Showing posts with label ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी Dhak bahiri guha information in Marathi. Show all posts
Showing posts with label ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी Dhak bahiri guha information in Marathi. Show all posts

Saturday, October 5, 2024

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी Dhak bahiri guha information in Marathi

 ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी

Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• स्थान: 

महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्री पर्वतात ढाक बहिरी हे ठिकाण प्राचीन लेणी व गुहा हिंदू मंदीर पाहायला मिळते.

• उंची : 

समुद्र सपाटी पासून या ठिकाणाची उंची ही सरासरी समुद्र सपाटी पासून २७०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.

ढाक बहिरी पाहण्यासाठी जाण्याचा प्रवाशी मार्ग:

• मुंबई येथून ठाणे – कल्याण – बदलापूर येथून पुढे कर्जत येथून दोन तासांचा पायी ट्रेक करत आपण ढाक बहिरीच्या पायथ्याशी पोहोचू शकतो.

• पुणे येथून पुढे पिंपरी चिंचवड मार्गे तळेगाव दाभाडे तेथून पुढे कामशेत येथून जांभवली गावातून राजमाची जवळील अरण्यातून ढाक बहिरीला जाता येते.

ढाक बहिरी या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे :

• सह्याद्री पर्वतात पुणे जिल्ह्यात मावळ प्रांतात कामशेत ठिकाण आहे. याठिकाणी आल्यावर जांभवली गावी जाण्याचा मार्ग विचारून आपण त्या गावी आपल्या वाहनाने जाऊ शकतो. तेथे पोहोचून आपले वाहन पार्किंग करून पुढे रान वाटेने ढाक बहिरीकडे जाऊ शकतो.

• कोंडेश्वर मंदिर:

 या गावातून पुढे लगेच आपणास कोंडेश्वर देवालय लागते. येथून पुढे आपणं ढाक बहिरीकडे जाऊ शकतो. हे एक शिवमंदिर आहे. नवीन पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आलेला असून अनेक हिंदू धर्मीय लोकांचे ते श्रध्दा स्थान आहे.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• कळकराई डोंगराकडे :

या वाटेने सह्याद्री पर्वतात उगम पावलेले ओहोळ, नाले पाहत गर्द झाडीतून अरण्य वाटेने पठारी भागातून जंगलात रान वाटेने कळकराईच्या डोंगराजवळ येऊन पोहोचतो. वाटेत लागणाऱ्या निबीड अरण्यातून सह्याद्रीच्या सदाहरीत अरण्याची प्रचीती येते.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• मार्गदर्शक फलक :

या ठिकाणी आपणास या ढाकबहिरी ठिकाणावर असलेल्या वेगवेगळ्या पॉइंटचे मार्ग दर्शन करणारा फलक लावलेला पाहायला मिळतो.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• कळकराई खिंड :

मार्गदर्शक फलक पाहून आपण लगेचच तिथे असलेल्या खिंडीतून जाऊ लागतो. ही वाट अत्यंत चिंचोळी आहे. येथून जाताना आपणास खोल घळईतून जाण्याचा अनुभव मिळतो. ही घळई पार केल्यावर खाली उतरावे लागते. त्यासाठी घळईच्या तोंडावर लोखंडी सळई बांधलेली दिसून येते. तसेच एक दोरही बांधलेला पाहायला मिळतो. हा गिर्यारोहण करणाऱ्या गडप्रेमीनी चढाई व उतरणे सोपे व्हावे म्हणून बांधलेला आहे.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• कात्याळ निसरडी वाट:

घळीतून खाली उतरून आल्यावर आपणास घळीच्या बाजूस ढाक बहिरी उंच डोंगर दिसतो. त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कडांच्या निसरट कात्त्याळ कड्याच्या बाजूने आपणास जावे लागते. पावसाळी दिवसात इकडे जाणे तसे कठीण असते. शेवाळलेल्या दगडाच्या उतराने जाणे अवघड असते.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• गुहा :

भैरी देवालयाकडे जाताना आपणास उंच कड्यात खोदून तयार केलेल्या गुहा पाहायला मिळतात. या अती प्राचीन गुहा असून. या ठिकाणी निवाऱ्यासाठी यांची निर्मिती केली असावी.

यामधे शंभर , दोनशे माणसे सहज राहू शकतात. विश्रांती घेवू शकतात.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi
छ.शिव स्मारक 

• कात्रज कडून येणारी वाट व पायरी चढत मार्ग :

कात्रज कडून येणारी वाट याठिकाणी पायथ्याला येवून पोहोचते. कात्रज कडून येताना आपणास प्रथम सांडशी गावात यावे लागते. तिथे आपणास छत्रपती शिवरायांचे स्मारक लागते. तेथून अरण्य वाटेने आपण ढाक बहिरीच्या पायथ्यास येवून पोहोचतो. येताना वाटेत आपणास भग्न अवस्थेत असणारे प्राचीन मंदिर लागते. त्याठिकाणी मंदिर व इतर अवशेष पहायला मिळतात.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

या वाटेने आल्यावर आपण पायथ्याशी दोन्ही वाटा मिळतात एक पुणे व दुसरी कर्जत वरून येथे येते. येथून समोर खडा पाषाण चढ दिसतो. ज्यामधे पायऱ्या खोदलेल्या आहेत. तसेच वर चढून जाण्यासाठी एक सळी जोडलेली आहे. जिच्या आधारे अनेक गिर्यारोहक येथे चढाई करत असतात.

• अरुंद वाट धोकादायक ठिकाणावर खडी चढाई केल्यावर एक पाय मावेल अशी अरुंद वाट जेथून खाली पडल्यास थेट खालील खडकावर पडू अशी जागा, याठिकाणी चढाई करून जाताना आपणास एक आडवी सपोर्टसाठी तार बांधलेली आहे.

• खडी चढाई : 

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

तारेच्या साहाय्याने आपण एक लाकूड बांधलेली जागा आहे. तिथं येतो. या ठिकाणी चढने अवघड आहे. अनेक दोर व तारा चढण्यासाठी सपोर्टला जोडलेल्या आहेत. त्या थेट मंदिर गुहे पर्यंत जोडलेल्या आहेत. या ठिकाणी असणाऱ्या लाकडावरून घरात कसे आपण सिडी लावून चढतो. तसे चढावे लागते.

• भैरवनाथ मंदिर गुहा :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

कठीण गिर्यारोहण करून आपण भैरवनाथ गुहेपर्यंत येवून पोहोचतो. या ठिकाणी शेंदरी रंगात रंगवलेली भैरवनाथ व अन्य हिंदू धर्मीय देवतांच्या मूर्ती गाभाऱ्यात पूजलेल्या दिसतात. गुहेच्या बाहेरील बाजूस देखील काही शिल्पाकृती देवी देवतांच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात. तसेच देवाची त्रिशूळ आधी आयुधे तिथं खोचलेली दिसून येतात.

• इतर गुहा :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

या ठिकाणी अनेक भक्तगण व अनेक गडप्रेमी येतं असतात. त्यांची राहण्याची व्यवस्था होईल अशा विशाल गुहा आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. गुहांच्या बाहेर दीड फूट उंचीची कात्याळ भिंत पाहायला मिळतें.

• पाण्याची टाकी :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

या ठिकाणी गुहेत लागून आपणास आतील बाजूस खोदीव पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात. ज्यातील एक पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तसेच दुसरे खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली असावीत. तसेच येथे काही भांडी देखिल पाहायला मिळतात. जी देवाच्या दर्शनासाठी येणारे भक्त, व गडप्रेमींसाठी जेवणं बनवण्यासाठी ठेवलेली पाहायला मिळतात.

• परतीचा प्रवास:

परतीचा प्रवास खुप अवघड आहे. कारण चढाई सोपी असली तरी उतरणे खुप अवघड आहे. धीर, धाडस व आवड असणारे भक्त व गिर्यारोहकच हे करू शकतात. सर्व सामान्य लोकांना हा ढाकबहिरी करने अवघड आहे.

ढाक बहिरी या गुहांची ऐतिहासिक माहिती :

ढाक बहिरी हे ठिकाण या प्रदेशातील आदिवासी लोकांचे दैवत आहे. त्यामुळे हे स्थान त्यांना अत्यंत प्रिय आहे. हे एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे याची निर्मिती आदिम काळापासून झालेली असावी. मात्र खोदकाम तसेच भूमिगत कात्याळ खोल्या, पाण्याच्या टाक्या या सातवाहन काळात खोदल्याच्या दिसून येतात. नंतर शिवकाळात थोडी डागडुगी झाली असावी. निबीड अरण्यात असल्याने हे ठिकाण परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहीले असावे.

गो. नि. दांडेकर या मराठी भाषेतील लेखकाच्या साहित्यात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो.

• अशी आहे ढाक बहिरी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...