निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती
Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात पश्चिम घाट म्हणजेच सहयाद्री पर्वतात आपणास खांद्याच्यीवाडी येथे निमगिरी किल्ला व हनुमंत गड पाहायला मिळतो.
• उंची :
या किल्ल्यांची सरासरी समुद्रसपाटी पासून उंची ही सुमारे ११०८मीटर आहे. व पायथा उंची ही सुमारे ३०० मीटर उंच हा किल्ला आहे.
• निमगिरी व हनुमंतगडाकडे जाण्याचा प्रवाशी मार्ग:
• मुंबई येथून आपण कल्याण तेथून पारगाव फाटा येथून आपण पुढे खांद्याचीवाडी येथे जाऊ शकतो. तेथून गडावर जाता येते.
• पुणे येथून पुढे जुन्नर येथे आल्यावर तेथून खांद्याच्यावाडीला बसने जाता येते. मात्र खाजगी वाहनाने प्रवास करणे चांगले. पारगावफाट्यावर आल्यावर तेथून आपण खांद्याचीवाडी येथे व नंतर गडाकडे जाऊ शकतो.
• निमगिरी किल्ला व हनुमंतगड याठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे:
• आपल्या खाजगी वाहनाने आपण पारगाव फाट्यावर आल्यावर तेथे चौकशी करून निमगिरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला येतो. तेथून पुढे आल्यावर आपणास एक दिशादर्शक पाटी पाहायला मिळते. त्यावर वसेवाडी, तळेरान व निमगिरी गावांना जाणाऱ्या दिशादर्शक फलकाच्या पुढे आल्यावर एक कमान लागते. त्या कमानीतून थोडे पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपणास एक छोटीशी नदी लागते. नदीचा पूल पार केल्यानंतर पुढे गेल्यावर आपणास खांद्याचीवाडी हे गाव लागते. आपली गाडी गावातील मराठी शाळेच्या आवारात आपण पार्किंग करून गडाकडे जाऊ शकतो.
• काळूबाई मंदीर :
खांद्याची वाडी गावातील शाळेजवळ आपण वाहने पार्क करून जेव्हा पुढे गडाकडे जाऊ लागतो. त्यावेळी आपणास ग्रामदैवत काळूबाईचे मंदिर लागते. मंदिराकडे जाताना आपणास बाहेरील चौथरा पाहताना त्याचे खांब हे प्राचीन मंदिराच्या खांबणीचे बनवलेले दिसून येतात. त्यावरून या ठिकाणी पूर्वी अत्यंत कोरीव मंदिर होते. ते जाणवते. या मंदिराचे अलीकडे नूतन बांधकाम झाले आहे. बाह्य मंडप व गाभारा असे स्वरूप पाहायला मिळतें. गाभाऱ्यात कालेश्वरी देवीची मुर्ती पाहायला मिळते. जी कित्येक जणांची कुलदेवता, तसेच ग्रामदेवत आहे.
• वीरगळ :
ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन पुढे रान वाटेने गडाच्या दिशेने जाऊ लागल्यावर काही पावलांवर आपणास गर्द झाडीतून जाताना आपल्या उजव्या हातास एक वाट लागते. त्या वाटेने पुढे गेल्यावर आपणास एका सरळ रेषेत ४० विरगळी पाहायला मिळतात. या विरगळी ऐतिहासिक आहेत. या प्राचीन काळी युद्ध व परकीय आक्रमण तसेच आलेल्या संकटात जो आपल्या राज्याचे संरक्षण करताना धारातीर्थी पडतो. त्या विराच्या स्मरणार्थ वीरगळ हिंदू संस्कृतीत उभारण्याची प्रथा आहे. अशा या वीरगळ पाहताना आपणास त्या वीरांचे स्मरण करून देतात.
• हनुमंत मंदिर :
या परिसरात आपणास हनुमंताचे एक भग्न अवशेष असलेले मंदिर पाहायला मिळते. हनुमंताची मुर्ती पाहायला मिळते. तसेच या परिसरातील वीरगळी जवळील परिसरात शिवपींड व गणेश मुर्ती देखील पाहायला मिळते.
• खिंडीचे दिशेने :
वीरगळ पाहून मागील वाटेस पुन्हा येऊन पुढे गडाच्या खिंडी कडे जाताना वाटेत आपणास माहिती फलक पाहायला मिळतो. त्या जवळून आपण पुढे गडाकडे रान वाटेने वाटचाल करू लागतो. या वाटेने गड पायथ्याशी येवून पोहोचतो.
• खिंडीकडे :
गडाच्या कात्याळ वाटेने आपण दोन गडाच्या खिंडीत येवून पोहोचतो.
• खोदीव पायरी मार्ग :
खिंडीत आल्यावर आपणास खोदीव पायरी मार्ग लागतो. ज्या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो. चढून जाण्यासाठी या मार्गावर लोखंडी रॉड लावण्यात आले आहेत. या वाटेने आपण चांगल्या पायरी मार्गानें गडाच्यावरील माची सारख्या भागाकडे जावू शकतो.
• भग्न दरवाजा :
या पायरी मार्गानें वर चढून जाताना आपणास वाटेत भग्न दरवाजा असलेली जागा पाहायला मिळते. तेथील लाकडी अडसर लावण्याची जागा पाहिल्यावर याचा अंदाज येतो. हल्ली येथे दरवाजा नाही आहे.
• पहारेकऱ्यांसाठी देवड्या:
गडावरील शिबंदीत असणारे पहारेकरी यांच्या निवाऱ्यासाठी देवड्या खोदलेल्या पाहायला मिळतात. या देवडीचे निरीक्षण केल्यावर आपणास असे जाणवते की याठिकाणी तुटलेला पायरी मार्ग वरील बाजूस आहे. जो पूर्वी या देवडीत वरून खाली उतरून येण्यासाठी बनवला गेला असावा. तसेच या कात्याळ खोदिव देवडीवरील बाजूने पाणी गळू लागले. तर ते पाणी निचरा होऊन जाण्यासाठीची योजना खाच मारून तयार केल्याचे दिसून येते.
• पायरी मार्ग :
देवडी पाहून खोदीव पायरी मार्गाने आपण गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो.
• पाण्याची टाकी :
गडाच्या माथ्यावरुन आपणास गडभर्मंती करताना पाण्याची विशाल खोदीव् टाकी जागोजागी खोदलेली पाहायला मिळतात. ज्या मध्ये मुबलक पाणी आपणास पाहायला मिळते. गडावर अधिवास करणाऱ्या गडकरी व इतर अधिकारी, तसेच शिबंदीतील माणसे यांच्या पिण्याच्या पाण्याची व खर्चाच्या पाण्याची सोय करण्यासाठी खोदली गेली असावीत. यातील दगड काढून ते तटबंदी व गडावरील इतर वस्तू बांधण्यासाठी वापरले असावेत. अशी जागो जागी आपणास आठ ते नऊ पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात.
• बांधकाम वास्तूंचे अवशेष :
गडावर आपणास काही बांधलेल्या वास्तूचे चौथरे दिसतात. त्यावरून रहिवासी वास्तूची कल्पना येते.
• तीन लेणी विस्तृत गुहा :
• निमगिरी गडावर आपणास तीन सलग्न अशा गुहा पाहायला मिळतात. ज्यामधे खोल्या केल्याचे आपणास आढळून येतात. यामधील एक गुहा मुजलेली आहे. तर एका गुहेतील आतील बाजूस आणखी सलग्न भूमिगत खोली असल्याचे आपणास दिसून येते. या सातवाहन कालीन गुहा असल्याचे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.
• भग्न मंदिर :
निमगिरी गडावर भ्रमंती करत असताना आपणास एका भग्न मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. दगडी चौकट व काही भिंतीचे अवशेष शिल्लक आहेत. आतील बाजूस शिवपिंडी व इतर हिंदू धर्मीय देवतेच्या मूर्ती पाहायला मिळतात. यामधील काही भग्न झालेल्या दिसून येतात. हे एक शिवमंदिर आहे. हे जाणवते. मंदिरावरील दगडांच्या कलाकुसरीवरुन तत्कालीन लोकजीवनाची व संस्कृतीची माहिती मिळते.
• निमगिरी या किल्ल्यास अजिंक्यगड या नावाने देखील ओळखले जाते.
• या किल्ल्यावरून आपल्याला पिंपळगाव धरण, हडसर किल्ला, चावंड किल्ला, सिंधोळा किल्ला, भोजगिरी, तारामती शिखर, दौंड्या डोंगर (ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सिडनी वरून आलेले विमान अपघात ग्रस्त झालेले होते.) या ठिकाणांचे व परिसरातील सहयाद्री पर्वतातील डोंगराळ प्रदेशाचे दर्शन घडते.
• हनुमंत गड:
किल्ले निमगिरीचे दर्शन घेऊन आपण पायरी मार्गाने थोडे खाली आल्यावर आपणास एक माची सारखा भाग लागतो. त्या ठिकाणा वरून हनुमंतगडाकडे जाण्यासाठी एक वाट दिसून येते. सदर वाट ही अवघड थोडीशी आहे. पण येथून खाली उतरून थोडेसे चढून गेल्यावर आपणास हनुमंतगडाच्या पायऱ्या पाहायला मिळतात. या कोरलेल्या पायरी मार्गाने आपणास हनुमंत गडावर जाता येते.
• पाण्याची टाकी :
आपणास गडावर जोड पाण्याचे विशाल टाके पाहायला मिळते. जे किल्ले निमगिरी पेक्षा मोठे आहे. त्यावरून आपणास तत्कालीन पाणी साठवण व्यवस्थेविषयी माहिती मिळते. अशा स्वरूपाची तीन चार टाकी या किल्यावर खोदलेली आहेत.
• वाडा :
किल्यावर आपणास एके ठिकाणी वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. हा वाडा विशाल असा होता. याला चार बुरूज होते. हल्ली भिंतीचे व बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. वरील छत काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.
• किल्ले निमगिरी व किल्ले हनुमंत गड ही जोड किल्ल्यांची जोडी एका खिंडीने एकत्र जोडली गेली आहे. हा किल्ला प्राचीन भोकरदन – जुन्नर - नाणेघाट – ते कल्याण – सोपारा या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी उभारलेल्या किल्यांमधील एक किल्ला आहे. या वाटेवर नारायण गाव ते जुन्नर तसेच कोकण भागात देखरेख करण्यासाठी अनेक किल्ले उभारलेले पाहायला मिळतात. प्राचीन सातवाहनांच्या काळापासून या किल्ल्यांची उभारणी केली गेली होती.
• निमगिरी व हनुमंतगड किल्याविषयी ऐतिहासिकविषयक माहिती :
• किल्ले निमगिरी व हनुमंतगड हे किल्ले सातवाहान काळात उभारले गेले. या परिसरावर शक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार , यादव या राजवटींनी राज्य केले.
• नंतर सुलतान शाही, बहामनी सत्ता, अहमदनगरची निजामशाही, मुघल बादशहा, यानंतर हिंदवी स्वराज्यात हा किल्ला होता. पुढे इंग्रजी सत्तेत हा किल्ला होता.
• आता इसवी सनाच्या १९४७ सालापासून स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात हा किल्ला आहे.
अशी आहे निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती
Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi