Showing posts with label माणिकगड किल्ल्याविषयी माहिती Manikgad Fort information in Marathi. Show all posts
Showing posts with label माणिकगड किल्ल्याविषयी माहिती Manikgad Fort information in Marathi. Show all posts

Saturday, November 9, 2024

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती Manikgad Fort information in Marathi

 माणिकगड किल्ल्याविषयी माहिती

Manikgad Fort information in Marathi

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात सहयाद्री पर्वतात माणिकगड किल्ला आहे.

• उंची :

या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ही सुमारे ७६० मीटर उंचीवर हा किल्ला आहे.

माणिकगड किल्ला पाहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग:

• मुंबई पुणे महामार्गावरील पनवेल येथून पुढे सावळा फाटा येथून - रसायनी – पाताळगंगा m.i.d.c. येथून पुढे वाशीवली – वडगाव येथून पुढे आपल्याला माणिक गडावर जाता येते.

• पनवेल – खोपोली – वाशीवली - ठाकरवाडी – कच्च्या रस्त्याने कातकरवाडी येथून पठारावरून आपण माणिकगडावर जाऊ शकतो.

• पुणे व मुंबई ही दोन आंतरराष्ट्रीय शहरे या किल्ल्यापासून जवळील आंतरराष्ट्रीय स्थानके आहेत.

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

माणिकगडावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• वडवली गावात आल्यानंतर आपण तेथून पुढे ठाकरवाडी येथे आल्यावर आपणास पुढे मोठे पठार पाहायला मिळते. या पठारावरून पुढे डोंगरास वळसा घालून आपण पुढे जंगल झाडीतून वर चढून माणिक गडावर जाऊ शकतो.

• भग्न वास्तू अवशेष:

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

काही अंतरावर आपणास काही दगडी अवशेष पडलेले पाहायला मिळतात. ते या ठिकाणी माची परिसरातील वास्तूचे अवशेष आहेत. यावरून येथे वस्ती होती. हे समजते.

• हनुमंत मंदिर : 

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

 या ठिकाणी वाटेत आपणास वाड्याचे अवशेषा पूर्वी एका मंदीराचे अवशेष पहायला मिळतात वर एक छपर तयार केलेले असून तेथे एक हनुमंत देवतेची मूर्ती पाहायला मिळतें हनुमंत हा संकटमोचन आहे म्हणून त्याचे मंदिर प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतें.

• भग्न दरवाजा :

गडाच्या पूर्व दिशेने आपण गडावर प्रवेश करतो. त्यावेळी आपणास तिथे भग्न दरवाजा पाहायला मिळतो. काळाच्या ओघात दुर्लक्षतेमुळे हा नष्ट झालेला आहे.

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

• पडलेली तटबंदी : 

गडमाथ्यावर आल्यावर आपणास जागोजागी पडलेल्या तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.

• शिवमंदिर :

गडावर एक लहान शिव मंदिर आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवराय यांची प्रतिमा ठेवलेली दिसून येते.

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

• पाण्याचे टाके :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

पुढे आपल्याला एक खोदीव पाणी टाके पाहायला मिळते. ज्यातील दगड बुरूज व तटबंदी बांधण्यासाठी वापरले होते.नंतर त्याचा वापर पाण्याच्या टाक्याच्या स्वरुपात केला होता.

• चुन्याची घाणी :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाचे दरवाजे, तटबंदी व इतर वास्तू, वाडे यांचे बांधकाम करण्यासाठी लागणारा चुना बनवण्याची घाणी या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. यामधील दगडी चाक नाहीसे झाले आहे.

• उत्तरमुखी दरवाजा :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाच्या उत्तर बाजूस एक अर्धवट असणारे दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. हा दरवाजा किती भक्कम होता. ते यावरील बांधकामावरुन समजते. आतील बाजूस दगडी अडसर लावण्याची रिकामी जागा दिवळी पाहायला मिळते. तसेच आत असणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रांती देवड्या पाहायला मिळतात. विशेषत हा मुख्य दरवाजा असावा.

• चोर दरवाजा :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

दरीच्या बाजूने आपण चालत आपल्या उजवीकडे वळून पुढे गेल्यावर आपणास चोर दरवाजा लागतो. जो संकटकाळी गडावरून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी केला गेला असावा.

• पाण्याची मूजलेली टाकी : 

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

तेथून पुढे थोडया अंतरावर पाण्याची मुजलेली टाकी पाहायला मिळतात. जी गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली होती.

• दक्षिण मुखी दरवाजा : 

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाच्या वरील बाजुस आपणास एक तटबंदी नसलेला दक्षिण मुखी दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजावर गणेश मुर्ती शिल्पाकृती केलेली पाहायला मिळते.

• राजवाडा व सदरेचे अवशेष :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाच्या वरील बालेकिल्ल्याच्या परिसरात आपणास सभोवती जोते असलेली वास्तू चौथरे पाहायला मिळतात. या ठिकाणी राज्य व्यवहार व इतर कामकाज चालत होते. ही एक सदर होती.

• न्हाणीघर अवशेष :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

या वास्तू मध्ये स्नानगृह अवशेष पहायला मिळतात. तसेच कपडे धुण्यासाठी बसवलेला दगड व सांडपाणी व्यवस्था केलेली पाहायला मिळते. यावरून तत्कालीन लोकांचे राहणीमान याविषयी अधिक माहिती मिळते.

• इतर वास्तू अवशेष :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

या परिसरात आपणास इतर भग्न वास्तूचे अवशेष पहायला मिळतात. मुख्य विस्तृत दालन व आतील लहान खोल्यांची रचना देखील अवशेषातून जाणवते.

• पाण्याचे टाके : 

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

मुख्य सदर व वड्यास लागूनच एक विस्तृत असे मोठे पाण्याचे टाके खोदलेले पाहायला मिळते. ज्यातील पाणी तत्कालीन गडाच्या रहिवाशांसाठी पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधले गेलेले होते.

• सलग पाणी टाकी :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाच्या उत्तर बाजूस आपणास सलग खोदलेली पाण्याची लहान मोठी टाकी पाहायला मिळतात.

• शिव मंदिर :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडावर उत्तरेस पाण्याच्या टाक्याच्या बाजूस एक भग्न अवस्थेत खोल असे शिवमंदिर पाहायला मिळते. शिवपिंडी व त्यासमोर नंदी व त्रिशूळ आहे. तसेच शेंदूर फासून प्राणप्रतिष्ठा केलेल्या हिंदू देव गणपतीची मुर्ती व इतर देवतेचे अवशेष पहायला मिळतात.

• बुरूज : 

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाचे बरेचसे बुरूज काळाच्या ओघात ढासळलेले असून त्यातील उत्तर बुरुजाजवळ तटबंदीस लागून दरीच्या टोकावर आपणास पाण्याचे टाके खोदलेले पाहायला मिळते. या ठिकाणी असलेल्या बुरुजात जंग्या व फांज्या आहेत. ज्या शत्रूवर बाण व तोफांचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी केलेल्या होत्या.

• बालेकिल्ला तटबंदी :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

गडाच्या बालेकिल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत असलेली पाहायला मिळते.

• राहुटी छिद्रे :

माणिकगड किल्ल्याविषयी माहिती  Manikgad Fort information in Marathi

हा किल्ला कठीण कात्याल पठाराचा असल्याने येथे पहारेकर्याना विश्रांतीसाठी राहुट्या उभा केल्या जात असत. त्यासाठी कात्याळ खळगे खोदलेले पाहायला मिळतात.

• काळाच्या ओघात बरीच अवकळा या किल्यात आलेली पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी ढासळलेली तटबंदी व इतर बुरूज नष्ट झाल्याने किल्यात अवकळा आली आहे.

माणिक गडाच्या उत्तरेस प्रबळगड, चंदेरी, माथेरान, इर्शाळगड ही ठिकाणे आहेत. तर वायव्येस कर्नाळा सांकशी किल्ला आहे.

माणिकगडाची ऐतीहासिक माहिती :

• माणिकगडाची स्थापना ही शिलाहार राजा भोज राजवटीच्या काळात झाली.घाटमार्गावरील व्यापारी सुरक्षेसाठी व टेहळणीसाठी या किल्याची निर्मिती केली होती.

• त्यानंतर हा किल्ला राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक तसेच यादव राजवटीत हा किल्ला होता. या सर्व हिंदू धर्मीय राजांच्या राजवटी होत्या.

• पुढे हा किल्ला इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर बहामनी सत्तेच्या नियंत्रणात आला.

• बहामनी शासनाच्या अस्तानंतर हा किल्ला निजामशाही राजवटीत दाखल झाला.

• इसवी सन १६५६ साली हा किल्ला हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवरायांनी दाखल करुन घेतला.

• इसवी सन १६६५ साली झालेल्या पुरंदर तहा नुसार हा किल्ला मुघल बादशहा औरंगझेबास दिलेल्या २३ किल्ल्यामध्ये किल्ला देण्यात आला.

• पुढे पुन्हा हा किल्ला आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्यात जिंकून घेतला.

• पुढे हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

• पुढील काळात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे याची मोठ्या प्रमाणत पडझड झाली.

• ब्रिटीश राजवटीनंतर हा किल्ला सध्या स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.

• अशी आहे माणिकगड किल्ल्याची माहिती.

Manikgad Fort information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...