अजिंठा लेण्याची माहिती
• भारत देशातील समृध्द प्राचीन सांस्कृतिक वारशामध्ये अजिंठा लेण्यांचा समावेश होतो.
• स्थान :
भारत देशातील मध्यवर्ती ठिकाणी स्थीत महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि. मी. अंतरावर अजिंठा लेणी वाघूर नदीच्या काठावर डोंगरात काळ्या बेसाल्ट या अग्निजन्य खडकात खोदून तयार केलेली आहेत
• अजिंठा लेण्यांकडे जायचा प्रवाशी मार्ग:
• भारतातील अन्य शहरातून तसेच प्रदेशातून रस्ते , लोहमार्ग, विमान वाहतूक याद्वारे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर शहर इतर भागांना जोडले गेले आहे.
• औरंगाबाद शहरापासून अजिंठा लेणी १०० ते ११० कि. मी. अंतरावर आहेत. लेण्यापासून काही अंतरावर वाहनतळ आहे. येथून आपण सरकारी बसद्वारे मुख्य लेण्याजवळ पोहचू शकतो.
• अजिंठा लेण्याविषयी माहिती :
• अजिंठा लेणी ही वाघूर नदीच्या काठावर असणाऱ्या डोंगरात घोड्याच्या पायात घालायच्या नालेच्या आकारात कोरली गेली आहेत. हा संपूर्ण डोंगर काळ्याकभिन्न बेसाल्ट खडकाचा कठीण असा अग्निजन्य खडक आहे.
• नदीच्या पात्रापासून अंदाजे १५ ते ३० मीटर (४०ते १००) फूट उंचीवर आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी एक मार्ग देखील बनवला गेला आहे. वाटेत छोट्या छोट्या दुकानातून विविध शिल्प रचना असणाऱ्या मूर्ती देखील पाहायला मिळतात.
• या ठिकाणी २९ बुद्ध लेण्या आपणास पाहायला मिळतात. पण यातील काही अपूर्ण आहेत.
• पहिले बुद्ध लेणे :
लेण्यांकडे जाणाऱ्या वाटेने आपण प्रथम लेण्याजवळ पोहोचतो. वीस खांबाची सुबक कलाकुसर असणारी ही लेणी आहे. आतील बाजुस सुंदर पेंटिंग काढलेली आहेत. नाजूक कलाकुसर खांबाच्या वरील बाजूस पाहायला मिळते. आतील बाजूस तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते.
२) दोन नंबर असणार्या लेण्यात प्रवेश केल्यावर आपणास छत व भिंतीवर नाजूक कलाकुसर केलेली पाहायला मिळते. तसेच भिंती चित्रातून गौतम बुध्द यांच्या जीवनातील घटनांवर आधारित अनेक भिंती चित्रे काढलेली पाहायला मिळतात. भिंतीचित्रातील रंग अजूनही नवीनतम वाटतात. मध्यभागी सुंदर बुध्द शिल्पाकृती मन आकर्षून घेते. तसेच या लेण्यात एका बाजूस पंचिका व हराती यांची शिल्पाकृती पाहायला मिळते.येथील खांबावर नाजूक कलाकुसर दिसून येते.
• तिसऱ्या दालनातील लेणी अपूर्ण स्वरूपात आहेत.
• चार नंबरची लेणी विस्तृत अशा दालनातील असून या ठिकाणी एकूण अठ्ठाविस खांब आहेत. बाहेरील बाजुस द्वारपालांच्या मुर्त्या पाहायला मिळतात. पुजास्थळी महात्मा गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. व अशा प्रकारे सहा बुध्द मुर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा पाहिल्यास अष्ट भय निवारक ह्या लेणी असल्याचे जाणवते. या लेणी विशाल स्वरूपाच्या आहेत.
• पाचव्या क्रमांकाची लेणी अपूर्ण आहेत. येथे अपूर्ण बुध्द मुर्त्या पाहायला मिळतात.
• लेणी क्रमांक ६ ही दोन मजली लेणी आहेत. या ठिकाणी असणारी बुध्द मूर्ती ही पद्मासनात बसलेली पाहायला मिळते. दुसऱ्या मजल्यावर खांब आहेत. सभगृहातील खांबावर तसेच इतर ठिकाणी मगरी व फुलांची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. दुसऱ्या मजल्यावर गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रेत असणाऱ्या मुर्त्या पाहायला मिळतात. या लेण्याच्या दरवाजावर देखील नक्षी पाहायला मिळते.
• सातव्या लेण्यात पुजास्थानी बुध्द मूर्ती व मागील बाजूस सुंदर प्रभावळी पाहायला मिळते.
• आठव्या लेण्यात पहाण्याजोगे फारसे काही नाहीं.
• नवव्या लेण्यांचा आकार काटकोन आकाराचा चैत्यगृह आहे. मध्यभागीं स्तूप बाजूस खांबावर अस्पष्ट बुध्द मूर्ती निरनिराळ्या भावमुद्रेत कोरलेल्या दिसतात.
• दहावे लेणे हे एक हिनयान या बुध्द पंथीय लेणे आहे. या लेण्यात चाळीस खांब असून मध्यभागी चैत्यगृह आहे. येथील कोरीव काम विलोभनीय आहे.
• अकरावे लेणे हा एक भला मोठा सभामंडप असून पुजास्थानी बुध्द मूर्ती आहे.
• सोळावे लेणे अत्यंत वैशिष्टय पूर्ण आहे. यामध्ये बुध्द चित्रे आहेत. बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग व घटना या ठिकाणी चित्रित केल्या आहेत.
• सतरा क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आपणास सुंदर भींती चित्रे पहायला मिळतात. यामध्ये बुध्द जातक कथा कोरलेल्या पाहायला मिळतात. ज्या जीवनातील जगण्याचा तात्विक अनमोल संदेश देतात. मध्यभागीं बुध्दमूर्ती पाहायला मिळते.
• एकोणीस क्रमांकाचे लेणे हे एक नालेच्या आकाराचे मंदीर आहे. यामधे देखिल बुध्दमूर्ती पाहायला मिळते. तसेच नागराजा व त्याची पत्नी यांची शिल्पाकृती देखील पाहायला मिळते. येथे तिन छत्री स्तूप आहे. तसेच अनेक बुधमुर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात.
• लेणी क्रमांक २६ ही अजिंठा लेण्यातील शिल्पकलेचे वैभव असणारी लेणी आहे. सुंदर नक्षी कोरलेली कमान आतील बाजूस बुद्धांचे महापरिनिर्वाण शिल्प बाजूस बुध्द जीवनातील घटना शिल्पे, पाहायला मिळतात. तसेच बाकी भिंती चित्रात बुध्द चरित्र तसेच जातक कथा पाहायला मिळतात.
• इतर बरीचशी लेणी ही अपूर्ण आहेत.
• अजिंठा लेण्यांची ऐतिहासिक माहिती :
• अजिंठा लेणी पाहिल्यावर यामध्ये वेगवेगळ्या काळातील शैली पाहायला मिळते.
• ही लेणी दोन टप्यात निर्माण केली गेली.
• दुसऱ्या ते चौथ्या शतकाच्या दरम्यान कोरलेली लेणी. यामधे स्तूप रचना दिसून येते. ही बौद्ध धर्म हिनयान पंथाच्या काळातील आहेत.
• दुसरा टप्पा म्हणजे सहाव्या ते नवव्या शतकात कोरलेली महायान लेणी , ही लेणी वाकाटक राजवटीच्या काळात खोदली गेली आहेत. वाकाटक राजवटीच्या नाशानंतर या लेण्यांचे काम थांबले गेले. त्यामुळे येथील बरीचशी लेणी अपूर्ण राहिली.
• ही लेणी वाघूर नदीच्या काठावर जंगलाने वेढलेली असल्याने शत्रू राजवटीत सुरक्षित राहिली.
• इसवी सन २८ एप्रिल १८३९ साली ब्रिटिश राजवटीत मद्रास प्रांताचा अधिकारी जॉन स्मिथ या ठिकाणी राहिला होता. त्यावेळी तो शिकारीस गेल्यावर त्यास प्रथम ही लेणी दृष्टीस पडली.
• इसवी सन १९८३ साली युनेस्को या संस्थेने जागतिक वारसा स्थळामध्ये या लेण्यांचा समावेश केला.
• महाराष्ट्र राज्यातील सात आश्चर्ये यामध्ये या लेण्यांचा समावेश प्रथम स्थानी आहे.
• चिनी व बुध्द प्रवाशांच्या वर्णन ग्रंथात या लेण्यांचा उल्लेख आहे.
• ही लेण्यात बुद्ध धर्मीय मूर्ती, शिल्पे, चित्रे यांचा समावेश आहे. चित्रे काढण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर केला गेला आहे. यामध्ये नैसर्गिक रंग, माती, भाताचा कोंडा, तसेच नैसर्गिक घटक वापरले गेले आहेत.
• अशी आहे अजिंठा लेण्याविषयी माहिती.
Ajintha Caves information in Marathi