वेरूळ लेणी (Ellora Caves)
वेरूळ लेण्यांची माहिती
Ellora Caves information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर ( औरंगाबाद) या शहरापासून थोडया अंतरावर वेरूळ गावापासून काही अंतरावर सातमाळा अजिंठा डोंगररांगेत वेरूळची लेणी आहेत.
• लेण्याजवळ जाण्यासाठीचा प्रवाशी मार्ग :
• पुणे व संभाजीनगर ही शहरे आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानसेवेने जोडली गेली आहेत.
देश पातळीवर रस्ते, लोहमार्ग व विमानसेवा यांनी जोडली आहेत.
• संभाजीनगर पासून देवगिरी वल्ली – दौलताबाद – कागझीपुर – खुलताबादपासून पुढे वेरूळ रोडवर लेण्यांकडे जाण्याचा जोड रस्ता आहे तेथून लेण्यांजवळ जाता येते.
• धुळे शहरावरुन– चाळीसगाव – कन्नड मार्गे– वेरूळ लेणी.
• नाशिकवरुन – सिन्नर – कोपरगाव – वैजापूर – लसूर मार्गे– वेरूळ लेणी.
• पुणे शहरावरुन– अहमदनगर. – शनी शिंगणापूर - नेवासा – गंगापूर – लसूरमार्गे – वेरूळ लेणी. पाहायला जाता येते.
• वेरूळ लेण्यांमध्ये पहाण्यायोग्य ठिकाणे :
• संभाजीनगर शहरातून आपण सिडको बस स्थानकापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ गाव आहे. तेथून थोड्या अंतरावर लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ते मार्ग आहे. या मार्गाने आपण लेण्याजवळ पोहचू शकतो.
• या परिसरातील डोंगरास येलो पर्वत म्हंटले जाई, येथून वाहणारी नदी येलगंगा नावाने ओळखली जात असे. तिच्या तीरावरील वसलेल्या गावास येलोर म्हंटले जाई. त्याचा अपभ्रंश पुढें वेरूळ असा झाला. व या ठिकाणास आज वेरूळ या नावाने ओळखले जाऊ लागले.
• ही लेणी घडवताना छीनी हतोड्याचा वापर करुन घडवली आहेत. यासाठी हजारो कारागिरांनी खुप वर्षे कष्ट केले आहे.
• या ठिकाणी एकूण ३४ लेणी गुहा आहेत. यापैकी
• लेणी क्र. १ ते १२ नंबर ही बुध्द धर्मीय लेणी,
• लेणी क्र. १३ ते २९ ही हिंदु धर्मीय लेणी आहेत.
• तर लेणी क्रं. ३० ते ३४ ही लेणी जैन धर्मीय लेणी आहेत.
• या ठिकाणीं हिंदू, जैन, बुध्द या तिन्ही धर्मीय लेण्यांचा सुयोग्य मिलाफ येथील लेण्यांतून दिसून येतो.
• बुध्द लेणी :
• बुध्द लेण्यांमध्ये आपणांस विहार, चैत्यगृह, ( प्रार्थनागृह) बुद्ध भिखू निवासस्थाने, गौतम बुध्द यांच्या विविध भावमुद्रा असणारी शिल्पे, तसेच इतर बुध्द धर्मीय मुर्त्या बोधिसत्व यांची शिल्पे पाहायला मिळतात.
• लेणे क्रं.१ हे बुद्धकालीन घटनांवर कोरीव लेणे आहे. या लेण्यात आठ दालने आहेत. येथे बुद्ध भिक्षू निवास करत. अनेक बुध्द मूर्ती व बुध्द वाड़.मयाशी संबंधित रचना येथे आढळतात.
• लेणे क्र.२ व लेणे क्र.३ ही बुध्द लेणी एकसारखी रचना असलेली दिसून येतात.
• लेणे क्र. ४ हे दोन मजली आहे. येथे बुध्द मूर्ती पाहायला मिळतात.
• लेणी क्रमांक ५ हे महायान लेणे आहे. या ठिकाणी बुध्द भिखु बुध्द धर्माचे शिक्षण घेत असत. तसेच त्यांच्यासाठी जेवणं विभाग देखील येथे होता.
• लेणी क्रमांक ६ : हा एक विहार आहे. बुध्द भिक्षू हे बुध्द तत्त्वज्ञान प्रसार करण्यासाठी चारिका करत. त्यवेळी तसेच पावसाळी दिवसात त्यांना सुरक्षीत आश्रय स्थान हे विहार असत. या लेण्यात तारा बोधिसत्व, अवलोकितेश्र्वर यांच्या विविध शिल्पाकृती येथे पाहायला मिळतात.हिंदू देवता सरस्वतीची मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते. सरस्वती ही विद्येची देवता आहे.
• लेणे क्रमांक ७ व ८ अपूर्ण राहिली आहेत.
• लेणे क्रमांक ९ हे पूजास्थळ असल्यासारखे दिसतें. या ठिकाणी अनेक गवाक्षे दिसून येतात. येथे तारा या बोधिस्त्वाची मूर्ती आहे. तसेच इंद्रियांना वश करुन भयांकित करणारे सहा सर्प, हत्ती, अग्निदेवता, तलवार यांसारख्या शिल्प मुर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात.
• लेणे क्रमांक १० हे एक चैत्यगृह आहे या ठिकाणीं मध्यभागीं स्तूप व बुद्धमूर्ती आहे. अनेक खांब सुरेख नक्षी तसेच अर्धवर्तुळाकार कमान पाहायला मिळते. छतावर लाकडी सर्प कोरलेला आहे. या ठिकाणीं भीखु प्रार्थना करत. तसेच ध्यान करत असत.
• लेणी क्रमांक ११ मध्ये काही बुध्द धर्मीय मुर्त्या तर काही हिंदु धर्मीय मूर्ती स्वरूप दिसुन येते. ही दोनमजली आहेत.
• लेणी क्रमांक १२ ही तिनमजली असून येथे ध्यानस्थ बुध्दमूर्ती पाहायला मिळते.
• हिंदू धर्मीय लेणी :
• हिंदु धर्मीय लेण्यांमध्ये हिंदु देवता, तसेच पौराणिक, ऐतिहासिक प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात.
वेरूळ लेण्यातील अतिशय महत्त्वपूर्ण स्थान हे कैलास लेण्यास आहे. अखंड पठारावरील पाषाणाचे अंतर घेऊन प्रथम संरचना तयार करून कळसापासून खोदत कोरीव काम करत हे लेणे पायापर्यंत खोदले गेले आहे. ५० मीटर लांब,३३ मीटर रुंद तर २९ मीटर उंच असे हे कैलास लेणे खोदले आहे.
अशी रचना या लेण्यांची आहे.
सुरेख गाभारा पुढें सभामंडप त्यापुढे स्तंभ व पुढें प्रवेशद्वार कमान अशी रचना या लेण्यांची आहे.
• कैलास लेणी पहायला जाताना प्रथम आपणास एक कोरीव कमान लागते. या मध्ये पुढें प्रवेशद्वारावर शंख निधी व पद्मनिधि नावाचे दोन द्वारपाल पाहायला मिळतात.
कळसावर सुरेख कोरीव काम करत खालील भागापर्यंत आरेखन केल्याचे दिसते. जवळ जवळ ४०,००० टन दगड काढून हि शिल्पे कोरलेली आहेत. याठिकाणी प्राणी, नक्षी, पाने फुले यांची सुबक कलाकुसर दिसून येते. लेण्याच्या वरील दालनात जाण्यासाठीचा पायरी मार्ग पाहायला मिळतो. या लेण्यात भव्य असे शिवलिंग आहे.
तसेच लेण्याच्या भोवती अनेक देवड्या खोदलेल्या आहेत. तसेच शिव पार्वती यांची तसेच हिंदू देवतांची शिल्पे कोरलेली आहेत.
• या ठिकाणीं असलेल्या लेण्यात रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत आहे. वरील बाजूस पर्वत तेथे शिव व पार्वती देवी विराजमान आहेत. यावरून या लेण्यास कैलास लेणे असे नाव पडले आहे. त्याचप्रमाणे देवी दुर्गा, गणेश मूर्ती, अनेक शिव आणि पार्वती यांच्या शिल्पांनी सज्ज अशी शिल्पाकृती येथे आहे.
• स्तंभ :
अखंड एकाच दगडात कोरलेला स्तंभ इथे पाहायला मिळतो. तो १५० फूट उंच असावा असे सांगितले जाते.
• या ठिकाणीं महाभारत, रामायण, तसेच अनेक पौराणिक घटना कोरलेल्या दिसून येतात.
• महाभारत भिंत :
मंदीर परिसरात एक भिंत आहे. ज्यावर महाभारत कालीन प्रसंग कोरलेले आपणास पाहायला मिळतात.
• या लेण्यांमधील शिल्प शैलीं ही कर्नाटक येथील पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिर व कांची येथील कैलास मंदीर येथील शिल्प रचनेशी साम्य आहे.
या लेण्याबाबत अशी अख्यायिका प्रचलित आहे. की राष्ट्रकूट राजवटीत येथील देवास हत्तीवरून नैवेद्य आणून दाखवला जात असे.
![]() |
रामेश्वर |
• वेरूळ येथील जैन लेणी:
• या लेणी समूहातील लेणी क्रमांक३० ते लेणी क्रमांक ३४ ही जैन लेणी आहेत. ही पाच गुहा मंदिरे आहेत. यामध्ये छोट्या सभा आहेत. त्यामधे इंद्रसभा, जगन्नाथ सभा तसेच छोटा कैलास यांसारखी शिल्पाकृती असणारी शिल्पे आपणास पाहायला मिळतात. जैन लेणी ही एकमजली लेणी आहेत. ही आतील बाजूने एकमेकांना जोडलेली आहेत. भव्य गज ( हत्ती) , बारीक कलाकुसर असणारे स्तंभ, सुक्ष्म कोरीवकाम, आश्चर्य कारक तोरणे हे स्थापत्यशास्त्राचे वैभव जैन लेण्यात आहे.
• याठिकाणी यासारख्या जैन तीर्थंकरांच्या जैनांचे चोविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान , इंद्र, गोमतेश्र्वर शिल्पाकृती व मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात.
• वेरूळ लेण्यांची ऐतिहासिक माहिती :
• राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कारकीर्दीत म्हणजेच इसवी सन ७५३ ते सन ७८३ या काळात केलास लेणे खोदले गेले. यासाठी राष्ट्रकूट राजा कृष्ण याचे भरीव योगदान दिले. हे येथील शिलालेख वरून जाणवते.
• बुध्द व जैन लेणी ही देखील इसवी सनाच्या ६व्या ते ९ व्या शतकात खोदली गेली.
• यालेण्याचे वैशिष्ट म्हणजे येथे हिंदु, जैन, बुध्द धर्माचा तिहेरी संगम दिसून येतो.
• ही लेणी द्रविड संस्कृतीशी संबंधित आहेत.
• बहमनी सुलतान हसन गंगू बहमनी हा काही काळ या ठिकाण काही काळ वास्तव्यास होता
• अरबी प्रवाशी अल – मस् – उदी याने तसेच फिरिस्ट मालेट यासारख्या परदेशी प्रवाशांनी या वेरूळ लेण्यांचा उल्लेख त्यांच्या प्रवास वर्णनात केलेला आहे.
• मुघल राजवटीत या लेण्यांची थोडीफार मोडतोड झालेली पाहायला मिळते.
• १९ व्या शतकात ब्रिटीश सरकारने या लेण्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला.
• इसवी सनाच्या १९४७ सालानंतर ही लेणी स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहेत.
• इसवी सन १९५१ साली भारत सरकारने या ठिकाणास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
• इसवी सन १९८३ साली युनेस्को या संस्थेने जागतिक वारसा स्थळात वेरूळ लेण्यांचा समावेश केला आहे.
• अशी आहे वेरूळ लेण्यांची ऐतिहासिक माहिती.