लिंगाणा किल्याची माहिती
Lingana Fort information in marathi
‘ रायगड हा राजगृह असेल तर लिंगाणा हे त्याचे कारागृह'
महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतातील रायगड किल्याजवळ सह्याच्या डोंगर रांगेत एक उंच बेलाग सुळका पाहायला मिळतो अतिशय उंच शिवलिंगाच्या आकाराचा हा डोंगर जणू निसर्गानेच शिवलिंग बनवले आहे. ज्यावर वर्षाऋतूत साक्षात वरुण राजाचं जलाभिषेक करतो.
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात महाड शहरापासून ईशान्येस १६ किलोमिटर अंतरावर तोरणा किल्ला व रायगड किल्याच्या दरम्यान लींगाणा किल्ला आहे.
लिंगाणा किल्याची उंची :
लिंगाणा किल्याची उंची सरासरी २९६९ फूट म्हणजेच ९०५.१८ मीटर आहे.
लिंगाणा किल्ल्याकडे जायचे कसे:
• रायगड जिल्ह्यातील महाडहून स्वतः घ्या वहानाने – पाने नावाच्या गावी गेल्यावर – तिथून चालत लींगाणा माची – व तेथून लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहेपाशी – तेथून पुढे लिंगाणा सुळका. अत्यंत कठीण चढणीची वाट आहे.
![]() |
बोराट्याची नाळ |
• पुणे शहरातून पूढे – नसरापूरमार्गे – वेल्हे – मेढे घाट – सिंगापूर – मोहरी – असा ७० किलोमिटर अंतर पार करून बोराटिच्या नाळीत तिथून पुढे रायलिंग डोंगर – लिंगाणा असा हा पुण्याहून लिंगाण्याकडे जाण्याचा मार्ग आहे.
• लिंगाणा प्रवास व पाहण्यासारखी ठिकाणे :
• बोराटीची नाळ:
पुण्याहून मेढे घाटमार्गे आपण घाट कोकणातील मोहरी या ठिकाणी येऊन पोहोचतो. तेथून पुढे उंच चढणीच्या वाटेने आपण बोराटीच्या नाळीत येतो. ही जागा म्हणजे उंच डोंगरातील एक निसरडी अरुंद वाट होय. या वाटेने अर्ध्या नळीतून पुढे रायलिंग डोंगर कड्याने आपण पुढे थोडे गेले की आपणास सुरेख डोंगरदऱ्या असणाऱ्या सह्याद्री परिसराचे व त्यातील निबीड अरण्याचे दर्शन घडते. येथून आपण एक साद दिली की सह्याद्री अनेक साद देत तुमच्या आवाजास प्रतिक्रिया देतो. या वाटेने जाताना मराठी मावळे इतके काटक कसे झाले त्यांच्या पायातील धमक निर्माण कशी झाली याची कल्पना आपणास ही चढण चढून येताना कळते.
• रायलिंग पठार :
अनेक सह्यगिरी सुळक्यांचे दर्शन घेत पुढे चढण चढून गेल्यावर आपण रायलिंगाच्या पठारावर येतो. विस्तृत पठार व त्यासमोर शिवलिंग आकाराचा विशाल पर्वत दिसतो तो आहे लिंगान किल्ला, या ठिकाणी श्रावण महिना व जून ते सप्टेंबर या काळात आल्यास आपली सर्व दुखे विसरून सुंदर असे निसर्गाचे हे रूप आपले मन प्रफुल्लित होते.
- लिंगाणा पाहातानाचा पहिला टप्पा :
![]() |
सह्याद्री दर्शन |
रायलिंग पठारावरून खाली उतरून पुढे बोराटीच्या नाळेतून एक फाटा कडेने लिंगाण्याकडे जातो. व नाळ मागे रहाते व खालील भागात जाते. या वाटेने चढण चढून अरुंद वाटेने जाताना पावसाळी दिवसात उगवलेले रान, गवत व फुललेली गवतफुले पाहून एक निराळा आनंद अनुभवायला मिळतो.
• रायलिंग पठारावरून लिंगाणा सर करण्याआधी जननी व सोमजाई देवीचे दर्शन घ्यावे त्यांचा आशीर्वाद घेऊनच लिंगाणा सर ट्रेकर्स करतात.
• तसेच लिंगाणा सर करताना आपणास ट्रेकिंगचा अनुभव असणे गरजेचे अन्यथा अपघात होऊ शकतो.
• विश्रांती गुहा व पाण्याचे टाके :
उंच कात्याळ कडा चढत पाऊलवाटेने कड्यावर चढण्याची कसरत करत दोर व अन्य ट्रेकिंग साहित्याचा वापर करत आपण एक टप्पा पार केल्यावर आपणास एक विश्रांतीसाठी उजव्या बाजूस गुहा लागते. कड्यातच खोदून तयार केलेली. व या वाटेच्या डावीकडे एक पाण्याचे छोटेसे टाके लागते. जे खूपच खोल आहे. व त्यातले निसर्ग निर्मित साठलेले पाणी पिण्यायोग्य आहे.
• कारागृह :
चढण चढत असताना एका टप्प्यावर आपणास थोडे ट्रेक करत गेल्यावर एक अरुंद भाग पुढे थोडासा पसरट होत गेलेला दिसतो. त्या वाटेने पुढे कोकण साईटला गेले की आपणास उंच लिंगाण्याच्या कात्याळात खोदलेली एक गुहेसारखी खोली दिसते. त्या खोलीस चार खिडक्या तसेच एक दरवाजा असून येथे पन्नास माणसे सहज राहू शकतात. येथे एक दोर लावलेला आहे. त्यावरून हे कारागृह की सदर हे ओळखता येत नाही.
- धान्यकोठी :
कारागृह खोलीहून थोडे पुढे गेल्यावर आपणास एक आणखी खोली पाहायला मिळते. तिच्या आतील बाजूस ओटा आहे. या ठिकाणी धान्य ठेवले जात असावे. काही ट्रेकर्सना ते आढलून आल्याचे समजले आहे.
- इमारत अवशेष :
या ठिकाणाहून पुढे गेल्यावर माचीचा सपाट भाग लागतो. तिथे बांधलेल्या खोल्यांचे अवशेष देखील पहायला मिळतात. त्यावरून हा किल्ला आहे याची जाणीव होते.तसेच इथे मावळे रहात असल्याचे जाणवते.
- तटबंदी :
या ठिकाणी आपणास तटबंदी पाहायला मिळत नाही हल्ली फक्त तिचे अवशेष पहायला मिळतात. पडलेल्या दगडांच्या रचनेवरून याची जाणीव होते.
- पाण्याचा हौद :
या ठिकाणी थोडे बाजूला गेल्यास पाण्याचा एक दगडात बनवलेला हौद पाहायला मिळतो. ज्यामध्ये पावसाळ्यात पाणी असते.
- पायऱ्या :
गड चढत असताना आपल्याला जागोजागी पायऱ्या पाहायला मिळतात. ज्या कात्याळकडा चढून जाण्यासाठी उपयोगी पडतात.
- लिंगाणा सुळका ( बालेकिल्ला):
परत मागे येऊन आपण शेवटच्या शिखराकडे गड ट्रेक करत चढू लागल्यावर उंचं असा द्रोणागिरी सारखा कात्याळ कडा लागतो. जो चढून वर शेवटच्या टोकावर आपण जाऊ शकतो. ज्या ठिकाणी जाताना जपून चढाई करावी लागते. निसरडी माती. व कात्याळ अरुंद वाट असल्याने जरा जरी तोल गेला तर थेट खोल दरीत कोसळू शकतो.
या वाटेने चढून वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. ज्या ठिकाणी आपणास स्वराज्याचा भगवा ध्वज फडकताना आपण पाहू शकतो. जिथे फक्त चढून जाण्याचे धाडस वारे करू शकते व उतरण्याचे धाडस पाण्याच्या धारेने करावे त्या ठिकाणी देखील स्वराज्य ध्वज फडकवण्याचे काम मराठी मावळ्यांनी केले
व आजही अनेक गिर्यारोहक या ठिकाणी जाऊन त्या ध्वजास सलामी देवून येतात.
• मावळे म्हणजे या ठिकाणी स्वराज्या विषयी व या मातीवर प्रेम करणारे तसेच मराठी मातीत जन्मलेले, शशिवचरीत्राचे आचरण करणारे व छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गक्रमण करणारे होत.
• परतीचा प्रवास :
लिंगण्याचा बेलाग सुळका चढताना जसी दमछाक होते. त्यावेळी आपल्या शरीरातील चंद्र व सूर्य नाडी सक्रिय होऊन बुद्धी व शरीर शक्ती वापरून चढवते, तसेच उतरताना बुद्धी, व शरीर शक्ती बरोबर धीर व संयम ही शिकवते. हळुवारपणे चढण उतरणे शिकवताना जीवनातील चढ व उतारांचा सामना संयमाने करायला शिकवते.
लिंगाणा किल्याचे महत्त्व व इतिहास :
• मोऱ्यांची जावळी जिंकली तेव्हा रायरीचा किल्ला व आसपासचा प्रदेश स्वराज्यात आला.
• छत्रपती शिवरायांनी या विभागाची पाहणी केल्यावर राजधानीसाठी उंच गिरिदुर्ग रायरीची रायगड करुन निवड केली.
• त्यावेळी लिंगाणा सुळका व त्या आसपासच्या परिसराची पाहणी झाली. व शिवलिंग अकाराच्या डोंगराची निवड आणखी एका गिरीदुर्गासाठी निवड झाली.
• या डोंगराचा आकार शिवलिंग पिंडी म्हणजेच लिंगाच्या आकाराचा असल्याने त्याचे नाव लिंगाणा ठेवले गेले.
• या दुर्गाची निबीडता पाहून हा दुर्ग एक कारागृह म्हणून निवडण्याचे ठरले.
• एखादा राज्यद्रोही, फितूर, शत्रूचा हेर, एखादा कुख्यात गुन्हेगार यांना तसेच स्वराज्याच्या शत्रूंना कैदी म्हणून या ठिकाणी ठेवले जाई.
• एखादा कुख्यात कैदी देखील इथे आणल्यावर येथील अवघड रचना व भीतीदायक चढण व निबीडता पाहून त्याचे देखील मनोध्यैर्य खचत असे. व तो शरण येई. या ठिकाणचे कारागृह पाहिले तर एक कात्याळात खोदलेली खोली. ज्या ठिकाणी पन्नास लोक सहज मावतील अशी ही जागा अत्यंत कठीण. पावसाळी दिवसात या ठिकाणी जाणे अत्यंत कठीण, राहणे तर अत्यंत कठीण होते.
• इसवी सन १६६५ साली पुरंदरचा तह झाला तेव्हा स्वराज्यात राहिलेल्या बारा किल्यात लिंगाणा एक किल्ला होता.
• इसवी सन १७८६ पर्यंत लिंगाणा किल्यावरील सर्व देखभाल ही रायगड जमाखर्चातून केली जात असे. तसेच सोमजाई व जननी, नवरात्र व इतर उत्सव खर्च देखील रायगड जमाखर्चातून केला जाई.
• यानंतर मात्र या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले.
• यावरील तटबंदी तसेच इतर वास्तू देखील काळाच्या ओघात नष्ट झाल्या. कात्याळ गुहा फक्त नीट राहिल्या.
• आजच्या आधुनिक काळात लिंगाणा हा किल्ला गिर्यारोहकांना साद घालतो. तो फक्त त्याची निबीडता जाणून घेण्यासाठी. व अनेक गिर्यारोहक ती ऐकूण आकर्षित होतात व विक्रम करतात.
•कोल्हापूर मधील सागर विजय नलवडे, या गिर्यारोहकाने लिंगाणा सुळका हा १६ मिनिटात सर केला आहे.
• महाराष्ट्र रेंजर्स मधील तानाजी केंकरे यांनी ११ मिनिट २२ सेकंदात हा बेलाग सुळका सर केला आहे.
• राहण्याची सोय :
हा एक निबीड व कठीण किल्ला असल्याने येथे राहण्यासाठी कात्याळामध्ये खोदलेल्या खोल्याच फक्त राहण्यासाठी आहेत. त्यामधे ५० ते १०० लोक मावू शकतात. तसेच येथे जवळील कत्याळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यातून आपल्या पाण्याची गरज भागवू शकतात. जेवणाची सोय ही ज्याची त्यालाच करावी लागेल.
• अशी आहे लिंगाणा या किल्याची माहिती.
Lingana Fort information in marathi