सांदण दरी ( sandhan Vally)
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील साम्रद या गावाजवळ सह्याद्री पर्वत रांगेत सांदण दरी आहे.
• सांदण दरीची लांबी व खोली :
सांदण दरी ही जवळ जवळ ४ किलोमीटर लांब असून तिची खोली ही सरासरी २०० ते ४००फूट खोल आहे.
• सांदण दरीकडे जाण्याचा प्रवाशी मार्ग :
• मुंबई कडून येताना ठाणे – कल्याण – मोरोशी – खुटाळबारागाव – शिरोशी – देहेन इथून पुढे आपण सांदण दरी परीसरात पोहोचू शकतो.
• नाशिक कडून येताना विल्होळी – पिंपळाड नाशिक – गोंडेदुमाला – मुंढेगाव – घोटी बुद्रुक – वसाळी – भंडारदरा – येथून साम्रद गावी व पुढे सांदण दरीकडे जाता येते.
• पुणे येथून – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – ओतूर – कोतुळ – राजुर – भंडारदरा – येथून साम्रद व पुढे सांदण दरीकडे जाता येते.
• अहमदनगर येथून भंडारदरा जलाशयाच्या बाजूने साम्रद गावी आपण जावू शकतो.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वत राजीत अशी अनेक ठिकाणे आहेत. जी निसर्गाची एक चमत्कारीक उदाहरणे आहेत. यामध्ये सर्वोच्च शिखर कळसुबाई, कोकणकडा, व सांदण दरीचा समावेश होतो.
सांदण दरी: अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटर परिसरातून आपण पुढे साम्रद गावी आल्यावर येथील रान वाटेने सांदण दरीकडे जाता येते. सांदण दरीकडे जाताना आपणास परिसरातील जंगल लागते. या जंगलातून आपणास
जाताना पावसाळी जंगलातील वृक्ष किती उंच असतात. जे सुर्य किरणांसाठी स्पर्धा करत असताना दिसून येतात. यांच्या तळाला आपणास झुडपे जास्त प्रमाणात दिसून येत नाहीत.
![]() |
भाटघर धरण |
![]() |
सह्याद्री पर्वत रांगा |
• साम्रद गावी आल्यावर पुढे वाहन तळावर गाडी पार्क करून पुढे सांदण दरीकडे जाताना तिकीट घर लागते. तेथे तिकीट घेवून आपण कच्च्या गाडीवाटेने कमानीकडे जातो. पुढे पायवाट लागते. आपल्याला कळसुबाई हरिश्चंद्र सांदण दरी नावाची कमान लागते. त्या वाटेने आपण पुढे गेल्यावर आपणास एक ओढ्यासारखे पात्र लागते. तिथून जरा पुढे आपणास झरा लागतो. व त्याच्या पुढे असणारे पात्र इथून सांदण दरीची सुरवात होते.
![]() |
ओढा |
फार पूर्वी म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जमिनीवरील समांतर असणारे दोन खडक एकमेका विरुद्ध विभागले. त्यांचे विभाजन झाले व् त्यामधे खोल अशी घळ असणारी खाच तयार झाली. ही जवळ जवळ चार किलोमीटर लांब तर काही ठिकाणी २०० फूट ते काही ठिकाणी ४०० फूट खोल अशी चर निर्माण झाली ती एक निसर्गाचा चमत्कारच आहे.
परिसरातील उंच डोंगरी भागातील पाणी पावसाळ्याच्या दिवसात या मधून वाहू लागते. त्यामुळे पावसाळी दिवसात तसेच हिवाळ्याच्या सुरवातीस येथे जाणे धोक्याचे असते.
• जगो जागी डोंगर खडकाच्या वरील भागातून पावसाळ्यात अनेक ओहोळ या दरीत वाहत उतरतात. त्यामुळे पावसाळी दिवसात जाणे कठीण असते. पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आलेले दगड, धोंडे तसेच कड्याचे तुटलेले खडक या दरीत जागोजागी पाहायला मिळतात.
![]() |
अरुंद नळी |
• अनेक गिर्यारोहक याठिकाणी ट्रेकिंग साठी येतात. व् उंच कड्याच्या भागातून दरीत उतरतात.
• पावसाच्या पाण्याचा जगोजागी झालेला साठा त्यात निर्माण झालेले मासे,साप व बेडका सारख्या प्राण्याबरोबर सांदण दरीतून कड्याच्या खोबणीत अनेक किडे कीटक यांचा निवास आपणास पाहायला मिळतो. प्रस्तर भंगाचे उत्तम भौगोलिक उदाहरण ही दरी असल्याने अनेक भौगोलीक जाणकार या ठिकाणी संशोधन करण्यासाठी तसेच अभ्यास करण्यासाठी येतात.
• आशिया खंडात ही दुसऱ्या क्रमांकाची दरी आहे. डिसेंबर पासून ते मे महिन्याच्या काळात अनेक गिर्यारोहक याठिकाणी भेट घेत असतात.
• सांदण दरीच्या सुरवातीच्या उगम स्थळापासून आपणं दरीत उतरतो. अनेक लहान मोठ्या खडकातून व दगड धोंडे यातून मार्गक्रमण करत पुढे जावे लागते.
दरीतून जाताना दोन्ही बाजूला उंच कडे लागतात. यामधून वाट काढत आपणास पुढे जावे लागते. या दरीची रुंदी काही ठिकाणीं जास्त आहे. तर काही ठिकाणी ती निमुळती होत जाते. ती इतकी की त्यातून एक ते दोन व्यक्तीचं सहजासहजी जाऊ शकतात.
• पाणी:
दरीतून पावसाळ्यात जेव्हा पाणी वाहू लागते. ते सखल जागी साठून त्याचे छोटे छोटे डोह तयार झाले आहेत. सुरवातीला लागणारा डोह लहान आहे. अगदी गुडघाभर पानी उन्हाळ्यात तिथे पायाला लागेल. मात्र जस जसे पुढे जाऊ तस तसे पुढे एका रुंद जागेत खोल पाणी लागते. ते पावसाळी दिवसात जवळ जवळ एक पुरुष खोल असेल. त्यातून मार्गक्रमण करत आपण पुढे गेल्यावर आपणास दगड गोटे असणारे दरीचे पुढील पात्र कोरडे लागते.
![]() |
डोह |
• अरुंद नळी:
दरीतून पुढे गेल्यावर ही विभंग झालेली खडकाची भिंत अत्यंत अरुंद होते. ज्यातून एखादाच माणूस जावू शकेल. एवढी तिची रुंदी असते.
• डोह:
दरीच्या पुढील भागात वरील वाहून येणाऱ्या पाण्याने तयार झालेला डोह पाहायला मिळतो.
• सूर्य किरणे :
या अरुंद दरीत सूर्याची किरणे फक्त दुपारच्या वेळीच पोहोचू शकतात. ती ही अल्प प्रमाणात. ज्याठिकाणी रुंदी जास्त व खोली कमी आहे. त्या ठिकाणी खोलवर किरणे जावून पोहोचतात.
• दरीच्या सुरवातीस खोली कमी असली तरी शेवटच्या टप्प्यात ती खूप खोल होत जाते. इतकी की तळाच्या भागात सुर्याची किरणे पोहोचू शकत नाहीत. म्हणून या दरीला श्याडो व्ह्याली म्हणजेच सावलीची दरी म्हणून देखील ओळखले जाते.
दरीच्या शेवटचा टप्पा :
दरीच्या शेवटच्या टप्प्यात खाली उतरताना आपणास दोराची मदत घ्यावी लागते.
दोराच्या साहाय्याने उतरुन आपण शेवटच्या भागात येतो या ठिकाणी आपणास खूप मोठे खडक लागतात. त्याच्या पुढे या दरीचा शेवट होतो. याबाजूने आपण करोळी घाटाकडे जावू शकतो.
• दरीच्या शेवटच्या प्रदेशात अती उंच कडा पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण गेल्यावर दरीचे वरून सुंदर दर्शन घडवणारा निरीक्षण पॉइंट आहे. येथे उभारल्यावर आपण सांदण दरी व सह्याद्री पर्वतातील उंच शिखरे व हिरव्यागार जंगलाचे विलोभनीय दर्शन घडते.
• अशी आहे सांदण दरीची माहिती. या दरीने महाराष्ट्रास एक वेगळी अशी ओळख मिळवून दिली आहे. अनेक पर्यटक या दरीस भेट देतात.