Sunday, September 29, 2024

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi

 वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi



स्था:

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात वसई गावाजवळ एक समुद्रास लागून एक किल्ला आहे. त्यास वसईचा किल्ला म्हणतात.

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्याचे नाव : सेंट सेबेस्टियन किल्ला वसई

किल्ल्याकडे जाण्याचे मार्ग :

• वसईचा किल्ला एक अरबी सागरी किनाऱ्यावर असणारा भुईकोट किल्ला आहे. जो उल्हास नदीच्या खाडीच्या भागात भारत देशात महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी सागरी मार्गाने आपण सहज जाऊ शकतो. मुंबई , सुरत व अन्य भारतीय बंदरा द्वारे आपण या किल्यावर सागरी मार्गाने जाऊ शकतो.

भू मार्ग :

• मुंबई पासून ठाणे तेथून ससूनघर – सातीवली – विरार वसईतून – वसई किल्यावर जाऊ शकतो. अंतर ५० किलोमीटर अंदाजे.

• सुरत – वापी – पालघर मार्गे आपण वसईला जाऊ शकतो.

• मुंबई , ठाणे, सुरत ही मोठी शहरे रेल्वे, भू व हवाई मार्गे इतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडली गेली आहेत.

• नाला सोपारा हे ठिकाण वसईपासून जवळ आहे.

वसई किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

• वसई या गावातून आपण किल्ल्याकडे जाताना हा भाग तिन बाजूंनी पाणी व दलदलीने वेढलेला व एका बाजूने वसई गावाला रस्त्याने जोडलेला दिसून येतो.

प्रवेशद्वार :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


वसई गावातून आपण जेव्हा किल्ल्याकडे जाऊ लागतो. तेंव्हा आपल्याला एक प्रथम प्रवेशद्वार लागते. ते बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार असून त्यास सेंट सेबेस्टियन असे नाव आहे. काळाच्या ओघात बरीचशी पडझड झालेली असली तरी कमानाकृती चौकट अजूनही शाबूत आहे. दरवाजावर बाजूस ख्रिस्ती धर्माचे प्रतीक होली क्रॉस काढलेला दिसून येतो. बाजूचे स्तंभ पोर्तुगीज पाश्चात्य बांधकाम पद्धतीची शैली दर्शवतात. या दरवाजाच्या वरील बाजूस सेंट सेबेस्टियनचा पुतळा होता. तो काळाच्या ओघात नष्ट झाल्याचे दिसून येते.

दरवाजाच्या आतील बाजूस अडन्याची अडसर लावायची जागा तसेच पहारेकरी यांना विश्रांती घेण्यासाठी देवड्या बांधलेल्या दिसून येतात.

दुसरे प्रवेश द्वार :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


प्रथम द्वार पाहून पुढे गेल्यावर अर्ध वळण घेतले की लगेच दुसरा दरवाजा लागतो. किल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही रचना केलेली आढळते. या दरवाजावरील बाजूस काही जंग्या आहेत. जेथून किल्यावर आक्रमण झाल्यास शत्रूवर बंदुकीची फायरींग , पेटते आगीचे गोळे तसेच कडते तेल टाकता येवू शकेल अशी रचना दिसून येते.

बालेकिल्ल्याच्या मागील बुरुज :

दुसऱ्या प्रवेशद्वारने आतील बाजूस गेल्यावर आपल्याला एक बुरुज दिसतो. त्यावर पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे. त्यावर हा किल्ला पोर्तुगिज गव्हर्नरच्या सांगण्यावरून गार्जिया डिश याने हा किल्ला बांधला आहे. हल्ली या बुरुजावर मोठ्या प्रमाणात गवत , झाडे , झुडपे उगवलेली दिसतात.

चर्च :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्ल्यावर पोर्तुगीज कालीन अनेक चर्च पहायला मिळतात, यातील काही चर्चची पडझड झालेली दिसते. चर्चच्या पुढील बाजूस अर्धवर्तुळाकार कमानी दरवाजा असून त्यानंतर प्रार्थना ठिकाण नंतर आतील बाजूस होली क्रॉस व पाद्री यांची उपदेश करण्याची जागा आहे. त्या ठिकाणी अर्धवर्तुळाकार सुंदर कमाणाकृती रचना दिसून येते.त्यावर छत आहे .चर्चची उंची पहाता ही इमारत तिन ते चार मजली असल्याचे जाणवते. वरील बाजूस गवाक्षे आहेत. प्रकाश आत येण्यासाठी अशी रचना दिसून येते. या गवाक्षात रंगी बेरंगी काचा बसवल्या होत्या. त्यातून प्रकाशाचे संक्रमण होऊन चर्चच्या आतील भागात उजेडाच्या प्रवेशाची रचना केल्याचे जाणवते.

घंटा मनोरा :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


प्रत्येक चर्चच्या शेजारी तिन मजली मनोरे आढळतात. हे तीन मजली ते चार मजली असत. या ठिकाणी मोठी घंटा बांधली जात असे. काळाच्या बदलत्या ओघात अनेक चर्च इथे बांधले गेले. त्या प्रत्येक चर्च शेजारी घंटा मनोरे आहेत. यातील विशाल घंटा आता इथे नाहीत. पण आज ही या मनोऱ्यात उभा राहून ध्वनी निर्माण केल्यास प्रतिध्वनी ऐकू येतात.

वर्तुळाकार जिने : 

चर्चची इमारत दोन किंवा तीन मजली असे. वरील भागात जाण्यासाठी चक्राकार जिने बांधल्याचे आपणास दिसतात. आजही ते इतिहासाची साक्ष देतात.

विस्तीर्ण मैदान :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


बालेकिल्ल्याच्या आतील बाजूस एक विस्तीर्ण मैदान आपल्याला दिसतें. या ठिकाणी सैनिकांची कसरत होई. कवायत होई. दोन ते अडीच हजार सैन्य इथे असत. तसेच घोडीदेखील बांधली जात असत.

रुग्णालय:


वसई किल्यात चर्च शेजारी एक उंच भिंती असणारे बांधकाम पाहायला मिळते. हे तत्कालीन रुग्णालय होते. पोर्तुगीज काळात येथे जखमी सैन्य, रोगी, तसेच इतर कर्मचारी यांवर औषधोपचार केला जात असे. या इमारतीत अनेक खिडक्या व दालने आहेत. व उंचीवरून ही इमारत दोन ते तिन मजली असल्याचे जाणवते.

सैनिक बराकी :

बालेकिल्ल्यात लागूनच सैनिकांना राहण्यासाठी बराकी होत्या. जिथे सैनिक विश्रांती घेत असत.

चौकोनी विहीर :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


पोर्तुगीज कालीन एक चौकोनी बांधकाम असलेली विहीर इथे आहे. जी तत्कालीन पाण्याची गरज भागवत होती. सध्या मात्र त्यावर झुडपे उगवलेली आढळून येतात , व पाणी पिण्यास अयोग्य आहे.

गोल विहीर :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


 मैदानावर मधे एक गोल विहीर आढळते. पण ती कोणत्या काळातील असावी हे समजत नाही.

कारखाना चिमणी धुराडे :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्यावर आपणास एक चिमणी पाहायला मिळते. या ठिकाणी गूळ किंवा साखर कारखाना असल्याचे समजते. मराठ्याकडून जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यावेळी कर्नल लिटलवूड हा ब्रिटिश अधिकारी येथे राहत होता. त्याने या किल्ल्याशेजारील व आतील दलदलीत ऊसाची लागवड करून घेतली. व गूळ व साखर निर्माण करण्याचा घाना वा कारखाना त्याने बांधल्याचे दिसते. कारखाना बांधणीसाठी त्याने या किल्याच्या तटबंदी व इतर भागातील दगड देखील विकले होते. असे स्थानिक लोक सांगतात.

तटबंदी व जिना :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्याच्या काही भागातील तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तटबंदीच्या काही भागाचे बांधकाम केल्याचे दिसून येते. तिची जाडी पहाता एक चारचाकी छोटी गाडी सहज जाईल इतकी जाड आहे. जागोजागी अनेक बुरुज पाहायला मिळतात. असे एकूण या किल्ल्यास दहा बुरुज असल्याचे दिसतें. कावलिरो बुरुज, सेंट सेबेस्टियन, सेंट गोसेलो, एलिफंटा, रैस मागो, सेंट पॉल, माद्रद दीय, नोस्सा सिनेरा दोरेमेदिया, सेंट पेद्रू, दहावा सेंट सेबेस्टीयन अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येक बुरुजावर जंग्या व फांज्या बांधल्या होत्या.

पोर्तुगीज कालीन तुरुंग :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


आपणास वसई किल्ल्यावर पाहणी करताना एक टाऊनहॉल शेजारी बांधकाम पाहायला मिळते. सध्या उंच भिंती व त्यातील दरवाजे शिल्लक आहेत. छप्पर नसलेली ही जागा पोर्तुगिज काळात कैदी ठेवण्यासाठी बांधलेला तुरुंग होती. पुढे ब्रिटिश काळात या ठिकाणचे स्वरूप बदलले गेले. ते येथील भिंतीतील खिडक्या व दारे यांच्या बदललेल्या रचनेवरून समजते. पोर्तुगीज काळात या ठिकाणी गुन्हेगार, युद्धकैदी ठेवले जात. या इमारतीच्या बाहेरील बाजूस एक आपल्याला शिलालेख पोर्तुगीज भाषेत पाहायला मिळतो. त्यावर इस १६४० साली बांधकाम केल्याचा उल्लेख आहे.

पोर्तुगीज कालीन टाऊन हॉल :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


वसई किल्यावर असणाऱ्या पोर्तुगीज कालीन वास्तूच्या अवशेषांमध्ये टाऊन हॉल ही इमारत रोमन शैलीत बांधलेली दिसते. या ठिकाणी सत्कार, निरोप, स्वागत समारंभ या सारखे कार्यक्रम होत असत. ही एक शासकीय मुख्यालय असणारी इमारत आहे. जेथून कागदी दस्तऐवज व पत्रव्यवहार चालत असे.

येथील भिंतीवर पाश्चात्य शैलीकृत नक्षी व ख्रिश्चन प्रतिके देखिल कोरलेली

 पाहायला मिळतात.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम :

तुरुंग परिसरात असणारी एक इमारत ही म्युझितम होती. तिचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे.

ख्रिचन चर्च मठ:

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


ख्रिचन धर्माचा उपदेश सांगणारे पाद्री किंवा बिशप यांना राहण्यासाठी तसेच धर्म अध्ययन करने, ख्रिस्त धर्माचे विचार प्रसार करने यासाठी या ठिकाणी एक मठ स्थापन केला होता. या ठिकाणी बाप्तिस्मा मंदिर आहे. ज्याची इमारत आजही सुस्थितीत असलेली पाहायला मिळते.या ठिकाणी धर्मांतरे करून अन्य धर्मियांना ख्रिस्ती धर्मात घेतले जात असे.या ठिकाणी घंटाघर व एक विशाल चर्च देखिल आहे.त्याचे नाव संत जोसेफ ख्रिस्त मंदिर आहे.

बाजारपेठ :

 वसई किल्याच्या परिसरात आतील बाजूस एक मोठी बाजारपेठ पोर्तुगीज काळात होती. जेथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार चाले. मुख्यत बांबू, काळीमिरी, मसाले पदार्थ, साखर, कही वेळा गुलामांचा बाजार देखील भरवला जात असे.

वज्रेश्वरी देवीचे मंदिर:

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्ल्यामधे आपणास काही मंदिरे पाहायला मिळतात. ज्यावेळी चिमाजी आप्पा हे मराठा पेशवे कालीन सरदार हा किल्ला जिंकण्यास आले. त्यावेळी त्यांनी वज्रेश्वरी देवीस नवस बोलला होता. किल्ला जिंकल्यावर मंदिर बांधेन. किल्ला जिंकल्यावर त्यांनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले.

नागेश्वर मंदिर:

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्याच्या परिसरात आणखी एक मंदिर आहे. जे शिवमंदिर आहे.

हनुमान / मारुती मंदीर :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


मराठ्यांनी ज्यावेळी हा किल्ला घेतला त्यावेळी इथे एक वीरश्रीचे व बलोपासनेचे प्रतीक असणारे मारुती मंदीर बांधलेले पाहायला मिळते.

संत गोन्सालवियास ख्रिस्त मंदिर:

वसई किल्यावर अजुनही चांगल्या स्थितीत असणारे ख्रिस्त मंदिर (चर्च) म्हणजे संत गोन्सालवियास चर्च होय. आजच्या काळातही या ठिकाणी ख्रिस्ती धर्मीय पवित्र उत्सव साजरे केले जातात.

दर्या दरवाजा :

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi


किल्ल्याचा शेवटी सागरी खाडी लागत सलग बुलंद दोन दरवाजे आहेत, या ठिकाणावरून सागराकडे जाता येते. हे दोन्ही दरवाजे भक्कम स्थितीत आजही आपल्या वेभवाची साक्ष देत आहेत. यातील दर्या दरवाजाची दारे आजही चांगल्या स्थितीत आहेत. व त्यांवर लोखंडी पत्रा व खिळे मारलेले दिसून येतात. याची जाडी पाहिल्यावर त्याच्या तत्कालिन वैभवाचा अंदाज बांधता येतो.

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi
दर्या दरवाजा दार 


बाओबाब वृक्ष:

दर्या दरवाजाच्या बाहेरील बाजूस एक विशाल पोर्तुगीज राजवटीच्या काळातील वृक्ष पाहायला मिळतो. तो विशाल वृक्ष बाओबाबचा आहे.

• किल्ल्याकडे झालेल्या दुर्लक्ष्यतेमुळे आज या ठिकाणी अनेक वनस्पती काळाच्या ओघात वाढलेल्या पाहायला मिळतात.

वसई किल्याची ऐतिहासिकदृष्ट्या माहिती :

• इसवी सनाच्या १३ व्या शतकापर्यंत येथे मौर्य शासकांचे नियंत्रण होत. 

भंडारी वेंगाळे या सरदाराने  इ.स. १४१४ साली या ठिकाणचे आंतरराष्ट्रीय महत्त्व जाणून या ठिकाणी एक गढी वजा भुईकोट किल्ला बांधला गेला.

• इसवी सन १४२०  ते इसवी सन १५३० यादरम्यान गुजरात येथील मुस्लिम शासक बहादूरशहा याचे नियंत्रण होत.

• इसवी सन १५३३ साली सेंट सेबेस्टियन याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

• इसवी सनाच्या १५३४ नंतर या ठिकाणी पोर्तुगीज शासकांनी अनेक चर्च, टाऊन हॉल, सैन्य निवास स्थान व इतर बरीच निवास स्थाने व किल्याच्या तटबंदीची बांधकामे या ठिकाणी केली गेली.

• इ. स. १५३६ साली ग्यारीसन चर्च बांधला गेला.

• इ. स. १५४० साली रुग्णालय बांधले गेले.

• इ.स.१६०६ साली कोर्ट ऑफ आम्सची इमारत बांधली गेली.

वसईचा किल्ला Vasai Fort Information in Marathi



• इ. स. १७३९ साली पेशवाई काळात मराठा सरदार चिमाजी अप्पा यांनी मराठ्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम काढली. व वसईच्या किल्यावर हल्ला केला. यामधे अनेक मराठा वीर धारातीर्थी पडले. शेवटी त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला.

• पेशवाईत असताना या किल्यावर अनेक हिंदू मंदिरे बांधली गेली.

• इ. स.१७७४ साली हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला.

• इ. स.१७७४ साली सालबाईच्या तहाने पुन्हा मराठ्यांकडे दिला गेला.


• इ. स. १८१८ साली मराठा साम्राज्य लयास गेले. व हा किल्ला ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली आला.

• इ. स. १८६० साली ब्रिटिश अधिकारी लिटलवुड यास ब्रिटिश सरकारने भाड्याने दिला. त्याने या ठिकाणी साखर कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला.

• इ. स. २६ में १९०९ साली तत्कालीन भारत सरकारने हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.

• १५ ऑगस्ट १९४७ नंतर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला.

• अशी आहे वसई किल्याची ऐतिहासिक माहिती.

Vasai Fort Information in Marathi

maharashtrakillevsthaledarshn.blogspot.com

No comments:

Post a Comment

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...