श्री मलंग गडाची माहिती
Sri Malang gad information in Marathi
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत माथेरान जवळ मलंगगड आहे.
• उंची :
मलंगगडाची उंची ही सरासरी ३२०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.
• मलंग गडाकडे जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग:
• मुंबई येथून तळोजा – चिंधरण मार्गे निटले तेथून – वाडी येथून पुढे मलंगगडाला जाता येते.
• कल्याण येथून डोंबिवली मार्गे पाळावा सिटी तेथून खोणी पागड्याचा पाडा येथून पुढे वाडी व तेथून मलंगगडाला जाता येते.
• बदलापूर येथून अंबरनाथ मार्गे मलंगगड फाट्यावरून मलंग गडाकडे जाता येते.
• पुणे येथून पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळा – कर्जत मार्गे बदलापूर व तिथून आपण अंबरनाथ मार्गे मलंगगडाला जाऊ शकतो.
• मलंगडाला जाण्यासाठी कल्याण येथून ट्याक्सी व बसची सोय आहे.
• मलंगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• बस किंवा टयाक्सीने आपणं मलंगगडाच्या पायथ्याशी मलंगगावी असलेल्या वाहनतळावर येवून पोहोचतो. वाहन तळावरून आपणास गडाचे लांबून दर्शन घडते.
• पायरी मार्ग :
गडावर जाण्यासाठी आपणास बांधीव पायरी मार्ग लागतो. या मार्गाने आपणं गडाकडे जाऊ शकतो. हा पायरी मार्ग पिरमाचीपर्यंत आहे.
• शिवपिंड :
वाटेत आपणास एक शिवपींड पाहायला मिळते.
• दुर्गामाता मंदिर:
पायरी मार्गानें आपणं जसे पुढे गेल्यावर आपणास दुर्गा देवीचे मंदिर लागते.
• दुकाने व पुजा साहित्य :
या ठिकाणी धार्मिक स्थान असल्याने येथे अनेक लोग येत असतात. त्यांच्या सोयीसाठी अनेक पुजासहित्य घेण्यासाठी दुकाने तसेच नाष्टा व अल्पोपहार हॉटेल्स पहायला मिळतात.
• पिरमाची:
माची म्हणजे किल्ल्यावर टेहळणी करण्यासाठी निसर्ग निर्मित तयार झालेली सपाट जागा मलंगगडाकडे जाताना प्रथम आपणास पीरमाची लागते. या परीसरात अनेक दुकाने तसेच दर्गा पाहायला मिळतो. तसेच अन्य रहिवाशी वास्तू येथे आहेत.
• दर्गा :
पुढे आपणं चालत चढून गेल्यावर आपणास एक दर्गा पाहायला मिळतो. हा हाजी मलंगदर्गा आहे.
• सोनमाची मार्ग :
दर्ग्याच्या समोर असणार्या दुकानांच्या मधून एक पायवाट गडाच्या दिशेने जाते.
• दगडी पायवाट मार्ग:
पीरमाची येथून वरून आपणं जेव्हा सोनमाचीकडे जाऊ लागतो. त्यावेळी आपणास वाटेत अनेक दगड धोंडे पडलेले पहायला मिळतात. या वाटेने आपण कात्याळ दगडी पायऱी मार्गा जवळ येवून पोहोचतो.
• कात्याळ पायरी मार्ग :
दगड धोंडे पडलेल्या अवघड वाटेने चढून आपण उंच बेसाल्ट खडकाचा खडा कडा लागतो. या कड्यात एका बाजूने खोदून पायऱ्या बनवल्या आहेत. असमान अकाराच्या या पायऱ्या चढण्यास कठीण आहेत. जागोजागी ठेवलेल्या खोबणी मध्ये हात घालत. या मार्गाने आपण वरील भागात असणाऱ्या सोनमाचीकडे जाऊ शकतो. हा किल्ला घेताना पीरमाचीवरून ब्रिटीशांनी तोफ गोळ्यांचा मारा केला पण तो दरवाजापर्यंत पोहोचू शकलाच नाही. मात्र पायरी मार्गावरील खडक फुटले गेले.
• सोनमाची दरवाजा :
पायरी मार्गानें व कठीण चढ चढून वरील बाजूस आल्यावर आपणास उंच खडकात भग्न दरवाजा व बुरूज दिसून येतो. या ठिकाणी सोनमाचीचे प्रवेशद्वार होते. जे काळाच्या ओघात तसेच आक्रमणात नष्ट झाले. हल्लीं उभे स्तंभ व बुरुजाचे दगडी बांधकाम शिल्लक आहे.
• वाड्याचे व इतर इमारतीचे अवशेष :
सोनमाचीवर आल्यावर आपणास काही बांधकामाचे अवशेष पायाचे थर दिसून येतात. हे सोनमाची वरील शिबांदित राहणाऱ्या लोकांना तसेच येथे असणारे किल्लेदार व पहारेकरी, शिपाई , प्रशासकीय अधिकारी याच्यासाठी निवासासाठी व कामकाजासाठी या ठिकाणी बांधल्या गेलेल्या वास्तूंचे आहेत.
• सौच कूप :
गडावर सोनमाची वर एका बाजूला आपणास मध्य युगीन काळातील सौच कुपाचे बांधकाम पाहायला मिळते.
• चोर दरवाजा :
सोनमाची वर आपणास एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. जो संकटकाळी वापरण्यासाठी गडावरील लोकांना ठेवण्यात आलेला आहे. हा कठीण अशा खोल दरीत उतरतो.
• पानी टाके :
सोनमाची वरुन आपण बालेकिल्ल्याकडे जाताना तसेच इतर बाजूला कड्यात खोदून पाणी टाकी बनवली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पडणारे पाणी या टाक्यांमध्ये साठते. व ते वर्षभर उपयोगात आणले जात असे.
• कठीण अवघड रणमंडळ वाट :
सोनमाची वरून बाले किल्ल्याकडे जाणारी वाट ही अत्यंत चिवुळ आहे. एका बाजूस खडा कातळ कडा तर पायात जेमतेम एक फूट जाडीची अरुंद वाट. तर दुसरीकडे तीव्र उतार एखादा शत्रू बालेकिल्ल्याकडे येत असेल तर वरील बाजूने त्यावर दगडाचा मारा केल्यास शत्रूस नष्ट करता येतं असे. तसेच दुसरीकडे खोल दरीत तो पडू शकेल. अशी रचना दिसून येते.
• बालेकिल्ल्याकडे जाणारी ही अरुंद वाट ही जागो जागी तुटलेली आहे. जागोजागी जाण्यासाठी दोर, लोखंडी पाईप व रोड घातलेले आहेत. हल्ली बालेकिल्ल्याकडे जाणे अत्यंत धोकादायक आहे. पण अनेक गिर्यारोहक या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात.
• विश्रांती देवड्या :
बालेकिल्ल्याकडे जाताना आपणास जागोजागी खडकात खोदून तयार केलेले विश्रांती देवड्या दिसून येतात.
• बालेकिल्ला :
किल्याचा अत्यंत वरील भाग म्हणजे बाले किल्ला होय.
• पाण्याची टाकी :
बालेकिल्ल्यावर आपणास अनेक पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. भर उन्हाळ्यात सुद्धा ती आटत नाहीत. बालेकिल्ल्यावर बांधकाम करताना लागणारे दगड बालेकिल्ल्याच्या सखल भागातून काढले गेले. त्या ठिकाणी अनेक पाण्याची टाकी तयार करण्यात आली.
• बालेकिल्ला निवाशी वास्तू व सदर:
• बाले किल्यावर उंच बाजूस आपणास बांधलेल्या छप्पर नसलेल्या व चहू बाजूने बांधकाम आज देखील शाबूत असलेली वास्तू पहायला मिळते. या ठिकाणी किल्यावर असणारे मुख्य अधिकारी तसेच किल्लेदार व इतर अधिकारी संकटकाळी राहत असत. तसेच त्यांच्या साठी आवश्यक शस्त्रसाठा व धान्य साठा देखील येथे केला जात असे. तसेच गुप्त मसलती देखील या ठिकाणी होत असत.
• परिसर दर्शन :
बालेकिल्ला हा मलंगगडाचा अत्यंत वरील भाग येथून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
• किल्ला पाहिल्यावर आलेल्या वाटेनेच परत फिरावे लागते.
• मलंगगडाची ऐतिहासिक माहिती:
• मलंगगडावर दत्त संप्रदायातील मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. तिची पूजा मुस्लिम धर्मीय करतात. हे ठिकाणं हिंदू धर्म व मुस्लिम धर्म यामध्ये वादातीत आहे. माघ महिन्यात पौर्णिमेस येथे यात्रा भरते.
• मलंग गडाचे प्रथम बांधकाम हे शिलाहार राजवटीत बांधले गेले.
• पुढे यादव, बहामनी, निजामशाही राजवट व अखेरीस मुघलांच्या ताब्यात हा किल्ला व परिसर होता.
• स्वराज्य स्थापन झाल्यानंतर हा किल्ला मराठा राजवटीत दाखल झाला.
• पेशवाई काळात इसवी सन १७८० साली इंग्रज अधिकारी आंबिग्डन याने मलंग गडावर हल्ला केला.
• मराठे पर्जन्य काळात शेतीच्या कामात गुंततात व त्यावेळी किल्ल्यावर मर्यादित सैन्य असतात. याचा फायदा घेण्याचे ठरवून ब्रिटीश अधिकारी आंबिग्डन याने मलंग गडावर हल्ला चढवला. त्याने पीरमाची जिंकून तिथं तोफा चढवून सोनमाची वर हल्ला चढवला. पण तो असफल झाला. कारण तोफेचे गोळे तिथपर्यंत पोहोचत नव्हते. तेव्हा आबिंग्डने नाकेबंदी करुन मराठ्यांची रसद तोडली. तरी देखील मराठ्यांनी कडवट प्रतिकार केला. शेवटी ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला.
• पुढे हा किल्ला ब्रिटीश राजवटीत होता.
• पुढे भारत देश स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• अशी मलंगगडाची माहिती आहे.
Malang gad information in Marathi