अंजनेरी किल्ला
Anjneri Fort information in marathi
![]() |
अंजनेरी किल्ला |
• स्थान :
भारत देशातील पश्चिम बाजूस असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या त्र्यंबकेश्वर या रांगेत अंजनेरी किल्ला आहे.
• अंजनेरी किल्ला उंची :
या किल्याची उंची समुद्र सपाटी पासून ४२०० फूट असून पायथ्यापासून उंची २५०० फूट आहे.
• या किल्याची चढण सोपी असून हा गिरिदुर्ग स्वरूपाचा किल्ला आहे. व या किल्यास् चढून जाण्यासाठी पायरी मार्ग आहे.
• अंजनेरी किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• अंजनेरी हा किल्ला मुंबई पासून १७५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे या शहरापासून २३७ किलोमिटर अंतरावर आहे.
• नाशिक – त्र्यंबकेश्वर रोड – अंजनेरी फाटा – या फट्यातून अंजनेरी गाव तेथून पुढे पायरी मार्गाने अंजनेरी किल्ला हे अंतर २० किलोमिटर आहे.
• अंजनेरी गावाजवळ असणाऱ्या मुळेगाव या गावातून सुद्धा आपण अंजनेरी किल्यावर जाऊ शकतो.
• बुधली नावाची एक अवघड पायवाट जी चढणीस अवघड आहे. ती देखील या किल्यावर जाते. या वाटेने आपण वेगाने जाऊ शकतो. ट्रेकर्स या वाटेचा वापर करतात.
• पायरी मार्गाने आपण दीड ते दोन तासात गडावर जाऊन पोहोचू शकतो.
• अंजनेरी किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• पायरी मार्ग :
अंजनेरी गावात आल्यावर आपण आपली गाडी पार्क करून गडावर जाण्यासाठी पायरी मार्गाने जाऊ शकतो. हा मार्ग दगडी असून काही ठिकाणी कात्याळात पायऱ्या बसवलेल्या दिसतात. पावसाळी दिवसात या मार्गावरून वरील पाणी वाहताना आढळते. पावसाळी दिवसात जाताना जरा जपून जावे लागते. वाट शेवाळलेली असू शकते.
या मार्गाने आपण किल्याच्या वरील पठारी भागाकडे जाऊ शकतो.
• अंजनी माता मंदिर :
गडावर आपणास प्रथम एक मंदिर पाहायला मिळते ते अंजनी मातेचे मंदिर आहे.
• जैन गुहा लेणी :
गडावर जाताना जागोजागी परिसरात जैन धर्मीय लेणी पाहायला मिळतात. या कात्याळात खोदून गुहा बनवून तयार केलेल्या असून यांद्वारे आपणास जैन धर्मीय तिर्थनकर व जैन संस्कृतीची माहिती करून देतात. या जवळ जवळ १०८ लेण्या आहेत.
• सीता गुहा :
गडावर एके ठिकाणी सीता गुहा आहे. या ठिकाणी दहा ते बारा लोक सहज राहू शकतात.
• अंजनी माता तप गुहा :
गडावर फिरत असताना आपल्याला एके ठिकाणी कपारीत एक गुहा दिसते. या गुहेत पुत्र प्राप्तीसाठी अंजनी मातेने तपश्चर्या केली. तिच्या तपाचे फळ म्हणून पवन देवाने पायसदान दिले. त्याच्या प्राशनाने अंजनी मातेस जो पुत्र झाला तो म्हणजे हनुमान, हनुमंताचे बालपण या ठिकाणी गेले.
• हनुमान जन्मस्थान मंदिर :
हनुमंताचा जन्म या ठिकाणी झाला. म्हणून येथे एक मंदिर उभारले गेले. ते हनुमंत जन्म मंदिर असून मागे अंजनी माता तर पुढे हनुमंत बालरुपात आढळुन येतात. अशी बाळ हनुमंत असणारी एकमेव जगातील मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. मूर्तीसमोर दोन पितळी गदा असून एक त्रिशूळ देखील आहे. जे शंकर भगवंताने हनुमंतास वरदान स्वरूपात दिल्याचे प्रतीक आहे.
• हनुमान तळे :
गडाच्या खालील बाजूस एक तलाव पाहायला मिळतो. तो एका मानवी पायाच्या आकाराचा आहे. त्यास हनुमंत तळे म्हंटले जाते. हे तळे म्हणजे हनुमंताच्या पायाचा ठसा मानले जाते. ज्यामध्ये पाणी साचलेले आहे.
• अंजनेरी पर्वताच्या पठारावरून फिरत असताना आजूबाजूचा रमणीय प्रदेश पाहायला मिळतो. यामध्ये वैतरणा, दारणा, गंगापूर यांसारख्या धरणांचे जलाशय तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न अशा प्रदेशाचे दर्शन घडते.
• अंजनेरी वनविभाग देखील आहे. या ठिकाणी पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती व प्राणी, पक्षी यांचे संवर्धन केले जात आहे. याठिकाणी असणाऱ्या अनेक वनस्पती अन्यत्र कुठेही आढळत नाहीत.
• सेरापेजिया अंजनेरिका ही जगात अन्यत्र कोठेही न आढळणारी वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळते.
• या ठिकाणी आढळणाऱ्या कित्येक वनस्पती या कीटक भक्षी आहेत.
• International Union For Conservation of Nature and Natural Resources ही आंतरराष्ट्रीय संस्था दुर्मिळ वनस्पती बाबत आपले निर्णय घेत असते. अंजनेरी किल्याच्या परिसरातील काही वनस्पतींना त्यांनी दुर्मिळ वनस्पती याबाबत आपली मानांकने दिली आहेत.
• अंजेनेरी किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• अंजनेरी या किल्याच्या परिसरात हनुमंताची माता राहत होती. तिने पुत्र प्राप्तीसाठी तपस्या केली होती.
• अंजनी मातेने केलेल्या तपस्येचे फळ म्हणजे हनुमंताचा जन्म या ठिकाणी झाला. तसेच हनुमंताच्या बालपणातील लीला देखील या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्या खाणाखुणा पहायला मिळतात.
• पुढील काळात जैन धर्मीय अनुयायांकडून या ठिकाणी जैन लेणी तयार केली गेली.
• पुढील काळात हे ठिकाण हिंदू व जैन धर्मीयांचे धार्मिक स्थळ म्हणून मान्यता पावले.
• हल्ली महाराष्ट्र वन विभागाद्वारे दुर्मिळ वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे संवर्धन या ठिकाणी केले जात आहे. यामध्ये कित्येक पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री पर्वतीय वनस्पती आहेत.
अशी आहे अंजनेरी किल्ल्याची माहिती
Anjneri Fort information in marathi