वीरगळी विषयी माहिती
Hiro stone information in Marathi
• मराठी नाव : वीरगळ,
• कन्नड नाव : वीरकल्लू,
• मल्याळम नाव : तर्रा,
• इंग्रजी नाव : हिरो स्टोन ( Hiro stone)
• विर उत्पत्ती :
प्राचीन काळी आर्य भारतात आले. ते समूहाने राहत. त्यावेळी अन्न धान्य कमी असायचं. त्यावेळी अन्नाची गरज भागवण्यासाठी गायी , म्हशी पाळल्या जात. गाय ही जास्त काळ दूध देते. त्यामुळे त्या गाई या उदर निर्वाहाचे साधन असत. त्यांची एक समूह दुसऱ्या समुहापासून चोरी करत असे. त्यांचे व आपल्या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी समूहातील दणकट, भांडखोर, चपळ, धाडशी व लढावू मुलांना गायी व गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली जात असे. ती मुले सराईत चोरांशी लढत . व गाई व आपल्या वसाहतीच्या संपत्ती व लोकांचे रक्षण करत.
![]() |
वीरगळ विषयी माहिती Hiro stone information in Marathi |
• शस्त्र शिक्षण व वीर :
ती लढावू मुले पुढे शास्त्र शुद्ध निरनिराळ्या नैसर्गिक प्राणी , पशू , पक्षी व अनेक धाडशी प्रसंगातून शस्त्र चालवणे व युद्ध करणे यासारख्या गतिविधि करू लागली. व यातून शूर वीरांची निर्मिती झाली. व पुढे हे वीर राज्य संरक्षणाचे काम करु लागले.
• वीरगती :
एखादा लढावू योद्धा जर शत्रू सैन्याशी लढताना मरण पावला, अथवा कोणतेही धाडशी समाज हिताचे कार्य करताना धारातीर्थी पडला. तर त्यास वीरगती प्राप्त होत असे.
• वीरगळ :
वीरगळ हा प्रकार कर्नाटक राज्यातून आलेला आहे.
लढाई व धाडशी कृत्य म्हणजे वाघाच्या हल्यातून एखाद्या गाईचे, माणसाचे रक्षण करणे, एखाद्या युद्धात मरण पावणे, एखाद्या समुद्री हल्यावेळी नावेतून शत्रूशी लढताना वीरमरण आले तर त्याच्या स्मरणार्थ एक दगड शिल्पकृती करून त्या वीराच्या जीवनातील प्रसंग कोरून उभा केला जातो त्यास वीरगळ म्हणतात.
• वीरगळीचे प्रकार :
• वीरगळीचे भाग :
विशेषत वीरगळीचे तीन, चार, पाच टप्पे असतात.
• वीरमरण :
एखादा वीर मृत पावलेल्या वेळचा प्रसंग या ठिकाणी कोरलेला पाहायला मिळतो. हा वीरगळीचा खालील अंतिम टप्पा असतो.
• शौर्य प्रसंग / वीर प्रसंग :
वीरगळीचा शेवटच्या टप्याचा वरील भाग होय. काही वीरगळीमध्ये हा अंतिम तळास असतो म्हणून याला तळाचा भाग म्हणतात. यामधे विराने केलेला पराक्रम कोरलेला असतो. जर एखादा वीर गाईची रक्षा एखाद्या वाघापासून करताना मृत झाला असेल. तर वीरगळीच्या पहिल्या टप्प्यात गाईच संरक्षण करताना व वाघाशी लढतानाचा प्रसंग कोरलेला पाहायला मिळतो.
• एखादा वीर पायदलातील असेल युद्ध करताना मृत झाला असेल. तर तो ढाल तलवार व भाला घेवून लढतानाचा प्रसंग कोरलेला दिसतो.
• एखादा वीर समुद्र किनारी असेल. व जहाजावर असेल. व परचक्र आल्यावर लढताना मृत पावला असेल तर आपणास जहाज व त्यातील लढणारे सैन्य प्रसंग वीरगळीच्या पहिल्या टप्प्यात कोरलेला दिसून येतो.
• एखादा वीर घोडेस्वार असेल व युद्धात मरण पावला असेल. तर घोड्यावर स्वार होऊन लढणारा वीर शिल्पाकृती मध्ये कोरलेला दिसून येतो.
• एखादा राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व मंत्री मरण पावला असेल तर त्या संबंधित रथ व त्याच्या हुद्या संबंधित रथ व इतर आयुधे कोरलेली पाहायला मिळतात.
• वीरगती व स्वर्गारोहन :
युद्ध प्रसंग व त्याच्या वरील हा टप्पा असतो. यामध्ये अप्सरा किंवा देवदूत त्या विरास धरून स्वर्गाकडे घेऊन जाण्यासाठी आलेला प्रसंग असतो. यामधे त्यांनी विरास पकडुन वर घेवून जातानाचा प्रसंग शिल्पाकृत केलेला दिसून येतो. एखादा वीर लढताना व कोणतेही समाजहिताचे रक्षण करत असताना मृत पावला असेल तर त्यास स्वर्ग प्राप्ती होते असे समजले जाते.
• स्वर्ग प्राप्ती :
या स्वर्गारोहनच्या वरील बाजूस असणारा हा भाग आहे. यामध्ये एका बाजूस पुरोहित असतो. जो देव पूजा करत आहे. ज्याच्या हातात. घंटी व इतर पूजा साहित्य आहे. व तो पूजा करत आहे. त्या शेजारी शिवपिंडी किंवा विष्णू व इतर देवता शिल्पाकृती असते. जर मृत वीर शिव उपासक असेल. तर शिवपिंडी व विष्णू भक्त असेल तर विष्णूमूर्ती कोरलेली दिसून येते. व त्या शेजारी वीर हात जोडून नमस्कार करतो आहे. बसून वंदन करत आहे. अशी शिल्पाकृती दिसून येते.
• अमृत कलश चंद्र सूर्य कलाकृती व मोक्ष प्राप्ती :
वीरगळीच्या वरील भाग हा अमृत कलश असतो. जो विराचे अमृत तुल्य कार्य दर्शवतो. हा कलश सर्वात वरील भागात असतो. याच्या शेजारी चंद्र व सूर्य कोरलेले आढळतात. जे या विराचे कार्य हे जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत. तोपर्यंत अमर राहील असे सुचिवतात. काही ठिकाणी कमल पुष्प, शरभ शिल्पे सुद्धा कोरलेले आढळतात. तसेच त्या लढावू विरास मोक्ष प्राप्ती होते असे समजले जाते.
अशा वीराच्या सन्मानार्थ विरगळी उभारल्या जात असत. अशा अनेक विरगळी आपणास भारत देशात व आपल्या महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतात.
• महाराष्ट्र राज्यातील वीरगळ असणारी ठिकाणे :
• कोल्हापूर जिल्हा : कसबा बीड. रायगड दिवेआगर : देगाव शिवमंदिर वीरगळ, मुंबई बोरिवली येथील एकसर वीरगळ,
• निमगिरी किल्ला पायथा गाव खांद्याचीवाडी येथे ४० वीरगळी आहेत. या ठिकाणी निरनिराळ्या वीरगळी पाहायला मिळतात.
अशी आहे वीरगळ या ऐतीहासिक भौतिक साधनाची माहिती.Hiro stone information in Marathi