तिकोना किल्ला माहिती
Tikona Fort information in Marathi
• स्थान : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सह्याद्री पर्वतात तिकोना किल्ला आहे.
• उंची : या किल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची ही सरासरी ३४८०फूट आहे.
• तिकोना किल्ला पाहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग:
• पुणे शहरापासून कोथरूड मार्गे पुढे पुरंगुट – पौंड – हाडशी मार्गे आपण तिकोना पेठेत गेल्यावर तेथून आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकतो. तेथून पुढे आपण तिकोना किल्यावर जाऊ शकतो.
• पुणे येथून तिकोना ५०किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई कडून येताना आपण खोपोली – लोणावळा मार्गे पाले पवन मावळ मार्गे – फागणे व तेथून तिकोना पेठ व पुढे आपण गडावर जाऊ शकतो.
• मुंबई पासून तिकोना किल्ला १०० किलोमीटर अंतरावर आहे.
• तिकोना किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
तिकोना या पायथ्याच्या पेठेतून जाताना आपणास शिवकालाची आठवण येते. येथून पुढे गडवाटेला आपणं लागतो. काही अंतर गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहन तळावर पोहोचतो. तिथे पार्किंग करून आपण पायी गडवाटेला लागतो.
गडाकडे जाताना हिरव्यागार वनराई तसेच भाताच्या खाच राचे मोहक दर्शन घडते. पुढे चढत लागते. या वाटेने चालताना ज्यांना गिर्यारोहण करण्याची सवय नाही त्यांना गड चढताना त्रास होतो. पण सवय असेल तर एक वेगळीच मौज वाटते.
• गडवाटेने चालताना जागोजागी आपल्याला काही अंतरावर दगडी पायऱ्या पाहायला मिळतात. या वाटेने जसजसे वरती चढून जाऊ तसतसे मावळ प्रांतातील किल्ले, धरणे तसेच सह्य पर्वताचे नयनरम्य दर्शन घडू लागते.
• चौकी : गडाच्या वरील भागात आल्यावर आपणास एक ठिकाण लागते, त्या ठिकाणी पहिली एक चौकशी करण्यासाठी चौकी होती. जी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. तिथेच मागील बाजूस उंच चढेल दगडी मार्ग लागतो. या वाटेने आपण जसजसे वरती जाऊ तस तसे अरुंद वाटेने आपण गडाच्या प्रथम दरवाजा जवळ येवून पोहोचतो.
• प्रथम प्रवेश द्वार:
जसे आपण गडाच्या प्रथम दरवाजाजवळ येतो. तसे शिवकालाची आठवण होते. उंच खडकात उभा असलेला हा दरवाजा यास हल्ली गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी बसवला आहे. शिवकालीन दरवाजा पाहून मन प्रसन्न होते. या दरवाजातून आपण जसे आत जातो. तसे आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्या पाहायला मिळतात. जवळूनच एक चढेल मार्ग आपणास गडाच्या वरील भागात घेवून जातो.
या वाटेवरील पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या दिसतात.
• दुसरे भग्न द्वार :
पुढे गडाच्या वरील भागात आल्यावर आपणास दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा दोन बुरुजांच्या मध्ये आहे. दरवाजाची वरील कमान ढासळलेली आहे. मात्र उभ्या चौकटीचे अवशेष दिसून येतात. चौकटी खाली असणाऱ्या छिद्रातून गडाच्या वरील भागातून येणारे पावसाचे पानी नीचरुन जाण्यासाठीच ते तयार केले असावे.
• बांधकामाचे अवशेष : या दरवाजातून आत गेल्यावर आपणास काही बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात.
• हनुमंत शिल्प मूर्ती :
पुढे गडाच्या भागात आपणास एका पाषाणात हनुमान देवतेची मूर्ती पाहायला मिळते ती शेंदरी रंगात रंगवलेली असून हनुमंताच्या पायात राक्षसी आहे. जीचे तो मर्दन करत आहे. असे हे शिल्प पाहून आपल्याला वाईट गोष्टी नष्ट करण्याची प्रेरणा मिळते.
• वाड्याचे अवशेष:
हनुमंत मुर्ती पासून आपण पुढे चालत गेल्यावर आपणास काही बांधकामाचे अवशेष दिसतात. ते या जागी असलेल्या प्राचीन वाड्याचे अवशेष आहेत. जो सरदार व अन्य राज्यव्यवहार सांभाळणाऱ्या लोकांसाठी बांधलेला होता.
• पाणी टाके:
गडावर आपणास बांधलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते. ज्यातून काढलेले दगड तटबंदी आणि बुरुज बांधण्यासाठी वापरले गेले असावेत. व् सखल भागात अशी पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात. हे टाके गडावरील पाण्याची गरज भागवण्यााठी काम करत असे.
• पायरी मार्ग :
पुढे आपणास पायरी मार्ग लागतो ज्या मार्गाने आपण किल्याच्या वरील भागाकडे म्हणजेच बालेकिल्ल्याकडे जाऊ शकतो.
• चुना घाणी:
गडावर बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असे. हा चुना त्यामधे तो घोटीव व घट्ट होण्यासाठी वाळू, चूना मेथीच्या बिया तसेच हिर्डीच्या पानांचा रस व गुळाचे पाणी वापरले जात असे. व हे मिश्रण घाणीत घालून कालवून त्याचा वापर बांधकामासाठी केला जात असे. त्याकाळातील चूना घाणी याठिकाणी आपणास व चूना मळण्याचा दगड देखील पाहायला मिळतो.
• तळजाई मंदिर व पाण्याची टाकी :
गडाच्या वरील बाजूस आपणास तळजाई मंदिर पाहायला मिळतें. जे खोदीव गुहेत आहे. ही गड देवता असून हे मंदिर कड्यामध्ये गुहा खोल्या खोदून तयार केलेले आहे. आतील गाभाऱ्यात आपणास देवीची तांदळा मुर्ती पाहायला मिळते. व बाहेरील बाजूस समोर पाण्याची टाकी देखील पाहायला मिळते. ज्यातील पाणी हे देवपूजा करण्यासाठी वापरले जात असे.
• बालेकिल्ला दरवाजा :
घाणी पासून पुढे गेल्यावर आपणास पायरी मार्ग लागतो.पायरी मार्गानें आपण जेव्हा बालेकिल्ल्याच्या दरवाजावर येतो. तेव्हा आपणास कमी रुंदी असलेला दरवाजा पाहायला मिळतो. हे बालेकिल्ल्याचे द्वार आहे. यामधून आत गेल्यावर वरील बाजूस जाण्यासाठी पायरी मार्ग लागतो.
• अरुंद पायऱ्या व पाण्याची टाकी :
बालेकिल्ल्याच्या दरवाजाने आत गेल्यावर गडाच्या वरील भागात जाण्यासाठी अरुंद पायरी मार्ग आहे. त्या शेजारून जाताना आपणास पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळते.
बालेकिल्ल्याचा पायरी मार्ग चढून जाताना अत्यंत खडा चढ लागतो. तो चढताना खूप दमछाक होते.
• गुहा खोल्या व पाण्याच्या टाक्या:
गड हा उंच असल्याने वरील भागात राहणाऱ्या लोकांच्या राहण्यासाठी खोदून तयार केलेल्या गुहा पाहायला मिळतात. तसेच काही पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात.
• बुरूज : बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून जेव्हा आपण वरील भागात येतो त्यावेळी बालेकिल्ल्याच्या दरवाजास लागूनच बुरूज बांधलेला पाहायला मिळतो. आजही सुस्थितीत ऐतिहासिक आठवणी जागवत उभे असलेले हे बुरूज दिसतात. यामध्ये आपणास जंग्या ज्या बाण मारण्यासाठी अथवा बंदुकीने निशाणा साधण्यासाठी ठेवलेल्या दिसून येतात.तसेच तोफांसाठी फांज्या देखील आढळतात.
• चौथा दरवाजा :
बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आपण जेव्हा वरील भागात येतो. त्यावेळी आपणास चौथा दरवाजा लागतो. काळाच्या ओघात थोडी पडझड झाली आहे. चौकटीचे स्तंभ थोडेसे पडले असेल तरी कमान आजूनही शाबूत आहे.
• झेंडा बुरूज :
• किल्याच्या वरील बाजूस आपणास एका बाजूला बुरुज व त्यावर फडकणार भगवा ध्वज पाहायला मिळतो. हा झेंडा बुरूज आहे.
• पाण्याचे विस्तीर्ण टाके :
बालेकिल्ल्यावर आपणास विस्तीर्ण असे पाण्याचे बांधीव टाके पाहायला मिळते. जे त्याकाळी गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधले होते.
वितंडेश्वर मंदिर :
ज्या देवाच्या नावाने या किल्यास वितंडेश्वर नाव पडले. त्या देवाचे मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शिवपिंडी असून समोर नंदी देखील पाहायला मिळतो.
शिव मंदिरातील महादेव पिंड व त्यासमोर असणारा नंदी शिवकाळातील आठवण करून देतो. मंदिराच्या पुढील बाजुस पाण्याचे खांब टाके पाहायला मिळतें. मंदिर साध्या स्वरूपाचे आहे.
• इमारत बांधकाम अवशेष :
बालेकिल्ल्यावर आपणास इमारत बांधकाम अवशेष देखील पाहायला मिळतात.
• या किल्ल्यावरून मोरगिरी, तुंग, राजगड, लोहगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड , विसापूर या किल्ल्याचे तसेच बारा मावळ प्रांत व पवना नदीच्या खोऱ्याचे दर्शन घडते.
• तिकोना किल्याची ऐतिहासिक माहिती :
• तिकोना किल्यावर आढळणाऱ्या अनेक प्राचीन गुहा व खोल्या पाहता यांची निर्मिती सातवाहन काळात झाली असल्याचे जाणवते.
• पुढे शक, चालुक्य,शिलाहार, यादव, या राजवटी या किल्याच्या परिसरात राज्य करीत होत्या.
• पुढे मुस्लिम आक्रमण आल्यावर येथे सुलतानशाही व नंतर बहामनी शासनाच्या ताब्यात हा परिसर होता.
• इसवी सन १५८५ साली हा किल्ला निजामशाहीत दाखल झाला, याचे नाव अमनगड ठेवलें होते.
• इसवी सन १६५७ साली हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. या किल्ल्याचे नाव वितंडगड ठेवण्यात आले. मावळ प्रांतातील हा किल्ला बारा मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त होता.
• इसवी सन १६६० मध्ये नेतोजी पालकर या किल्याचे किल्लेदार होते.
• इसवी सन १६६५ साली हा किल्ला पुरंदर तहात मोघलांना देण्यात आला.
• पुढे हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घेण्यात आला.
• आज हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• अशी आहे तिकोना किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती.
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l