Showing posts with label अर्नाळा किल्ला माहिती Arnala killa information in Marathi. Show all posts
Showing posts with label अर्नाळा किल्ला माहिती Arnala killa information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

अर्नाळा किल्ला माहिती Arnala killa information in Marathi

 अर्नाळा किल्ला माहिती

Arnala killa information in Marathi

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


स्थान

महाराष्ट्र राज्यातील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत उगम पावून कोकणाकडे वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या खाडी शेजारी असणाऱ्या सागरी बेटावर असणारा जलदुर्ग अर्नाळा किल्ला होय.

उंची:

 हा एक जलदुर्ग असून याच्या भिंतीची उंची समुद्र सपाटी पासून ३० ते ३५ फूट आहे.

किल्ल्याकडे जायचे कसे :

 अर्नाळा एक जलदुर्ग असून तो ठाणे जिल्ह्यात वसई तालुक्यात वसलेला सागरी किल्ला आहे.

• मुंबई – अहमदाबाद मार्गावरील विरार येथून आगाशी बसने आपण अर्नाळा किल्याच्या समुद्र किनारी आगाशीला आल्यावर कोळी वस्ती.    तेथून बोटीने जवळील अर्नाळा बेटावर जाऊ शकतो. तिथे हा किल्ला आहे.

• विरार येथून अर्नाळा किल्ला हा १२ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.

• मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेलेले भारतातील समुद्र किनाऱ्यावरील ठिकाण आहे. येथून विरार व पूढे अर्नाळा किल्याकडे जाता येते.

• हा एक सागरी किल्ला असल्याने समुद्र मार्गे देखील आपण इकडे जाऊ शकतो.

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


अर्नाळा किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• अर्नाळा या ठिकाणी विरारवरून आल्यावर आपण एका कोळी वस्तीत येतो. तिथे आल्यावर आपणास सकाळी ८ ते १२ तसेच संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत प्रवासी बोटी उपलब्ध असतात. या बोटीने आपण सागरी प्रवास करत अर्नाळा किल्ला असणाऱ्या बेटावर उतरु शकतो.

• बेटावर उतरल्यावर आपणास ३०० घरांची वस्ती लागते. जवळ जवळ ३००० लोकवस्तीचे हे गाव आहे. या वस्तीतून असणाऱ्या रस्त्याने आपण अर्नाळा किल्ल्याकडे जाऊ शकतो.

महाद्वार व बुरुज :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


वस्तीतून आपण किल्याच्या उत्तर दरवाजापाशी येतो. हा आजही दोन बुलंद अशा बुरुजात असलेला चिरेबंदी दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच दरवाजावर आपणास सुरेख नक्षी कोरलेली पाहायला मिळते. तसेच हत्ती , वाघ आणि समुद्री जीव यांच्या संकरातून तयार केलेला पवित्र प्राणी यांची शिल्पे पाहायला मिळतात. तसेच हिंदु धर्मीय पवित्र पुष्प कमळ कोरलेले आपणास पाहायला मिळते. तसेच पेशवे कालीन शिलालेख पहाता येतो. ज्यातून किल्ल्याचे पुनर्निर्माण केलेला उल्लेख देखील पाहायला मिळतो.

 कमानीवर वेलबुट्टी नक्षी पाहायला मिळते. दरवाजातून आत गेल्यावर आपणास एक घुमटाककार छत आपणास पाहायला मिळतें. सैनिकांना विश्रांतीसाठी तसेच दरवाजावर चौकी पहारा देणाऱ्याना निवारा देवड्या बांधलेल्या पाहायला मिळतात.

बुरुजावर जाण्यासाठी जिना :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


महादरवाज्यातून आत आल्यावर आपणास बाजूच्या बुरुजावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग आपणास बुरुजावर घेवून जातो.

बुरुज :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


महादरवाजा शेजारी असणाऱ्या बुरुजाच्या वरील भागात आल्यावर आपणास समोरील किनारा व समुद्र यांचे दर्शन घडते. या ठिकाणी अनेक जंग्या व फांज्या पहायला मिळतात. जंग्या या बंदुक व बाण यांचा मारा करण्यासाठी तर तोफेने बार काढण्यासाठी फांज्या बांधलेल्या आपणास पाहायला मिळतात. जवळून एक छोटा रस्ता खालील बाजुस येतो. ज्यातून दरवाजावर हल्ला करणाऱ्या शत्रूवर थेट हल्ला करता येतो.

• तटबंदी : 

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्याच्या सभोवताली एक छोटी गाडी वाटे इतक्या रुंदीची भक्कम तटबंदी बांधलेली आहे. आज देखिल ती अत्यंत शाबूत असलेली पाहायला मिळतें. जागोजागी जंग्या देखिल पहायला मिळतात. या तटबंदीची उंची ही तीस ते पस्तीस फूट उंच आहे.

बुरुज

जागोजागी आपणास किल्याच्या चहुतर्फा सुरक्षितता राखण्यासाठी आपणास भक्कम बुरूज त्या काळात बांधलेले पाहायला मिळतात. बावा बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज असे नऊ बुरुज याठिकाणी पाहायला मिळतात.

गणेश बुरुज :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्ल्यावरील आकर्षक व भक्कम बांधणी असलेला बुरुज म्हणजे गणेश बुरुज होय. या बुरुजावर जंग्या व फांज्या आहेत. तसेच या ठिकाणी वरील बाजुस निवारा खोली देखिल होत्या. या बुरुजात एका बुरुजावर कौले देखिल होती. त्याच बरोबर बुरुजातून खाली जाण्यासाठी आपणास एक सशक्त असा छत दरवाजा मार्ग देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी दरवाजा अडकवणेसाठी असलेली छिद्रे देखील पाहायला मिळतात. या वाटेने खाली उतरून येताना जागोजागी प्रकाशासाठी देवळ्या खोदलेल्या आहेत. बुरुजातून खाली उतरल्यावर आपणास अनेक सैनिकांना विश्रांतीसाठी देवड्या पाहायला मिळतात.

गणेश बुरुज दरवाजा :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


 गणेश बुरुजास एक भव्य असा दरवाजा आहे. जो आतील बाजुस असल्याने शत्रूस देखील सहसा नजरेस पडत नाही. या ठिकाणी दरवाजास लागून अनेक सैनिक निवासस्थाने पाहायला मिळतात.

चौकोनी बुरुज :

किल्ल्यावरील इतर बुरूजापेक्षा निराळ्या बांधणीचा चौकोनी बुरुज देखील आहे.

• बुरूजास लागून एक सुरक्षित निवारा खोली देखिल पाहायला मिळते.

• छत नसलेला बुरुज :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्यावर असलेल्या एका बुरुजाचे छत पडलेले आहे. या ठिकाणी बुरुजात उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोन पायरी जिने पाहायला मिळतात.

पाचलिंगेश्वर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर:

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


पेशव्यांनी हा किल्ला घेतल्यावर या ठिकाणी शिवकृपेने विजय प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणीं एक शिव मंदिर बांधले. या मंदिरात नंदी व महादेव पिंडी पाहायला मिळते.

अष्टकोनी तळे :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


मंदिरा समोर अष्टकोनी तळे आढळते. तळे खोदताना प्राचीन मूर्ती सापडल्या. त्या गणेश व हनुमंत मुर्ती आपणास तळ्याकाठी स्थापन केलेल्या पाहायला मिळतात. गणेशाची अत्यंत सुरेख लांब सोंड असणारी मूर्ती खूप आकर्षक आहे.

दत्त मंदिर

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


या परिसरात आपणास एक दत्त मंदिर देखिल बांधलेले पाहायला मिळते.

हजरत शहा आली दर्गा :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्याच्या आतील बाजुस एक दर्गा पाहायला मिळतो. तो हजरत शहा अली दर्गा आहे.

दर्ग्याच्या परिसरात आपणास शहा आली व हाजी अली यांच्या कबरी पाहायला मिळतात.

पडक्या वाड्याचे व वास्तूंचे अवशेष :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्यात फिरताना आपणास पडक्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. या वास्तू या किल्यावर रहाणारे किल्लेदार, तसेच इतर सेवक वर्ग, अधिकारी तसेच कामकाजा निमित्त येणारे इतर सरदार व दर्या सारंग, यांसाठी निवास स्थाने व वाडे बांधलेले पाहायला मिळतात.

• किल्ल्यामध्ये आपणास पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवणार्या पाच ते सहा विहिरी पाहायला मिळतात.

कालिका माता मंदिर व नित्यानंद महाराज पादुका :

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


किल्याच्या मुख्य दरवाजापासून थोड्याच अंतरावर आपणास कालिका माता मंदिर पाहायला मिळते. सुंदर कळस, आतील बाजूस नक्षीकाम सुरेख सभामंडप, व गर्भगृहात आपणास सुंदर कालिका मातेची मूर्ती पाहायला मिळते. तसेच या परिसरात नित्यानंद महाराज यांच्या पादुका देखील पाहायला मिळतात.

उंच टेहेळणी मनोरा : 

अर्नाळा किल्ला माहिती  Arnala killa information in Marathi


आपणास किल्यापासून कोळी वस्तीच्या पुढे गेल्यावर आपणास एक उंच टेहळणी मनोरा बांधलेला पाहायला मिळतो. समुद्र मार्गे शत्रूचा हल्ला झाल्यावर तसेच येणाऱ्या शत्रुची माहिती देण्यासाठी हा उंच मनोरा बांधला गेला. पोर्तुगीज काळात या मनोऱ्याचे बांधकाम झाल्याचे समजते. यामध्ये जाण्यासाठी भूमिगत मार्ग असल्याचे दिसते. पण हल्ली सरीसृप प्राण्याच्या भीतीने लोक या मनोऱ्यावर जात नाहीत.

कोळी वस्ती : 

या ठिकाणी आपणास कोळी या हिंदू लोकांची वस्ती पाहायला मिळतें. जे येथील प्राथमिक रहिवासी आहेत.

अर्नाळा किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती:

• अर्नाळा किल्ला बांधलेले ठिकाण हे वैतरन नदीच्या मुखाजवळ असलेले एक सागरी बेट होते. या ठिकाणी बांधलेला हा किल्ला आहे.

• याबेटास पूर्वी गाय बेट म्हणून ते ओळखले जाऊ लागले.

• या ठिकाणी फार पूर्वी पासून कोळी वस्ती आहे.

• मुस्लिम राजवट स्थापन झाल्यावर गुजरातचा सुलतान मुहम्मद बेगडा याने या ठिकाणी इ. स. १५१६ साली छोटीशी गढी बांधली होती.

• इसवी सन १५३० साली पोर्तुगिजांनी हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. यामध्ये थोडाफार बदल केला.

• वसई किल्यास रसद पुरवठा करण्यासाठी तसेच दिव दमण या ठिकाणी जाणाऱ्या वाटेवरील हे एक महत्त्वाचे ठाणे होते.

• इसवी सन १७३७ साली हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. यासाठी शंकराजी नावाच्या मराठा सरदाराची नियुक्ती केली होती. त्याने स्थानिक कोळी, भोई लोकांची मदत घेऊन किल्ला सर केला.

• पुढे पेशव्यांच्या सांगण्यावरून या किल्ल्याची तटबंदी व इतर डागडुजी करून घेण्याचे काम तुळाजी आंग्रे यांनी केले. या किल्याचा दरवाजा तसेच इतर बुरुजांची बांधणी सुद्धा केली गेली. याविषयी असणारा शिलालेख आपणास उत्तर प्रवेशद्वारावरील चौकटीवर दिसून येतो.

• इसवी सन १७८१ साली ब्रिटिश अधिकारी गोडार्ड याने या किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी या किल्यावर ४०० मराठा होते. त्यांनी चिवट प्रतिकार दिला. पण किल्ल्यातील रसद संपत आल्यामुळे त्यांनी हा किल्ला ब्रिटिशांच्या हवाली केला.

• इसवी सन १८८० साला पर्यंत या ठिकाणी असणार्या हजरत शहा अली दर्ग्यास ८० रुपये वर्षासन येत असे.

• पुढे हा किल्ला ब्रिटीश राजवटीत होता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर हा स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला आहे.

• हा किल्ला ४ हेक्टर क्षेत्रावर असून यास नऊ बुरूज व तीन दरवाजे आहेत.

• अशी आहे अर्नाळा किल्याची ऐतिहासिक माहिती.

• Arnala Fort Information in Marathi


ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...