शिरपुंज्याच्या भैरवगड किल्ल्याची माहिती
Shirpunje bhairvgad information in Marathi
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिरपूंजे गावी असणारा सहयाद्री पर्वतातील हरिश्चंद्र गडाचा रखवालदार म्हणून या किल्ल्यास ओळखले जाते.
• हा किल्ला राजूर मार्गावर देखरेख करण्यासाठी बांधला गेला असावा.
• उंची : या किल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून उंची ही सरासरी ११४९ मीटर उंचीवर हा किल्ला वसलेला आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग:
• अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिरपूंजे गावी व तेथून पुढे गडावर जाता येते.
• भैरवगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• अकोले तालुक्यातील शिरपुंजे व कुमशेत गावाच्या मध्यभागी हा किल्ला पाहायला मिळतो.
• शिरपुंजे गावी असणाऱ्या वाहन तळावर आल्यावर तिथे आपण गाडी पार्किंग करू शकतो.
• पायरी मार्ग:
वाहनतळापासून लगेच काही अंतरावर आपणास पायरी मार्ग लागतो. या मार्गाच्या सुरवातीस आपणास दिपज्योत पाहायला मिळते. या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो. या वाटेने पुढे गेल्यावर कच्ची वाट लागते. या वाटेला नेहमी माणसांची वर्दळ असते. त्यामुळे ती मळलेली पाहायला मिळते. पावसाळी दिवसात गड चढताना जागोजागी अनेक पाण्याने भरून वाहणारे ओढे, नाले, झरे पाहायला मिळतात.
• लोखंडी शिडी मार्ग :
पुढे आपणास गड चढण्यास सुकर व्हावा यासाठी लोखंडी शिडी मार्ग बनवलेला पाहायला मिळतो. या वाटेने आपण गडाच्या वरील बाजूस असणाऱ्या खिंडीत येऊन पोहोचतो.
• खिंड व दोन मार्ग :
खिंडीत आल्यावर आपणास दोन मार्ग लागतात. एक हा लोखंडी शिडी मार्ग जो उजव्या बाजूस आहे. जो घनचक्कर गडावर घेवून जातो. तर दुसरीकडे कात्याळात खोदलेला पायरी मार्ग लागतो तो आपणास भैरवगडाकडे घेवून जातो.
• पडलेली तटबंदी :
गडाच्या वरील बाजूस आल्यावर आपणास पडलेल्या गडाच्या तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.
• पाण्याच्या टाक्या:
गडाची बांधणी करताना गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी तसेच बांधकाम करण्यासाठी सखल भागातील खडक खोदून त्यातील दगड काढून पाण्याची अनेक टाकी खोदलेली पाहायला मिळतात. ज्यातील पाणी, वर्षभर पुरेल इतका साठा आपणास गडावर निर्माण केलेला पाहायला मिळतो.
• भूमिगत पाणी टाके:
आपणास गड माथ्यावर एक खोदून तयार केलेले भुयारी पाणी टाके देखील पाहायला मिळतें.
या टाक्यास दरवाजा व खिडकी देखील पाहायला मिळते.
• भैरवनाथ मंदिर:
गडाच्या वर आपणास एक उतरणीवर शिडी मार्ग पाहायला मिळतो. या मार्गाने आपण खालील बाजूस असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात जाऊन पोहोचतो. सुरेख कात्याळ गुहेत असणारे हे मंदिर आहे. या मंदिरात आपणास अश्वारूढ असलेली मुर्ती पाहायला मिळते. या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते. अनेक भक्त याठिकाणी येत असतात. त्यांना जेवण करण्यासाठी येथे काही भांडी देखील ठेवलेली आहेत. हे हिंदू धर्मीयांचे पवित्र स्थान आहे.
या मंदिरात खालील बाजूस कात्याळात कोरलेली देखील मूर्ती पाहायला मिळतें. या ठिकाणी दर अश्विन महिन्यात यात्रा भरते.
• विरगळ व हिंदू धर्मीय देवतेच्या मुर्त्या :
मंदिर परिसरात अनेक विरगळ तसेच हिंदू देवतांच्या पाषाण शिल्प मूर्ती पाहायला मिळतात.
• दीपमाळ : या ठिकाणी एक दीपमाळ देखील आहे.
• पठारावरील विरगळ :
गडाच्यावरील बाजूस असणाऱ्या पठारावर एक विरगळ पाहायला मिळते. ही विरगळ ही किल्ला जिंकल्यावर शोर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या पाहायला मिळतात.
• विस्तृत पठार :
या गडाच्या माथ्यावर विस्तृत पठारी भाग पाहायला मिळतो. पावसाळ्यात अनेक रानफुलांनी बहरलेले गवत इथे पाहायला मिळते. तसेच जागोजागी खोदलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
• गडमाथ्यावरुन आपल्याला घनचक्कर पठार पाहायला मिळते.
• धान्य कोठार:
गडावर आपणास धान्य कोठार पाहायला मिळते. तसेच इतर पडलेल्या वास्तूंचे व वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.
• गडाच्या माथ्यावरुन आपणास हरिश्चंद्रगड, चावंड, जीवधन, रतनगड, हडसर, नानाचा अंगठा, अलंग मलंग, कुलंग, मदन मोरोशीचा भैरवगड दिसतो. तसेच वातावरण स्वच्छ असेल तर कल्याण पर्यंतचा प्रदेश आपणास पाहायला मिळतो.
• भैरवगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती :
• राजूर या मार्गावरील वाहतूक देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. महाराष्ट्रात राज्य करत असलेल्या सातवाहन, चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट ,यादव या हिंदू राजवटी या परिसरात होऊन गेल्या. नंतर सुलतानशाही, बहामनी राजवट, निजामशाही, मुघल, मराठे या राजवटी देखील या किल्ल्याने पहिल्या आहेत. सध्या हा किल्ला इसवी सन १९४७ नंतर भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• अशी आहे शिरपुंजे गावच्या भैरवगडाविषयी ऐतिहासिक माहिती.
Shirpunje bhairvgad information in Marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l