Showing posts with label संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला). Show all posts
Showing posts with label संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला). Show all posts

Sunday, September 29, 2024

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)

 संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


स्थान

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील चाकण या ठिकाणी हा भूईकोट किल्ला आहे.

भुईकोट किल्ला म्हणजे सपाट जमिनीवर बांधलेला गढीसारखा किल्ला होय. जो अनेक बुरुज व जाड तटबंदी असणाऱ्या भिंती बांधून बांधला जातो.

• हा किल्ला पुणे शहरापासून २० मैलावर आहे. पुण्यातून चाकण जवळच आहे.

• पुणे – भोसरी मार्गे – चाकण.

• नाशिककडून नाशिक – सिन्नर – संगमनेर मार्गे चाकण.

• मुंबई मार्गे – लोणावळा – चाकण.

• सध्या अत्यंत दयनीय स्थितीत हा किल्ला आहे.याची बरीचशी पडझड झाली असून तो दुरावस्थेत आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


तटबंदी :

या किल्याची बरीच पडझड झाली असून तटबंदीचा बराचसा भाग दुरावस्तेत आहे. तरी पण काही भाग शाबूत आहे. त्यावरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येते या किल्ल्याच्या तटबंदीचा बराचसा भाग हा भाजीवीट वापरून बांधला गेला आहे. किल्याच्या उजव्या बाजूची तटबंदी सुस्थितीत असून डावीकडील तटबंदीचा बराचसा भाग ढासळलेला आहे.

काही इमारती अवशेष :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


काही पडझड झालेले इमारतीचे अवशेष आपणास पाहायला मिळतात.

बुरुज :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


किल्याची बरीच पडझड झालेली असून काही बुरुज शिल्लक आहेत. बुरुजात जंग्या व फांज्या आहेत. ज्यातून बाहेरील शत्रूवर तोफांचा व बाणांचा मारा करता येतो. सध्या बुरुजांचा बराचसा भाग ढासळलेला दिसून येतो. किल्याच्या पश्चिम बाजूस व वायव्य दिशेला असणारे बुरुज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यातील एका बुरुजावर भगवा ध्वज दिमाखात फडफडत आहे.

खंदक :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


संग्रामदुर्ग किल्याच्या सभोवती मोठे पाण्याचे खंदक होते. पण सध्या या खंदकाचा बराचसा भाग मुजलेला आहे.

खंदक असल्यामुळे मध्ययुगात किल्यावर थेट हल्ला करणे कठीण जात असे.

मुजलेल्या विहिरीचे अवशेष :

किल्याच्या परिसरात आतील बाजूस एक विहीर होती. जी त्याकाळी पाणी पुरवठा करण्यासाठी खोदली होती. सध्या ती मुजलेली आहे. मात्र वरील बाजूस मोट चालवण्याचे साधन दिसून येते. जे उंच भिंतीतील बांधकामात दिसून येते.

नवीन तटबंदी :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


तटबंदीच्या काही भागाचे बांधकाम नव्याने केल्याचे दिसून येते. तटबंदीवरील बाजूस जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. पण गेट लावून सुरक्षेच्या कारणाने बंद केला आहे.

प्रवेशद्वार :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


किल्याच्या प्रवेशद्वारातील एक प्रवेशद्वार सुस्थितीत थोडेफार आहे. काळाच्या ओघात त्याची बरीचशी पडझड होत आली आहे. कमान सुस्थितीत असुन रोड टाकून सुरक्षेच्या दृष्टीने ते प्रवेश बंद केल्याचे दिसते.

दामोदर विष्णू मंदिर :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


किल्याच्या आतील भागात दामोदर विष्णू मंदिर पाहायला मिळते. ज्याचा बराचसा भाग अलीकडील काळात बांधल्याचे दिसून येते. आतील बाजूस विष्णू देवतेची सुरेख मूर्ती पाहायला मिळते.

तोफ कट्टा :

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


किल्याच्या मधील भागातील वास्तू नामशेष झाल्या आहेत. त्या ठिकाणी एक रिकाम्या जागेत गोल कट्टा बांधलेला असून त्यावर एक तोफ ठेवलेली दिसते.

• किल्याच्या मधून रस्ता गेल्यामुळे किल्याची एकजीवता दिसून येत नाही.

• अनेक आधुनिक वस्ती या परिसरात झाल्यामुळे किल्ला असल्याची जाणीव पुसत चाललेली दिसून येते.

संग्रामदूर्ग किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती:

• संग्रामदुर्ग किल्ला कोणी बांधला याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध नाही. पण हा किल्ला आदिलशाहीत होता. या किल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता.

• छत्रपती शिवरायांच्या शब्दाखातर आदिलशाही चाकरी सोडून स्वराज्यात फिरंगोजी नरसाळा दाखल झाला. छत्रपती शिवराय यांनी त्यास संग्रामदूर्ग किल्याचा किल्लेदार नेमले.

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


• छत्रपती शिवराय जेव्हा पन्हाळगडावर अडकलेले होते. त्यावेळी उत्तरेतून मुघल सरदार शाहिस्तेखान हा स्वराज्यावर चालून आला. त्याने पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकला. व विजयाची सुरवात एका छोट्या गढीने करावी असे त्यास वाटले. व त्याने चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यास जिंकून घेण्यासाठी लष्कर पाठवले. व २१ जून १६६० साली त्याने या संग्रामदुर्ग किल्यास वेढा दिला. त्याला वाटत होते. की हा किल्ला सहज घेता येईल. तो त्याची तुलना मातीच्या ढेकळा बरोबर करत असे. पण या गढीतील मराठ्यांनी चिवट प्रतिकार देत हा किल्ला जवळजवळ ६० दिवस शौर्याने लढवला. तोफा बंदूक व अन्य कोणत्याही संघर्षाने हा किल्ला घेता येईना. त्यामुळे बादशहा औरंगजेब नाराज झाला. व त्याने कडक शब्दात समज शाहिस्तेखानास दिली. शेवटी खंदकाखालून त्याने भुयार खोदून त्यातून सुरुंग पेरूण बत्ती दिली. मराठ्यांना ही गुप्त योजना लक्षात आली नाही. व त्याने १४ ऑगस्ट १६६० साली सुरुंग उडवला. यामध्ये पूर्वेच्या बाजूचा बुरुज उडाला. बरेचशे मराठे मारले गेले. व किल्ल्यात मुघल सैन्य घुसले. तरीदेखील मराठ्यांनी चिवट प्रतिकार दिला. शेवटी मराठ्यांनी माघार घेत किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. मराठ्यांचा पराक्रम पाहून शाहिस्तेखानाने सरदारकीचे आमिष दाखवले. पण ते झुगारून फिरंगोजी नरसाळा आपल्या मावळ्यांसह छत्रपती शिवरायांच्या चाकरीत दाखल झाला. तीनशे मावळे विरूद्ध पन्नास हजार मुघल असे लढाईचे स्वरूप होते. यामधे मराठ्यांनी कडवा प्रतिकार दिला. हा लढा इतिहास प्रसिद्ध आहे.

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


• सध्या हा किल्ला दुरावस्तेत आहे. २०१४ पासून याचे दुरुस्तीचे काम चालू आहे. काही तटबंदीचे बांधकाम केले गेले आहे.

संग्राम दुर्ग (चाकणचा किल्ला)


अशी आहे संग्रामदूर्ग किल्याची माहिती


ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...