Showing posts with label पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi. Show all posts
Showing posts with label पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

 'पुरंदर किल्ला'
Purandar Fort information in marathi

अल्याड राजुरी पल्याड जेजुरी मध्ये वहाते कऱ्हा हो,

      पुरंदर शोभे शिवशाहीचा मानाचा तुरा.’


पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

 पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

स्थान : 

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सासवड गावाजवळ असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला असणाऱ्या उपरांगेत, जी भुलेश्वर पर्यंत गेली आहे. त्याच रांगेत सिंहगड व पुढे पुरंदर हे किल्ले येतात.

उंची : 

समुद्र सपाटी पासून हा किल्ला १३९० मीटर उंच/ म्हणजेच ४४७२ फूट उंचीवर सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागातील एक गिरिदुर्ग स्वरुपाचा हा किल्ला आहे.

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

भौगोलिक स्थान:

पुणे शहराच्या आग्नेय बाजूस, सासवड शहराच्या नैऋत्येस, या गडाच्या पूर्वेला सपाट मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस उंच डोंगराळ भाग .पुरंदरच्या वायव्येस ४२ कि. मी. अंतरावर सिंहगड, पश्चिमेस ५४ कि. मी. अंतरावर राजगड व ६० कि. मी. अंतरावर तोरणा किल्ला आहे.

निर्मिती :

पुरंदर किल्ल्याची निर्मिती ही यादव राजवटीत झाली असे मानले जाते. इसवी सन १३५० साली याच्या बांधणीस सुरुवात झाली.

किल्यावर जाण्यासाठी मार्ग :

• पुणे शहरातील कात्रज या ठिकाणाहून सासवड हे ठिकाण २५ कि. मी. अंतरावर आहे. तिथून पुढे पुरंदर किल्ला १५ ते १८ की.मी. अंतरावर आहे.

• पुरंदर किल्ल्याला जाताना तिन घाटमार्गे जाता येते. कात्रज घाट, दिवे घाट, बापदेव घाट.

• पुणे सातारा रोड कापूरहोळ मार्गे २० की. मी. पुरंदर.


• पुणे – सासवड -नारायणपूर येथून तसे दोन मार्गे जाता येत होते.

• पहिला मार्ग नारायणपूर येथून पुरंदरच्या पायथ्याशी आल्यावर आलू दरवाजाकडे एक जंगल वाट जाते. त्या जंगली पायवाटेने आपण ट्रेकिंग करत जाऊ शकतो. पण हल्ली आर्मी ट्रेनिंग कॅम्पमुळे हा रस्ता बंद केला आहे.

• दुसरी वाट सरळ पक्क्या गाडी वाटेने थेट पुरंदर आर्मी गेटवर जाऊन तिथे परवानगी घेऊन आत पार्किंग करून पुढे आपण गडावर जाऊ शकतो.

• हल्ली फक्त आर्मी कॅम्प मार्गच फक्त आपणास सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेतच या गडावर जाता येते. 

• त्याआधी व त्यानंतर प्रवेश मिळत नाही. तसेच आपले ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. कारण भारतीय मिलिटरी कॅम्प असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेतली जाते.

• पुरंदर व वज्रगड हे जोडकिल्ले आहेत. मात्र वज्रगडच्या बाजूने एन्ट्री बंद केली आहे.


पुरंदर किल्ल्यावर पाहण्या सारखी ठिकाणे :

या किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांमध्ये बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, पद्मावती तळे, मुरारबाजी समाधी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, केदारेश्वर मंदिर, शेंदर्या बुरुज, छत्रपती शिवाजीराजे स्मारक, सर दरवाजा, दिल्ली दरवाजा, चर्च, तटबंदी व पुरंदर बुरुज, बालेकिल्ला, खन्दकडा.

बिनी दरवाजा :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

Purandar Fort

नारायण गावातून पुढे पुरंदराच्या पायथ्यापासून जंगली पायवाटेने वर चढून आल्यावर आपल्याला एक दरवाजा लागतो. तो बिनी दरवाजा होय. हा दरवाजा पुरंदरच्या माची शेजारी येतो. अत्यंत उंच एखादा हत्ती सुद्धा अंबारीसह यातून जाईल. काळया पाषणात बांधलेला अजूनही सुस्थितीत हा दरवाजा आहे. पहारे कर्यांना विश्रांतीसाठी आतील बाजूस देवड्या आहेत. पण याबाजूने प्रवेश बंद केला आहे.

पुरंदरेश्वर मंदिर :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


 सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला काही लष्करी छावणीतील वास्तू लागतात. तेथून थेट पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जायच्या अगोदर एक प्राचीन यादवकालीन बांधणीचे हेमाडपंथी तंत्राची बांधणी असणारे पुरंदेश्वराचे मंदिर लागते. दगडाच्या एका खोबणीत दुसरा बसवून अत्यंत सुंदर निर्मिती या मंदिराची केली आहे. हे महादेव मंदिर असून येथे सुरेख शिवपिंड तसेच सुंदर इंद्र देवाची मूर्ती पाहायला मिळते. इंद्र देवाने इथे तपश्चर्या केली होती. त्याचे नाव पुरंदर म्हणून या किल्ल्यास पुरंदर हे नाव ठेवले.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला.

रामेश्वर मंदिर :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


पुरंदर मंदिराच्या मागील बाजूस असणारे हे मंदिर पेशव्यांचे खाजगी मंदिर आहे.

पेशव्यांचा वाडा :

 पेशव्यांच्या राहण्यासाठी इथे वाडे बांधले होते. त्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.

मुरारबाजी देशपांडे यांची समाधी :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

पुरंदर किल्ला 

मोगलांनी केलेल्या आक्रमणात पुरंदरच्या वेढ्यावेळी कडवा प्रतिकार करत धारातीर्थी पडलेले किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांची समाधी इथे पाहायला मिळते. समाधीच्या पुढील बाजूस मुरारबाजी देशपांडे यांचा एक भव्य पुतळा पाहायला मिळतो. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची प्रेरणा आपल्याला मुरारबाजी यांच्याकडून मिळते.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक व उद्यान :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

 छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांची आठवण म्हणून अलीकडे त्यांचा भव्य पुतळा उभारून त्याभोवती सुरेख उद्यान अन् स्मारक वास्तू आर्मी ट्रेनिंग कॅम्प तर्फे उभी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक हे वंदन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एक ऐतिहासिक तलवार पाहायला भेटते. तसेच या ठिकाणी भिंतीचीत्रे आहेत. यातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनातील प्रसंग पाहायला मिळतात.

छत्रपती शिवराय यांचा पुतळा :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


स्वराज्याचे आद्य निर्माते छत्रपती शिवराय यांचा अर्ध शिल्पाकृती पुतळा व उद्यान देखील येथे निर्माण केलेले पहावयास मिळते.

पद्मावती तळे :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधी पासून जवळच आपणास एक तलाव काही अंतर चालत गेल्यावर लागतो. तो आहे. पद्मावती तलाव. आर्मी कॅम्पच्या परिसरातील या तलावास सुरेख कथडा बांधलेला आपणास दिसतो.

शेंदर्या बुरुज :

पद्मावती तलावा पासून पुढे बालेकिल्ल्याच्या वायव्य भागात एक बुरुज लागतो त्यास शेंदर्या बुरुज असे म्हणतात.

बालेकिल्ला व तेथील दरवाजे :

पद्मावती तळ्याच्या जवळून आपण पुढे आल्यावर एक वाट बालेकिल्ल्याकडे घेऊन जाते. बालेकिल्ला अत्यंत उंच असा किल्ल्याचा भाग आहे. इकडे जाताना आपल्याला तिन दरवाजे लागतात. इंग्रजी झेड आकाराचे म्हणजेच अंधार्या खोलीसाठी केलेल्या प्रकाश प्रसारक आरश्यांच्या रचनेचे दरवाजे लागतात.

सर दरवाजा पुरंदर: 

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


पहिला दरवाजा हा सर दरवाजा म्हणून ओळखला जातो. याच्या आतील बाजूस शेंदरी रंगात रंगवलेली हनुमंताची मूर्ती आहे.

• दुसरा दरवाजा हा गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो. आजही हा भक्कम स्थितीत उभा आहे.

उत्तर दरवाजा/ दिल्ली दरवाजा  पुरंदर किल्ला: 

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


हाा दरवाजा तिसरा दरवाजा आहे. इथून पुढे आपल्याला बालेकिल्ल्यावर जाता येते.

• बालेकिल्ल्यावर पुष्कळ प्रमाणात पाण्याची छोटी छोटी टाकी तसेच तळी पाहायला मिळतात. येथून पाईपद्वारे हे पाणी आर्मी कॅम्पमध्ये नेले गेले आहे.

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


• बालेकिल्ल्यावर राहत्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.

• बालेकिल्ल्यावर एक शिवकालीन बंदिस्त टाके आढळते. त्यामध्ये शिडी द्वारे उतरता येते. त्यातील पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. इतर उघड्या टाक्यातील, तळ्यातील पाणी सूर्य प्रकाशाने शेवाळलेले आहे.

• या परिसरात काही निवडुंग तसेच इतर लहानमोठ्या वनस्पती पाहायला मिळतात.

केदारेश्वर मंदिर Holly Hilstasion in Purandar :

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


बालेकिल्ल्यात अती उंच भागात हे मंदिर असून या ठिकाणी जाण्यासाठी परसबंदी पायऱ्यांचे बांधकाम पाहायला मिळते. त्या चढून वरील भागात गेल्यावर आपल्याला एक मंदिर लागते. ते केदारेश्वराचे मंदिर होय. या मंदिरात एक शिवलिंग आहे. तसेच काही शिवकालीन शस्त्रे ही पहायला मिळतात.उदा. तलवार.केदारेश्वर देवालयावरील भगवा ध्वज फडकताना पाहिला की आपल्याला स्वातंत्र्य व स्वराज्याची आठवण करून देतो. 

खंदकडा : 

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


दिल्ली दरवाजा पासून पुढे गेल्यावर एक उंच पाषाणाचा कडा लागतो त्यास खंदकडा असे म्हणतात. इथून पुढे गेल्यावर पाण्याची टाकी लागतात. तसेच काही शिवकालीन इमारतींचे अवशेष पहायला मिळतात.

अंबारखाना

खंदकड्यापासून पुढे गेल्यावर आपणास अंबारखाना लागतो. इथून पुढे पाण्याची टाकी आहेत. तिथून केदारेश्वर मंदिराकडे जाता येते.

चर्च : 

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


आर्मी कॅम्प मधून पुढे आल्यावर आपणास ब्रिटिश कालीन वास्तू चर्च लागते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कमानाकृती दारे अन् खिडक्या. विस्तृत अशा या चर्चचे छत किलचीवर असून त्यावर पत्रा घातलेला आहे.अशीच चर्च आणखी एक इथे बांधलेली आहे.

'Purandar Fort information in marathi'

पुरंदराचे वैशिष्ट्य :

पुरंदरचे वैशिष्ट्य सांगताना

• या किल्ल्यावर मोठी शिबंदी ठेवता येऊ शकते. कारण इथे मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे.

• हा किल्ला तिन बाजूंनी अडचणीचा असल्याने शत्रूस जिंकणे कठीण जात होते.

• वज्रगड हा जोड किल्ला या किल्ल्यास लागून असल्याने मदतीची कुमक मिळू शकते.

• मोठा, मजबूत, विस्तारित व बचाव करण्यास जागा पुष्कळ असल्याने हा महत्वाचा किल्ला.

• याच्या पायथ्याला नारायणपूर हे गाव दत्त महाराजांचे पवित्र ठिकाण आहे.


पुरंदर किल्ल्याची ऐतिहासिक, माहिती :

• इसवी सनाच्या बाराव्या शतकात हा यादव घराण्याच्या ताब्यात होता.

• त्यानंतर बहामनी सत्तेच्या राजवटीच्या ताब्यात गेला.

• इसवी सन१४४९ साली मलिक अहमद याने तो जिंकून निजामशाहीत दाखल केला.

• इसवी सन १५५० साली आदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला.

• शिवरायांनी स्वराज्य स्थापन केल्यावर आदिलशहाने शहाजीराजांना कैद केली. तेव्हा शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले. तेव्हा संघर्ष करण्यास योग्य ठाणे शिवरायांनी पुरंदर निवडले. तेव्हा इथे महादजी निलकंठ यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांचा भाऊ व त्यात या ठिकाणी वर्चस्वासाठी वाद होता. याचा फायदा घेऊन छत्रपती शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. व फत्तेखानाचा बंदोबस्त तर केलाच. शिवाय शहाजीराजांची सुटकाही केली.

• इसवी सन १६५५ साली नेतोजी पालकर यांची या गडावर सरनोबत म्हणून निवड झाली.

• इसवी सन१४ मे १६५७ साली छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म या गडावर झाला.

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi

पुरंदर किल्ल्याची ऐतिहासिक, माहिती

• इसवी सन १६६५ साली पुरंदरला मोघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी वेढा दिला. व दिलेरखानाने पुरंदर व वज्रगडावर तोफांचा मारा केला. माची जिंकली. मराठा व मोघल यात तुंबळ संघर्ष झाला. याचा परिणाम ११ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहात झाला. यामध्ये २३ किल्ले व चार लक्ष होणाचा मुलुख शिवरायांनी मुघलांना दिला व स्वराज्यात १२ किल्ले राहिले.

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi
 पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi


मुघलांना दिलेले किल्ले:

पुरंदर, वज्रगड(रुद्रमाळ), कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोणा, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भांडारदुर्ग, पालसखोल, रुपगड, बख्तगड, मरकगड, माणिकगड, सरुपगड, सकरगड, अंकोला, सोनगड, मानगड.

स्वराज्यात राहिलेले किल्ले : 

राजगड, सिंधूदुर्ग, रायगड, विजयदुर्ग, विशाळगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, व्याघ्रगड, तळगड, घोसाळगड, सुवर्णदुर्ग हे राहिले.

• ८ मार्च १९०७ रोजी निळोपंत मुजुमदार यांनी पुन्हा स्वराज्यात हा किल्ला जिंकून आणला.

• छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने हा किल्ला पुन्हा जिंकला व याचे नाव आझमगड ठेवले.

• पुढे शंकर नारायण सचिवांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला.

• त्यानंतर इसवी सन १८१८ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला.

• स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. इथे सैनिक प्रशिक्षण केंद्र आहे.


llस्वराज्याचा हा मानाचा तुरा आहे. जो स्वराज्याच्या जिरेटोपात खुलून दिसतो.ll

पुरंदर किल्ला Purandar Fort information in marathi"

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...