प्रतापगड किल्ला माहिती:
Pratapgad Fort information in marathi
“ शौर्य किल्ला म्हणून ओळखला गेलेला सह्याद्री पर्वतातील गिरिदुर्ग म्हणजे प्रतापगड”
![]() |
प्रतापगड किल्ला माहिती pratapgad Fort information in marathi |
प्रतापगड किल्ला स्थान :
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून जवळ काही अंतरावर हा किल्ला स्थित आहे.
छत्रपती शिवरायांनी जावळी जिंकल्यावर तेथील जंगलात दुर्गम असा भोरप्याचा डोंगर होता. जाण्यास कठीण अशा जंगलांनी वेढलेल्या अशा या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखी खाली इ.स.१६५६ साली हा किल्ला बांधून घेतला. यावरून या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सतराव्या शतकपर्यंत जाते.
उंची :
प्रतापगडाची सरासरी उंची ही १०८० मीटर / ३५५६ फूट आहे.
• प्रतापगडाला ४७५ पायऱ्या आहेत.
• सदर गड हा सतराव्या शतकात बांधला गेला असल्याने याची तटबंदी व इतर वास्तू अजूनही सुस्थितीत आहेत.
प्रतापगड तटबंदी :
शिवकाळात म्हणजे १७ व्या शतकात उभारलेला या किल्ल्याची तटबंदी अत्यंत भक्कम असून वायव्येस ती जास्त उंचीची म्हणजे ८०० फुटाहून ही जास्त आहे.
ड्रोणद्वारे प्रतापगडाचा फोटो काढला तर तो एका फुलपाखरासारखा दिसतो.
या किल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग आहे. व चढण्यास सोपा असा हा किल्ला आहे.
प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग :
सातारा ते प्रतापगड अंतर ८७ की.मी.
पुणे ते प्रतापगड हे अंतर १५० की. मी. आहे.
• महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्यात सातारा शहरातून पश्चिमेस महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून पुढे आंबेनळी घाटाने गेल्यावर मध्ये प्रतापगड हा फाटा लागतो. त्या वाटेने थेट गडावर जाता येते. गडावर वाहन तळावर गाडी पार्क करून थोडे चालत गेल्यावर आपणास प्रतापगड किल्ल्यावर जाता येते.
• दुसरा मार्ग हा कोकण विभागातील मुंबई - गोवा हाईवेवरील पोलादपूर इथून एक फाटा पश्चिमेस आंबेनळी घाटातून महाबळेश्वरला जातो त्या वाटेने पुढे आल्यास प्रतापगडचा वरील सांगितलेला फाटा लागतो. त्याने आपणास प्रतापगडावर जाता येते.
• प्रतापगडावरील पहाण्यायोग्य ठिकाणे :
• प्रतापगड महादरवाजा :
वाहन तळापासून थोड चालून गेल्यावर ९६ पायऱ्या चढूण गेल्यावर भक्कम चिलखती बुरुजाची गोमुख बांधणी असणारी रचना लागते. तिथे उंच एखादा हत्ती देखील जाईल असा भव्य दरवाजा लागतो तो आहे प्रतापगडचा महादरवाजा. या दरवाजाचे महत्व असे की येथे अजूनही शिवकालीन पद्धतीने सुर्योदया वेळी हा दरवाजा उघडला जातो. अन् सूर्यास्ता वेळी बंद केला जातो. या दरवाजाची ठेवणं गोमुख पद्धतीची आहे. गोमुख म्हणजे गाय वासराला दूूध पाजताना चाटताना मागे वळून पाहतानाचे दृश्य. शिवकालीन किल्ल्यावरील बरेच दरवाजे अशा पद्धतीने बांधलेले आहेत. यामुळे शत्रूच्या तोफांचा मारा हा थेट दरवाजावर होऊ शकत नाही. तसेच वेगाने सामूहिक प्रहारही करता येत नसे.
प्रतापगड किल्ला माहिती pratapgad Fort information in marathi
दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपणास पहारे कर्यांना विश्रांतीसाठी बांधलेल्या देवड्या दिसतात. तिथेच एक शिवकालीन तोफ पाहायला मिळते. व ती पेटवण्यासाठी लागणारी मशाल ठेवणेसाठी तयार केलेला कमळाकृती शिल्प कोरलेला मध्यभागी छिद्र असणारा दगड पाहायला मिळतो.
• भवानी माता मंदिर जुना रस्ता व नगारखाना :
महा दरवाजातून आत आल्यावर थोडे पुढे आल्यावर एक कमानीसारखी दरवाजांची रचना दिसते. हा जुना भवानीमाता मंदिराकडे जाण्याचा जुना मार्ग आहे. इ. स. १९५७ पर्यंत हा मार्ग खुला होता. पण आता पडझड झालेली असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे आता बंद आहे. येथून पुढे नगारखाण्याच्या वास्तूंचे अवशेष लागतात. शिवकाळात भवानी देवी प्रसन्न राहावी व तिची स्वराज्यावर कृपा राहावी म्हणून रोज नगारखाण्यात वाद्ये वाजवली जात असत.
• प्रतापगड तलाव :
महादरवाजातून पुढे गेल्यावर आपणास काही पायऱ्या चढून गेल्यावर एका वळणावर वाटेच्या खालील बाजूस एक सुंदर तलाव पाहायला मिळतो. प्रतागडावरील बांधकाम करताना या ठिकाणाहून खोदून दगड काढले गेले. व त्यामुळे इथे एका तलावाची निर्मिती झाली. यासाठी प्रथम पावसाळी दिवसात पाहणी करून पाणी वाट पाहिली जाते. व त्यानुसार सखल जागा निवडून खुदाई केली जात असे. त्यातून तलाव निर्मिती व बांधकाम हे दोन्ही उद्देश साध्य होत असत.
भवानीदेवी मंदिर :
महादरवाजापासून पुढे पायरी मार्गाने चालून वर गेल्यावर तटबंदीच्या इमारतीत एक कमानाकृती दरवाजातून आत गेल्यावर तिथे भवानी देवीचे मंदिर लागते. तुळजभवानी ही छत्रपती शिवराय यांची कुलदैवत तिचे प्रतिरूप हे मंदिर आहे. सुंदर असा सभामंडप विस्तृत प्रांगण असणारे हे मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारी शाळिग्राम शिळा ही नेपाळच्या गंडकी नदीतून आणली गेली. त्या शिळेतून सुरेख अशी ही पवित्र मूर्ती घडवून अभिषेक करून तिची स्थापना इथे केली गेली.
या मंदिरात एक स्पटिकरुपी शिवलिंग आहे. त्याची पूजा छत्रपती शिवराय करत असत. या ठिकाणी एक तलवार देखील आहे. ती सेनापती हंबीरराव मोहिते यांची आहे असे मानले जाते. त्यावर काही चांदणीची चिन्हे दिसून येतात. एक चांदणी म्हणजे शंभर शत्रूंना मारल्याची निशाणी. अशी पाच चांदण्या असणारी तलवार पाहायला मिळते.
हनुमान मूर्ती :
भवानी मंदिरापासून पुढे गेल्यावर एक हनुमान मूर्ती लागते. ती समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केली आहे असे मानले जाते.
बालेकिल्ला :
भवानी मंदिरापासून पुढे गेल्यावर आपणास आणखी एक दरवाजा लागतो. तो आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा. येथून आपल्याला बालेकिल्ल्यावर जाता येते. तेथील केदारेश्वर मंदिर, शिव पुतळा, व तलाव, बुरुज पाहता येतो.
केदारेश्वर मंदिर :
बालेकिल्ल्याचा दरवाजातून आत गेल्यावर पुढे पायऱ्या चढून गेल्यावर एक मंदिर लागते ते केदारेश्वराचे मंदिर. भवानी देवीच्या मंदिरासाठी इथे बांधकाम करत असताना इथे खोदताना एक भव्य शिवलिंग सापडले. तेव्हा त्याच शिवलिंगाची इथे स्थापना केली तेच हे केदारेश्वर मंदिर.
वाड्याचे अवशेष :
केदारेश्वर मंदिरा शेजारी आपणास काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ते आहेत शिवकालीन वाड्यांचे अवशेष. या ठिकाणी छत्रपती शिवराय तसेच अन्य अधिकारी व राजमाता जिजाबाई देखील राहत होत्या. अष्टप्रधान मंडळाच्या सभा इथे होत होत्या.
छत्रपती शिवराय यांचा पुतळा :
बालेकिल्ल्याच्या वरील भागात आपल्याला एक भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहायला मिळतो. हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा २० फूट उंच अशा चौथर्यावर असून याची उंची १६ फूट आहे. एकूण मिळून ३६ फूट उंचीचा हा पुतळा आहे. याचे वजन साडे चार टन ऐवढे असून तो ब्राँझचा बनवलेला आहे. तो इथे आणताना पार्टच्या रुपात आणला. असे ऐकून १७ पार्ट इथे आणून जोडले अन् हा पुतळा बनवला गेला.
याचे अनावरण करण्यासाठी स्वतः तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते.
ही सर्वात पवित्र जागा मानली जाते.
येथे जवळच शासकीय विश्रामगृह आहे.
• या शिव पुतळ्या जवळ अनेक वास्तूंचे अवशेष आहेत. तिथून जवळील तटबंदीच्या काठाने चालत गेल्यास काही अंतरावर आपणास चोर दरवाजा पाहायला मिळतो. सुरक्षेच्या कारणास्तव आता तो बंद केला आहे. त्या काळी शत्रू जर किल्यावर आत घुसला तर या चोर वाटेने बाहेर पडता येत असे.
• टेहळणी बुरूज / शिवप्रताप बुरुज :
बालेकिल्ल्यातून खाली परत आल्यावर समोर एक चिलखती बुरूज दिसतो. तो आहे शिवप्रताप बुरुज. तिथे कायम भगवा ध्वज फडकताना दिसतो. अत्यंत सुस्थितीत असणारा हा बुरुज छत्रपती शिवराय यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. या बुरुजा खालून दोन्ही बाजूंनी फिरण्यास वाट दिसून येते. त्या काळी टेहळणी करण्यासाठी याची बांधणी केली होती.
प्रतापगडावर तिन बुरुज आहेत :
सूर्य बुरुज : प्रतापगडावर येणाऱ्या रस्त्यास लागून सुर्य बुरुज आहे.
यशवंत बुरुज : बालेकिल्ल्यात असलेल्या शिव पुतळ्याच्या मागील बाजूस हा बुरुज पाहायला मिळतो.
रेडका बुरुज : हा किल्याशी जोडला आहे.एक रेडकाच्या तोंड सारखा त्रिकोनाकृती बुरुज आहे
बुरुज हे किल्ल्यावर देखरेख करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. किल्ल्याची दुबळी बाजू बळकट करण्याचे काम हे बुरुज करतात.
कडेलोट टोक : प्रतापगडावर देखील एक कडेलोट टोक आहे. ज्यावरून एखादा फितूर व स्वराज्य द्रोही शत्रू जर का सापडला तर त्यास या कडेलोट ठिकाणावरून खाली ढकलले जात होते.
अफजलखान कबर :
छत्रपती शिवराय यांना मातीत मिळवण्याचे स्वप्न उरी बाळगून आलेल्या अफजलखानास या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजीराजांनी मातीत मिळवला. त्याची कबर या ठिकाणी आहे. शिवप्रताप बुरुजावरून ही कबर आपल्याला स्पष्ट दिसते.
प्रतापगडावर येणाऱ्या वाटेवरच एका बाजूला प्रतापगडपासून काही अंतरावर ती आहे.
याच बरोबर अनेक छोटे मोठे दरवाजे व चोर वाटा आपणास पाहायला मिळतात.
• या गडावर शिवकलापासून अनेक मावळे व सरदार राहत होते. त्यांचे अनेक वंशज आपल्याल पाहायला मिळतात. इथे लोकवस्ती आजही पाहायला मिळते.तसेच रहाण्याची सोय ही होते.
प्रतागडावरील ऐतीहासिक घडामोडी :
• जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून शिवरायांनी जावळी जिंकून घेतली. तेव्हा या जावळीच्या खोऱ्यात एक भोरप्याचा दुर्गम डोंगर होता. तो शिवरायांनी हेरला व तिथे एक किल्ला बांधण्याचे ठरवले.
• छत्रपती शिवराय यांच्या आज्ञेने मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या देखरेखीखाली हा किल्ला बांधून इसवी सन १६५६ साली पूर्ण केला.
![]() |
प्रतापगड किल्ला माहिती pratapgad Fort |
प्रतागडावरील ऐतीहासिक घडामोडी :
• शिवरायांच्या या स्वराज्य कार्यात आलेले प्रथम मोठे संकट म्हणजे अफजलखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहा सरदार अफजलखान २०००० घोडदळ ,१५००० पायदळ, १५०० बंदूकधारी शिपाई, ८० तोफा, १२०० उंट, ८५ हत्ती असा लवाजमा घेऊन शिवरायांवर चालून आला.
• त्यावेळी शिवरायांकडे फक्त ६००० घोडदळ, ३००० पायदळ,४००० राखीव पायदळ होते.
• येताना वाटेतील हिंदूंची पवित्र स्थाने पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर या धार्मिक ठिकाणी नासधूस करून तो वाईला आला. येथे त्याने बारा वर्षे काम पाहिले होते.
तेव्हा शिवरायांनी बुद्धिकौशल्याने अफजलखानाचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. व राजमाता जिजाबाई, अन्य सरदार यांच्याशी सल्लामसलत करून ते राजगडावरून थेट प्रतापगडावर गेले.
दोन्ही बाजूंनी चर्चा करून भेटीगाठी घेऊन सलोखा करण्याचे ठरले.
यासाठी प्रतापगडावरील माचीच्या परिसरात सुंदर श्यामियानात भेट ठरली. बरोबर फक्त दहा अंगरक्षक आणावयाचे ठरवले.
छत्रपती शिवराय खान दगाफटका करणारा असल्याचे जाणून होते. शिवरायांनी चिलखत घालून वर अंगरखा घातला. डोक्यावर जिरेटोप घालून त्यावर मंदिर बांधला. डाव्या बोटात वाघनखं व त्याच हाताच्या अस्तनीत बीचवा लपवला.
भेटीवेळी खानने दगा करण्याचा प्रयत्न केला. त्याने कट्यारीने वार केला. तेव्हा शिवरायांनी त्याचा कोथळा वाघनख व बीचव्याच्या साहाय्याने काढला. व इतर मावळ्यांना वाटेवरील रानात झुडपात लपनेस सांगितले होते. त्यांनी संपूर्ण खानाच्या फौजेचा धुव्वा उडविला.
यावेळी संभाजी कावजीने अफजलखानाचे मुंडके कापून आणले. ते राजगडावरील एका दरवाजाच्या बुरुजात पुरले आहे.
अशा या पराक्रमाची साक्ष हा प्रतापगड आहे.
ज्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध केला. तो दिवस दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
यानंतर स्वराज्यामध्ये मोठा खजिना तसेच शस्त्र साठा आला. व स्वराज्याचा पाया बळकट झाला.
• छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात इसवी सन १६८९ साली काकरखानाशी लढाई या पायथ्याशी झाली होती.
या लढाईत राजाराम महाराजांनी पराक्रम गाजवला.
• इसवी सन१६५६ ते इसवी सन १८१८ या काळात काही महिने सोडल्यास हा किल्ला कायम स्वराज्यात राहिला.
• इसवी सन१८१८ साली तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. यामध्ये मराठे पराजित झाले. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
• स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यावर इसवी सन १९५७ साली तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या किल्ल्यावर छत्रपती शिवराय यांच्या भव्य अशा ३६फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले.
असा स्वराज्यातील भव्य प्रताप घडून आलेल्या ठिकाणी असलेला व छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधलेला शिवरायांचा शौर्य गड म्हणजे प्रतापगड होय.
आपल्याला ही प्रतापगड किल्ल्याची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये. कळवा.
Pratapgad Fort.