Ankai and tankai Fort information in marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर विभागातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई गावाजवळ अंकाई व टंकाई किल्ला आहे. ही एक जोड किल्याची जोडी आहे. या ठिकाणापासून पूढे सातमाळा अजिंठा डोंगररांगा सुरू होतात. हे किल्ले देखील त्याच रांगेत येतात.
उंची :
समुद्र सपाटी पासून अंकाई किल्ला हा ३१५२ फूट /९६०.९७ मीटर उंचीवर आहे.
• समुद्रसपाटी पासून टंकाई हा किल्ला २८०२ फूट / ८५४.२६ मीटर अंतरावर आहे.
• अंकाई व टंकाई या किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• नाशिक हे जवळील सर्वात मोठे शहर या ठिकाणापासून अगदी जवळ आहे.
• नाशिक – चांदवड मार्गे - मनमाड तेथून अंकाई गावी जाता येते.
• नाशिक – औरंगाबाद – विंचूर मार्गे मनमाड – तेथून अंकाई गावी.
• नाशिक रेल्वे स्टेशन वरून – मनमाड – तेथून पुढे दक्षिण बाजूला या किल्याच्या पायथ्याच्या गावी अंकाईला जाता येते.
• अंकाई गावी रस्त्याने जाता येते.
• अंकाई व टंकाई किल्यावर व परिसरात पाहण्यासारखी ठिकाणे :
• रोडने व अंकाई स्टेशन पासून एक किलोमिटर अंतरावर असणाऱ्या आपण जेव्हा अंकाई गावी पोहोचतो. तेव्हा आपणास एका गावातील गाडी पार्किंग परिसरात असणारी वीरगळ पाहायला मिळते.
• वीरगळ :
गाडी पार्किंगच्या ठिकाणी असणारी वीरगळ ही कंबरे इतकी म्हणजे जवळ जवळ सात आठ फूट उंच अशी आहे. तिच्यावर रानडुक्कराचे शिल्प आहे. तसेच सतीचा हात काढलेला पाहायला मिळतो.
• पायरी मार्ग :
अंकाई गावातून आपण किल्याकडे जाताना आपणास एक पायरी मार्ग किल्यावर जाताना मध्येच टंकाईच्या पोटातील लेण्याजवळ घेवून जातो.
• टंकाई पायथा लेणी
टंकाई किल्याच्या पायथ्याला दोन लेणी प्रथम खोदलेली पाहायला मिळतात. त्यातील एका लेण्यासमोर पाण्याचे टाके खोदलेले आहे.त्यालेण्यामधे कोणतीही मूर्ती किंवा कोरीव काम पाहायला मिळत नाही
• लेणी :
त्या दोन लेण्या पाहून झाल्यावर थोडे दहा बारा पायऱ्या चढून वर गेल्यावर आपणास पाच ते सहा लेणी लागतात. एकमेकाला लागून असलेली ही लेणी पाहायला मिळतात यातील पहिली दोन लेणी दुमजली आहेत.
• पहिले लेणे :
हे दुमजली आहे. बाहेरील बाजूस ओसरी मग सभामंडप त्यानंतर गाभारा अशी रचना आहे. ओसरी दोन खांबांवर असून सभामंडप चार खांबावर आहे. सुरेख नक्षीदार नक्षी सभामंडपावर दिसून येते. छतावर सुंदर कमलाकृती कोरलेली दिसते.
• पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना खोदलेला आहे. पहिल्या मजल्यावरील दालने दोन खांबी आहेत.
• दुसऱ्या लेण्यांमध्ये ओसरीवर डावीकडे यक्ष मूर्ती पाहायला मिळते. तर दुसरीकडे इंद्रानी मूर्ती आहे. जी हिंदू देवता भवानी रुपात दिसून येते. आतील सभामंडप चार खांबावर असून पाहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. वरील बाजूस दालनाच्या वरती सुरेख नक्षी कोरलेली जाळी पाहायला मिळते. बाहेरील बाजूस दोन व्याघ्र कोरलेले आहेत.
• तिसरे लेणे :
या लेण्यात दोन मुर्त्या आहेत. एक कीचक व दुसरी आंबिका यांची
• पुढील लेणे सुद्धा इतर लेण्याप्रमाने असलेले पाहायला मिळते.
• पाचवे लेणे:
मात्र तीर्थंकर यांच्या मूर्तीचे आहे. जे जैन धर्माविषयी माहिती देते. हे आहेत नेमिनाथ भगवान तसेच ही आहे शांतीनाथ भगवान यांची मूर्ती तसेच इतर तीर्थंकरांच्या मुर्त्या ही येथे आहेत.
• खिंड :
लेणी पाहून आपण पुढे थोडे वर चढून गेल्यावर खिंडीत येतो. या ठिकाणी तटबंदी केलेली भिंत पाहायला मिळते. या ठिकाणाहून किल्याची सुरुवात होते. येथून वर पायरी मार्गाने चढून गेल्यावर आपण दक्षिण दरवाजापाशी येतो.
• दक्षिण दरवाजा :
दक्षिण दरवाजा हा अंकाई व टंकाई गडाचे प्रवेशद्वार असून हा एक भव्य दरवाजा असून कमानाकृती आहे. याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूचे बुरुज आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. दरवाजाचे लाकडी अवशेष अजूनही टिकून आहेत.
दुसरे प्रवेशद्वार :
पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आपणास दुसरे प्रवेशद्वार लागते. त्यातून आत गेल्यावर आपणास मध्यभाग लागतो. तेथून पुढे दोन्ही किल्यांकडे जाणारे वेगळे मार्ग लागतात.या ठिकाणी आल्यावर डाव्या बाजूला अंकाई किल्ला तर उजव्या बाजूला टंकाई किल्ला आहे.
अंकाई किल्ला :
अंकाई किल्यावर पुढे आणखी एक प्रवेशद्वार आहे. सलग अशी एकामागोमाग सात प्रवेशद्वारे आपणास पाहायला मिळतात. त्यांची रचना एकसारखी आपणास पाहायला मिळते. दुसरा दरवाजा झाल्यावर लगेच तिसरा दरवाजा लागतो.
• अंकाई कोट लेणी :
तिसरा दरवाजा पार केल्यावर आपणास डावीकडील बाजूस अंकाई कोट लेणी पाहायला मिळतात ही तीन लेणी आहेत. व ही हिंदू धर्मीय लेणी आहेत.
यामधील एका लेण्यात शिवलिंग पाहायला मिळते. एके ठिकाणी महेश शिल्प पाहायला मिळते. तसेच एका लेण्याच्या प्रवेशद्वारावर जय व विजय या दोन द्वारपालांची शिल्पाकृती बाहेरील बाजूस पाहायला मिळते.
• चौथा दरवाजा :
लेणी पाहून पुढे वरील भागात गेल्यावर आपणास चौथा दरवाजा लागतो. या दरवाजातून वरील बाजूस गेल्यावर आपणास अंकाई किल्याची खालील तटबंदी व इतर दरवाजाचे सुंदर दर्शन घडते. या किल्याचे दरवाजे तटबंदी व बराचसा भाग आजही सुस्थितीत असलेला पाहायला मिळतो.
• पुढे पाचवा मग सहावा व त्यानंतर सातवा दरवाजा लागतो.
• सातवा दरवाजा चढून वरील बाजूस आल्यावर आपणास विस्तीर्ण भाग असणारे पठार लागते. हा गडाचा माथा आहे.
• मुघलशैली वास्तू :
गड माथ्यावर एक वास्तू आपणास पाहायला मिळते. ती डाव्या बाजूस जाताना लागते. ती मुघल स्थापत्य शैली असणारी वास्तू आहे.
• पाणी टाके :
तेथून पुढे गेल्यावर आपणास एक पाण्याचे टाके लागते.
• सीता गुंफा :
पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपणास सीता गुंफा लागते.
• अगस्त्य ऋषी मंदिर :
सीता लेणी पाहिल्यानंतर आपण पुढे गेल्यावर आपणास अगस्त्य ऋषी मंदिर पाहायला मिळते. या ठिकाणी अगस्त्य ऋषींचे वास्तव्य होते. असे मानले जाते.
कात्याळ खोदिव तलाव :
अगस्त्य मंदिरापासून पुढे थोड्याच अंतरावर एक छोटासा तलाव आहे. जो कात्याळामध्ये खोदलेला दिसून येतो. त्याच्या मध्यभागी समाधी आहे. ती अगस्त्य ऋषींची समाधी मानली जाते. या ठिकाणी येणारे भाविक अगस्त्य ऋषींचे दर्शन घेण्यापूर्वी या ठिकाणी स्नान करतात. व नंतर दर्शन घेतात.
या तलावाशेजारी अनेक समाध्या आपणास पाहायला मिळतात.
• तलावापासून पुढे गेल्यावर आपणास एक वास्तू लागते. तसेच आणखी दोन बांधीव तलाव पाहायला मिळतात. तसेच एक कोरडा तलाव देखील पाहायला मिळतो.
• छत नसलेला वाडा व मजार :
पुढे आपणास एक विशाल भिंती असणारी मजबूत अशी भिंत सभोवताली पाहायला मिळते. ही या ठिकाणी असणारी विशाल वास्तू आहे. या ठिकाणी पुढे गेल्यावर एक मजार पाहायला मिळते. जी मुघल व निजामशाही काळातील वाटते. तिला बडे बाबा की दर्गा म्हणून पुजले जाते.
• अंकाई बालेकिल्ला :
पुढे किल्याच्यावरील भागात गेल्यावर आपणास एक निशाण काठी पाहायला मिळते. हा किल्याचा सर्वात वरील भाग बालेकिल्ला आहे. या ठिकाणी उभे राहिल्यावर आपणास सातमाळा डोंगररांगेच्या सुंदर प्रदेशाचे दर्शन घडते. आकाश निरभ्र असेल तर धोडप पर्यंत असणारे सर्व किल्ले पाहता येतात.
• येथून आपणास गोरखगड, हाडविची शेंडी देखील पाहायला मिळते.
• या ठिकाणी असणारी निशाण काठी ही ध्वज फडकवण्यासाठी वापरत असत.
• अंकाई किल्ला पाहून पुन्हा आपण खिंडीत येतो ज्या ठिकाणी टंकाई किल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. तसे पाहता ही जोड किल्याची जोडी आहे.
• टंकाई हा किल्ला अंकाई किल्याची सुरक्षा हेरून बांधला गेला आहे. एखादा शत्रू टंकाईच्या वापर करून अंकाईवर हल्ला करू नये म्हणून हा जोड किल्ला बांधला होता.
• तटबंदी :
टंकाई किल्याची तटबंदी ही सुरेख असलेली पाहायला मिळते. वरील बाजूस जाणाऱ्या दरवाजाची मोडतोड झालेली पाहायला मिळते. अंकाई सारखीच याच्याही दरवाजांची रचना असून वरील बाजूस विस्तृत असे पठार आपण पाहु शकतो.
• तळे :
वरील बाजूस गेल्यावर पिण्यासाठी टाकीसारखे तळे आपणाला पाहायला मिळते.
• शिवमंदिर टंकाई किल्याच्या वरील बाजूस आपणास एक शिव मंदिर पाहायला मिळते.
• अंकाई व टंकाई किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती :
• या किल्याचा इतिहास पाहता हा त्रेतायुगामध्ये जातो. या ठिकाणी अगस्त्य ऋषींचे वास्तव्य होते. प्रभू रामचंद्र व अगस्त्य ऋषी यांची भेट याच ठिकाणी झाली. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना अगस्त्य ऋषींनी दिव्य अस्त्रे प्रदान केली.
• यानंतर इसवी सनाच्या सहाव्या व सातव्या शतकात येथे जैन, व हिंदु धर्मीय लेणी तयार केलेली पाहायला मिळतात. जी कठीण कात्याळ खोदून बनवली गेली.
• यानंतर या ठिकाणी सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्यांची सत्ता होती. या ठिकाणी असणाऱ्या बांधकामावरील हेमाडपंथी बांधकामावरुन त्याची कल्पना येते.
• पुढे हा प्रदेश इस्लामी राजवटीखाली आला.
• शहाजहान या मुघल बादशहाच्या काळात इसवी सन १६३५ साली मुघल सुभेदार खानखनान याने हा किल्ला निजामशहा कडून तेथील किल्लेदारास फितवून घेतला.
• औरंगाबाद व सुरत व्यापारी मार्गाचे महत्व जाणून या किल्यावरील बांधकाम मुघलांनी १६३५ साली करून घेतले.
• पुढे हा किल्ला हैद्राबाद निजाम व मराठा पेशवा बाजीराव यांच्या संघर्षानंतर पेशवाईत आला.
• इ.स.१७५२-५३ सालापासून हा किल्ला मराठेशाहीत राहिला. तसेच या परिसरातील बरेचशे किल्ले मराठा साम्राज्यात आले.
• पुढे इसवी सन १८१८ साली हा किल्ला ब्रिटिश कॅप्टन म्याकडॉवल याने मराठा किल्लेदारांकडून जिंकून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात घेतला.
• हल्ली हा किल्ला इसवी सन १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• अशी आहे अंकाची व टंकाई किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती