कार्ला लेणी व देवी एकविरा मंदिर माहिती Karla Leni and Ekvira Devi Temple information in Marathi
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात बोरघाटात सह्याद्री पर्वत रांगेत खोदली व कोरली गेली आहेत.
• नालासोपारा येथून कल्याण ते बोरघाट व इतर घाटमार्गातून प्राचीन काळी तेर, भोकरदन या शहराशी व्यापार चालत होता.
• कार्ला लेणी पहायला जाण्यासाठीचा प्रवाशी मार्ग :
• पुणे व मुंबई ही भारतातील मोठी शहरे कार्ला येथून जवळचं आहेत.
• पुणे मुंबई बसने कार्ला फाट्यावर उतरुन आपणास कार्ला लेणी पहायला जाता येते.
• पुणे लोणावळा लोकलने मळवली स्टेशनवर उतरुन तिथून रिक्षा वाहनाने हाइवे लगतच्या कमानीतून आपणास कार्ला डोंगर पायथा मंदिरापर्यंत जाता येते.
• कार्ला परिसरातील प्रेक्षणीय स्थळे:
• कार्ला डोंगरा खालील पायथ्याला वाहनतळ आहे तेथून आपण आपले वाहन पार्किंग करुन सरळ पायथा मंदिरापाशी येवू शकतो.
• एकविरा देवी पायथा मंदिर :
• भक्तांच्या दर्शनासाठी डोंगर पायथ्याला देवी आली अशी अख्यायिका आहे. म्हणून इथे पायथा मंदिर बांधले आहे. या ठिकाणी आपणास चरण पादुका व देवीची सुरेख मूर्ती पाहायला मिळते. अनेक भक्त येथे दर्शन घेवून मग पुढील प्रवास करतात.
• मंदिरा मागील पायरी मार्ग :
पायथा मंदिरा मागील बाजूस आपणास पायरी मार्ग लागतो. अनेक भक्त आई एकविरेचा उदो उदो उदो असे बोलत पहिल्या पायरीवर नमन करून या मार्गाने पूढे चालतात. चालायला सुकर तर थोडा कष्टदाई हा मार्ग आहे.
• पायरी मार्ग व दुकाने :
एकविरा देवी ही हिंदु धर्मियांचे पवित्र स्थान तिचे भक्त दर्शनास जाताना व येताना खरेदी करतात. त्यासाठी येथे अनेक दुकाने पाहायला मिळतात.
• धबधबा:
पायरी मार्गाने आपण पूढे गेल्यावर वाटेत एक छोटा धबधबा लागतो. पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्याचे पाणी उन्हाळ्यात रोडावलेले असते. त्याचे मधूर पानी उन्हाळ्यात चवदार लागते.
• एकविरा देवी पादुका मंदीर:
थोडे अंतर पूढे गेल्यावर आपणास खडकावर असलेले एक मंदिर पाहायला मिळतें. येथील खडकात देवीच्या पायाची चिन्हे आहेत. तेथे एक मंदिर बांधले आहे.
या परिसरात गाडी पार्किंग वाट व पायरी मार्ग एकत्र येतात.
• खडी चढण पायरी मार्ग :
देवीच्या चरण पादुका मंदिरापासून खरी चढण चालू होते. हा मार्ग दमछाक करणारा आहे.
• विस्तीर्ण आवार व पुजा साहित्य स्टॉल:
वर चढून आल्यावर विस्तीर्ण आवार लागतो. या ठिकाणीं देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजा साहित्य खरेदी करण्यासाठी स्टॉल आहेत. येथे पूजेचं साहित्य खरेदी करून भक्त पूढे दर्शनासाठी जातात.
• तिकीट घर :
या ठिकाणी तिकीट काढून पुढे दर्शनास जाता येते.प्रत्येकी २५ रुपये चार्ज घेतला जातो.
• नगार खाना:
पूजा साहित्य घेऊन पूढे गेल्यावर आपणास नगारखाना पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी देवीसाठी नगारा वाजवला जातो.
• कापूर स्तंभ :
देवीच्या मंदिर परिसरात एक लहान स्तंभ पाहायला मिळतो. तो कापूर जाळण्यासाठी असावा.
• बाबाजी महाराज समाधी:
मंदिर आवारात एक समाधी पाहायला मिळते. ती बाबाजी महाराज यांची आहे.
• सभामंडप :
पुढे आपणास डोंगर कड्याशी लागून मंदिर लागते. पुढे दर्शन मंडप व त्यापुढे गाभारा आहे. देवीच्या उत्सवात या ठिकाणी खूप गर्दी असते.
• गाभारा :
सुंदर अशी चौकट गाभाऱ्यास बसवलेली आहे. त्यातून आत गेल्यावर आपणास सुरेख एकविरा देवीची मूर्ती काळ्या काताळात कोरलेली पाहायला मिळते. देवीच्या डोक्यावर सोनेरी मुकुट कपाळावर कुंकू, सौभाग्य अलंकार परिधान केलेली, मुर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.हि देवी जलदेवता स्वरुप आहे.आगरी कोळी या देवीचे भक्त आहेत. तसेच चांद्रसेनी कायस्थ प्रभु, कुणबी, देवज्ञ ब्राह्मण, यांची देखील कुलदेवता एकविरा देवी आहे. संकट दूर करणारी तारणहार अशी ही देवी आहे.
• जोगेश्वरी माता :
एकविरा देवीचे बंधू काळभैरव यांची पत्नी जोगेश्वरी मातेची मुर्ती शेजारी आहे. एकविरा व जोगेश्वरी यांचे नाते नणंद भावजयीचे आहे.
• एकविरा देवीची इच्छा होती की आपले मंदिर एका रात्रीत बांधावे. पाच पांडव वनवासात असताना एकविरा देवीची त्यांनी या ठिकाणी उपासना केली. व डोंगरात खोदून गाभारा तयार केला व मुर्ती एका रात्रीत घडवली. व देवीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हा एकविरेने अज्ञात वासात त्यांना कोणी शोधू शकणार नाही असा आशीर्वाद दिला. व देवी या ठिकाणीं कायमची स्थाईक झाली. शंकराच्या आशीर्वादाने परशुराम माता देवी रेणूका एकविरा देवी या रुपात या ठिकाणी प्रकट झाली.
• आगरी कोळी व इतर समाजातील लोक देवीला नवस बोलतात. व नवस फेडायला येथे येतात. व देवीच्या देवळावर कोंबडा उडवतात.
• बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याची म्हणजेच ठाकरे घराण्याची ती कुलदेवता आहे.
• या मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही.
• चाफ्याचे झाड:
मंदिर आवारात एक चाफ्याचे झाड पहायला मिळतें. देवीचे भक्त या झाडाची पूजा करतात.
• कार्ला बुध्द लेणी :
• एकविरा देवी मंदिराच्या मागील बाजूस आपणास लेणी गुहा पाहायला मिळतात.
• सिहस्तंभ:
मंदिरा मागे लेणी पाहायला जाताना आपणास तिकीट घ्यावे लागते. तेथून पुढे गेल्यावर आपणास स्तंभ पाहायला मिळतात. कोन जागोजागी असणारे उचं असे जवळ जवळ ४५ फूट उंच स्तंभ वरील बाजुस चक्रे तर त्यावर नक्षी व शीर्ष भागी सिंह मुद्रा पाहायला मिळते.
हा स्तंभ सारनाथ येथील स्तंभा सारखा आहे. त्या शेजारी सुरेख तसेच अपूर्ण स्तंभ पहायला मिळतात.
• हत्ती शिल्पे :
स्तंभाच्या मागील बाजूस आपणांस हत्ती शिल्पे पाहायला मिळतात. काळाच्या ओघात झालेल्या समाजकंटकांनी केलेल्या आक्रमणात यातील काही शिल्पांची नासधूस झालेली पाहायला मिळते.
• मिथुन शिल्पे :
या ठिकाणी नर व नारी यांची काही रासलीला करणारी मिथुन शिल्पे देखील पाहायला मिळतात..
• गौतम बुद्ध व त्यांची शिष्य यांची शिल्पे :
लेणी पाहत असताना आपणास गौतम बुद्ध व त्यांचे शिष्य यांची शिल्पे देखिल कोरलेली पाहायला मिळतात.
• चैत्यगृह व स्तूप :
सिंह स्तंभा मागील बाजूस आपणास चैत्यगृह पाहायला मिळतो. ही बुध्द लेणी आहेत. उत्कृष्ट जाळीदार कमान आतील बाजूस अनेक साईट स्तंभ वरील बाजुस अर्धवर्तुळाकार कमान व सुरेख नक्षी पाहायला मिळते. मध्यभागीं कोरीव स्तूप व त्यावर सुंदर लाकडी संरचना पाहायला मिळतें. तसेच गौतम बुद्ध यांची कमळात विराजमान शिल्पाकृती देखील पाहायला मिळते.
• लेणी क्रमांक २ :
ही लेणी अपूर्ण स्वरूपात आहेत.
• बुध्द मूर्ती व ध्यानधारणा कक्ष :
आपणास या ठिकाणी गौतम बुध्द यांची शिल्पाकृती पाहायला मिळते. बुध्द धर्म प्रसारण करणारे चारक व चारीका करणारे शिष्य यांना उपासना, ध्यान धारणा करण्यासाठी तसेच राहण्यासाठी या ठिकाणी हा कक्ष निर्माण केल्याचे जाणवते. या ठिकाणी बुध्द वाड.मयाचे वाचन देखिल विश्रांती वेळी बुध्द धम्म प्रसारक करत असत.
• ध्यान धारणा कक्ष पाहून आपण पायरी मार्गाने वरील बाजूस गेल्यावर आपणास काही बुध्द लेणी तसेच एकविरा मंदिर अवार व परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
• कार्ला लेणी व एकविरा देवी मंदिर यांची ऐतिहासिक माहिती :
• अनेक धार्मिक पुस्तकात एकविरा देवी या ठिकाणीं प्रकट झाल्याचा उल्लेख आहे. असे येथील भक्त पुजारी यांचे म्हणणे आहे.
• या ठिकाणी एकविरा देवी मंदिर पांडवांनी द्वापार युगात निर्मिती केली.
• इसवी सनाच्या पहिल्या ते पाचव्या शतकात या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक राज्यकर्त्यांच्या आश्रयाने इथे लेणी कोरली गेली.
• या ठिकाणी काही शिलालेख कोरलेले आहेत. त्यामध्ये ब्राम्ही लिपी आढळते.
• चैत्य गृहात असणाऱ्या लेखात कोरलेला संदेश
‘ वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम जिंबुदिपम्ही उततम.’
अर्थ: वैजयंतीचा श्रेष्ठ भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जंबूद्विपात ( भारत देशात) उत्कृष्ट आहेत.
• शिल्पातील लेण्यांतून मिळणारी माहिती :
• शिल्पावरून असे जाणवते की त्याकाळी स्त्रिया डोक्यावर पदर घेत असत. त्यांच्या कमरेला शेल्यासारखे वस्त्र असे. तर पुरुष मुंडासे व धोतर वापरत असत. स्त्रिया कुंकू लावत असत. हे शिल्पातील कपाळावरील टिळ्यावरून जाणवते. तसेच स्त्रिया कर्णफुले, अनेक माळा, मण्यांचे हार, तोडे, बांगड्या, मेखला असे दागिने वापरत असत.
• तसेच सुरेख केस रचना करत असत.
• या ठिकाणी काही सध्या अस्तित्वात असणाऱ्या गावांची तत्कालीन नावे देखिल पहायला मिळतात
उदा. सोपारा (सोपरकर),करंजगाव (करिजक) डहाणू (धेनुकाकट), गुजरात येथील काठेवाड भागातील प्रभासतीर्थचे नाव ( प्रभास), तर उत्तर कर्नाटक ( वैजयंती), मावळ प्रांताचे (मामलाहारे), सुतार काम (वढ्की), सुगंधी द्रव्य व्यापारी (गंधक) असे उल्लेख आपणास येथील शिलालेखात अढळतात.
• २६ मे १९०९ साली भारत सरकारने कार्ला लेणी समुहाचा महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक वारसा स्थळात समावेश केला आहे.
अशी आहेत कार्ला लेणी व देवी एकविरा मंदिर माहिती
Karla Leni and Ekvira Devi Temple information in Marathi