रोहिडा किल्ला माहिती
Rohida Fort information in marathi
महाराष्ट्र राज्यातील घाट प्रदेशात असणार्या व आपल्या ठेवणीची एक विचित्र मांडणी केला गेलेला फोर्ट म्हणजे विचित्र गड म्हणजेच रोहिडा किल्ला होय.
• स्थान :
भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर जवळील सह्याद्री पर्वताच्या महाबळेश्वर डोंगर रांगेच्या एका खुशीत नीरा नदीच्या खोऱ्यात रोहिडा खोरे नावाचा उपविभाग आहे. येथे डोंगरात चीखलावडे व बाजारवाडी गावाजवळ हा किल्ला गिरिदुर्ग रोहिडा उभा आहे.
- रोहिडा किल्याची उंची : रोहिडा किल्ल्याची उंची ही ३६६० फूट आहे.
रोहिडा किल्यावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :
• महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर जे राष्ट्रीय, राज्य तसेच लोहमार्गाने संपूर्ण देशास जोडले आहे. या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. येथून भोर मार्गे रोहिडा किल्यावर जाता येते.
• पुणे – भोर – बाजारवाडीत बसने येवून मळवाटेन चढून किल्ले रोहीडाच्या पहिल्या दरवाजा पर्यंत पोहोचता येते. ही वाट थोडी निसरड असणारी आहे.
• पुणे – भोर – महाड रोड वरील चौक तेथून वानेवडी – शिरवली – आंबेघर – चिखलावडे फाटा – चिखलावडे मार्गे – रोहिडा किल्ला.
• पुणे ते भोर हे १० किलोमिटरअंतर असून भोर पासून दक्षिणेस रोहिडा किल्ला अंदाजे १० किलो मिटर अंतरावर आहे.
• रोहिडा किल्याची नावे : रोहिडा, विचित्रगड, बिनीचा किल्ला अशा नावाने रोहिडा किल्ला ओळखला जातो.
• रोहीडा किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• गणेश दरवाजा :
बाजारवाडी गावातून चढण चढुन आपण पहिल्यांदा गणेश दरवाजा जवळ पोहोचतो. या ठिकाणी चौकटीवर पूर्वी गणेशमूर्ती होती. हल्ली ती नष्ट झाली आहे. गणेश दरवाजा आजही भक्कम अवस्थेत आहे. काळया पाषाणात बांधलेला हा दरवाजा त्या काळाच्या गडाच्या वैभवाच्या खाणाखुणा सांगतो.
• दुसरा दरवाजा :
गणेश दरवाजातून आत आल्यावर थोडे २० -२२ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक दुसरा दरवाजा लागतो. आजही याची चौकट अस्तित्वात आहे. किल्याच्या संरक्षणासाठी सल्लग दरवाजे बांधले जात होते. यावर वेगवेगळ्या प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. यामधे वाघ, हत्ती या प्राण्यांच्या अस्पष्ट आकृती दिसून येतात. दरवाजावरील अस्पष्ट शरभ शिल्पामुळे हा यादव काळातील बनावटीचा दरवाजा वाटतो.
• पाणी टाके :
दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे वळल्यावर आपणास पायरी मार्गाजवळ खालील बाजूस जमिनीत एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. त्यास बारमाही पाणी असते.
• तिसरा दरवाजा :
पायरी मार्गाने पुढे लगेच आपण तिसऱ्या दरवाजा जवळ पोहोचतो. हा दरवाजा कमानाकृती रचना असणारा असून यावर हत्तीमुख असणारी शिल्पे कोरलेली आहेत. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस शिलालेख असून त्यातील एक उजवीकडील फारशी लिपीतील तर दुसरा डाव्याबाजूला देवनागरी लिपीतील आहे.
![]() |
फारशी शिलालेख रोहिडा किल्ला |
![]() |
देवनागरी लिपी शिलालेख रोहिडा किल्ला |
• बालेकिल्ला :
• तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर आपणास किल्याच्या वरील बालेकिल्ल्याचा भाग लागतो.
• सदर व फत्तेबुरुज :
बालेकिल्ला परिसरात थोड्याच अंतरावर सदरेचा भाग लागतो. या ठिकाणी किल्लेदार तसेच सरदार व इतर महत्वाच्या बैठकी होत असत. व दैनंदिन व्यवहारावर चर्चा घडत असत. तेथे लागूनच एक बुरुज आहे. हा अर्ध वर्तुळाकृती असून त्याचे नाव फत्ते बुरुज आहे. असे एकूण सहा बुरुज या किल्यावर पाहायला मिळतात. या बुरुजात जागोजागी जंग्या पाहायला मिळतात. किल्यावर फत्ते मिळवला म्हणून यास फत्ते बुरुज म्हंटले जात असावे.
येथून भोर तालुक्याचे दर्शन घडते.
• सर्जा बुरुज :
फत्ते बुरुजावरून पुढे लोखंडी रिळ लावलेल्या वाटेने पुढे गेल्यावर आपणास दुसरा बुरुज लागतो त्यास सर्जा बुरुज असे म्हणतात.हा या किल्यावरील सर्वात मोठा बुरुज असून याचा उपयोग हा टेहळणी, तसेच युद्धावेळी होत असे. येथे अनेक बुरुजात जंग्या व फांज्या पाहायला मिळतात.तसेच याठिकाणी ध्वज फडकवला जात असे त्याची पायथा रचना दिसते.
• चोर दरवाजा :
सर्जा बुरुजापासून पुढे चालत गेल्यावर आपणास एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. तो दरीच्या कडेला असल्याने संकटकाली याचा वापर केला जात असे. हल्ली याची मोडतोड झाल्याचे जाणवते काळाच्या ओघात दुरावस्थेमुळे अशी अवस्था झाली आहे.
• तटबंदी :
किल्याची तटबंदी अजूनही मजबूत आढळते. काही ठिकाणी पडझड झाल्याचे दिसते.
• पाण्याची टाकी :
रोहिडा किल्यावर बुरुज तसेच तटबंदीचे बांधकाम करताना जागोजागी खुदाई करून दगड काढले गेले. त्या काढल्या गेलेल्या दगडांच्या जागी खोल खड्डे तयार करून पाण्याची साठवण केली जाऊ लागली. त्यामुळे शिबंदीतील मावळ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली. अशी अनेक टाकी या किल्यावर जागोजागी पाहायला मिळतात.
• किल्लेदार निवास वास्तू अवशेष :
फत्तेबुरुजापासून चालत पुढे गेल्यावर आपणास एके ठिकाणी भग्न वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. ते किल्लेदार निवास अवशेष तसेच सरदार निवास अवशेष असावेत. त्या ठिकाणी किल्याच्या शिबंदीतील सरदार तसेच किल्लेदार, व इतर मावळे यांना निवासासाठी बांधले गेले होते. हल्ली फक्त अवशेष पाहायला मिळतात. तसेच काही घरगुती वस्तूंचे अवशेष देखील सापडले आहेत.
• राजवाडा अवशेष :
किल्ल्यावरील अवशेष मध्ये निवास वास्तूत एके ठिकाणी राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
• रोहिडेश्वर मंदिर :
वाड्याच्या अवशेषा पासून थोडे पुढे गेल्यावर आपणास एक मंदिर लागते. मंदिर साध्या बांधणीचे असून त्याचा हल्ली जीर्णोद्धार करण्यात आला आहे. ते रोहिडमल्ल देवाचे मंदिर आहे. मंदिरात गणेश, भैरव व भैरवी तसेच एका बाजूस महादेवाची पिंड पाहायला मिळते.
• या मंदिरापासून पुढे काही अंतरावर एक तळे असून त्याची तटबंदी ढासळलेली आहे. सुरक्षेसाठी त्याभोवती जाळी मारलेली दिसते. त्या ठिकाणी आपणास काही समाध्या तसेच इतर अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यावरील लढावू मावळ्यांच्या तसेच सरदाराच्या मृत्यु नंतर त्याच्या स्मृती स्मरणार्थ त्या बांधलेल्या दिसतात.
• तसेच या ठिकाणी गोफनीचे दगड तसेच काश्याची विट सापडली आहे. जी त्या काळी वापरली जात होती. ती मंदिराच्या आत ठेवलेली आहे.
• वाघजाई बुरुज :
वाघजाई मंदिराकडे जायच्या वाटेला आपणास वाघजाई बुरुज पाहायला मिळतो. तो अत्यंत मोठा व भक्कम असा बुरुज आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, जागोजागी जंग्या व फांज्या पाहायला मिळतात. टेहळणी तसेच लढाऊ रचना या बुरुजाची दिसून येते. झेंडा फडकवत ठेवण्यासाठी एक खोबणी देखील आहे. तसेच रात्री पाहारा देताना दिवे मालवू नये यासाठी जागोजागी खोबणी असणाऱ्या देवळ्या देखील दिसतात.
• वाघजाई मंदिर :
वाघजाई बुरुजा समोर पुढे काही अंतरावर आपणास एक मंदिर पाहायला मिळते ते वाघजाई देवीचे आहे. मंदिरावर सुरेख कलश असून समोर भव्य सभामंडप आहे. तसेच तुळशी वृंदावन आहे. आतील बाजूस वाघजाई देवीची सुरेख मूर्ती पाहायला मिळते.
• रोहिडा किल्यावर दामुगडे बुरुज आहे. याची बांधणी इतर बुरुजापेक्षा वेगळी जाणवते.
• शिरवली बुरुज फिरून पाहताना किल्याच्या खालील सुरेख परिसराचे दर्शन घडते.
• पाटणे नावाचा बुरुज थोडाफार ढासळलेला दिसतो.
• किल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ठिकाणाहून शत्रू आक्रमणाचा धोका वाटतो त्या ठिकाणी बुरुज बांधला जात असे. तो संपूर्ण दगडी बनावटीचा असून चुन्याने त्यास दगडाची घट्ट पक्कड करून चिलखती स्वरूप आणले जाई. त्यावर चढून जाण्यासाठी दगडी पायरी जिना असतो. तसेच बंदूक व बाणाने संधान करण्यासाठी जागोजागी जंग्या व तोफेचा मारा करण्यासाठी फांज्या बांधून ठेवलेल्या बुरुजात दिसतात. तसेच पहारेकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी जागोजागी कमानाकृती देवड्या ठेवलेल्या आढळतात.
• या किल्याची रचना विचित्र असल्याचे जाणवते. म्हणून त्यास विचित्रगड असे म्हणतात.
• चूना घाणी :
अशाप्रकारे गडफेरी करून आपण चुन्याच्या घाणी जवळ येतो. जिचा उपयोग किल्याच्या तटबंदी अन् बुरुज बांधणीसाठी लागणारा चूना निर्मितीसाठी केला जाई.
• रोहीडा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती :
• रोहिडा किल्ला हा प्रथम चालुक्य राजवटीत त्यानंतर राष्ट्रकूट राजवटीत, त्यानंतर शिलाहार राजा भोज यांच्या ताब्यात होता.
• यादव काळात हा किल्ला यादव सरदारांच्या ताब्यात होता. याचे बरेचसे बांधकाम केले गेले.
• यादव राजवटी नंतर बहामनी सत्तेत हा किल्ला आला.
• मे १६५६ साली बहामनी सुलतान मुहम्मद आदिलशाने या किल्यावरील दरवाजाचे तसेच अनेक वास्तूंचे बांधकाम केले. हे तेथील शिलालेखात उल्लेख असलेल्या मजकूरावरुन समजते.
• इसवी सन १६५६ साली रोहिडा किल्ला शिवरायांनी विठ्ठल मुद्गल या आदिलशाही सरदाराकडून जिंकून स्वराज्यात दाखल केला.
• स्वराज्याचे प्रमुख शिलेदार रोहिडा मावळ प्रांतातील कान्होजी जेधे हे स्वराज्याचे निष्ठावान पाईक होते. त्यांकडे छत्रपती शिवराय यांनी भोर विभागाची पूर्ण व रोहिडा किल्याची आर्धी देशमुखी होती. त्यांकडे नियमापेक्षा कमी म्हणजे ३० होण उत्पन्न घेतले जाई. वसुली अधिकाऱ्यांनी असे का? विचारल्यावर छत्रपती शिवराय म्हणाले की ‘ जेधे आपले चाकर असल्याने पूर्वापार चालत आलेलं द्रव्यच घ्यावे.'
• या घटनेवेळी बाजीप्रभू देशपांडे व बांदल मंडळी स्वराज्याच्या कार्यात सामील झाली. जे याठिकाणी सेवेत होते. * बाजीप्रभू देशपांडे व छत्रपती शिवराय यांची प्रथम भेट ही याच किल्यावर झाली. ज्यांनी गजापुरच्या घोडखिंडीत आपल्या पराक्रमाची शर्थ करून छत्रपती शिवराय व स्वराज्याचे रक्षण करताना बलिदान दिले.
• इसवी सन १६६६ साली झालेल्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मुघलांना देण्यात आला.
• २४ जून १६७० साली रोहिडा पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला होता.
• १६७० पासून एक वर्षाचा अपवाद वगळता रोहिडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला.
• पुढे १७०० मध्ये भोरचे संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले. तेव्हापासून हा किल्ला संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत रोहिडा किल्ला संस्थानाच्या ताब्यात राहिला.
ही आहे रोहिडा किल्ल्याची माहिती
Rohida Fort information in marathi