Showing posts with label इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती Irshalgad Fort information in Marathi. Show all posts
Showing posts with label इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती Irshalgad Fort information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती Irshalgad Fort information in Marathi

 इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती

Irshalgad Fort information in Marathi

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात पनवेल व कर्जत तालुक्याच्या दरम्यान सह्याद्री पर्वतात माथेरान या थंड हवेच्या ठिकाणा जवळील डोंगर रांगेत इर्शालगड हा किल्ला आहे.

• उंची : या किल्ल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून ३७०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.


इर्शाळगड किल्ला पाहायला जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग :

• इर्शाळगड हे ठिकाण मुंबई पासून ६० किलोमीटर अंतरावर तर पुणे येथून १०० किलोमीटर अंतरावर आहे.

• कर्जत येथून ५० किलोमीटर अंतरावर इर्शाळगड आहे.

• मुंबई वरून येताना पनवेल येथे येऊन तेथून बस किंवा खाजगी वाहनाने इर्शाळगड पायथ्याशी असणाऱ्या चौक या गावी खाजगी वाहनाने जाता येते. तेथून पायी ट्रेक करत आपण गडावर जाऊ शकतो.

• पुणे येथून लोणावळा – खोपोली – खालापूर मार्गे आपण चौक गावी व तेथून पुढे आपण पायी गडावर जाऊ शकतो.


इर्शाळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे :

खाजगी वाहनाने आपण मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आल्यावर तेथे असणाऱ्या नम्रेवाडी किंवा चौक गावी येऊन गड वाटेस एखादी सुरक्षित जागा पाहून गाडी पार्क करावी. तेथून पुढे पायी चालत ट्रेकिंग सुरू होते. डोंगरी पायवाट चढेल भागाकडे म्हणजेच इर्शाळवाडीकडे घेवून जाते. जसजसे उंच चढून जावे तसे आपणास सुंदर हिरवागार निसर्ग रम्य परिसर व मोरबे धरणाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


 वाटेत जागा मिळेल तिथे विश्रांती घेत आपण इर्शाळवाडीकडे जाऊ लागतो. जाताना वाटेत निरनिराळ्या रंगाच्या छटा व आकाराच्या जैव विविधतेन नटलेल्या वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचे दर्शन घडते. पण या ठिकाणी जाताना आपणास गिरीभ्रमन करण्याची सवय असावी लागते. तसेच प्रवासात आपली पाण्याची बाटली असेल तर उत्तम, तसेच या परिसरात सरीसृप प्राणी आहेत. फुरसे ही विषारी सापाची जात या परिसरात पाहायला मिळतें. यासाठी तुमच्याकडे विष रोधक औषधे असणे गरजेचे आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• इर्शाळवाडी:

पायी चालत ट्रेकिंग करत आपण इर्शाळवाडी गावात येतो. सुंदर मातीची तसेच कुडाच्या भिंती असलेली घरे सुंदर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतात. या गावातून पुढे चालत गावाबाहेर असणाऱ्या छोट्याशा इर्शाळदेवी मंदिरा जवळ आपण येऊन पोहोचतो. ही या ठिकाणची ग्रामदेवता आहे. गडावर देवीचे मंदिर आहे. पण लहान मुले व वृध्द लोकांसाठी सोयीचे व्हावे म्हणून याठिकाणी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे.

• हल्ली झालेल्या भुस्खलनामुळे या गावातील घरांची मोठ्या प्रमाणत पडझड झाली आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi
भूस्खलन झाल्यावर इर्शाळगड 


• विशाल शिळा:

मंदिराच्या समोरच एक रान वाट ही गडाच्या दिशेने वरील बाजूस जाते. वाटेत डोंगराचे कडे तुटून खाली पडून गुहा निर्माण झालेली आहे. येथून आपण पुढे इर्शाळगड म्हणजेच इर्शाळ सुळक्याकडे जावू शकतो. जाताना वाटेत विशाल अशा शिळा पाहायला मिळतात. तेथून आपण वरील भागात गडाकडे जावू शकतो.


• सिडी मार्ग व पाण्याचे टाके:

पुढे आपणास तुटलेला पायरी मार्ग लागतो. त्या ठिकाणी आपणास वरील बाजूस चढून जाण्यासाठी गिरिदुर्ग प्रेमींनी सिडी लावलेली पाहायला मिळते. तिथेच एका बाजूस खोदलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते.


• कठीण चढाई व दोर :

पुढे जसे उंच जावे तसे चढाई अवघड होते. तेव्हा वरील बाजुस चढून जाण्यासाठी एक दोर बांधलेला पाहायला मिळतो. पण आपण चढाई करताना दोर व बाजूच्या दरडी मधील खाचेचा वापर करून चढाई करावी लागते.


• निढं :

उंच चढून गेल्यावर आपण निढ्या जवळ येवून पोहोचतो. निढं हे नैसर्गिक निर्मित भुरुप असते. उन, वारा, पाऊस यांच्या माऱ्याने डोंगराच्या मधील मऊ खडक झिजून झिजून पडतात व मध्यभागीं एक छिद्र पडते, व निसर्ग निर्मित अशी एक कमान तयार होते. जिथे एक निवारा स्थान तयार होते. हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. याचा वापर विश्रांती साठी मध्ययुगात सैनिक करत असत.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• पाणी टाके व अर्धवट गुहा:

निढ्याचे जवळच एक पाण्याचे टाके खडकात खोदलेले पाहायला मिळते. व डोंगराचा कडा तुटून एक अर्धवट गुहा निर्माण झालेली पाहायला मिळते.

• पाण्याचे टाके :

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


निढ्या जवळून एक वाट खालील दिशेला जाते. तिथे एका बाजूला आपणास आणखी एक पाण्याचे टाके खोदलेले दिसून येते. आजकाल त्यातील पाणी अस्वच्छ आहे. मात्र मध्ययुगात त्यांची स्वच्छता नियमित होत असे. व पिण्यासाठी व खर्चासाठी त्याचा वापर केला जात असे. हल्ली झालेल्या दुरावस्थेमुळे तिथे झाड उगवलेले दिसून येते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• उंच शिखरे :

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


निढं पाहून जेव्हा आपण वरील अवघड चढ चढून वर जातो. तेव्हा आपण शिखराजवळ येऊन पोहोचतो. ही या ठिकाणची सर्वात उंच जागा. पावसाळ्यात या ठिकाणी सूनकीची फुले पाहायला मिळतात. सुनकी म्हणजे सूर्यफूलाचे लहान रूप होय.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• इर्शाळदेवी मंदिर :

शिखर पाहून खाली उतरून आल्यावर निढ्याच्या खालील बाजूस आपणास एक मंदिर पाहायला मिळते. ही आहे गड देवता, इर्शाळदेवी. तिचे छोटेसे मंदीर पाहायला मिळते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• गुहा : इर्शाळदेवीचे दर्शन घेऊन थोडस खालील बाजूस आल्यावर एका बाजूला अवघड चढाई करून गेल्यावर आपणास एक भुयारी गुहा पाहायला मिळतें. जी मध्ययुगात या ठिकाणी राहणाऱ्या शिबंदीतील सैन्यासाठी तयार केली गेली असावी. हल्ली या ठिकाणी वटवाघळांची वस्ती असते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• इर्शाळगड चढाई करणे थोडे अवघड आहे. गिरिभ्रमन करणारे तसेच गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी ती पोषक आहे.

• या ठिकाणाची बांधणी व स्थान पाहता हा किल्ला कल्याण परिसरात टेहळणीसाठी वापरला असावा. येथे. गडाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. मात्र याचे महत्त्व मध्ययुगात टेहळणीसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi


• तुम्हाला जर इर्शाळगड ट्रेक करायचा असेल तर तुम्ही या परिसरातील अनेक ठिकाणांची सहल करू शकता. प्रथम ठाकूरवाडी येथे येऊन आपण प्रबळगड व कलावंतीण दुर्ग पाहून त्या परिसरात वस्ती करू शकतो. त्यानंतर पुढे बोरिची सोंड पाहून मधल्या वाटेने इर्शाळगडाला जावू शकतो. तेथून खाली मोरबे धरण पाहून पुढे पनवेलला जाऊन कर्नाळा किल्ला पाहून पुढे चंदेरी व म्हैसमाळ सुळका पाहून माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जावू शकतो. असा दोन चार दिवसांचा ट्रेक आपला होऊ शकतो. पण यासाठी गिरिदुर्ग पाहण्याची आवड व चढाईचे परिश्रम घेता आले पाहिजे.


इर्शाळगडाविषयी ऐतिहासिक माहिती:

• इर्शाळगड हा किल्ला नसून तो एक सुळका आहे. त्याचे स्थान पाहता रायगड , प्रबळगड तसेच इतर किल्याच्या परिसरात टेहळणी साठी हे स्थान विकसित केले असावे.

• इर्शाळ गडाच्या खालील बाजूस असणाऱ्या चौक गावी नेतोजी पालकर यांचा जन्म झालेला आहे.

• स्वराज्य स्थापन केल्यावर कल्याण भिवंडी जिंकून घेताना मे १६६६ साली छत्रपती शिवराय यांनी इर्शाळगड जिंकून घेतला, व टेहेळणीसाठी या जागेची निवड केली .

• तसेच प्रतिकूल काळात लष्कर व संपत्ती गुप्तमार्गे पाठवणी करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी. तसे पाहता या ठिकाणास ऐतिहासक पार्श्वभूमी नाही.

• अशी आहे इर्शाळगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती

Irshalgad Fort information in Marathi


ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...