गद्येगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi
दानधर्म करणे हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे. प्राचीन काळापासून ही पद्धत चालत आली आहे. एखाद्या व्यक्तीस, एखाद्या गावास किंवा मंदिरास दानधर्म म्हणून एखादे इनाम किंवा जमीन दिलेली असते. ते इनाम कोणी काढून घेवू नये. किंवा त्यावर जबरदस्ती कब्जा करु नये. म्हणून त्या ठिकाणी एक शिलालेख उभा केला जात असे. त्यास गद्येगळ असे म्हणतात.
हा शिलालेख कोरताना खालील भागात अभद्र वचन असते. ती एक शापवाणीच असते.
• गद्येगळचे भाग :
गद्येगळचे तीन भाग पडतात.
• चंद्र , सूर्य व अमृत कलश :
गद्येगळ लेखनात वरील बाजूस चंद्र, सूर्य व अमृत कलश काढलेला असतो. याचा अर्थ असा की ही जमीन वा जागा जी दान केलेली आहे. ती आचंद्र - सूर्य जोपर्यंत आसमंतात आहेत. तोपर्यंत हे दिलेले दान अबाधित राहील. ते कोणीही राजा किंवा इतर व्यक्ती हिरावून घेवू नये.
मध्यभागी अमृत कलश असतो. त्यावरून दिलेले दान हे अमर आहे. असे सांगितले जाते.
• शिलालेख :
चंद्र, सूर्य, व अमृत कलश त्याच्या खाली शिलालेख असतो. सुरवातीस मंगलाचरण असते. व त्यामध्ये दिलेल्या दानाची माहिती दिलेली असते. की ती जागा किंवा इनाम कोणी व कोणाला दान दिले आहे. ते दान कशासाठी दिलेले आहे. याची सविस्तर माहिती लिहिलेली असते.
• अभद्रवचन शापवाणी :
शिलालेखात खालील बाजूस अभद्र असे अपशब्द लिहिलेले असतात. त्यामधे लिहिलेले असते. जो कोणी दिलेले दान मानणार नाही, व ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करील. त्याच्या आई, बहीण , पत्नी यासारख्या घरातील महिलांना गाढवाशी समागम करावे लागेल. किंव तशी वागणूक दिली जाईल.
हिंदू धर्मीय लोक आपल्या कुटुंबांना प्राणापलिकडे जपतात. त्यामुळे असे दान ते काढून घेत नाहीत.
• गाढव व स्त्री शिल्प :
शिलालेखाच्या खालील बाजूस एक गाढव व एक स्त्री यांचे शिल्प समागम करताना काढलेले असते. व असा दगड एक इशारा सूचनाही देवून दिलेले दान असलेल्या ठिकाणी उभारला जातो.
अशा शिल्पाकृती दगडास गद्येगळ असे म्हणतात.
• गद्येगळ उभारण्याची प्रथा :
गद्येगळ हा उभा करण्याची प्रथा ही विशेषत शिलाहार राजांच्या काळात सुरू झाली. ती इसवीसनाच्या दहाव्या शतकात ही प्रथा सुरू झाली. ते इसवी सनाच्या १६ व्या शतकापर्यंत ती चालू होती.
• शिलाहार राजे, कदंब राजे यादव काळ व विजयनगर काळात विशेषत गद्येगळ लिहिले जात होते.
• महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, गुजरात राज्य व उत्तर कर्नाटक परिसरात असे गद्येगळ उपलब्ध आहेत. त्यातले काही मंदिरास केलेल्या दानधर्म कार्याविषयी आहेत. काही किल्याच्या परिसरात आढळतात.
• गद्येगळ ही एक शापवाणी आहे.
• गद्येगळ हे विशेषत मराठी, संस्कृत, फारसी भाषेत कोरलेले आढळले आहेत.
• पहिला गधेगळ हा इसवी सन ९३४ साली शिलाहार राजवटीत काळातील आहे.
• सर्वात जास्त गधेगळ हे शिलाहार राजवटी मध्ये उभारले गेले होते.
• श्रवण बेलघोळ येथील एका गधेगळामध्ये शेवटी दानपत्र लिहिल्यानंतर असे लिहिले आहे की “ हे दान कुणी नाकरील अक्षरशः त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल.” असा उल्लेख आढळतो असे अनेक गधेगळ आहेत.
अशी आहे गधेगळ विषयी माहिती
Gadhegal information in Marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l