माणिकगड किल्ला, गडचंदुर (चंद्रपूर) विषयी माहिती
Manikgad Fort (chandrapur) information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूर तालुक्यात घनदाट जंगलात माणिकगड आहे.
• माणिकगडाचे दुसरे नाव गडचंदुर आहे.
• उंची :
या किल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची ही सुमारे ५०७ मीटर उंचीवर हा किल्ला आहे.
• माणिक गड पाहण्यासाठी जाण्याचा प्रवाशी मार्ग:
• माणिकगड हा चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे.
• नागपूर या महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ठिकाणापासून १९३ किलोमीटर अंतरावर माणिकगड किल्ला आहे.
• नागपूर येथून – बुटीबोरी – वरोडा – वणी – कोरपना – सोनुर्ली – माणिकगड.
• चंद्रपूर - बल्लारपूर – गडचंदूर – अमलनाला बांध – नाग्रळा येथून माणिकगड.
• चंद्रपूरपासून पुढे चंदूर् येथे आल्यानंतर जीवती रोडला असणाऱ्या अरण्यझाडीत माणिकगड आहे.
• माणिकगडावर पाहण्यासाठीची ठिकाणे :
• गुगल म्यापने आपणं सहज चंद्रपूर जिल्यातील माणिकगड पाहण्यासाठी जाऊ शकतो.
• माणिकगडाला जाताना वाटेत एक फाटा लागतो. त्या वाटेने थोड चालत पुढे गेल्यावर आपणास एक सुंदर मंदिर लागते. या ठिकाणी एक पाण्याचे टाके सुध्दा आहे.
गडपायथ्याशी गाडी पार्क करून आपण तेथून गड पाहणीसाठी दहा रुपयाचे तिकीट घेऊन आपण गडाकडे जाऊ लागतो.
• दगडी फरसबंदी :
पुढे चालत गेल्यावर आपणास दगडी फरशी लावलेली मुख्य रस्त्याची वाट लागते. या वाटेने आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो.
• मुख्य दरवाजा :
आजही सुस्थितीत असलेला मुख्य किल्याचा दरवाजा आपणास लागतो. दरवाजावर सुंदर अशी शिल्पाकृती कोरलेली आपणास पाहायला मिळते. यावर नाग, वाघ व सिंह या प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या राजवटी होऊन गेल्या त्यांच्या विषयी माहिती या शिल्पाकृतीतून मिळते.
• भग्न तोफ : दरवाजाच्या बाहेरील बाजुस एक भग्न तोफ पाहायला मिळते.
• दुसरा दरवाजा :
या दरवाजानंतर आपणास आणखी एक दरवाजा पाहायला मिळतो. हा दोन्ही बाजूंनी बुरुजात असलेला दरवाजा आसून आजही सुस्थितीत आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस खालील भागात शत्रूचे पाय प्रवेश केल्यावर मारण्यासाठी छोट्या कोठ्या केलेल्या दिसून येतात.येथे शिपाई लपून रहात असत. त्यानंतर दरवाजावरील पहारेकऱ्यांसाठी देवड्या खोदलेल्या आहेत. ज्या त्यांना विश्रांती काळात वापरता येतात.
• कातळभिंत रस्ता :
पुढे चालत गेल्यावर आपणास अरुंद दोन्ही बाजूस कातळ व मधी अरुंद रस्ता असलेला कातळभिंत रस्ता लागतो. या वाटेने आपण गडाच्या आतिल बाजूस जाऊ शकतो.
• गड मार्गदर्शक नकाशा :
कातळभिंत वाटेने आपण गड मार्ग दर्शक फलका जवळ येवून पोहोचतो. तेथून पुढे आपणास गड भ्रमंती सुकर होते. हा वनदूर्ग असून याची चढाई सोपी आहे.
• निवारा राहुटी / झोपडी :
पुढे चालत गेल्यावर आपणास एक निवाऱ्यासाठी बांधलेली झोपडी म्हणजेच राहुटी दिसते.
• गणेशमूर्ती व उखळ व दगड :
निवारा झोपडीच्या पुढील बाजूस लगेच एक गणेशमूर्ती आहे. तिच्यासमोर एक उखळ आहे. व त्यातील बत्याचा दगड हा दोन्ही कान धरून आपण हाताच्या कोपराने उचलून घ्यायचा व परत ठेवायचा आपली पातके नष्ट होतात असा स्थानिक लोकांचा समज आहे.
• राणीमहल :
वाटेने चालत आपण जंगल झाडीतून पुढे गेल्यावर दोन दालन असलेली एक वास्तू म्हणजेच महाल लागतो. अत्यंत सुंदर सुस्थितीत असणारी ही वास्तू पहाण्यासाठी योग्य आहे. सुरेख खिडक्यांची रचना येथे पाहायला मिळतें.
• राणी महालास लागून एक छोटा हौद आहे. त्यामधे जाण्यासाठी बांधीव पायरी मार्ग आहे. त्यास लागूनच राणी तलाव आहे.
• राणी तलाव :
पुढे आपणास राणी महालास लागूनच आपणास एक तलाव पाहायला मिळतो. जो येथील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदला गेला होता. राणी महालातून आपण या तलावाकडे जाऊ शकतो.
माणिकगड हा अरण्यात असल्याने या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असतो. तलावातील पाणी पिण्यासाठी येथे जंगली प्राणी येत असतात.
• चोर दरवाजा :
राणी महालातून एक चोर दरवाजा या तलावात उतरतो.
• पातळ विहीर :
राणी तलाव जवळून एक वाट पुढे जाते. खूप अंतर चालून गेल्यावर आपणास लोखंडी रेलिंग लागते. तेथून खालील बाजूस चालत गेल्यावर आपणास उंच कातळ खोदून एक बनवलेली विहीर लागते. येथील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ही खोदली गेली होती.
पाताळविहिरिकडे जाताना आपणास विविध झाडे वाटेत लागतात.
• पाताळविहिर पाहून थोडे वर आल्यावर वाटेत लाकडी पॅगोडा लागतो. जो वनखात्याने उभारला आहे.
• निवारा झोपडी :
पूढे आपण दुसऱ्या निवारा झोपडी जवळ येतो. जी टेहळणी बुरूजाच्या वाटेवर आहे.
• पाताळविहिर पाहून थोडे वर आल्यावर वाटेत लाकडी पॅगोडा लागतो. जो वनखात्याने उभारला आहे.
• टेहळणी बुरूज :
पुढे आपण निवारा झोपडी पासून चालत गेल्यावर आपणास एक बांधलेला उंच असा टेहळणी बुरुज लागतो. सुरेख बांधकाम आयाताकृती रचना, वरील बाजूस चढून जाण्यासाठी पायऱ्या असणारा हा एक निराळाच बुरूज पाहायला मिळतो. ज्याचा वापर टेहळणी साठी केला जातो. येथून सुरेख सूर्यास्त पाहता येतो.
• तटबंदी :
या किल्याची बरीचशी तटबंदी आजही सुस्थितीत असलेली पाहायला मिळते.
किल्याच्या पूर्व बाजूची तटबंदी जागोजागी ढासळलेली आहे. काही प्रमाणात तटबंदी सुरक्षित आहे. काही बुरूज शिल्लक आहेत
• पागा :
पुढे आपणास एक पागा लागते. जी सैनिकांचे घोडे बांधण्यासाठी बांधलेली होती. काळाच्या ओघात नष्ट पावण्याच्या स्थितीत आहे.
• भग्न तोफा :
किल्याची पाहणी करताना आपणास भग्न तोफा पाहायला मिळतात.
• माणिकगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• गडचिरोली परिसरात नागवंशीय लोक राहतात.
• इसवी सनाच्या ९ व्या शतकात या नागवंशीय लोकांचा राजा कुरुमप्रभू याने आपले राज्य प्रस्थापित केले. त्यांची राजधानी वैरागगड होती.
• त्याच वंशातील नागवंशीय राजा महिंद्रयुन याने हा माणिकगड किल्ला बांधला.
• नागवंशीय अग्र देवता माणक्यादेवीच्या नावावरून या किल्यास माणिक्यगड नाव दिले गेले. पुढे त्याचा अपभ्रंश माणिकगड असे नाव दिले गेले.
• इसवी सनाच्या १२व्या शतकापर्यंत नागवंशियांची सत्ता या ठिकाणी होती. तेथून पुढे गोंड राजांची सत्ता या ठिकाणी होती.
• पुढे मुघल, इंग्रज अशा राजवटीत हा किल्लाबराच काळ राहीला.
• आता हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• अशी आहे माणिकगडाची माहिती. Manikgad Fort information in Marathi