गोरक्षगडाविषयी ऐतिहासिक माहिती
Gorakshgad Fort information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आपणास गोरक्षगड सह्याद्री पर्वतात पाहायला मिळतो.
• उंची :
या किल्ल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची ही सुमारे २१३७ फूट म्हणजे ६५१ मीटर उंच हा किल्ला आहे.
• गोरक्षगड पाहायला जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग:
• गोरक्षगड हा किल्ला मुंबई पासून ९५ किलोमीटर अंतरावर आहे. तर पुणे येथून १५० किलोमीटरवर तर मुरबाड येथून २५ किलोमीटर अंतरावर या किल्याच्या तळाशी असणारे दहेरी गाव आहे.
• हा किल्ला अत्यंत खडतर असून याची चढाई अवघड आहे. गिर्यारोहकांसाठी एक आकर्षक ट्रेक हा किल्ला आहे.
• पुणे जिल्ह्यातील पुणे येथून पुढे – चाकण – माळशेज घाट – हा अहमदनगर कल्याण मार्ग आहे. या मार्गाने पुढे वैशाखरे पुढे डावीकडे वळून धसाई मिल्हे मार्गे आपण जंगल वाटेने गोरक्ष गड पाहायला जाऊ शकतो.
• मुंबई कडून येताना आपण ठाणे कल्याण येथून पुढे उजवा फाटा नारीवली – उचले येथून आपण गोरक्षगडाकडे जाऊ शकतो.
• माहितीसाठी आपण दिशादर्शक नकाशा देखील वापरू शकता.
• मुरबाड मील्हे मार्गे आपण सोप्या वाटेने गोरक्षगडावर जाऊ शकतो.
• ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील दहेरी गावापासून आपण गोरक्षगड पाहायला जाऊ शकतो.
• गोरक्षगडवर पाहण्यासारखी ठिकाणे :
• गोरक्षनाथ मंदिर :
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील दहेरी गावात आल्यावर आपणास एक मंदिर पाहायला मिळते हे गोरक्षनाथ यांचे मंदीर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी सुंदर पायरी मार्ग आहे. तसेच मंदिर परिसरात कासव व नंदी यांच्या मुर्त्या प्रतिष्ठापीत केलेल्या पाहायला मिळतात.
• याच ठिकाणाहून एक रानवाट सह्याद्री पर्वतातील गोरक्षगडाकडे घेवून जाते. वाटेत असलेल्या कमानीतून आपण रान वाटेने उंच सखल डोंगर पार करत आपण शनी देवता मंदिरापर्यंत येवून पोहोचतो.
• शनी देवता मंदिर :
सध्या सेड प्रमाणे स्थानिक हिंदूंनी उभारलेले हे मंदिर पत्र्याच्या छताखाली आहे. आतील बाजूस शनिदेवतेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूस खालील भागी आपणास जुन्या चौथर्याचे अवशेष पहायला मिळतात. व् मंदिराच्या प्राचीनतेची कल्पना येते. हाताच्या पाठीमागील बाजूस घड्या घालून शनिदेवतेस नमन करून प्रवाशी पुढील प्रवास सुखकर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून गडवाटेला लागतात.
• या किल्याच्या परिसरात आपणास एक भग्न अवशेष असणारे शिव मंदीर आपणास पाहायला मिळतें.
• कात्याळ गुहा :
गडाकडे आपण जेव्हा पायवाटेने जाऊ लागतो. तेव्हा गड चढणी करताना आपणास एक कात्याळात खोदलेली गुहा पाहायला मिळते. उंच चढून यामध्ये जाता येते. तिची उंची पाहता. पुर्वी गडावर जाणाऱ्यांसाठी लोकांना सुरक्षित विश्रांती स्थान असावे असे वाटते.
• खडी वाट:
थोडं पुढे चढून गेल्यावर आपणास गडाची खडी चढाई लागते. उंच कात्याळ कड्यात खोदून तयार केलेल्या पायऱ्या जागोजागी वक्राकार झालेल्या दिसून येतात. खाली पाहिले तर विहंगम दरीचें दर्शन घडते. या पायर्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण ते इतके सोपे नव्हते. कारण या सर्व पायऱ्या बसवलेल्या नसून खडकात खोदून तयार केलेल्या आहेत.
• प्रथम प्रवेश द्वार :
पुढे प्रवेशद्वार लागते. दगडी चौकट व खोदून तयार केलेले प्रवेश द्वार व तेथून पुढे वक्राकार जीना तो ही खोदून तयार केलेला यातून वरील बाजुस गेल्यावर आपणास थोडी पसरट जागा लागते.
![]() |
पहिल्या प्रवेश दारातून वर येणारा मार्ग |
• गुहा व पाण्याच्या टाक्या :
पुढे उंच कड्याच्या बाजूने चालत जावे लागते. तेव्हा आपणास राहण्यासाठी काही गुहा कात्याळ खोदून तयार केलेल्या पाहायला मिळतात.
गुहांच्या बाहेरील बाजूस आपणास पाण्याच्या टाक्या खोदून तयार केलेल्या पाहायला मिळतात.
• पाण्याच्या टाक्या :
या वाटेने सरळ कड्याच्या कडेने जाताना आपणास सलग लागुन खोदलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. या गडावरील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवतात.
• अरुंद खडा पायरी मार्ग :
![]() |
बालेकिल्ल्याच्या वाटेतील विश्रांती देवड्या |
पहिल्या दरवाजापासून आपण थोड अरुंद वाटेने गुहा व टाक्यांच्या बाजूने आपणास अत्यंत अरुंद एक पावूल ठेवून चालावे लागेल अशा वाटेने किल्याच्या पुढील भागात येतो. तिथे एक सिडी लावलेली आहे. येथून आपणास वर चढणे अत्यंत अवघड आहे. या सिडीने वरील बाजूस पायरी मार्गानें आपणास चढावे लागते. एका वेड्यावाकड्या सर्पासारखी ही वाट जागोजागी पायऱ्या थोड्याफार तुटलेल्या पाहायला मिळतात. ही वाट खड्या चढणीची असून वर जाण्यासाठी पायऱ्यांमध्ये खाचा , खोबण्या केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे चढण सुकर होते. पण हा मार्ग गिर्यारोहकांसाठी ज्यांना चढणीचा सराव आहे. त्यांसाठीच योग्य आहे.
![]() |
बालेकिल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार |
• बालेकिल्ला माथा व शिव मंदिर:
किल्याच्या वरील माथ्यावर आल्यावर आपणास एक शिव मंदिर पाहायला मिळतें. गड रचना लक्षात घेता या ठिकाणी खालून मंदिर बांधणीसाठी साहित्य आणणे अशक्य आहे, असे वाटते. पण जिद्द व चिकाटी असणाऱ्या प्राचीन हिंदू धर्मीय लोकांनी ते करून दाखवले आहे.
गडाच्या वरील बाजूस असणाऱ्या शिव मंदिरात आपणास गोरक्षनाथ यांची समाधी पाहायला मिळतें. जसे हे शिवमंदिर आहे तसेच ती गोरक्षनाथ यांचे समाधी मंदिर आहे. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ हे शिष्य गुरू आहेत. गुरुदेव दत्त यांच्या नाथ संप्रदाय तील ते असून यांच्यामुळे या पंथाचा प्रसार झालेला आहे.त्यामुळे गोरखगड व किल्ले मच्छिंद्रगड हे जवळजवळ आहेत.
• पाण्याचे टाके : मंदिरापासून थोडया अंतरावर एका उताराची बाजू आहे तिथे आपणास एक पाण्याचे विशाल टाके पाहायला मिळतें. याच जागेचे दगड काढून हे मंदिर बांधले असावे. व् पाण्याची गरज भागवणेसाठी हा पानी साठाही निर्माण केला आहे.
• बेलाग् कड्यामुळे गडाची चढण अत्यंत अवघड व धोकादायक आहे.
या ठिकाणी आल्यावर एक अद्भुत शांती मिळते. तसेच संपूर्ण भीमाशंकर अभयारण्याचा भाग तसेच अहुपे घाट मच्छिंद्रगड व सिद्धगड, यांचे दर्शन घडते.
• मच्छिंद्रनाथ सुळका :
या ठिकाणी थोडे विसावून परतीच्या वाटेवर लागताना गड उतरणे अत्यंत धोकादायक असते. कारण खडा उतार असल्याने उतरताना खोबणीत पकड मजबूत करूनच उतरावे लागते. एखादेवेळी घसरल्यास सरळ आपण खोल दरीत पडू शकतो. त्यामुळे सावकाश उतरावे लागते.
हा किल्ला सर करने अवघड आहे. त्यामुळे गिर्यारोहण जमत असेल त्यांनीच धाडस करावे. अन्यथा लांबूनच या किल्याच्या दर्शनाचा आनंद घ्यावा.
• घनदाट अरण्य व निबीड वाट तसेच अनेक सरीसृप प्राणी , हिंस्र प्राणी व माकडांचे हल्ले झेलत एखादा धाडसी गिर्यारोहकच हा किल्ला सर करू शकतो.
• या किल्यास जरी ऐतिहासिक जास्त पार्श्वभुमी नसली तरी या किल्ल्याचे बांधकाम हे सातवाहन काळात केलेले असावे. हे येथील गुहा लेण्यांवरून तसेच असलेल्या शिलालेख वरून समजते.
• अवघड चढणीचा असल्याने या किल्याबाबत कोणताही इतिहास विषयक संदर्भ आढळत नाही. हा किल्ला अवघड चढणीचा असल्याने कोणतेही परकीय आक्रमक या किल्याच्या वाटेला जात नसत. त्यामुळे प्राचीन हिंदू धर्मीय सांस्कृतिक खुणा या ठिकाणी अजूनही किल्याच्या दरवाजावरील हिंदु प्रतीके, गुहा व शिव मंदिर यातून आजही याच्या वैभवशाली खाणाखुणा सांगत आहेत.
अशी आहे गोरक्षगडाविषयी ऐतिहासिक माहिती
Gorakshgad Fort information in Marathi