Showing posts with label भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य. Show all posts
Showing posts with label भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य. Show all posts

Sunday, September 29, 2024

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

 भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


स्थान

महाराष्ट्र राज्यातील पश्चिमेस सह्याद्री पर्वतात वसलेले पुणे जिल्ह्यातील एक स्थान जे धार्मिक व प्राकृतिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य




उंची :

 भीमाशंकर हे स्थान समुद्र सपाटी पासून १२०० मीटर उंच आहे. तर अभयारण्य ३००० फूट उंचावर स्थित आहे.

भीमाशंकरला जाण्यासाठी प्रवासी मार्ग:

• पुणे हे महाराष्ट्रातील एक मोठे शहर असून ते रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्गाने भारतातील अनेक शहरांना जोडलेले ठिकाण आहे.

• पुणे ते भीमाशंकर हे अंतर ११० किलोमीटर आहे.

• पुणे येथून नाशिक रोड वरील मंचर पासून ६५ किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे.

• पुणे येथील शिवाजीनगर बस स्टँड वरून भीमाशंकरला अनेक बसेस ये – जा करत असतात.

• खाजगी वाहनाने देखील भीमाशंकरला जाता येते.

राहण्याची व भोजनाची सोय : 

भीमाशंकर परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. तेथे आपल्या राहण्याची तसेच भोजनाची सोय होऊ शकते.

भीमाशंकर येथे पाहण्यासारखी ठिकाणे :

• पुणे शहरापासून जेव्हा आपण भीमाशंकरला निघतो. तेव्हा अर्धा रस्ता मैदानी तर अर्धा रस्ता हा घाटमार्ग आहे. वाटेत आपल्याला घोड नदी पाहायला मिळते. तसेच घोड नदीवर बांधलेले डिंबे धरण देखिल पाहायला मिळते.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


• भीमाशंकर बस स्टँडला उतरल्यावर आपण चालत गेल्यावर वाटेत आपणास एक कमान लागते. ज्यावर भीमाशंकर असे लिहिलेले पहायला मिळते. या कमानीतून पुढें गेल्यावर आपणास पायरी मार्ग लागतो. जो थेट मंदिरापर्यंत पोहोचवतो.


कमळजा माता मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


त्रिपुरासूर राक्षसास मारण्यासाठी भिमकाय अवतार घेतलेल्या शिवशंकरास देवी पार्वतीने मदत केली होती. तिचे रुप म्हणजे कमळजा होय. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याअगोदर पार्वतीमातेच्या या रूपाचे दर्शन आधी घ्यावे लागते. कमळ पुष्पांनी पार्वती देवीची पूजा केली जाते. कारण शंकराने देवीस गौरीस कमलपुष्प वाहून वंदन केले होते. पूजा केली होती म्हणून येथे कमलपुष्पे वाहतात. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आधी या ठिकाणी कमळजा देवीचे दर्शन घेतात. मंदिरात आपणास चांदीच्या पत्र्यावर कोरलेली अष्टभुजा देवीची मूर्ती पाहायला मिळते. तर त्याच्या मागील बाजूस शेंदूर लावलेली देवीचे पाषाण आपणांस पाहायला मिळते.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


• श्रावण महिन्यात देवीस कमलपुष्पे व करटोलीच्या फळात दिवे लावून पूजा करतात.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


• दरवर्षी महाशिवरात्रीला महादेवाची पालखी कमळजामंदिरात येते. तर दसऱ्यात देवीची पालखी भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात येते.


भीमा नदी उगम स्थान : 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


पुढे गेल्यावर एका बाजूला थोडे अंतर गेल्यावर भीमाशंकर मंदीर रोडला डाव्या बाजूस आपणास एक छोटी वाट दिसतें. त्या वाटेने गेल्यास आपणास भीमा नदी उगमस्थान दिसतें. जी ज्योतिर्लिंगातून गुप्त होऊन या ठिकाणी कुंडात प्रकट झाली. त्रिपुरासूरास मारताना शंकराच्या शरीरावरून जो घाम ओघळला त्यातून भीमा नदी प्रकट झाली. असे मानले जाते. येथून पुढे ती गुप्त होऊन ज्योतिर्लिंगात प्रवेश करते.

डाकिणी शाकीणी मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 उगमस्थानाच्या वरील बाजूस एक मंदीर पाहायला मिळते. ते डाकीण शाकीणी मंदीर आहे. तसेच परिसरात पंचायतन व अन्य भीमाशंकर देवाचे सेवक यांच्या मुर्त्या पाहायला मिळतात.

भव्य सभामंडप :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


पुढें पायरी मार्गाने आपण दर्शन मार्गाजवळ येवून पोहोचतो. हा मार्ग सभामंडपातून जातो. अत्यंत सुंदर काळ्या पाषाणातील स्तंभ, सुरेख नक्षीकाम येथे पाहायला मिळते. या ठिकाणी दर्शन स्क्रीन देखील आहे. येथे आपणांस गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घडू शकते.

कासव :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 सभामंडपात कासव आहे. यास हिंदु धर्मात महत्वाचे स्थान आहे. ते आपल्या मनातील वाईट विचार त्याग करून परमेश्वरास सकल इंद्रिय अंकुचीत करून शरण येण्याचे द्योतक आहे.

नंदी :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


सभामंडपात आपणास एक नंदी पाहायला मिळतो. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी नंदीचे दर्शन घेतले जाते.

गणेश मूर्ती: 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


मंदिर परिसरात सुरेख गणेश मूर्ती पाहायला आपणास मिळते. शेंदरी रंगाची सुंदर अशी मूर्ती लक्ष वेधून घेते.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


सभामंडपातून गाभाऱ्यात आपणं पोहोचतो. गाभाऱ्यात सुरेख शिवलिंग आहे. या पिंडीखालून भीमा नदीचा उगम होतो. पहाटे शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यानंतर यावर चांदीचे आवरण चढवले जाते. या ठिकाणी आपणास जवळच पार्वती देवीची मूर्ती देखील पाहायला मिळते. याठिकाणी शिवलिंगाचे दोन भाग पाहायला मिळतात. ते शिव व पार्वतीचे रुप आहेत. म्हणून या ज्योतिर्लिंगास अर्धनारिश्वर असे देखिल म्हंटले आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भैरव

महाद्वारी आपणास भैरव देखिल पाहायला मिळतो.

भव्य घंटा:

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 मंदिरात एक पांचधातूने निर्मित एक घंटा पहायला मिळते. जी वसई किल्ल्यावरील आहे. वसईचा किल्ला पेशवाईच्या काळात चिमाजी अप्पांनी सर केल्यावर तेथील घंटा भीमाशंकर मंदिरास भेट स्वरूपात आणून महादेवाच्या चरणी अर्पण केली होती. ही पंचधातूची घंटा आहे.


शनिदेव मंदिर : 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


घंटेच्या समोरील बाजुस शनिदेवतेचे मंदीर आहे.

जोड नंदी :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 आपणास शनी मंदिरा शेजारी जोड नंदीची जोडी असलेली मूर्ती पाहायला मिळते. अनेक भक्त या ठिकाणीं मनोभावे पूजा करत असतात.

सर्वतीर्थ कुंड : 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


मंदिरा शेजारीच लागून जवळच सर्व तीर्थ कुंड आपणास पाहायला मिळतो. भीमा नदी उगमस्थनातून पुढें ज्योतिर्लिंगामधून प्रकट होते. तेथुन पूढे गुप्त होऊन यासर्वतीर्थ कुंडात प्रकट होते.व तेथून पुढे बाहेर पडून ती अरण्यातून मार्गस्थ होते.

गणेश मंदिर : 

सर्वतीर्थ कुंडाजवळच आपणास एक छोटे गणेश मंदिर पाहायला मिळते. हल्ली येथे कुंडातील पाणी दूषित होऊ नये म्हणून जाळी बसवलेली पाहायला मिळते.

हनुमान मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


मंदिर परिसरात आपणास सुंदर हनुमंत देवतेचे मंदीर पाहायला मिळते.

राम मंदिर

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


हनुमान मंदीर पासून जवळच आपणास राम मंदिर देखील पाहायला मिळते. मंदिरात श्री राम, सीता, लक्ष्मण, व हनुमंताची मुर्ती पाहायला मिळते.

दुर्गा माता मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 राम मंदीरा जवळच दुर्गा माता मंदीर देखिल आहे.

नवदुर्गा मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


 तसेच देवी पार्वती मातेचे नवदुर्गा अवतार असलेले मंदीर देखील या ठिकाणी पाहायला मिळते.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य
राधाकृष्ण मंदिर 


भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर हे काळ्याकभिन्न अशा बेसाल्ट या अग्निजन्य खडकात बांधले गेले आहे. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे स्वरूपात आहे. यादव कालीन बांधणी या मंदिराची पाहायला मिळते. या बांधणीत नर व मादी दगडाचा वापर केला गेला आहे. एका दगडात दुसरा दगड खोबणी करुन बसवलेला आपणास पाहायला मिळतो. मंदिरावर आपणास दशावतारातील घटना असलेली शिल्पाकृती पाहायला मिळते. मंदिरा बाहेरील शिल्पाकृती मध्ये हनुमंत , श्रीकृष्ण व इतर देवतांच्या मुर्ती देखील पाहायला मिळतात.

भीमा नदी मूर्ती : 

मंदिरात शेजारी आपणास काळ्या पाषाणात कोरलेली भीमा नदीचा मुर्ती देखिल पाहायला मिळते.

गुप्त भीमाशंकर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर मंदिरा पासून पूढे दोन किलो मीटर अंतरावर आपणास अरण्यात एक छोटा जलप्रपात पाहायला मिळतो. जेथे बारा महिने पाणी वाहत असते. या ठिकाणी पडणाऱ्या पाण्याखाली आपणास शिवलिंग पाहायला मिळते. ते गुप्त भीमाशंकर होय. सदैव येथे शिवलिंगावर जलाभिषेक होताना पाहायला मिळतो. जवळच महादेवाचे शस्त्र त्रिशूळ आपणास पाहायला मिळते. अनेक तपस्वी या ठिकाणीं तपसाधना करण्यासाठी येत असतात.

भीमाशंकर अभयारण्य :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर हे स्थान पश्चिम पूर्व सह्याद्री पर्वत तसेच सह्य घाटमाथ्यावरील ठिकाण आहे. त्यामुळे हा परिसर सदाहरित तसेच निमसदाहरित व काटेरी झुडपी अरण्याने समृध्द असा आहे. या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे आढळतात.

यामधे रानआंबे, करवंदे, जांभुळ, तोरणे, उंबरे, तोरणे, फणस यासारखे वृक्ष तसेच इतर अनेक प्रकारचे अजस्त्र वृक्ष व वेली पाहायला मिळतात.

भीमाशंकर अभयारण्यात आढळणाऱ्या औषधी वनस्पती:

• गुळवेल, रुखाळा, अमरकंद, जंगली अद्रक, बेडकीचा पाला, रान चींचोका (गारंबी), अर्धी सुपारी, हाडसांधी, वेल्या करंज, शतावरी, नळकंद, संजिवणी, लोहतळ, पंचागळी, कोंबडनखी, सफेद सायर, बिवळा, शिकेकाई, शेंदरी, करब (अंजन), मळवा, फणसाड,करंज, हिरडा, बेहडा, अशा अनेक प्रकारच्या वनस्पती भीमाशंकर अभयारण्यात आढळतात.

भीमाशंकर अभयारण्यात आढळणारे प्राणी :

भीमाशंकर अभयारण्यात आपणास उदमांजर,रानडुक्करे, भेकरे, सांबर, हरणे, तरस, वाघ, बिबळे, खवले मांजर, मुंगूस कोल्हे, काळ्या तोंडाची माकडे, शेकरू यासारखे अनेक प्राणी तसेच सरिसृप प्राणी देखिल आढळतात.

शेकरु ( जायंट स्क्विरल) :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


शेकरु हा प्राणी महाराष्ट्रा

चा राज्य प्राणी हा भीमाशंकर अभयारण्यात आढळतो. शेपटी सह मिटरभर लांब असा हा प्राणी आपणास येथील झाडाच्या फांद्यावरुन फिरताना दिसून येवू शकतो. याची शेपूट झुपकेदार असते. तपकिरी रंगाची पाठ असते. याचा गळा, छाती व पोट पिवळसर पांढऱ्या रंगाचे असते. मांजरा सारख्या मिशा यास असून तोंडातील दात सुळ्यासारखे असतात, त्याच्या पायाच्या नख्या ह्या अणकुचीदार व वाकड्या असतात. हा समूहाने राहणारा प्राणी असून अभयारण्यातील झाडावर अनेक घरटी शेकरे बांधतात. शत्रू पासून बचाव व्हावा यासाठी सारखे आपल्या घरट्यातील निवास बदलत असतात. येथील रानातील झाडांना लागलेली जांभळे, करवंदे, रानआंबे, उंबरे तसेच इतर खाण्यायोग्य फळे खाऊन हा प्राणी उदरनिर्वाह करतो. थंडीच्या दिवसात अन्न दुर्मीळ बनते. त्यावेळी झाडाच्या साली, पाने कुरतडून खातो व आपला उदरनिर्वाह करतो.

भीमाशंकर अभयारण्यात आढळणारे पक्षी :

या परिसरात अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. यामध्ये कृष्ण गरुड, शृंगी घुबड, नर्तक, पारवे, बुलबुल, वनकपोत, तांबट यांसारखे पक्षी येथे पहायला मिळतात.

मुंबई पॉइंट:

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर अभयारण्य परिसरात पश्चिम दिसेल आपणास सह्य कड्याच्या टोकावर एक स्थान आहे. जेथून आपणं पश्चिम घाट उतारावरील घनदाट अरण्याचे दर्शन घेवू शकतो. येथून मुरबाड, कल्याण या ठिकाणचा परिसर आपणास पहाता येवू शकतो. तसेच सुंदर सूर्यास्ताचे दर्शन देखिल घडून येते.

वनस्पती पॉइंट, हनुमान तळे, अंजनी माता मंदिर :

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


भीमाशंकर अभयारण्यातील वनस्पती पॉइंट परिसरातून गर्द हिरव्यागार सदाहरित वनाचे दर्शन घडते. येथून जवळच एक पाण्याचे तळे आहे. या तळ्यास हनुमान तळे असे नाव आहे. हे या अभयारण्यातील एक पाणवठ्याचे ठिकाणं आहे. जेथे अनेक पशुपक्षी पाणी पिण्यासाठी येतात. येथून थोड्या अंतरावर हनुमंताची माता अंजनीचे मंदिर आपणास पाहायला मिळते.

नागफणी कडा:

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


अभयारण्यातील कोकण बाजूस डोंगराचे कडे निर्माण झाले आहेत. त्यांची टोके एखाद्या नागाने फणा काढल्यासारखे दिसतात. म्हणून त्यास नागफणी कडा असे म्हणतात. येथून दरितील कोकणाचे सुंदर असे दर्शन घडते.

वाकी विहीर:

भट्टीच्या रानात एक जिवंत झरा आहे. या ठिकाणीं बारा महिने पाणी असते. उन्हाळ्यात सर्व पाणवठे आटतात. मात्र हा झरा कायम वाहत असतो. अनेक पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याचे काम हा झरा करतो. इथे प्राण्यांच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात.

• या अभयारण्यातून वाहणाऱ्या घोड व भीमा नदीवर या परिसरात धरणे बांधली आहेत. घोड नदीवर असलेले डिंबे धरण हे पोखरी गावाच्या पुढील घाट ओलांडला की लागते. तर भीमा नदीवर चासकमान हा प्रकल्प आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


• या अभयारण्यास लागून अनेक किल्ले देखील आहेत. त्यातील गोरखगड व मच्छिंद्रगड हे अनेक गिर्यारोहक व हिंदू धार्मिक व्यक्तींना आकर्षित करतात.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य


• इसवी सन१८८६ ते १९१३ या काळात ब्रिटीश सरकारने या अरण्याचा राखीव वनक्षेत्रात समावेश केला.

• अशा या अभयारण्यात सफर करताना अनेक औषधी वनस्पती, तसेच प्राणी , पक्षी यांचे ज्ञान होते. तसेच सुंदर अशा सौंदर्याचे दर्शन देखील घडते. वेगवेगळ्या ऋतूत या अरण्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. विशेषत वसंत ऋतूत या ठिकाणीं भेट देणे म्हणजे एक पर्यटकांसाठी प्रेक्षणीय भेटच आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य

अशी आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग व अभयारण्याची माहिती 

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...