Showing posts with label पेमगिरी किल्ला माहिती Pemgiri Fort information in Marathi. Show all posts
Showing posts with label पेमगिरी किल्ला माहिती Pemgiri Fort information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

पेमगिरी किल्ला माहिती Pemgiri Fort information in Marathi

 पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

स्थान :

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पेमगिरी गावाजवळ पेमगिरी किल्ला आहे.

• उंची :

पिमगिरी किल्याची सरासरी उंची ही २७७२ फूट उंचीवर हा किल्ला आहे.

पेमगिर किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :

• पेमगिरी किल्ला पुण्यापासून १३४ किलोमीटर अंतरावर आहे.

• नाशिक पासून हा किल्ला ९१ किलोमीटर अंतरावर आहे.

नाशिक – सिन्नर – संगमनेर – खंडगाव – पेमगिरी.

• मुंबई पासून हा किल्ला १५५ किलोमीटर अंतरावर आहे.

पेमगिरि किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

• संगमनेर मार्गे आपण जेव्हा पेमगिरी गावी येतो. त्यावेळी आपणास एक कमान लागते. त्याठिकाणी दोन फाटे फुटतात. एक पुरातन वटवृक्ष असलेल्या ठिकाणी जातो. तर दुसरा पेमगिरी किल्ल्याकडे जातो.

• किल्याच्यावरील बाजूस आपणास आपल्या वाहनाने जाता येते.

• सिडी मार्ग:

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पायी येणाऱ्यांसाठी गडाच्या खालील बाजुस एक देऊळ आहे. त्या देवळाजवळून एक वाट चढून वरील बाजुस असणार्या सिडी मार्गा जवळ जाते. या सिडी मार्गाने आपणं गडावर जाऊ शकतो.

• पाण्याची टाकी:

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

 गडावर पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवणेसाठी अलीकडे एक पाण्याची टाकी बांधलेली आहे.

• वाहनतळ :

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

किल्यावर आपणास वाहनतळ आहे. त्या ठिकाणी आपण आपली वाहने पार्क करु शकतो.

• श्री पेमाई देवी मंदिर:

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

किल्याच्या वरील भागात आपणास दगडी बांधकाम असलेले प्राचीन असे पेमाई देवीचे मंदिर पाहायला मिळतें. सुंदर अशी शस्त्र सज्ज अशी देवीची मूर्ती पाहायला मिळतें. बाजूला शेंदरी रंगात रंगवलेली तांदळा मुर्ती देवीची आहे. मंदिरास छोटेखानी कळस आहे.

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

• नविन पेमाई देवी मंदिर:

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

गडावर पाहणी करताना आपणास नविन अलीकडे बांधलेले पेमाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. मूळ मंदिराच्या मागील बाजूस हे मंदिर आहे.

• पाण्याची टाकी

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

 प्राचीन मंदिरा बाहेरील बाजूस आपणास पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. जी सातवाहन काळातील असल्याचे समजते. किल्याची तटबंदी व बुरूज बांधताना त्यासाठी लागणारा दगड काढून एकीकडे बांधकाम व दुसरीकडे पाणी टाके असे दुहेरी उद्दिष्ट ठेवून या टाक्यांची रचना केल्याचे दिसते.

• कोरडी पाण्याची टाकी :

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

मंदिरा शेजारी आपणास काही कोरडी पडलेली पाण्याची टाकी पहायला मिळतात. गडाच्या दक्षिण दिशेस ही टाकी अढळतात.

• बाळंतीण टाके ( खांब टाके)

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

मंदिरा पासून थोडे बाजूला चालत गेल्यावर आपणास एके ठिकाणी एक विस्तृत असे चौकोनी आकाराचे खांब टाके पाहायला मिळते. या टाक्यांमध्ये भर उन्हाळ्यात देखिल पानी असते. यालाच बाळंतीनीचे टाके असेही म्हणतात.

• उत्तर दिशा टेहेळणी बुरूज :

गडाच्या उत्तर बाजूस आपणास एक बुरूज पाहायला मिळतो. काळाच्या ओघात तो नष्ट झालेला आहे. या ठिकाणी एक ध्वजस्तंभ देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी टेहळणीसाठी या बुरुजाच् वापर केला जात असे. व येथे ध्वज देखील फडकवला जात असे.

• तटबंदी व बुरुज : काळाच्या ओघात तसेच दुर्लक्षते मुळे किल्ल्यावरील तटबंदी व बुरुजांची ढासळणी झाली आहे. बऱ्याच अंशी नाश पावलेले आहेत.

पेमगिरीं गावातील दगडी बारव:

किल्ला पाहून खाली गावात आल्यास पेमगिरी गावात आपल्याला एक दगडी बांधकाम केलेली बारव म्हणजेच विहीर बांधलेली आहे. या बारवी मध्ये दोन दगडी बांधकाम असलेल्या खोल्या बांधलेल्या आहेत. आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्यांची योजना देखील आहे. या विहिरीचे पाणी मोटेच्या साहाय्याने काढले जात असे. त्यासाठी केलेली रचना दिसून येते. या विहिरीत एक शिलालेख देखील आहे. ज्यावर शके १६२८ असा उल्लेख आहे. यावरून विहिरीचे निर्मिती साल समजते.

• हनुमान मंदिर :

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

गडाच्या खालील असणाऱ्या गावात आपणास एक हनुमंत मंदिर पाहायला मिळतें. आधुनिक काळातील जरी हे मंदिर असले तरी मंदिराची बांधणी उत्कृष्ट अशी आहे. मंदिरात लाकडी खांब तसेच महिरप सुंदर अशी नक्षी असलेली पाहायला मिळतें. मंदिरात हनुमंताची मूर्ती पाहायला मिळतें. तसेच पंचमुखी हनुमंताची पंचधातूची मूर्ती देखील पाहायला मिळते. तसेच श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री विठ्ल रूक्मिणी यांच्या मुर्त्या देखिल पाहायला मिळतात. तसेच नित्य त्यांची पुजा अर्चा चालते. तसेच या ठिकाणी आपणास हनुमंताच्या जीवनावरील चित्रे पाहायला मिळतात.हे मंदिर इसवी सन १९४२ साली गंगाराम महाराज दुबे यांनी बांधले आहे.

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

• विशाल वटवृक्ष :

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

पेमगिरी किल्ल्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर आपणास एक प्राचीन असा वटवृक्ष आढळत. अनेक पारंब्या याच्या जमिनीत रुजलेल्या आहेत. या पारंब्यामुळे या वृक्षाचा विस्तार खूप मोठा आहे.

• विरगळ व हिंदू धर्मीय देवतांच्या मूर्ती:

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

या वटवृक्षाखाली आपणास विरगळ पाहायला मिळतात. ज्या ऐतिहासिक योध्यांची प्रतीके आहेत. तसेच हिंदू देवतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात.

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

• जाकमत बाबा व जाखाई देवी मंदिर :

या वटवृक्षाच्या खाली आपणास एक हिंदू धर्मीय मंदिर आढळते. हिंदू रामोशी समाजातील लोकांचे ते धार्मिक स्थान आहे.

पेमगिरी किल्ला माहिती  Pemgiri Fort information in Marathi

जाकमत बाबा एक मेंढपाळ होते. जे आपल्या शेळ्या घेऊन चारायला या परिसरात येत. एकदा त्यांवर वाघाने हल्ला केला. त्यांनी वाघाला प्रतिकार सुरु केला. व ते ओरडू लागले. त्यावेळी त्यांची बहीण जाखाई धावून मदतीस आली. दोघांनी वाघास ठार मारले. पण ते दोघेही मरण पावले. त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. आजही या परिसरातील वृक्ष तोडणाऱ्याना जाकमत बाबा शिक्षा करतो. असा लोकांचा समज आहे.

पेमगिरी किल्याविषयी ऐतिहासिक माहिती:

• सातवाहन काळात पेमगिरी किल्यावर काही पाण्याची टाकी खोदली गेली.

• मुघलांनी साम्राज्य विस्तार धोरणाने दक्षिण भारतावर आपले लक्ष केंद्रीत केले. मुघलांचा दक्षिणेतील सरदार महाबतखान व त्याचा मुलगा खानजमान याने आपल्या फौजेनिशी दौलताबाद किल्ल्यास १ मार्च १६३३ साली वेढा दिला.

• ६मे १६३६ साली तह करण्यात आला.

• १७ जून १६३३ साली दौलताबाद किल्ला मुघलांनी ताब्यात घेतला. यानंतर मुघलांनी निजामशहास हरवले व निजाम व त्याचा वजीर फत्तेखान यास कैदेत टाकले. व निजामाचा मुलगा मुर्तिजा निजामशहा यास जीवधनच्या किल्यात कैद करुन ठेवलें. निजामशाही सरदार शहाजीराजे यांनी मूर्तींजा निजामशहाची जीवधन किल्यावरून सुटका केली. व् त्यास पेमगिरी किल्ल्यावर आणले. व् त्या ठिकाणी आपल्या मांडीवर बसवून त्यांनी प्रती निजामशाही स्थापन केली. या निजामशाही मध्ये भीमा व निरा नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश येत होता. शहाजीराजे यांनी मोठा पराक्रम गाजवला. मुघल व आदिलशहा या दोन्ही सैन्याशी त्यांनी झुंज देवून त्यांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पण त्यांचा निभाव लागला नाही. व् इ.स.१६३६ साली निजामशाहीचा अंत झाला.

• निजामशाही युद्धाच्या काळात शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्या काही काळ पेमगिरी किल्यावर होत्या. नंतर त्यांना सुरक्षेच्या कारणाने शिवनेरी किल्ल्यावर हलवण्यात आले. पेमगिरी किल्ला स्वराज्य निर्मितीची सुरवात मानली जाते. कारण या प्रती निजामशाही मुळे मराठा सरदारांचा आत्मविश्वास वाढला. व् शिवरायांनी पुढे याचा फायदा घेत स्वराज्य स्थापन केले.

  • शके १६२८ पेमगिरीं गावातील दगडी बारव म्हणजेच विहीर बांधलेली आहे.
  • इसवी सन १९४२ साली गंगाराम महाराज दुबे यांनी पेमगिरीं गावातील हनुमान मंदिर बांधले आहे.
  • इसवी सन १७३८ ते १७४० या साला दरम्यान पेशवे बाजीराव व मस्तानी काही काळ या गडावर वास्तव्यास होते.                 अशी
 आहे पेमगिरी किल्ला माहिती Pemgiri Fort information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...