कुलंग किल्ला ( नाशिक)
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या उत्तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या कळसूबाई शिखराच्या डोंगर रांगेत अलंग, मलंग व कुलंग हे किल्ले आपणास पाहायला मिळतात.
यामधे असणारा कुलंग हा एक किल्ला आहे.
• उंची :
या किल्याची उंची ही समुद्रसपाटी पासून ४८२५ फूट /१४७१ मीटर आहे.
• किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• कुलंग किल्ल्याजवळ पायथ्याशी आंबेवाडी हे गाव आहे.
• आंबेवाडी हे गाव नाशिक शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावर आहे.
• नाशिक – इगतपुरी आंबेवाडी – या ठिकाणाहून पायी ट्रेक करत गडावर जाता येते.
• आंबेवाडी हे ठिकाण पुण्यापासून १८२ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई पासून १४० किलोमीटर अंतरावर आहे.
• सूरत या गुजरात राज्यातील ठिकाणापासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई, पुणे, नाशिक, सुरत ही भारत देशातील मुख्य शहरे असून ती जमीन व हवाई मार्गाने राज्यातील इतर भागांशी तसेच आंतरराष्ट्रीय प्रदेशांना जोडली गेलेली आहेत. याठिकाणी रस्ते व लोहमार्गाचे जाळे दिसून येते.
• आंबेवाडी पर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग हा रस्ते मार्ग आहे.
• कुलंग किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• नाशिक मार्गे इगतपुरी हून आपणास आंबेवाडी मार्गे गडाच्या पायथ्याला असणाऱ्या परिसरात येता येते. या ठिकाणी आल्यावर गुगल म्यापद्वारे आपण जंगलातून मार्गक्रमण करत किल्याच्या परिसरात येतो.
• खडतर जंगली पायी ट्रेक :
किल्याच्या परिसरात जंगली माळभाग परिसर लागतो. येथील विरळ जंगल प्रदेशात पायवाटेने उंच सखल टेक चढत आपण गडाच्या दिशेने चालत जाऊ शकतो.
• पाण्याचा ओढा :
जंगलमार्गे चालत गेल्यावर आपणास जंगलातून वरील भागातून आलेला एक ओढा पाहायला मिळतो या ओढ्याला पावसाळी दिवसात भरपूर पाणी असते. उन्हाळी दिवसात पाणवठे आटू लागतात. येथील सर्व सजीव प्राणी, पक्षी व वनस्पतींची आवश्यक पाण्याची गरज येथूनच पूर्ण होते
• कठीण कात्याळ चढ व पायरी मार्ग :
जंगली अरण्यातून अनेक उंचवटे पार करत आपण गडाच्या उंच कात्याळ कड्याजवळ येतो. येथून ट्रेक खूप अवघड होत जातो. थोडे चढून गेल्यावर आपणास कात्याळ पायरी मार्ग लागतो. जो कड्यामध्ये कड्यात जागोजागी खोदून तयार केल्याचे दिसून येतो. या पायऱ्यांच्या रचना पाहता पाणी न थांबता निचरून जाण्याची रचना दिसते.
• पहारेकरी देवड्या :
जसजसे पायरी मार्गाने वर जावे तसतसे एका बाजूला खोल दरी तर दुसरीकडे उंच किल्याचा पाषाणकडा दिसून येतो. जसजसे उंच आपण जातो. तेव्हा तेथून सुरेख सह्याद्री पर्वताच्या सुंदर दर्या व शिखरे पाहायला मिळतात. थोडे वर चढून गेल्यावर आपणास डोंगराच्या खडकात खोदलेल्या देवड्या पाहायला मिळतात.
• भग्न दरवाजा :
किल्याच्या वरील भागात चढून गेल्यावर आपणास एक भग्न दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजाच्या वरील भाग नष्ट झालेला असून बाजूचे चौकटीचे कमरे पर्यंतचे चौथरे शिल्लक आहेत. तसेच त्यामध्ये दरवाजा लावल्यावर लावायच्या अडसराची छिद्रे पाहायला मिळतात.
• विस्तृत उंच सपाट आवार :
दरवाजाच्या पुढे आपणास विस्तृत उंच आवार पाहायला मिळतो.
• पाण्याची जोड टाकी / उत्कृष्ट जलसंच रचना :
थोडे पुढे गेल्यावर आपणास किल्यावर एका जागी लागून असलेली दहा पाण्याची जोड टाकी पाहायला मिळतात. ज्यांची मांडणी उतरत्या रचनेनुसार दिसते. एका टाक्यातून दुसऱ्या टाक्यात पाणी येण्यासाठी एक तोटीची रचना दिसून येते. शेवटाची टाक्यातील पाणी हे अत्यंत नित्तळशंख दिसते. जे पिण्यायोग्य आहे. किल्ल्यावरील शिबंदीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज तसेच खर्चाची गरज ही टाकी पुरवतात. ही काळया पाषाणात खोदलेली दिसतात. ती ही फक्त छिन्नी हातोड्याचा वापर करून.
• वास्तू अवशेष :
किल्यावर काही बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. जोता, त्यास लागून खोली व ओसरी अशी रचना असणाऱ्या बांधकामाचे भूमिगत चौथरे पाहायला मिळतात. जे त्याच्या संपूर्ण बांधकामाची कल्पना दाखवून देतात.
• राजवाडा अवशेष :
गडावर कमरे इतक्या उंचीचे असणारे बांधकाम दिसून येते. ज्या वास्तूच्या छताची पूर्ण हाणी झाली आहे. ज्याच्या रचनेतून तो एक वाडा असल्याचे दिसते. किल्यावर असणारे मुख्य अधिकारी व किल्लेदार तसेच इतर लोकांसाठी तसेच दैनंदिन व्यवहारासाठी या वास्तूचा वापर केला जात असावा.
• जागोजागी इतर ठिकाणी छोटी पाण्याची टाकी तसेच इतर वास्तू अवशेष पाहायला मिळतात. जी शिबंदीतील माणसांच्या सोईसाठी केल्याचे दिसून येतात.
• महादेव पिंड व नंदी :
पाषाणात खोदलेल्या टाक्यांच्या जवळच एक पाषाणात कोरलेली महादेव पिंड आपणास पाहायला मिळते. जी उन पाऊस झेलत किल्याच्या सद्याची स्थितीची जाणीव करून देतात.
• पाणी साठवणेसाठी बांधलेली भिंत :
किल्यावर आपणास एक मानवनिर्मित भिंत बांधलेली पाहायला मिळते. जी किल्ल्यावरील वाहून जाणारे पाणी दरीच्या ठिकाणी आडवून किल्याच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी बांधल्याचे दिसते.
• कुलंग गडावरून सहयाद्री पर्वताचे तसेच इतर दरी भागाचे दर्शन घडते.
• कुलंग, आलंग, व मदनगड हे अगदी जवळ जवळ एका रेषेत असणारे किल्ले आहेत.
• मदनगडापेक्षा कुलंग् गडाचा ट्रेक सोपा वाटतो.
• कात्याळ गुंफा :
किल्याच्या वरील भागात एक कात्याळ गुंफा आढळते. जीथे वीस पंचवीस लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकेल इतकी मोठी आहे.
• या गडावरुन कळसूबाई शिखर दिसते. तसेच याच्या पश्चिमेला हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा गड दिसतो. तसेच पश्चिम बाजूस या किल्याच्या कोकणकडा आहे. या ठिकाणाहून चारी बाजूंनी नजर ठेवता येत असे.
• कोकणातून इगतपुरी मार्गे घाटावरील अनेक व्यापारी मार्गांना जोडणारा ऐतिहासिक मार्ग या किल्याजवळून जातो. कोकणातील खाडी प्रदेशातून ते थेट घाटी नगरापर्यंत व येथून देश मार्गे कलकत्ता शहरापर्यंत प्राचीनकाळी व्यापार चालत असे. यावर देखरेख करण्यासाठी विशेषतः या किल्याची निर्मिती व्यापारी मार्गावर झाली असावी. असे अनेक इतिहासकार मानतात.
• कुलंग किल्याची ऐतिहासिक माहिती :
• कुलंग या किल्याची निर्मिती सातवाहन राजवटीत झाली असावी असे मानले जाते
• त्यानंतर राष्ट्रकूट, वाकाटक व चालुक्य राजवटीत हा किल्ला होता.
• इसवी सनाच्या ९ते ११ या काळात हा किल्ला यादव घराण्याच्या राजवटीत दाखल झाला.
• पुढे मुस्लिम राजवटीत व नंतर मराठी राज्यात हा किल्ला हिस्सा होता
• काही काळ नाशिक विभागात असताना मुघल राजवटीत देखील या किल्ल्याने पाहिली आहे
• पुढे हा किल्ला स्वराज्यातील पंतप्रधान पेशवे यांच्या ताब्यात इसवी सनाच्या १७६० साली दाखल झाला.
• त्यानंतर इसवीसन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी येथील पायरी मार्गाची मोडतोड केली. व किल्याचा दरवाजा व इतर वास्तू नष्ट केल्या. कारण पुन्हा मराठ्यांनी एकजूट होऊन आपल्या सत्तेला आव्हान देवू नये म्हणून.
• इसवी सन १९४७ सालानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• सोय :
किल्याच्या परिसरात असणारे पाणवठे हे फेब्रुवारी महिन्यानंतर आठतात. तरी ट्रेकला जाणाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ट्रेक करावा. पावसाळ्यात देखील ट्रेक केला जातो. मात्र काळजी घ्यावी. तसेच परिसरातील अनुभवी गाईड घेणे अत्यंत चांगले.
• जेवणाची सोय या ठिकाणी होत नाही. मात्र राहण्याची होऊ शकते. या ठिकाणी काही गुहा व देवड्या आहेत. जेवणाची सोय स्वतः च करावी लागते.
• येथील कुंडातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
अशी आहे कुलंग किल्याची माहिती.
• Kulang Fort information in marathi