आगाशिव लेण्यांविषयी माहिती मराठी
Agashiv Lenyavishyi mahiti Marathi
• स्थान :
भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्यातील कराड तालुक्यात ही लेणी जखिनवाडी गावाजवळ डोंगरात ही लेणी पाहायला मिळतात.
• आगाशिव लेणी पाहायला जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे या आंतरराष्ट्रीय ठिकाणापासून आपण N.H. 4 या राष्ट्रीय मार्गाने आपण सातारा जिल्ह्यातील कराड जवळील या ठिकाणी जाऊ शकतो.
• मुंबई - पुणे – सातारा – कराड – जखिनवाडी - आगाशिव डोंगर.
• जखिनवाडी हे ठिकाण कराड शहरापासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या नॅशनल हाइवे वर ५ किलोमीटर अंतरावर आहे.
• जखीनवाडी येथून आगाशीव डोंगर फक्त ७०० मिटर अंतरावर आहे. हा मार्ग सोईस्कर आहे. लवकर पोहोचता येते.
• कराड – मलकापूर मार्गे – आगाशिवला जाऊ शकतो.
• या डोंगराचा आकार हिंदू धर्मीय प्रतीक ओमसारखा आहे. म्हणून या ठिकाणास आगाशिव म्हणतात.
• आगाशिव डोंगरात पाहण्यासारखी ठिकाणे :
• प्रथम आपण जखिणवाडी गावी कराड शहरातून आल्यावर डोंगराच्या खालील बाजूस असणाऱ्या जंगलाच्या परिसरात वाहनतळावर आपले वाहन पार्किंग करू शकतो.
• पायरी मार्ग :
लेण्यांकडे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पायरी मार्ग बनवला आहे. या जवळ जवळ ५०० ते ६०० पायऱ्या आहेत. चढाई सुलभ आहे.
या ठिकाणी वरील बाजुस आल्यावर आपणास एका बाजूला २६ लेण्या पाहायला मिळतात.
• लेणे क्रमांक ६,७,१२,१७ :
वरील सर्व लेणी या चैत्यगृहचैत्यगृह आहेत. ही लेणी संपूर्ण बेसाल्ट खडक खोदून तयार केलेली आहेत. संपूर्ण पारंपरिक पद्धतीने छीन्नी हातोडा वापरून तयार केलेली आहेत. चैत्याच्या आतील बाजूस स्तूप आहे. या ठिकाणी बुद्ध मूर्ती दिसत नाही. व ही लेणी अगदी इसवीसनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकाच्या आधी हिनयान या बुध्द धर्मीय पंथाकडून खोदली गेली आहेत. आतील स्तूपाच्या भोवती परिक्रमा करता येते. कार्ले, भाजे, बेडसा येथील लेण्याप्रमाणे स्तंभ येथे नाहीत. त्यावरून त्याही पूर्वीच्या काळातील या लेणी आहेत. कारण त्या लेण्यात बुध्द धर्मीय चित्रे व शिल्पे येथे दिसत नाहीत.
• सहाव्या लेण्याच्या बाहेरील बाजूस थोडे नक्षीकाम दिसते. ज्यामधे एकीकडे अशोकचक्र, व दुसरीकडे सिंह शिल्प आहे. आतील बाजूस स्तूप आहे. त्याभोवती परिक्रमा मार्ग आहे.
• सातवे लेणे :
• विठ्ठल रुक्मिणी मंदिर :
एका लेण्यांमध्ये आपणास स्तूपाच्या जागी गाभारा करून विठ्ठल व रुक्मिणी मंदिर स्थापन केल्याचे जाणवते. येथील या लेणीचे पुनर्निर्माण एका मंदिरात झाले. ते पेशवे काळात झाल्याचे स्थानीक लोकांच्याकडून समजते. बाहेरील बाजूस मंडप व आत गाभारा अशी संरचना आहे.
• बाराव्या व सतराव्या लेण्यात आपणास बुध्द स्तूप पाहायला मिळतो.
• इतर विहार लेणी :
या ठिकाणी असणारी इतर लेणी या विहार आहेत. बाहेरील बाजूस विस्तृत दालने, व आतील बाजूस लहान लहान ध्यान व शयन कक्ष असल्याचे जाणवते. प्रत्येक विहाराच्या व चैत्याच्या बाहेर एक पाण्याचा कुंड अथवा पोरी म्हणजे हौद खोदून तयार केला आहे. तो रहिवास करणाऱ्या भिक्षूंना स्नान संध्या करण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची गरज भागवणेसाठी केला होता.
पावसाळी दिवसात अथवा चारिका करत बुध्द धम्म प्रसार करणाऱ्या साधूंना विश्रांती व ध्यानधारणा तसेच राहण्यासाठी या लेणी समूहाची रचना केली आहे.
• लेणे क्रमांक २३ :
या ठिकाणी आपणास एक पाण्याचा झरा पाहायला मिळतो. स्थानिक खालील गावातील लोक या ठिकाणास पवित्र मानतात. तेथील मळाई देवीची पालखी या लेण्यात आणली जाते. व पुन्हा गावात नेली जाते. दरवर्षी ही प्रथा दसर्यास केली जाते.
मळाई देवी ही जलदेवता म्हणून ओळखली जाते.
• येथील लेण्यांना आता दारे बसवलेली आहेत. यातील काही लेण्यांच्या बाहेरील भिंती पडलेल्या आहेत. तर काही विस्तृत विहार आहेत. तर काही अत्यंत एक ते दोन व्यक्ती रहण्या इतकी लहान आहेत.
• दुसरा लेणी समूह :
डोंगराच्या पलीकडे असणारा कोयना वसाहती जवळ आपणास दुसरा लेणी समूह पाहायला मिळतो.
• काळभैरव मंदिर :
या लेणी समूहात एक हिंदू धर्मीय देवता काळभैरवाची स्थापना केलेली आहे. या लेण्याच्या बाहेर पाण्याची लहान लहान तळी आहेत. येथील एका तळ्यात कमळ पुष्पे आपणास दिसून येतात.
येथे लहानलहान खोल्या आहेत. येथे देखील आपणास काही विहार पाहायला मिळतात.
• तिसरा लेणी समूह :
• डोंगराच्या पश्चिम बाजूस आगाशिव गावाच्या बाजूला आणखी एक लेणी समूह दिसून येतो. येथील लेणे क्रमांक ४८ हा एक स्तूप आहे. येथील लेण्यात अर्ध नटेश्वराची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. बाकीची लेणी ही विहार आहेत.
• सर्व लेणी समूह पाहून परत परतीच्या पायरी मार्गानें आपण परत येवू शकतो.
• आगाशिव लेण्यासंबंधी थोडक्यात ऐतीहासिक माहिती :
• येथील लेण्यात कोणताही शिलालेख नाही. पण येथील स्तूप व विहार रचना पाहून ही हीनयान बुध्द धर्मीय लेणी असल्याचे समजते.
• या लेण्यांची रचना ही स्थानिक क्षत्रप, राज्यांकडून मिळालेले दान स्वरूपातील निधी, तसेच समाजातील दानी लोकांनी केलेल्या दानातून झालेला आहे.
• ही लेणी पावसाळी दिवसात बुध्द धर्मीय उपासकांना विश्रांती व आराधना, तपश्चर्या व रहिवास करण्यासाठी बनवली गेली होती.
• काळाच्या ओघात येथील थोडया लेणी नष्ट झालेल्या आहेत.
• हल्ली भारत सरकारच्या प्रयत्नाने यांचा जीर्णोद्धार केला जाऊन पर्यटन स्थान म्हणून विकसित केले आहे.
• स्तूप म्हणजे बुध्द धर्मीय साधूंचे प्रतीक स्वरूप, अथवा बुध्द स्वरूप होय.
• चैत्याच्या आत स्तूप असतो. येथे लयन मंदिर प्रकारातील चैत्ये आहेत. येथे बुध्द शिष्य व साधक प्रार्थना करतात.
• विहार हा बुध्द साधकांचे निवास स्थान असते.
• या लेण्यांमध्ये काळानुरुप सत्ता बदलल्यावर बदल झाले आहेत. बुध्द धर्मीय राजांच्या राजवटीत येथे चैत्य व विहार तयार केले. नंतर हिंदू धर्मीय राजवटीत येथे हिंदू मंदीर निर्माण झालेली दिसतात. हा एक काळानुरूप वैचारिक बदलाणे झालेला बदल आहे. तो आहे तसा शांततेनं स्वीकारून पुढे संमिश्र संस्कृतीचा तो एक आरसा बनलेला आहे.
• अशी आहे आगाशिव लेण्याविषयी माहिती.