ढाकगड किल्ल्याची माहिती
Dhakgad Fort information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सहयाद्री पर्वतातील डोंगराळ प्रदेशात आपणास ढाकगड किल्ला रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात अरण्यात पाहायला मिळतो.
• उंची : सरासरी समुद्र सपाटी पासून हा किल्ला २७००फूट उंचीवर हा किल्ला आहे.
• ढाक गड किल्याकडे जाण्याचा प्रवाशी मार्ग:
• मुंबई येथून ठाणे- कल्याण – बदलापूर मार्गे - कर्जत – येथून सांडशी गावातून अरण्य वाटेने ढाकगडाकडे जाता येते.
• पुणे येथून पुढे पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळा – कामशेत – जांभवली गावातून अरण्य वाटेने ढाकगड किल्ल्यावर जाऊ शकतो.
• ढाकगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• ढाकगड हा एक अरण्यातील किल्ला आहे. पुण्याहून कामशेत या ठिकाणी आल्यावर तेथून पुढे जांभवली गावात आल्यावर गावाच्या बाहेर असणाऱ्या ढाकवाडी मार्गावरून कोंडेश्वर या मंदिराजवळ येवून पोहोचतो.
• कोंडेश्वर् मंदिर :
अलीकडे जीर्णोद्धार झालेले हे मंदिर एक शिव मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक ओढा आहे. पावसाळी दिवसात हा ओसंडून वाहतो. मात्र उन्हाळा सुरू झाला की आटलेला असतो. हा ओढा पार करून आपण अरण्य वाटेने ढाकबहिरी या मार्गाने जाऊ लागतो. पुढे या वाटेने पुढे खूप चालत गेल्यावर जंगलातून आपण कळकराई सूळक्याजवळील जंगलात येतो. या ठिकाणी आपणास मार्ग दर्शक फलक पाहायला मिळतो. कळकराई सुळक्याजवळून जंगलातून आपण ढाकगड किल्ल्यावर जाऊ शकतो.
कर्जत कडून येताना सांडशी गावात आल्यावर अरण्य वाटेने आपण ढाक बहिरी या वाटेने जावे. पुढे जंगलात जागोजागी मार्गदर्शक बाण पाहायला मिळतात. या वाटेने पुढे एक पायवाट ढाकगडकडे तर दुसरी ढाक बहिरी लेण्या कडे घेवून जाते. या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो.
• ढाक गड हा किल्ला अरण्यात असल्याने तो पाहायला जाताना एकटे जाऊ नये, एकत्र ग्रुपने जाणे चांगले.तसेच अरण्यात असल्याने खाण्याचे पदार्थ पश्चिमेकडून येताना सांडशीगावातून किंवा पूर्वेकडून येताना जांभवली गावातून खरेदी करून जाणे चांगले. पुढे या रान वाटेने आपण जंगल झाडी, पठार पार करत गडाच्या जवळ येऊन पोहोचतो
• कात्याळ खोदीव पायरी मार्ग :
पूढे आपणास कात्याळ चढेल पायरी मार्ग लागतो. या वाटेने आपण गडावर जावून पोहोचू शकतो. हा किल्ला पाहायला जाताना स्थानिक एखादा व्यक्ती सोबत असेल. किंवा ज्याने या पूर्वी हा ट्रेक केला असेल ती व्यक्ती सोबत असेल तर उत्तम मार्गदर्शन मिळेल.
• महादरवाजा :
गडाच्या उत्तर बाजूस आपणास एक भग्न दरवाजा पाहायला मिळतो. काळाच्या ओघात, तसेच परचक्र आल्यावर काही समाज कंटकांनी येथे नासधूस केल्यामुळे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. चौकटीची एक अर्धवट बाजू शिल्लक आहे.
• पाण्याची टाकी :
किल्यावर एके ठिकाणी एकूण पाच जोड पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ज्यांची निर्मिती किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची गरज भागवणेसाठी केली गेली . त्यातील काही टाकी दहा फुटा पेक्षा खोल आहेत. तसेच आणखी काही अंतरावर आपणास अशी टाकी खोदलेली पाहायला मिळतात.
• बांधकाम अवशेष :
काही ठिकाणी आपणास बांधकाम केलेले चौथरे पाहायला मिळतात. यावरून तेथे रहिवासी वास्तूची कल्पना येते.
• कोठार :
किल्यावर राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या आहाराची गरज भागवण्यासाठी बांधले गेलेल्या कोठाराचे अवशेष देखील पाहायला मिळतात.
• भग्न शिव मंदिर :
किल्यावर पूर्वी एक शिव मंदिर होते. हल्ली तिथे फक्त भग्न अवशेष पहायला मिळतात.
• विशाल तळे :
ढाकगड किल्यावर पूर्वी बांधलेले एक तळे देखील पाहायला मिळतें. जे गडावरील पाण्याची गरज पाहता खोदलेले होते. उन्हाळ्यात मात्र ते आटले जाते.
• तटबंदी :
हा किल्ला सहयाद्री पर्वतातील उंच एक प्रस्तरावर असणारा किल्ला आहे. किल्ल्यावरील तटबंदी बऱ्याच ठिकाणी पडलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी सुस्थितीत ती आढळून येते.
• अरण्यात असल्याने हा किल्ला बराच दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे आता अवशेष देखील पाहताना अवघड जाते.
• या किल्ल्यावरून आपणास श्रीवर्धन गड, मनरंजन गड, कोंढाणे लेणी, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, इर्शाळगड, चंदेरी किल्ला, पदरगड, कोथळीगड, यांचे दर्शन घडते.
• ऐतिहासिक महत्त्व :
भोर घाटातून होणारी व्यापारी वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्याची निर्मिती केली गेली. एक टेहळणीचा किल्ला म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. येथील ढाकबहिरी गुणांमुळे हा आदिम काळापासून मानवी वावर असणारा किल्ला आहे.
अशी आहे
ढाकगड किल्ल्याची माहिती
Dhakgad Fort information in Marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l