चावंड किल्ला / प्रसन्नगड किल्ला माहिती
Chavnad / prasanngad Fort information in Marathi
• स्थान:
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात उत्तरेस असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या उगम प्रदेशात चावंड किल्ला आपणास पाहायला मिळतो.
• चावंड किल्ला हा प्रसन्नगड, चावंड्स, चावुंड चौंड चामुंडगड या नावानी देखील ओळखला जातो.
• उंची:
समुद्र सपाटी पासून चावंड किल्ला हा सरासरी ३४०० फूट उंचीवर तसेच पायथ्यापासून ११५५फूट पायथ्यापासून उंच हा किल्ला सह्याद्री पर्वतात नाणेघाटा जवळ आहे.
• नाणेघाट हा जूना व्यापारी मार्ग असून त्या मार्गावरील देखरेख तसेच संरक्षण करण्यासाठी या परिसरात शिवनेरी, जीवधन, हडसर व चावंड गडाची निर्मिती केली गेली होती.
• चावंड किल्यावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• चावंड किल्ला पाहायला जाण्यासाठी या किल्याच्या परिसरात असणाऱ्या जुन्नर शहरात प्रथम आपणास जावे लागेल.
• पुणे येथून १०० किलोमीटर अंतरावर चावंड किल्ला आहे.
• मुंबई येथून १७०किलोमीटर अंतरावर चावंड किल्ला आहे.
• जुन्नर शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर चावंड किल्ला आहे.
• चावंड किल्ला पाहायला जाताना आपणास प्रथम जुन्नर या ठिकाणी जावे लागेल तेथून चावंडवाडीला बस अथवा इतर वाहनाने यावे लागते. तेथून जवळच चावंड किल्ला आहे.
• मुंबई – जुन्नर – चावंडवाडी तेथून किल्ले चावंडला जाता येते.
• पुणे – जुन्नर – चावंडवाडी तेथून पुढे किल्ले चावंड पाहायला जाता येते.
• चावंड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• जुन्नर कडून आपण रोडने चावंडवाडी जवळ आल्यावर पुढे थोडया कच्च्या रस्त्याने आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या पायरी मार्गाजवळ येतो.
• माहिती फलक व मचान :
किल्याच्या पायथ्याशी आल्यावर आपणांस किल्याची माहिती देणारे फलक पाहायला मिळतात. तसेच एक टेहळणी करण्यासाठी उभा केलेले मचान शेजारी असलेले पाहायला मिळते.
• पायरी मार्ग:
गडाकडे जाताना आपणास एक पायरी मार्ग लागतो. या वाटेने आपण गडाकडे जाऊ शकतो.
• खडतर कात्याळ पायरी मार्ग:
बांधीव पायरी मार्गाने आपण जेव्हा गडाच्या कात्याळ पायरी मार्गाजवळ येवून पोहोचतो. हा मार्ग जागोजागी तुटलेला आहे. किल्ला बांधणी करताना या पायऱ्या खड्या कात्याळात खोदलेल्या आहेत. हा किल्ला संपूर्ण बेसाल्ट नावाच्या निसर्ग निर्मित अग्निजन्य खडकावर स्थित आहे. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र राज्यातील पठार हे या खडकाचे बनलेले आहे. सह्याद्री पर्वतातील प्रदेश यामध्ये येतो. त्या काळी छिन्नी हतोड्याचा वापर करून याची निर्मिती झाली आहे. या पायऱ्या देखील . या मार्गाने जाणे सुकर व्हावे यासाठी लोखंडी पाईप रॉड लावण्यात आलेले आहेत. त्यामूळे गड चढताना मदत होते. ब्रिटिशांनी हल्ला केल्यावर तोफांचा मारा करून हा पायरी मार्ग उद्ध्वस्त केला होता.
••पायरी मार्ग पुरलेली तोफ :
पायरी मार्गाने जेव्हा आपण गडाकडे जाऊ लागतो. तेव्हा एका पायरीवर आपणास एक तोफ पुरलेल पाहायला मिळते. तिचे निरीक्षण केल्यास ती जंबुरका पद्धतीची वाटते.
पायरी मार्ग चढून वरती आल्यावर जेव्हा आपण गणेश दरवाजा जवळ येवू लागतो. त्यावेळी आपणास मोठा पायरी मार्ग लागतो. त्यावरून गडाच्या खालील तुटलेल्या पायऱ्यांची वास्तविकता दिसून येते. किंवा शत्रूस गड चढणे अवघड जावे यासाठी देखील पायऱ्यांची लहान मोठी रचना केली असावी.
• गणेश दरवाजा/महादरवाजा :
पायरी मार्गानें आपण गणेश दरवाजा जवळ येवून पोहोचतो. या दरवाजावर गणेश देवतेचे शिल्प कोरलेले आहे. वरील बाजूस बंदिस्त कमान व खाली चौकट दिसून येते. चौकटीवरील पट्ट भंगलेला आहे. तो ढासळू नये म्हणून लोखंडी पाईप रॉड लावण्यात आलेले आहेत. हा दरवाजा एका बाजूला बुरुज व दुसरीकडे कात्याळकडा असलेली ताशीव भिंत पाहायला मिळते. निसर्ग निर्मित अशी संरक्षक रचना असल्याचे पाहायला मिळतें. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.
• पायरी मार्ग :
गणेश दरवाजाने ज्यावेळी आपण आत जातो तेव्हा पुढे गेल्यावर दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग भग्न अवशेषांकडे घेवून जातो.
तर दुसरा खोदीव पायरी मार्ग आहे. जो किल्याच्या वरील भागाकडे घेवून जातो.
• सदर अवशेष :
चावंड हा किल्ला प्राचीन आहे. या ठिकाणी किल्याच्या वरील बाजूस आपणास जोत्याचे बांधकाम पाहायला मिळतें. उभे स्तंभ व तासीव दगडाची बैठक पहाता या ठिकाणी राजसदर असल्याचे जाणवते.
• वास्तूंचे अवशेष :
गडाच्या वरील बाजूस आपणास बांधलेल्या वास्तूचे अवशेष पहायला जागोजागी दिसतात. किल्ल्याच्या शिबंदित राहणाऱ्या लोकांसाठी तसेच किल्लेदार व त्यांचा कुटुंब कबिला राहण्यासाठी त्या बांधल्या असाव्यात. काळाच्या ओघात अथवा अन्य आक्रमकांच्या हल्यात उद्ध्वस्त झाल्याचे जाणवते. या परिसरात एक उखळ देखील पाहायला मिळतो.
• वाडा:
गडावर आपणास अनेक अवशेष पहायला मिळतात. त्यामधे असणाऱ्या अवशेषामध्ये वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात. जे किल्लेदार वा तत्कालीन अधिकारी यांच्यासाठी बांधलेले असावेत. आता फक्त पायाभूत अवशेष पहायला मिळतात.
वाड्याशेजारी आपणास एक पाण्याची विस्तृत अशी तळी पाहायला मिळते.
गडावर फिरत असताना आपणास एका बाजूला एक सुरेख बांधीव खोदिव पाण्याचा तलाव पुष्करणी पाहायला मिळतो. जी किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवणेसाठी खोदली गेली होती. सुरेख तासिव दगडी बांधकाम या तलावाचे दिसून येते. त्याच्या सद्य स्थिती वरून त्याच्या प्राचीन भव्यतेची कल्पना येते.
शिव मंदिराजवळ असलेली ही पुष्करणी तिच्या भोवती फिरण्यासाठी बांधीव चौक आहे. चौक झाल्यावर लागणाऱ्या बांधीव कठड्यास लागून देवड्या केलेल्या आहेत. व् त्यामध्ये अनेक देवतांच्या मुर्त्या असाव्यात. त्यांची पूजाअर्चा होत असावी हे समजते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसून येते.
• शिव महादेव मंदिर :
पुष्करणी जवळच आपणास एक प्राचीन बांधणीच्या मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. आजच्या काळात त्याकडे बरेचसे दुर्लक्ष झाल्याने त्यास अवकळा आल्याचे जाणवते. पण काळ्या दगडात असलेले तासिव व घडीव नक्षी असलेले स्तंभ व इतर महिरप व चौथरे पाहिल्यास आपणास त्याच्या भव्यतेची कल्पना येते. आतील बाजूस सुंदर शिवपिंडी पाहायला मिळते. मंदिराची रचना पाहता सभामंडप गाभारा प्रदक्षिणा फेरी मार्ग देखील अस्तित्वात असावा याची जाणीव होते.
• भग्न नंदी : तलावाच्या बाजूला आपणास भग्न नंदीचे अवशेष पहायला मिळतात. त्याच्या भग्नतेवरून त्यावर झालेल्या हल्याची व केलेल्या विध्वंसाची कल्पना येते.
तसेच गडावर काही ठिकाणी भग्न देवतांच्या मुर्त्या आढळतात.
• पाण्याची टाकी : किल्ल्यावर आपणास अनेक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. एके ठिकाणी तर सात पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. जी सप्त मात्रुका टाकी म्हणून ओळखली जातात. या किल्यावर शाक्त पंथ म्हणजे देवी उपासक प्राचीन काळी राहत असावे. ते देवी उपासक असल्याने त्यांनी सप्तमात्रुका टाक्यांची निर्मिती केली असावी. ही टाकी गडाच्या वायव्य भागात आपणास पाहायला मिळतात.
मध्ययुगीन काळात हिंदू धर्मीय लोकांच्या संरक्षणासाठी शाक्त पंथ उदयास आला. या पंथाचे एक पूजा स्थान म्हणून आपण चावंड किल्ल्याकडे पाहू शकतो.
• पाण्याची टाकी : गडावर आपणास अनेक पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. जी गडाच्या तटबंदी व बुरुज बांधण्यासाठी दगड काढून एकीकडे बलाढ्य तटबंदी व बुरुज बांधले. तर दुसरीकडे पाणी साठवण अशा दुहेरी उद्देशाने या पाण्याच्या टाक्यांची निर्मिती केली गेली. गडाच्या नैऋत्य बाजूला तुरळक तटबंदी व पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसून येतात.
सप्त पाण्याच्या टाक्यांमध्ये जाण्यासाठी पायरी मार्ग तयार केलेला पाहायला मिळतो. तसेच सुरेख कमान देखील तयार केलेली दिसून येते.
• चामुंडा देवी मंदिर:
गडाच्या बालेकिल्ल्यावर देवी चामुंडाचे मंदिर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी फलक व दिशादर्शक खुणा वाटेवर केलेल्या आहेत. हे गडाच्या वरील भागात आहे. जुने मंदिर भग्न झाल्यावर त्या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधलेले आहे. चिरेबंदी मंदिराच्यावर घुमटाकार छोटा कळस आहे. मंदिराच्या आतील बाजूस देवी चामुंडेची मूर्ती आहे. मंदिरासमोर अनेक लहान मुर्ती पाहायला मिळतात. तसेच एक दीपमाळ देखील आहे. शाक्त पंथी मंडळी ही देवी उपासक असल्याने या ठिकाणी आपणास देवी चामुंडाचे मंदिर पाहायला मिळतें. या देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे या गडास चावंड नाव पडले.
• गुहा :
गडाच्या ईशान्य बाजूस आपणास खोदून तयार केलेल्या गुहा पाहायला मिळतात. ज्या विशेषत सातवाहन काळात खोदलेल्या असाव्यात. प्रशस्त अशा या गुहेत आज देखील राहण्याची सोय होऊ शकते. छिन्नी हातोड्याचा वापर करून तयार केलेल्या या गुहा आहेत. या परिसरात गडाची तटबंदी समाप्त होताना दिसते.
चावंड किल्यावर असलेल्या गुहा या सातवाहन काळातील तसेच शाक्त पंथियांनी आपल्या रहाण्याकरता बांधलेल्या आहेत. या गुहांकडे जाताना तटाच्या बाजूने असलेल्या निमुळत्या वाटेने जावे लागते. पुढे गेल्यावर एकामागून एक लेणी रचनेत या गुहा आहेत. आत बैठक व्यवस्था या गुहेत होती. ती येथील गुहा खोलीच्या रचनेतून दिसून येते
• भुयारी मार्ग :
गुहेजवळ आपणास एक भुयारी मार्ग असलेला पाहायला मिळतो. हा मार्ग आता सुरक्षेसाठी बंदिस्त आहे.
चावंड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती:
• या किल्याच्या परिसरात प्राचीन काळापासून मानवी वस्ती आढळते.
• सातवाहन राजवटी काळात या ठिकाणी गुहा खोदल्या गेल्या. या ठिकाणी पुढे सप्त मातृका तलाव खोदून शाक्त पंथीय देवीच्या उपासना करणाऱ्या सन्याशी व साधूंनी तलाव खोदले. व् देवी चामुंडा म्हणजेच चावंडादेवीची स्थापना करून पूजा अर्चा होऊ लागली.
• याच काळात नाणेघाट या राज्यमार्गवर नजर ठेवण्यासाठी शिवनेरी, हडसर, जीवधन व चावंड किल्याची बांधकाम सातवाहन काळात झाले असावे. असे मानले जाते.
• पुढे या परिसरात यादव, शिलाहार, तसेच शक राजांची सत्ता असावी.
• इसवी सनाच्या तेराव्या ते चौदाव्या शतकात या परिसरात बहमनी राजवटीची सत्ता असल्याचे मानले जाते.
• या काळात या परिसरात असणाऱ्या महादेव कोळी जातीच्या सरदाराची सत्ता या प्रदेशातील किल्ल्यांवर होती.
• इसवी सन १४८५ साली अहमदनगर येथे निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमद याने पुणे प्रांत काबीज केल्यावर चावंड किल्ला आपल्या ताब्यात घेऊन तेथे आपला किल्लेदार नेमला.
• मुर्तीजा निजामशहा याच्या काळात इसवी सन १५६५ ते ८८ या काळात त्याच्या वजीराने बंड केल्यावर त्यास चावंड् किल्यावर कैद करुन ठेवले. चंगीजखान याच्या मध्यस्थीने त्याची सुटका झाली.त्यानंतर दुसरा वजीर असदखान यास देखील कैद करुन ठेवले होते.
• इसवी सन १५९४ साली इब्राहिम निजामशहा व चांदबीबी यांचा पुत्र जो एक वर्षाचा होता. त्यास या ठिकाणी नजर कैदेत टाकले होते. पण वजीर मिया मंजू याने त्याची सुटका केली.
• निजामशाह शहजादा बहादुर हा चावंड् किल्यावर असताना वजीर इखलासखान याने बंड केले. व् चावंड किल्ला परिसर सुभेदार यास आदेश दिला की बहादुर शहा यास आपल्या ताब्यात द्यावे. पण चतुर सुभेदाराने मीया मंजू याचे लेखी फर्मान असल्याशिवाय आपण बहादुर शहा यास हवाली करणार नाही असे सांगितले. तेव्हा इखलासखान याने तोतया बहादुर शहा निर्माण करून मीया मंजू वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मीया मंजूने अकबर पूत्र मुराद याकडे मदत मागितली. तेव्हा मुराद थेट मदत न करता थेट अहमदनगर ताब्यात घेण्यासाठी चाल करून आला. अशा प्रकारे बाहेरून संकट बोलावून घेतल्याचा पश्चाताप मीया मंजुला झाला.
• इसवी सन १६३६ साली निजामशाहीवर आलेले आदिलशहा व मुघल यांचे आक्रमण झाले. यावेळी झालेल्या युद्धात पराभव झाल्यावर निजामशाही कडून तह करताना. चावंड किल्ला शहाजीराजे यांनी मुघलांना दिला.
• इसवी सन १६७२-७३ साला दरम्यान छत्रपती शिवराय यांनी चावंडगड, हरिश्चंद्रगड,महिषगड, अडसरगड ताब्यात घेतले. व स्वराज्यात आलेल्या या किल्ल्यांचे नामांतर केले. यामध्ये चावंड किल्याचे नाव प्रसन्नगड ठेवले.
• इसवी सन १६९४ मध्ये औरंगजेब याने दक्षिणेत आल्यावर चावंड किल्ला जिंकला व किल्लेदार म्हणून सुरतसिंग गौड याची नेमणूक केली. परत हा किल्ला मराठ्यांनी जिंकला, त्यानंतर पुन्हा मुघलांतर्फे १६६५ साली गाजिउद्दीन बहादुर याने किल्ला जिंकला.असे वारंवार हा किल्ला मराठे व मुघल राज्यात फिरत राहिला.
• १० ऑगस्ट १७४९ साली चावंड हा किल्ला मुघलांनी हवालदार संताजी मोहिते यास मुघलांकडून सनदेत दिला गेला.
• पुढे हा किल्ला पेशवाईत आला. पेशवाईत असताना कैदी ठेवण्यासाठी या किल्याचा वापर केला गेला.नाना फडणवीस यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यास काही काळ कैद करून या किल्यावर ठेवले होते.
• इसवी सन १८१८ साली इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यावर संपूर्ण सत्ता इंग्रज राजवटीच्या ताब्यात आली. त्यावेळी इंग्रज अधिकारी मेजर एल्ड्रीजने चावंड किल्यावर २ मे रोजी हल्ला चढवला. यावेळी त्याने गडावर तोफ मारा करून जिंकून घेतला. व् गडाच्या पायरी मार्ग तोफेच्या माऱ्याने नष्ट करुन टाकला. तसेच गडावरील वास्तूंची हाणी केली.
• पुढे हा किल्ला इंग्रज राजवटीत होता.
• इसवी सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• अशी आहे चावंड किल्याची ऐतिहासिक माहिती.