्र अलीकडे सह्याद्री प्रतिष्ठानने या ठिकाणी एक दरवाजा शोधून काढलेला आपणास पाहायला मिळतो. दरवाजाच्या चौकटीचे अवशेष व दरवाजाची जागा या ठिकाणची सफाई करण्याचे काम त्यांनी केले आहे.
• ऐतिहासिक घडामोडी :
• माहुली किल्ला व त्याचे जोडकिल्ले पळसदुर्ग आणि भंडारगड कोणी बांधले याचा ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. तरी देखील यादव किंवा त्यापूर्वी होऊन गेलेल्या हिंदू राजवटीतील हा किल्ला बांधला गेला असावा.
• इसवी सन१४८५ सालात हा किल्ला निजामशाहीत दाखल झाला.
• इसवी सनाच्या १६३५ -३६ या सालात निजामशाहीवर आलेल्या मुघल व आदिलशाही आक्रमणात शहाजी राजांनी निजामशाहीचे रक्षण करताना आपली पत्नी जिजाबाई व पूत्र शिवराय यांना या ठिकाणी सुखरूप ठेवलें होते.
• निजामशाही पाडावानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.
• इसवी सन १६६१साली शिवरायांनी माहुलीचा किल्ला हा स्वराज्यात जिंकून घेतला.
• इसवी सन १६६५ साली पुरंदर तहात हा किल्ला परत मुघलांना दिला गेला.
• इसवी सन १६६८ साली हा किल्ला पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला पण यश आले नाही.
• परत मोरोपंत पिंगळे प्रधानांनी इसवी सन १६७० साली परत स्वराज्यात दाखल करुन घेतला.
• पुढे संभाजीराजे यांच्या कालापर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता.
• इसवी सन १७३५ साली फितवून औरंगजेब बादशहाने किल्ला ताब्यात घेतला.
• पुढे पेशवाई काळात माहुली व जोडकिल्ले मराठा साम्राज्यात दाखल करुन घेतला.
• पुढे इसवी सन १८५७ साली मराठा इंग्रज तहाने हा किल्ला इंगर्जांच्या ताब्यात गेला.
• इसवी सन १९४७ साली हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
अशी आहे माहुलीगड, भंडारगड व पळसदुर्ग या किल्ल्याची माहिती