कण्हेरगड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती
Kanhergad Fort information in marathi
स्थान : महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्हा व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या गौताळा औटम घाट या अभयारण्यातील उंच अशा सातमाळा अजिंठा डोंगररांगेत कण्हेरगड आहे.
उंची : समुद्र सपाटी पासून हा किल्ला ६६० मीटर उंचीवर आहे.
• या किल्याची चढाई थोडी कठीण असून पायी ट्रेक करावा लागतो. सुरवातीच्या टप्प्यात चढाई जरा अवघड आहे. पण सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावने राबवलेल्या पायरी उपक्रम पाहता बराच सुकर होतो.
• कण्हेरगडावर जायचे कसे :
• मुंबई नाशिक रोड – भुसावळमार्गे मनमाड नंतर चाळीसगाव येथून बस वा खाजगी वाहनाने पाटणादेवी अभयारण्यात तेथून कन्हेरगडाला जाता येते.
• नाशिक वरून वणी दिंडोरी मार्गे कळवण तेथून कण्हेरीवाडी या गावी यायचे तेथून पाऊलवाटेने कण्हेर गडावर जाता येते.
• कण्हेर गडावर व गडाशेजारी पाहण्यासारखी ठिकाणे :
• कण्हेरीवाडी तसेच चाळीसगाव कडून पाटणादेवी परिसरात आल्यावर या दोन्ही वाटा एका ठिकाणी खिंडीत एकत्र येतात तेथून कन्हेर गडावर जाता येते.
• प्राचीन हेमाडपंथी मंदिर :
पाटणादेवी अभयारण्यात जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यावर आपणास एक मंदिर लागते. जे अरण्यात आहे. हे एक प्राचीन शिवमंदिर असून हे यादवकालीन आहे. याची बांधणी हेमाडपंथी असून. ते पूर्वाभिमुख आहे. उंच सहाफुट चौथर्यावर हे उभारले असून ७५ फूट लांब, १८ फूट उंच व ३६ फूट रुंद असे हे मांदिर विस्तारलेले आहे. बाहेरील बाजूस भव्य सभामंडप असून त्यामधे नंदी विराजमान आहे. गर्भगृहात सुरेख शिवपिंड असून सुरेख नक्षीदार खांब या ठिकाणी पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस देखील अनेक मूर्ती पाहायला मिळतात. सुरेख नक्षीदार अशी रचना व डिझाईन पाहायला मिळते. तत्कालीन शिल्पशैलीची ओळख या मंदिराची रचना पाहून होते.
• समाधी :
मंदिराच्या बाजूने गडाच्या दिशेने जाताना जागोजागी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव येथील कार्यकर्त्यांनी जागोजागी सूचना फलक लावल्याने वाट सुकर होते. या वाटेने जाताना वाटेत पुढे एक समाधी लागते. त्यावर छत्री उभारलेली आहे.
• कातळ जैन गुहा :
समाधी छत्रीपासून थोडे पुढे गेल्यावर उंच कात्याळ डोंगर लागतो. व या डोंगरावर चढून थोड अंतर गेल्यावर आपणास कात्याळ पोखरून बनवलेली गुहा पाहायला मिळते. सुरेख नक्षीकाम असणाऱ्या या गुहेत सुरेख सुंदर अशा जैन लेणी कोरलेल्या पाहायला मिळतात. या लेण्यांना नागार्जुन लेणी देखील म्हणतात. बाहेरील बाजूस दोन खांब असून त्यापुढे लेणीद्वार आहे. त्या द्वारपट्टिवर जैन तिर्थंकरांची माहिती लिहिलेली दिसते. लेण्याच्या दरवाजातून आत गेल्यावर समोर भगवान महावीर यांची तपस्या मग्न अशी सुरेख मूर्ती शिल्पाकृती रचनेत पाहायला मिळते. आजूबाजूला अनेक तीर्थकरांच्या लेण्या आपणास पाहायला मिळतात. तसेच सेविकांची व गंधर्व लेणी देखील कोरलेली पाहायला मिळतात. तसेच एका बाजूला गोमटेश्र्वर भगवानांची मूर्ती देखील उभी पाहायला मिळते.
ती डाव्याबाजूला असणाऱ्या भिंतीला लागून आहे.
• पाणी टाके :
तेथून जवळच पाण्याचे टाके जवळ डोंगरात काळया कात्याळात खोदलेले पाहायला मिळते. ज्यातील पाणी भर उन्हाळ्यात देखील सुखद गारवा देते.
• सीता न्हाणी :
जैन लेणी पाहिल्यावर तेथूनच एका पायवाटेने चालत डोंगराच्या एका बाजूला गेल्यास तेथे आणखी कात्याळात खोदलेल्या खोल्या पाहायला मिळतात. या ठिकाणाला सीता न्हाणी म्हणतात. या एकप्रकारचा खोल्या आहेत. तसेच येथे राहता येऊ शकेल अशी यांची रचना आहे.
• शृंगारिक ब्राह्मण हिंदू लेणी :
सीता लेणी पाहून आपण गडावरुन जाताना गडाच्या बाजूने डोंगराला वळसा घालून दोन डोंगराच्या मध्यभागी असणाऱ्या दरीकडे जाताना आपणास एक खडकात खोदलेले पाणी टाके लागते. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने त्यातील पाणी अस्वच्छ दिसते. तेथून पुढे दोन डोंगराच्या मधील दरी शेजारी पायवाटेने चढून वर गेल्यावर तेथे आपणास इंग्रजी यल आकारात व्हरांडा पाहायला मिळतो. त्याठिकाणी आपणास सुरेख बाहेरील बाजूस खांब पाहायला मिळतात. या खांबावर सुंदर नक्षी कोरलेली पाहायला मिळते. असे एकूण चार खांब आहेत. सुंदर सभामंडप पाहायला मिळतो. लेण्यांच्या द्वारावर सुरेख नक्षी काम केलेले आहे. ही ब्राह्मण लेणी इसवी सनाच्या ११ व्या शतकात कोरलेली पाहायला मिळतात.
या ठिकाणी आतील बाजूस मूर्ती अस्तित्वात सध्या नाही. हा भाग जरा गडाच्या विरूद्ध बाजूस असल्याने पर्यटक व ट्रेकर्स मंडळी यांची येथे वर्दळ नसते.
• कात्याळ पायरी मार्ग :
जैन लेणी पाहून आपण त्याशेजारी लावलेल्या दिशादर्शक वाटेने पुढे चालत गेल्यावर आपणास रेलिंग असणारा कात्याळी पायरी मार्ग लागतो. या मार्गाने वर चढून जावे लागते. हा वीस फुटी कात्याळ कडा चढणे अवघड पण सह्याद्री प्रतिष्ठानने उभारलेल्या रेलिंग व खोदलेल्या पायरी मार्गामुळे वाट थोडी सुकर झाली आहे.
या मार्गाने सितालेणी व जैन लेण्यांच्या वरील भागात जाता येते.
• निढे :
कात्याळ मार्गाने चढून वर गेल्यावर वरील बाजूस निसर्ग निर्मीत निढे पाहायला मिळते. हे ठिकाण अत्यंत पहाण्याजोगे असून या ठिकाणी बसून विश्रांती घेत. दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगा तसेच दरितील सुंदर हिरवागार निसर्ग पाहता येतो.
• कात्याळ गुहा :
निढे पाहिल्यावर त्याच्या पुढील बाजूने आपण शेजारील दरीत थोडे खाली उतरून गेल्यावर आपणास दोन तीन कात्याळ गुहा लागतात. या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते.
• कात्याळ पायरी मार्ग :
निढे पाहिल्यावर आपण त्या पुढील पायरी मार्गाने आपण गडावर जाऊ शकतो. या पायरी मार्गाने किल्याच्या खालच्या माचीवर आपण येतो.
• मार्गावर एक भग्न दरवाजा आपणास पाहायला मिळतो.
• गडमाथा तसा बराच विस्तृत आहे. खालील बाजूने जरी हा डोंगर लहान वाटत असला तरी वरील बाजूने खूप विस्तृत आहे.
• वाडा व इमारतीचे अवशेष :
किल्याच्या वरील बाजूस वाड्याचे व इमारतीचे अवशेष पहायला मिळतात जे किल्लेदार व शिबंदीतील मावळ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आले होते.
• पाण्याची टाकी:
गडाच्या वरील बाजूस अनेक पाण्याची टाकी दिसून येतात. जागोजागी असणाऱ्या या टाक्यामुळे मध्युयुगात किल्यावरील शिबंदीची पाण्याची गरज भागत असे.
• तलाव :
किल्याच्या वरील भागात एक छोटासा तलाव देखील पाहायला मिळतो. ते एक तळे आहे. व गडाच्या डाव्या बाजूला ते आहे.
• पाणी टाके :
तेथून पुढे एक पाण्याचे टाके पाहायला मिळते.
• शिवलिंग :
पाणी टाके पाहिल्यावर तिथेच लगेच एक शिवलिंग पाहायला मिळते.
• दगडी टोपी सारखा माथा :
गडाच्या वरील भागात आपणास एखाद्या टोपीसारखी रचना असणारा दगडी खडक पाहायला मिळतो.
- किल्याची तटबंदी :
काळाच्या ओघात किल्याची बरीच दुरावस्था झाल्याने किल्ल्यावरील तटबंदी बरीचशी दूरावस्थेत आहे.
• उत्तर बुरुज :
• गडाच्या उत्तरेस एक बुरुज पाहायला मिळतो. त्याठिकाणी निशाण काठी पाहायला मिळते.
• खाच :
गडाचा विस्तार हा पूर्व व पश्चिम असून या गडाला एका बाजूस धोडप कील्याप्रमाणे खाच आहे. या ठिकाणी खाचेत उतरण्यासाठी रस्सी लावलेली आहे. तिच्या साहाय्याने आपण उतरून पुढे गेल्यावर आपणास सुंदर असा तासिव कडा पाहायला मिळतो. तो कडा मानवनिर्मित वाटतो.
• गड माथ्यावर असणारी छिद्रे :
गडाच्या माथ्यावर आपणास काळया कात्याळात खोदलेली छिद्रे पाहायला मिळतात. ती तात्पुरता निवारा करण्यासाठी मारलेली दिसतात.
- गडाचा दरवाजा :
डोंगराच्या वरील भागात आल्यावर बालेकिल्ल्यास वळसा घालून बालेकिल्ला उजव्या बाजूला व दरी डावीकडे ठेवत पुढे चालत गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस आल्यावर एक दरवाजा लागतो. कमानाकृती रचना व घुमावदार वळण असणारा हा दरवाजा या गडाची शोभा वाढवतो. याच्या बुर्जांची रचना लक्षात घेता. त्याची मजबुती दिसून येते. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या आहेत. तसेच घुमावदार वळण असलेला हा दरवाजा. बाजूला सुस्थितीत बुरुज पाहून चालून आल्याचे चीज होते. पण या मार्गाने गडाच्या वरील बाजूस जाण्यासाठी सुकर असा मार्ग नाही आहे .
• हनुमान मंदीर :
गडाच्या बुरुजा शेजारील कडा चढून वर आल्यावर आपणास सुंदर अशी शेंदरी रंगात रंगवली असलेली हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते.
या मार्गाने गडाच्या बालेकिल्ल्यावर जाणे अवघड आहे. त्यापेक्षा नीढे असणाऱ्या मार्गाने पायरी मार्ग चढून आपण गडाच्या वरील भागात पोहोचू शकतो. एका बाजूला कडा व दुसरीकडे खोल दरी असा हा कात्याळ मार्ग पाहण्यासारखा आहे.
- कण्हेरगड किल्याची ऐतिहासिक माहिती :
• कण्हेर गडाची उभारणी ही इसवी सनाच्या ८ व्या शतकात झाली असावी असे मानले जाते. यादव घराण्याच्या राजवटीत हा किल्ला उभारला गेला असावा.
• जनार्दन स्वामींच्या चरित्रात इसवी सन १२२८ ( शके ११५०) साली आषाढ अमावस्येला सूर्यग्रहण असताना पाटणादेवी मंदिर सर्व लोकांना खुले केले असा उल्लेख आहे
• स्वराज्यात कधी दाखल झाला याबाबत माहिती जास्त आढळत नाही. पण सुरतेची दुसरी लूट करून जाते वेळी मराठे याच प्रदेशात मुघलांशी भिडले. व मैदानी युद्धात मुघलांना धूळ चारली. व मराठ्यांचा दम त्यांनी दाखवला.
• या ठिकाणी मराठा किल्लेदार रामजी पांगेरा हा होता. रामजीने स्वराज्याच्या अनेक मोहिमात भाग घेतल्याने गडाच्या रक्षणार्थ होतात्म्य पत्करले.
• इसवी सन १६७१ साली या किल्यास मुघल सरदार दिलेरखान व बहाद्दूर खान यांनी वेढा दिला. मराठ्यांनी गनिमी काव्याने हैराण करून सोडले.
• कण्हेर गडाच्या पायथ्याशी रामजी पांगेरा याच्या नेतृत्वाखाली पहाटेच्या वेळी मुघलांशी जोरदार संघर्ष झाला.यात ४०० मावळे सहभागी झाले होते. दिलेरखानाने सात वर्षानंतर मुरारबाजी देशपांडे सारखा लढणारा मराठा वीर पुन्हा पहिला. या युद्धात मराठ्यांनी १२०० मुघल कापून काढले.
• याचा उल्लेख बखरकार करतात
‘ टिपरी जैशी शिंगियाची दणाणते.'
• रामजीला सरदारकी व जहागिरीचे आमिष दिलेरखानाने देवू केले होते. पण त्याला बळी न पडता त्याने व त्यासोबतच्या मावळ्यांनी होतात्म्य पत्करले.
• यावेळी गडावर फक्त ८०० मावळे होते. शेवटी गड मुघलांच्या ताब्यात गेला. किल्लेदार व शिबंदीतील ४०० मावळ्यांनी १२०० मुघल कापले. पण मुघलांची सेना खूप मोठी होती. त्यामुळे माघार घ्यावी लागली.
• इसवी सन १७५२ साली पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
• औरंगजेब बादशहा याच प्रदेशातून स्वराज्यावर चालून आला. ज्याला पुढे मराठी मुलखातच मूठमाती मिळाली.
• पुढे हा किल्ला पेशवाईत पेशव्यांच्या ताब्यात राहिला.
• इसवी सन १७८९-९० मध्ये या किल्यावर असणाऱ्या कोळी लोकांनी बंड केले. पण ते शमावले गेले.
• इसवी सन १८१८ साली पेशवाईचा अस्त झाल्यावर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
• या परिसरात भास्कराचार्य होऊन गेले. जे श्रेष्ठ गणिती होते. ज्यांनी शून्याचा शोध लावला.
अशी आहे कण्हेरगड किल्याची ऐतिहासिक माहिती