Sunday, September 29, 2024

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती Vajrgad Fort Information in Marathi

 वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती

Vajrgad Fort Information in Marathi

maharashtrakillevsthaledarshn.blogspot.com

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


स्थान

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत पुरंदर तालुक्यात सासवड जवळ वज्रगड आहे. हा पुरंदर किल्ल्याचा जोडकिल्ला आहे.

उंची :

 या किल्ल्याची सरासरी उंची ही १५०० मीटर आहे.

वज्रगड किल्यावर जाण्यासाठी मार्ग :

• पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर असून ते रस्ते, लोहमार्ग व विमानसेवेद्वारे इतर ठिकाणांना जोडलेले शहर आहे. येथून नारायणपूर मार्गे वज्रगड जवळच आहे.

• वज्रगड हा पुरंदर किल्याचा जोडकिल्ला आहे. पुरंदर या किल्ल्यावरून वज्रगड किल्यावर जाता येते. मात्र सध्या पुरंदर हा किल्ला भारतीय लष्करी प्रशिक्षण केंद्र येथे असल्याने पुरंदर वरून येथे जाता येत नाहीं. तसेच येथे जाण्यास बंदी आहे.

• काही ट्रेकर्स खोमणे वस्ती वरून वज्रगडाला जाऊन येतात. पण हा मार्ग जाण्यास कठीण आहे.

• पुणे येथून दिवेघाट मार्गे – सासवड मार्गे – नारायणपूर रोडला पुरंदर वज्रगड फाटा आहे – तेथून पुढे वज्रगडाच्या पायथ्याशी असणार्या खोमणे वस्ती वरून अरुंद पाय वाटेने जंगल झाडीतून आपण वज्रगडाल जाऊ शकतो.

वज्रगड किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :

खोमणे वस्ती :

वज्रगडाच्या पायथ्याशी असणारे हे एक रामोशी समाजाच्या लोकांचे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी आपण पायवाटेद्वारे वज्रगड किल्ल्याकडे जाऊ शकतो.

उमाजी नाईक यांचे स्मारक :

• ब्रिटिश सरकारच्या काळात ब्रिटिश तसेच अन्यायकारक जमिनदारा विरुद्ध आंदोलन करून सशस्त्र लढा देणारे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जन्म व त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध केलेल्या कार्याची ओळख करणारे हे स्थान आहे. त्या स्मरणार्थ येथे उमाजी नाईक यांचे स्मारक उभारले आहे.

अरुंद खडतर मार्ग :

उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आपण तेथून एका पायवाटेने पुढे वज्रगडाच्या दिशेने चालत गेल्यावर अनेक सखल - उंच असे जंगली झुडुपांनी वाढलेल्या मार्गाने आपण वज्रगडाकडे जाऊ शकतो. पण इकडे जाताना स्थानिक लोकांची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वाट अत्यंत खडतर आहे.

गडाची तटबंदी:

या वाटेने चढून वर आल्यावर आपणास गडाची तटबंदी पाहायला मिळते. ही अजुनही भक्कम स्थितीत असून यामध्ये जागोजागी जंग्या पाहायला मिळतात.

महादरवाजा :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


तटबंदीच्या कडेने आपण पुढे आल्यावर भक्कम दोन बुरुज लागतात. त्या बुरुजा जवळून अत्यंत सुरेख गोमुखीरचना असणारा पायरी मार्ग आपणास पाहायला मिळतो. या मार्गाने आपण पुढे गेल्यावर आपणास एक आतील बाजूस भव्य दगडी असा उंच दरवाजा पाहायला मिळतो . त्या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्या पाहायला मिळतात. आजही सुस्थितीत असलेल्या देवड्या व दरवाजा या किल्याच्या मध्ययुगीन काळाची साक्ष देतात.

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


कातळ सुळके :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


महादरवाजातून आतमध्ये गेल्यावर पायरी वाटेने पुढे गेल्यावर उंच असे कात्याळ सुळके पाहायला मिळतात. या ठिकाणी चढून जाणे अवघड आहे. याच्या खाली दगडाच्या मधील भागात भुयारी खोबणी आहेत.

राजगादी :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


कात्याळ धोंड्याच्या वरील बाजूस एक सपाट बैठकीचे ठिकाणं पाहायला मिळते. या ठिकाणी बसून राजे व इतर मुख्य अधिकारी टेहेळणी करत व भोवताली असणाऱ्या मावळ्यांना आदेश देत. तसेच ब्रिटीश काळात उमाजी नाईक या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन इंग्रज सरकार विरुद्ध योजना आखत असे.

कमानी प्रवेशद्वार :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


किल्यावर एक पुढे ढासळलेले बांधकाम पाहायला मिळते. तसेच काळाच्या ओघात अनेक साधी तसेच काटेरी निवडुंगाची झाडे वाढलेली दिसतात. त्यातून पुढे आपणास एक कमानी दरवाजा पाहायला मिळतो.

माचीचा बुरुज :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


किल्यावर माचीचा बुरुज आपणास पाहायला मिळतो. काळाच्या ओघात त्याची पडझड झालेली पाहायला मिळते. तसेच शिवकाळात या बुरुजांवर शत्रूच्या तोफेचा मारा होऊन यातील बऱ्याच बुरुजांची पडझड झाली.

तीन पाण्याची टाकी :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


वज्रगडावर आपणास तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. मध्ययुगीन काळातील ही टाकी येथील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याचा स्त्रोत होती. आजही या ठिकाणी भर उन्हाळ्यात देखिल भरपूर पाणी अढळते.

मारुती मंदीर:

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


पाण्याच्या विस्तीर्ण टाक्याच्या शेजारी आपणास एक मारुती मंदिर देखिल पाहायला मिळते. शेंदरी रंग लावलेली सुरेख मूर्ती बलोपासनेची प्रतीक आहे.

रुद्रेश्वर महादेव मंदिर:

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


हनुमान मंदीरा पासून जवळच आपणास एक शिवमंदिर पाहायला मिळते. छताच्या आतील गिलावा थोडा ढासळलेला असला तरी देखील भक्कम दगडी बांधकाम असलेले हे मंदीर आजही इतिहासाची आठवण करून देते. आतील बाजूस महादेव पिंड तर बाहेरील बाजूस नंदी आहे.

• उमाजी नाईक आपल्या सहकर्यांसमवेत या ठिकाणी वास्तव्यास होते. तसेच येथे आपल्या सहकार्यां समवेत बलोपासना करत म्हणून या मंदिरास तालीम असे देखील म्हंटले जात असे.

चोरवाट :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


गडावर आपणास एके ठिकाणी तटाला लागून एक भुयारी मार्ग देखील पाहायला मिळतो. जो गडावर आक्रमण झाल्यास बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करीत असे. हा मार्ग दरी जवळील जंगलात उघडत असल्याने तेथून शत्रूस चकवून जाणे सोपे जात असे.

पूर्व बाजूचा चिलखती बुरुज :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


गडाच्या पूर्व बाजूला आपणास दुहेरी तटबंदी असलेला चिलखती बुरुज पाहायला मिळतो. पूर्व बाजूच्या तटबंदीचे संरक्षण व किल्ल्यावरील आक्रमण परतवून लावणे तसेच टेहळणीसाठी या बुरुजाच्या वापर मध्ययुगीन काळात केला जात असे. दुहेरी बांधणी म्हणजेच बुरुजात बुरुज अशी रचना या ठिकाणी पाहायला मिळते.

तटबंदी :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


काळाच्या ओघात तसेच या किल्ल्याकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे आज बरीच तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी घनदाट झाडे झुडपे उगवलेली दिसतात. त्यामुळे बऱ्याच वास्तूंना काळाच्या ओघात अवकळा आल्याचे दिसून येते.

बुरुज :

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi


किल्ल्यावरील कमकुवत जागी बांधलेले बुरुज बरेचशे ढासळलेले पाहायला मिळतात. काही दगडी बांधकामावरुन त्याची प्रचिती येते.

बुरुजात जंग्या व फांज्या आढळतात.

इतर वास्तू अवशेष :

किल्यावर वाढलेल्या झुडपांमुळे राहण्यासाठी बांधलेल्या वस्तूंचे अवशेष नीट पाहता येत नाहीत.

वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती:

• पूर्वी या ठिकाणी इंद्र देवाने तपश्चर्या केली. म्हणून या ठिकाणा शेजारी असणाऱ्या किल्यास पुरंदर म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून वज्रगड हे नाव या किल्ल्यास दिले गेले.

• पुढें हा किल्ला यादव राजवटीत होता.

• इसवी सन १३८४ मध्ये सुलतानशाही काळात या ठिकाणी एक ठाणे स्थापन केले.

• पुढे सुलतान शाही नष्ट झाल्यावर बहमनी राजवटीत हा किल्ला दाखल झाला.

• हसन गंगू बहमनी याचा मुलगा मुहम्मद याने या ठिकाणी बांधकाम करून घेतले. यामध्ये एक बुरुज व दरवाजा बांधला गेला.

• पुढे हा किल्ला इसवी सन १४४९ साली निजामशाहीत मलिक अहमद याने दाखल करून घेतला.

• निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे आला.

• इसवी सन १५५० साली आदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला.

• शिवरायांनी स्वराज्य स्थापन केल्यावर आदिलशहाने शहाजीराजांना कैद केली. तेव्हा शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले. तेव्हा संघर्ष करण्यास योग्य ठाणे शिवरायांनी पुरंदर निवडले. तेव्हा इथे महादजी निलकंठ यांच्या ताब्यात पुरंदर वज्रगड किल्ला होता. त्यांचा भाऊ व त्यात या ठिकाणी वर्चस्वासाठी वाद होता. याचा फायदा घेऊन छत्रपती शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. व फत्तेखानाचा बंदोबस्त तर केलाच. शिवाय शहाजीराजांची सुटकाही केली.

  • शिवकाळात येथील संरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजातील लोकांकडे दिली होती.

  • वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती  Vajrgad Fort Information in Marathi

• इसवी सन १६६५ साली पुरंदरला मोघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी वेढा दिला. व दिलेरखानाने पुरंदर व वज्रगडावर तोफांचा मारा केला. माची जिंकली. मराठा व मोघल यात तुंबळ संघर्ष झाला. याचा परिणाम ११ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहात झाला. यामध्ये २३ किल्ले व चार लक्ष होणाचा मुलुख शिवरायांनी मुघलांना दिला व स्वराज्यात १२ किल्ले राहिले.

• मुघलांना दिलेले किल्ले:

• पुरंदर, वज्रगड(रुद्रमाळ), कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोणा, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भांडारदुर्ग, पालसखोल, रुपगड, बख्तगड, मरकगड, माणिकगड, सरुपगड, सकरगड, अंकोला, सोनगड, मानगड.

• स्वराज्यात राहिलेले किल्ले :

• राजगड, सिंधूदुर्ग, रायगड, विजयदुर्ग, विशाळगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, व्याघ्रगड, तळगड, घोसाळगड, सुवर्णदुर्ग हे राहिले.

• • ८ मार्च १९०७ रोजी निळोपंत मुजुमदार यांनी पुन्हा स्वराज्यात हा किल्ला जिंकून आणला.

• छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने हा किल्ला पुन्हा पुरंदर सोबत जिंकला.

• पुढे शंकर नारायण सचिवांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला.

• त्यानंतर इसवी सन १८१८ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला.

• इंग्रज राजवटीत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर इंग्रज सरकार व जमिनदार अन्याय करत. त्याविरुद्ध उमाजी नाईक या क्रांतिकारकाने सशस्त्र लढा उभारला.या परिसरात राहून अनेक मराठा विरांना एकत्र करून विरोध चालवला. त्या काळी उमाजी नाईक आपल्या सहकार्यासमवेत वज्रगडावर राहत असत. व गुप्त योजना आखत तसेच शस्त्र व बलोपासनेचे धडे येथील क्रांतिकारकांना देत असतं.

• ब्रिटिशांनी हे आंदोलन मोडून काढले.

• पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारतात दाखल झाला.

• आजकाल पुरंदर किल्यावर भारतीय लष्करी प्रशिक्षण केंद्र असल्याने वज्रगडाकडे जाण्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घातलेली आहे. तसेच येथे भारतीय जवान कसरती करतात.

• अशी आहे वज्रगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती.

Vajrgad Fort Information in Marathi

No comments:

Post a Comment

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...