साल्हेर किल्ला माहिती
Salher Fort information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हयात सटाणा तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवर साल्हेर किल्ला आहे.
• साल्हेर किल्याची इतर नावे:
सालगिरी, शैल्यगिरी, महेंदेगिरी,
• उंची :
या किल्ल्याची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची ही 1567मीटर /5141फूट आहे.
• महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई असले तरी किल्यात सर्वात उंच असण्याचा मान तसेच उत्तुंग उंच असा हा साल्हेर किल्ला सर्व किल्ल्यांचा जिरेटोपच आहे.
• साल्हेर किल्ला पाहायला जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• मुंबई येथून नाशिक 166 किमी. तर पुणे येथून 120 किमी अंतर आहे तेथून सटाणा येथे यावे लागते. तेथून 50 किलोमीटर अंतरावर साल्हेर किल्ला आहे.
• गुजरात कडून येताना सुरत मार्गे येतं असाल तर नवसारी – अहवा - पांडवा - महारदरा – बाभुळणे - आलियाबाद – तेथून पुढे दक्षिणेला वळून वाघांबे मार्गे साल्हेरवाडी तेथून पुढे साल्हेर किल्ल्याकडे जाता येते.
• सटाणा कडून येताना डांगसौदाणे साल्हेर – साल्हेरवाडी तेथून साल्हेर किल्यावर जाता येते.
• नाशिक कडून येताना नाशिक – दिंडोरी – वणी –नंदुरी – मोहदरी – अभोना – कनाशी – कारंजखेडा – साकोडे – साल्हेरवाडी मार्गे आपणं किल्ल्याकडे जाऊ शकतो.
• किल्ला पायथ्याशी असलेले मार्ग:
• वाघांबे येथून आपणं गडाकडे पायी जाताना साल्हेर सालोटा खिंडीतून पुढे गेल्यावर गड चढताना चार दरवाजे लागतात. येथून गडावर जाता येते.
• साल्हेरवाडी मार्गे सरळवाट असून या मार्गे गडावर जाताना सहा दरवाजे लागतात.
• माळदर मार्गे साल्हेर सालोटा खिंडीतून मार्ग गडाकडे जातो. पण त्याचा वापर सहसा होत नाही.
• वाहनतळ :
साल्हेरवाडीतून गडाकडे जाणाऱ्या रस्त्याने आपणं वाहनतळ असलेल्या ठिकाणी प्रथम येवू शकतो. या ठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत. येथे अल्पोपहाराची सोय होऊ शकते.तसेच गाडी पार्किंग करू शकतो.
• पायवाट व विरगळ:
चालत पाय वाटेने जाताना वाटेत आपल्याला वीरगळ पाहायला मिळते. जी एक ढाल धारण केलेल्या व भाला फेकणाऱ्या योध्याचे शिल्प आहे. पूर्वी युद्धात विजय मिळवणाऱ्या योध्याच्या विजया प्रीत्यर्थ बनवली गेली असावी.
• भवानी देवी मंदिर :
वाटेत जाताना आपल्याला डाव्या बाजूस थोडया अंतरावर भवानी मातेचे मंदिर पाहायला मिळते.
• खडतर कात्याळ पायरी मार्ग :
वाटेने पुढे गड चढताना खडाचढ लागतो. तो अत्यंत खडतर पायरी मार्ग आहे. या पायऱ्या कात्याळ खडकात खोदलेल्या आहेत.
एका बाजूस बेलागकडे त्याच कड्यांना खोदून पायऱ्या बनवल्या आहेत.
• गणेश शिल्प :
वाटेत आपल्याला खड्या कात्याळात खोदलेले गणेश शिल्प दिसते. जे विघ्ननाश करणारी गणेश देवता जी आलेल्या गडावरील संकटाना दूर करण्यासाठी कोरली गेली असावी.
• प्रथम दरवाजा:
वर चढून आल्यावर आपणास प्रथम दरवाजा लागतो. ज्याची चौकट आजही शाबूत आहे. ज्याच्या वरील महिरपीवर हिंदू देवतांचे प्रतीक असणारे कमळ पुष्प कोरलेले आहेत. तसेच अन्य नक्षी कोरलेली पहायला मिळते.
• पायरी मार्ग:
पहिल्या दरवाजापासून वर पुन्हा पायरी मार्ग लागतो. बाजूला काही ठिकाणीं तटबंदी तर काही ठिकाणी अवघड चढ लागतो.
• या मार्गावर एकामागोमाग थोडे थोडे अंतर ठेवून असे सहा दरवाजे आहेत. या दरवाजाची ठेवणं प्राचीन हिंदू स्थापत्य शास्त्र वापरून तयार केली गेली आहे.या दरवाजावर हिंदू धर्मीय प्रतीके पहायला मिळतात.
![]() |
किल्याचा क्रमस्थ भक्कम दरवाजा |
![]() |
समांतर तटबंदी वाट |
• पहाडी गुहा व समांतर पायवाट :
तिसरा गडाचा दरवाजा पार केल्यावर आपणास उंच खडा दगडी पस्तर कडा व त्या शेजारी एक अरुंद वाट लागते. या वाटेने आपणं गडाच्या वरील भागाकडे जाऊ शकतो. या वाटेने जाताना आपणास बाजूला डोंगरातील खडक फोडून तयार केलेल्या गुहा तसेच पाण्याची टाकी पहायला मिळतात. जवळ जवळ या खोदीव टाक्या व गुहांची संख्या अंदाजे 20ते 21 असावी. या गुहेतून निघालेल्या दगडांचा वापर संरक्षक तटबंदी तसेच इतर वास्तू व दरवाजे बांधण्यासाठी केला असावा.
• चौथा दरवाजा :
गडाच्या चौथा दरवाजा देखील इतर दरवाजा प्रमाणेच बांधणी असलेला दिसून येतो. या ठिकाणी मात्र आपणास एक शिलालेख दरवाजाच्या कमानीवर कोरलेला पाहायला मिळतो.
• वाड्याचे अवशेष :
गडाच्यावरील बाजूस आल्यावर आपणास एक बांधकाम दिसते. या ठिकाणी आपणास पायऱ्या व जोत्याचे अवशेष दिसतात. तत्कालीन काळातील वास्तूचे अवशेष आहेत हे. या ठिकाणी त्या काळात सरदार तसेच अनेक अधिकारी तसेच किल्लेदार व कर्मचारी यांच्या बैठका होत असत.
• विस्तीर्ण आवार :
किल्याच्या वरील भागात आपणास विस्तीर्ण आवार पाहायला मिळतो.
• पाण्याची टाकी :
किल्याचे बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड सखल भागातून काढून त्याचा वापर केला. व त्या दगड काढलेल्या भागात आपणास पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यातील पाणी तत्कालीन पिण्याची व खर्चाची गरज भागवत असे.
• कात्याळ वस्ती खोल्या :
किल्यावर आपणास खडक खोदून बनवलेल्या कात्याळ खोल्या पाहायला मिळतात. ज्यांचा वापर निवासासाठी करण्यात येत असे. आजही या सुस्थितीत आहेत.
• हनुमान मंदिर :
किल्ल्यावरील कात्याळ खोलीतील एके ठिकाणीं आपणास संकटमोचन हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. जी संकटकाळी योध्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असे.
• गंगासागर तलाव:
मध्ययुगीन काळात किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवणेसाठी गंगासागर तलावाची निर्मिती केली गेली. अत्यंत सुरेख अशी रचना येथे पहायला मिळते. हा तलाव गडाच्या उंच भागी पाहायला मिळतो. भर उन्हाळ्यात देखील यामध्ये भरपूर पाणी असते. पाण्याची उंची मोजण्यासाठी मध्यभागीं एक स्तंभ देखील आहे.
• रेणुका देवी मंदिर:
तलाव शेजारी आपणास देवी रेणुका मंदिर पाहायला मिळते. मंदिराच्या कलश भागाची मोडतोड झालेली पहायला मिळते. गाभाऱ्यात देवीचे मुर्ती आहे. तर शेजारी गणेश मुर्ती पाहायचा मिळतें. रेणुकादेवी पूत्र परशुराम यांचे वास्तव्य या ठिकाणी होते. त्यांनीच येथे देवीची स्थापना केली आहे. मंदिरा बाहेरील खांबावर नक्षी कोरलेली दिसून येते.
• यज्ञ वेदी:
• परशुराम मंदिर :
परशुरामाने संपूर्ण पृथ्वी जिंकून ब्राह्मणांना दान केली. व आपल्यासाठी नविन प्रदेश निर्माण करण्यासाठी परशुराम साल्हेर गडावर आले. या ठिकाणी थोडे तप करुन त्यांनी येथून आपल्या धनुष्य बाणाने समुद्र थोडा दुर हटवला व जमीन निर्माण केली ती म्हणजे कोकण भूमी. त्यासाठी सोडलेला बाण याचं ठिकाणाहून व येथे त्यांनी ज्या ठिकाणी तप केले ते ठिकाण साल्हेर किल्ला होते. गडाच्या वरील शिखर भागी आपणास परशुराम मंदिर पाहायला मिळते. या मंदिरात पादुका व मूर्ती पाहायला मिळते.
![]() |
गडाची खडी चढण व दरवाजा |