पितळखोरा लेणीसमूहाविषयी माहिती मराठी
Pitalkhora lenisamuha vishyi mahiti
स्थान :
भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात सातमाळा अजिंठा डोंगर रांगेत आपणास गौताळा अभयारण्यात पितळखोरा लेणी पाहायला मिळतात.
- पितळखोरा लेणी पाहायला जाण्यासाठीचा प्रवाशी मार्ग:
• पितळखोरा या ठिकाणास संभाजीनगर, मुंबई व पुणे ही आंतरराष्ट्रीय स्थानके आहेत. येथून जाऊ शकतो.
• संभाजीनगर हे ठिकाण येथून जवळ आहे.
• संभाजीनगर येथून पुढे – कन्नड – तेथून पुढे खुलताबाद मार्गे गौताळा अभयारण्य तेथून पुढे पाऊल वाटेने पितळखोरा लेणी पाहायला जाता येते.
• मुंबई येथून – नाशिक – मनमाड - नांदगांवमार्गे खडकी – येथून पाटणा – चंडिकादेवी मंदिर येथून रान वाटेने आपण पितळखोरा लेणी समुहापर्यंत जाऊ शकतो.
• पुणे येथून – अहमदनगर - संभाजीनगर – कन्नड – गौताळा अभयारण्य आणि तेथून पितळखोरा लेणी समुहापर्यंत आपण पोहोचू शकतो.
• पितळखोरा लेणी येथे पाहण्यासारखी ठिकाणे:
• गौताळा अभयारण्य :
महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्यात गौताळा अभयारण्य आहे. हे खुरटी, काटेरी झुडुपे यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्य परिसरात आपणास पितळखोरा लेणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपणास पितळखोराकडे जाणारे प्रवेशद्वार पाहायला मिळतें. येथून आत आपण आपल्या खाजगी वाहनाने पोहोचू शकतो. या ठिकाणी आपणास पार्किंग साठी जागा आहे.
• पायरी मार्ग :
पार्किंग परिसरात आपण गाडी पार्किंग करून लेणी समूह पाहायला जाताना वाटेत आपणास पुरातत्व विभागाने बनवलेला पायरी मार्ग लागतो. या वाटेने आपण पुढे गेल्यावर दरीच्या दिशेने असलेला हा प्रवाशी मार्ग लेणी समुहापर्यंत नेऊन पोहोचवतो. या वाटेस लोखंडी रॉड रोलिंग लावलेली पाहायला मिळतात. या वाटेने पुढे आपण ओढ्याच्या पात्रात येवून पोहोचतो.
या ठिकाणी आपणास संपूर्ण कात्याळ खडकाचे पात्र पाहायला मिळते. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातील दगड गोट्यांमुळे तयार झालेले रांजण खळगे पाहायला मिळतात.
• धवलतीर्थ धबधबा व लोखंडी पूल:
पुढे आपण लेणी समूहाजवळ पोहोचतो. या ठिकाणी आपणास धवलतीर्थ धबधबा पाहायला मिळतो. जो पावसाळ्यात ओसडून वाहताना दिसतो. उन्हाळ्यात मात्र सुकलेला दिसून येतो. हा ओढा पार करण्यासाठी आपल्या सोयीसाठी लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. तो पार केल्यावर आपणास गुहां पर्यंत जाता येते.
याठिकाणी एक मार्गदर्शक फलक लावण्यात आला आहे.
• पितळखोर गुहा न. १ व २ :
पूल पार केल्यावर आपणांस गुहा एक व दोन लागतात. या अती प्राचीन काळापासून या अग्निजन्य बेसाल्ट खडकात खोदलेल्या पाहायला मिळतात. यातील भाग ढासळलेला असून त्या ठिकाणी फक्त आधारासाठी म्हणून एक खांब दिलेला दिसून येतो. एक कपारी सारखी रचना या गुहांची आहे.
• गुहा न. ३ विहार :
• तिसर्या गुहेचे निरीक्षण केल्यास तिच्या सुरवातीचा भाग पडलेला असून आतील दालनांचे अवशेष पहायला मिळतात. आतील बाजूस निवारा खोल्या असाव्यात असे जाणवते. आतील बाजूस बैठक कक्ष, निवारा स्थान असल्याचे जाणवते. समोरील बाजूस कुंड असल्याचे दिसून येते. काळाच्या ओघात तसेच परचक्र आल्यावर येथील वास्तू नष्ट केल्या गेल्याचे व झाल्याचे जाणवते.
• चैत्यगृह :
भग्न विहार पाहून आपण थोडे पुढे गेल्यावर आपणास एक चैत्यगृह लागते. या चैत्याचा बाहेरील भाग पडलेला आहे. यामध्ये एकूण ३७ खांब आहेत. जे दोन्ही बाजूला समान अंतरावर आहेत. या खांबावर बुध्द धर्मीय देवतेच्या विविध मुद्रा कोरलेल्या दिसून येतात. तसेच बुध्द भिक्षू व शिष्यगण यांची चित्रे काढलेली आहेत. हा स्तूप इसवी सन पुर्व दुसऱ्या शतकात तयार केला असून हा लयन स्थापत्य मंदिर स्वरुप आहे. वरील छत रचना पहिली असता. पिंपळ पानाच्या रचनेसारखी दिसून येते. या चैत्याच्या मध्यभागी एक भग्न शिळा दिसून येते. जी स्तूप असावी. या स्तूपामध्ये पूर्वी बुध्द धर्मीय गुरूंच्या अस्थी ठेवल्या जात. व या स्तूपाच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग असून तो स्तंभाच्या मागून जातो. हा परिक्रमा मार्ग होय. या ठिकाणी बुध्द धर्मीय सभा आयोजित केली जात असे. स्तंभांच्या मागील बाजूस भिंतीवर बुध्द धर्मीय भितीचीत्रे असून त्यामध्ये वापरलेले रंग हे नैसर्गिक आहेत. जे बनवण्यासाठी फुले, माती, शाडू, कोळसा, झाडाचा चिक व इतर प्राकृतिक घटक वापरून हे रंग बनवले असावेत. काळाच्या ओघात ही चित्रे पुसट झालेली दिसून येतात. या चैत्यामध्ये जाण्यासाठी पायरी मार्ग बनवला गेला होता. तो भग्न पावलेला आहे.पायरी बाजूच्या वेदिका पट्टीवर कोरलेल्या सुंदर यक्ष आकृती वरून ते सिडीचा भार उचलत आहेत. हे दाखवले आहे. यावरून तत्कालीन नक्षीची कल्पना येते.
![]() |
यक्ष आकृती नक्षी |
• विशाल विहार :
चैत्य पाहून थोड पुढे गेल्यावर आपणास भग्न हत्ती असलेली चरण वेदिका पट्टीवर विशाल अशी दालने असलेला विहार लागते. हत्ती घोडा, राजहंस यासारखी शिल्पाकृती ही बुध्द चरित्राचा भाग आहेत. हत्ती शिल्पकृती मध्ये एकूण नऊ हत्ती आहेत. ते पाहून पुढे कोपऱ्यात आल्यावर आपणास वरील भागात जाण्यासाठी खोदून तयार केलेला दरवाजा लागतो. या दरवाजाची चौकट सुंदर नक्षिने सुशोभित केली आहे. या शेजारी द्वारपाल असून त्यावरील चेहरा शरीर व वस्त्र आभूषणे पाहिल्यावर तत्कालीन लोकांचे राहणीमान याविषयी अधिक माहिती मिळते. तसेच त्यावरील वस्त्र हे व्यापारी निर्यात केल्या जाणाऱ्या परदेशी मागणी असणाऱ्या मुलायम वस्त्रासारखे असल्याचे जाणवते. चौकटी शेजारी नागशिल्प आहे. या विहाराच्या वरील बाजूस एक पाण्याचे टाके आहे. जे विहाराच्या वरील बाजूने येणारे पाणी साठवण्यासाठी केले होते. त्या टाक्यापासून एक छोटीशी पाण्याची खाच बनवून उतारावरील भिंतीतून थेट पायरी मार्गानें दरवाजाच्या बाजूने नागशिल्पाच्या फणीपर्यंत आणलेली आहे. ज्यातून येणारे पाणी नागाच्या फणीतून खाली पडते. जे बुद्ध धर्मीय शिष्य व धर्म प्रसारक या विहारात प्रवेश करत त्यांचे पाय धुण्यासाठी बनवले आहे. यावरून तत्कालीन पाणी व्यवस्थापन दिसून येते. दरवाजावर सुंदर नक्षी असलेला पट्ट दिसून येतो. या दरवाजातून वरील बाजुस पायरी मार्गाने चालत जाता येते.
• विस्तृत आवार :
या पायरी मार्गानें आपण विस्तृत अवार असलेल्या भागात येतो. हे स्थान चर्चात्मक सल्ला मसलतीसाठी ठेवलेले असावे. त्याच्या आतील बाजूस अनेक खोल्या आहेत. ज्यामधे ध्यान कक्ष आहेत. ध्यान कक्षाच्या प्रवेशिकेवर अर्धचंद्राकृती पिंपळ पान नक्षी आकारात कोरलेल्या डिझाईन आहेत. त्यावर सुंदर नक्षी दगडावर छिनी हातोडा वापरुन कोरलेली असून सुंदर जाळी काम केलेली नक्षी असलेली गवाक्षे या विहारांना आहेत. ज्यातून हवा आत बाहेर जावी अशी रचना आहे. ध्यान धारणा करण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी आतील दगड तासून रचना केलेली दिसून येते. येथे बुद्ध धर्मीय शिष्य व धर्म प्रसारक ध्यान धारणा व विश्रांती घेत असतं. बाहेरील बाजूस काही स्तंभ देखील तयार केलेले पाहायला मिळतात.
• लेणे क्रमांक ५ :
पाचव्या क्रमांकाचे लेणे हे देखील विहार असावे. आज तिथे आपणास भग्न अवशेष पहायला मिळतात. बाहेरील भाग पडलेला असून फक्त आतील बैठका अस्तित्वात आहेत.
• लेणे क्रमांक ६ :
या लेण्यात देखील बैठक व्यवस्था शिल्लक राहिली असून त्यामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले पाहायला मिळते.
• लेणे क्रमांक ७ :
या लेण्यांमध्ये एक पाण्याचे टाके आहे. जे या ठिकाणी राहणाऱ्या भिक्षूंच्या पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली असावीत.
• लेणे क्रमांक ८. :
पुढील लेणे हे एक भग्न विहार असून यामध्ये वरील बाजुस सुंदर नक्षी हर्मीकापट्ट आहे. जो वरील स्तंभावर कोरलेला दिसून येतो.
• लेणे क्रमांक ९ व १०. :
नवव्या व दहाव्या क्रमंकाचे लेणे ही एक भग्न अवस्थेत असलेली गुहा आहे.
• या ठिकाणी असणाऱ्या उरलेल्या लेण्यांची रचना भग्न पावलेली असून फक्त अवशेष शिल्लक आहेत.
• पुलाच्या पलीकडे आसलेली लेणी पाहून जेव्हा आपण पुलाच्या अलीकडील भागात येतो. त्यावेळी अलीकडील भागातून एक अरुंद वाटेने आपण चालत गेल्यावर त्या ठिकाणी एक चैत्य लागतो.
• लेणे क्रमांक ११ :
अकरावे लेणे हा एक चैत्य आहे. दुमजली दरवाजे असणारा हा चैत्य आहे. यामध्ये चढून जाण्यासाठी पायर्या आहे. आतील बाजूस एक लहान स्तूप आहे. त्याच्या मध्यभागी वेदिका पट्ट आहे.
• या स्तूपा शेजारी भग्न असा स्तूप पाहायला मिळतो.
• लेणे क्रमांक १२ व १३ :
वरील बाजूस असलेले स्तूप व चैत्य पाहून आपण थोडे पुढे गेल्यावर आपणास पायरी मार्ग लागतो. या मार्गाने खाली उतरून गेल्यावर आपणास सलग दोन चैत्य लागतात. हे आकाराने लहान आहेत. आतील बाजूस स्तूप आहेत. त्यातील एका चैत्या मधील स्तूप पूर्ण स्वरूपात असून या चैत्याच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
• पितळखोरा लेण्याविषयी ऐतीहासिक माहिती :
• पितळखोरा लेणी समूहाची निर्मिती ही इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकात झालेली आहेत. तत्कालीन बुध्द धर्मास राजाश्रय दिलेल्या क्षत्रपांनी दिलेल्या दानातून या लेण्यांची निर्मिती झाली.
• या लेणी समूहातील चौथ्या क्रमांकाच्या लेण्यात एक शिलालेख आढळतो. यामध्ये गंधीक कुल मितदेव व पैठणचा संघक पुत्र याचा या लेणी उभारणीस दान दिल्याचा उल्लेख आहे.
• या ठिकाणी १३ लेणी समूह आहेत. ही लयण स्थापत्य प्रकारात येतात. लयण स्थापत्य म्हणजे डोंगर अथवा दणकट खडक खोदून त्यामधे छीन्नी हतोड्याचा वापर करून खोदून केलेली शिल्पाकृती मंदिरे, विहार, निवासगृह होय.
• ही लेणी बुध्द धर्मीय दोन पंथाची स्मरणस्थाने आहेत. यातील काही स्तूप व विहार यांची निर्मिती प्रथम सत्रात झालेली आहेत. ती हिन यान काळातील आहेत. ज्या ठिकाणी शिल्पाकृती नाही ती हिन यान पांथियानी बनवली आहेत. तर काही नंतरच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत बनवलेली आहेत. वाकाटक राजवटीत येथील द्वारपाल बुद्ध धर्मीय भितीचित्रे , हत्ती व इतर शिल्पाकृती झाल्याचे आढळून येते. ही महायान लेणी आहेत. ज्यांनी पुढे मुर्तीपूजेस चालना दिली.
• चैत्य: चैत्य म्हणजे बुध्द धर्मीय मंदिरे
• विहार : बुद्ध धर्मीय शिष्य व धर्म प्रसारक यांना निवास व्यवस्था होईल अशा साठी बांधलेल्या विश्रांती वास्तू.
• स्तूप : बुध्द धर्म प्रसारक योगी यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या अस्थी ठेवण्यासाठी बांधलेली पूजनीय जागा. ज्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी बांधलेली वास्तू, या सभोवती परिक्रमा मार्ग बनवला जातो. व येथे बुध्द शिष्य ध्यान धारणा करतात. व परिक्रमा करून सकारात्मक ऊर्जा ग्रहण करतात
• पुढील काळात हिंदू धर्मीय राजवटीच्या काळात येथील लेणी सुरक्षित राहिली.
• पुढे परकीय आक्रमणे आल्यावर येथील वास्तू नष्ट केल्या गेल्या.
• वारंवार होणारे प्राकृतिक बदलांचा व इतर मानवी आक्रांतामुळे येथील स्तूप, विहार , चैत्य यांची पडझड झालेली आहे.
• पुढे हा प्रदेश मुघल, मराठे, इंग्रज या राजवटीत राहिला.
• १५ ऑगस्ट १९४७ सालापासून स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात ही लेणी आहेत. या ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा भारत सरकार पुरवत आहे.
अशी आहे पितळखोरा लेणीसमूहाविषयी माहिती मराठी
Pitalkhora lenisamuha vishyi mahiti