Showing posts with label बेडसे लेणी Bedsa leni information in Marathi. Show all posts
Showing posts with label बेडसे लेणी Bedsa leni information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

बेडसे लेणी Bedsa leni information in Marathi

 बेडसे लेणी

Bedsa leni information in Marathi

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


स्थान :

 महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आपणांस बेडसा लेणी पहायला मिळतात.

उंची

सदर लेण्यांची उंची ही समुद्र सपाटी पासून २२५० फूट उंचीवर या लेण्या आहेत. तर डोंगर पायथ्या पासून ३०० फूट उंचीवर बेडसे लेणी आहेत.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi
बेडसे लेणी


लेणी पहायला जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग:

• सदर लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय शहर आहे. तसेच मुंबई देखील आंतरराष्ट्रीय शहर आहे.

• पुणे येथून रस्ते तसेच रेल्वेने कामशेत या ठिकाणीं आल्यावर पवना धरणाकडे जाणाऱ्या वाटेवर बेडसे गाव आहे या गावाच्या मागील बाजूस आपणास बेडसे लेणी डोंगरात पाहायला मिळतात.

• मुंबई कडून येताना लोणावळा – खुदगाव मार्गे दुधारी खिंड तेथून पवना मार्गे आपण बेडसे गावी येवू शकतो.

• पुणे ते बेडसे अंतर ५० किलो मीटर तर मुंबई ते बेडसे अंतर १०८ किलोमीटर आहे.

• बेडसे लेणी या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे:

• बेडसे गावी आल्यावर आपण गावा पाठीमागील डोंगराच्या खालील पायरी मार्गाजवळ वाहनाने जाऊ शकतो.

बांधीव पायरी मार्ग:


पायरी वाटे जवळ आल्यावर आपणास बांधीव दगडी पायऱ्या असणारा मार्ग लागतो. ऐकूण जवळजवळ ४०० पायऱ्या असाव्यात. या मार्गाने आपण चढून लेण्यांकडे जाताना वाटेत जागोजागी पाण्याचे झरे असलेले पाहायला मिळतात. हे पावसाळ्यात मनसोक्त वाहतात. तर उन्हाळ्यात रोडावलेले किंवा आटलेले पाहायला मिळतात.

• ही लेणी जुन्या व्यापारी मार्गावर कोरली गेली आहेत. जवळ जवळ २२०० ते २३०० वर्ष जुनी अशी ही लेणी आहेत.

• या मार्गानें चढून आपण लेण्यांजवळ येवून पोहोचतो. या लेण्यांना मारकूडची गुहा पण म्हंटले जाते.

गुहा नंबर १ : 

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


 या ठिकाणीं आपणास एक अपूर्ण अवस्थेत असलेला स्तूप व चैत्य गृह पाहायला मिळते. जे खोदले गेले. पण त्याची सजावट व पूर्णता होऊ शकली नाही.

दुसरी गुहा : 

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


या ठिकाणीं आपणास भूमी अंतर्गत एक पाण्याची टाकी बनवलेली पाहायला मिळते. जी तत्कालीन पाण्याच्या साठवणीच्या नियोजन विषयी सांगते.

तिसरी गुहा :

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


 या ठिकाणी आपणास चैत्य व स्तूप बनवण्याचा प्रयत्न केलेला पहायला मिळतो. या ठिकाणीं ब्राम्ही लिपीत कोरलेली अक्षरे म्हणजेच शिलालेख पाहायला मिळतो. स्तूप अपूर्ण आहे. वेदिका पट्टी त्यावर कोरलेली आहे. शीर्ष भाग अपूर्ण अवस्थेत असलेला हा स्तूप आहे.

लेणी क्रमांक ४व ५:

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


या ठिकाणी आपणास पाण्यासाठी खोदलेले टाके पहायला मिळते. दहा ते पंधरा फूट खोल व तसेच विस्तृत असे हे हौद आहेत. पाचव्या लेण्यात आपणांस शिलालेख पाहायला मिळतो.

चैत्यगृह व स्तूप:

एक विस्तृत असे पुर्ण चैत्यगृह आहे. याच्या प्रवेश स्थानी आपणांस चार स्तंभ पहायला मिळतात. यातील दोन पुर्ण गोलाकार असून बाकीचे दोन भिंतीत कोरलेले आहेत. हे अष्टकोनी असून तळाच्या बाजूस वक्राकार गादी मध्यभागीं अष्टकोनी स्तंभ त्यावरील बाजूस उलटे अधोमुखी अवस्थेत कमळ पुष्प कोरलेले आहे. त्यावर हर्मिका चौथरा असून त्यावर प्राणी शिप्ले आहेत. यामध्ये अश्व, गज, बैल हे प्राणी विशेषत असून त्यावर नर व नारी स्वार आहेत. त्यांनी केलेला पेहराव तत्कालीन लोकांच्या राहणीमाना विषय माहिती देतो.

 या स्तंभाची रचना मौर्य कालीन असून यावर इराणी म्हणजेच पर्शियन शिल्प शैली दिसून येते. स्तंभावरील हत्ती म्हणजे गजाच्या मुखातील सुळे हे खरोखरच होते. पण आता ते काही समाजकंटकांनी चोरून नेल्याचे अढळते. त्या हत्तींच्या मुखांवर ती दंत छिद्रे पाहायला मिळतात.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi



बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


बाह्य भिंत व चैत्य

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


स्तंभ पाहून जरा पुढे गेल्यावर पिंपळ पानाच्या आकृतीत कोरलेली अर्धवर्तुळाकार चैत्य दिसून येतो. त्याची रचना पहाता आतील बाजूस वातायान व्हावे तसेच सूर्य किरणे पोहोचण्यासाठी ती खुली जागा सोडलेली दिसून येते. त्या वर सुरेख नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. तसेच बाहेरील बाजूस ध्यान कक्ष पहायला मिळतात. त्यांच्या दारावर सुरेख पिंपळ पानांची वरील बाजुस नक्षी असून त्याखाली वेदिका पट्टी दिसून येते. आतील बाजूस ध्यानस्थ बसण्यासाठी आसन खोदले आहे.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


स्तूप:

 चैत्यातून प्रवेश केल्यावर आपणांस आतील बाजूस स्तूप पाहायला मिळतो. याच्या दोन्ही बाजूस स्तंभ असून त्यावर पुष्प, धम्म चक्र कोरलेली आहेत. असे हे ऐकून २६ स्तंभ पहायला मिळतात. या स्तंभा मागील बाजूने एक छोटा रस्ता आहे. जो एक परिक्रमा मार्ग आहे. या मार्गानें दोन्ही बाजूस असलेल्या दरवाजानी ही परिक्रमा पुर्ण करता येते. मध्यभागीं असलेला स्तूप खालील बाजूस ज्योते त्यावर थोडे अंतर सोडून वेदिकापट्ट त्यानंतर घुमुट त्यावर मान त्यावर हार्मिकापट त्यावर कमळ देठ पाहायला मिळतो. अत्यंत पूर्णाकृती असणारा हा स्तूप आहे. याच्या वरील लाकडी तुळया चोरुन तसेच वरील साहित्य चोरीस गेले आहे. वरील बाजूस गज पाठी पाहायला मिळतें. या ठिकाणीं बुध्द धर्माचे अरिहंत बुध्द भिक्षू यांच्या अस्ती ठेवल्या जात. ज्याने येथील वातावरणात चित्त शांती, तरलता, शक्ती यांचा संचार होत असे. बुध्द धर्म त्रिरत्ने , सूक्ते, तसेच त्रिपिटक यांचे वाचन होत असे. तसेच बुध्द तत्त्वज्ञानाचे तार्किक विवेचन देखील भीखूंना दिले जात असे. तसेच येथे ध्वनी संपूर्ण परिसरात पसरेल अशी या चैत्याची व स्तूपाची रचना केली आहे.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


लेणी क्रमांक ६ :

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


या ठिकाणीं पाण्याचा हौद बांधला गेला आहे.

लेणी क्रमांक ७ :

सहाव्या लेण्यास लागून अपूर्ण लेणी क्रमांक सात पाहायला मिळतातं. या ठिकाणी बसण्यासाठी ओटे तयार केले आहेत. काही अपूर्ण दालने सुद्धा आहेत. त्यास लागून पाण्याची भूमी अंतर्गत टाकी आहे.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


लेणी क्रमांक ८

 ही अपूर्ण असून तो एक अपूर्ण ध्यान कक्ष आहे.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


विहार :

पुढील लेणे हे एक विहार आहे. गजपृष्ट पाठीचा आकार असणारा हा एक विहार आहे. बाहेरील बाजूस पाण्याची टाकी असून नंतर बैठक आहे. त्यानंतर विस्तीर्ण आवार असून आतील बाजूस अनेक छोट्या छोट्या खोल्या खोदलेल्या आहेत. या एकूण ११ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीवर पिंपळ पर्णाकृती नक्षी व वेदिका पट्टी दिसून येते. आतील बाजूस ध्यान बैठक, विश्रांती स्थान व त्याखाली साहित्य ठेवण्यासाठी जागा आहे.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


• त्यानंतर वरील बाजूस जाण्यासाठी एक खडकात पायरी मार्ग खोदलेला दिसतो. त्या शेजारी एक ध्यान कक्ष असून त्या शेजारी पाण्याची टाकी खोदलेली आहे. यामध्ये वरील बाजूतून पाणी वाहत या टाकीत उतरते. ते वर्षभर पुरते.

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


बेडसे लेण्याविषयी ऐतिहासिक माहिती:

बेडसे लेणी  Bedsa leni information in Marathi


• बेडसे लेणी पाहताना काही शिलालेख आढळतात

• एक शिलालेख ‘ नसिकातो अनदस सेठीस पुतस पुसण कस दान’

अर्थ : नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्यांचे दान दिले

• सदर लेणी ही इसवी सन पूर्व दुसऱ्या ते पहिल्या शतकात खोदली गेली आहेत.

• ही बुध्द लेणी आहेत.

• हा परिसर सह्याद्री मावळ प्रांतात येतं असल्याने हा परीसर परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहिला आहे.

• संपूर्ण भारत देशात परिपूर्ण अवस्थेतील चैत्य व स्तुप या ठिकाणीं पाहायला मिळतो.

• २६ मे १९०९ साली भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

• स्वातंत्र्य पूर्व काळात या ठिकाणी ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताचे गव्हर्नर हेन्री कर्झन यांनी भेट दिली होती. त्यावेळी स्वच्छता करण्यासाठी येथील लोकांनी भिंती चित्रे खरडून घालवली. हे हेन्रीना कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले.

• सध्या १५ ऑगस्ट १९४७ नंतर हे ठिकाणं स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.

अशी आहेत बेडसे लेणी

Bedsa leni information in Marathi


ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...