हरिश्चंद्रगड माहिती
स्थान :
भारतीय उपखंडातील महाराष्ट्र राज्यातील सह्याद्रीच्या उंच डोंगर शिखररांगा असणाऱ्या प्रदेशात म्हणजेच पुणे, अहमदनगर, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर माळशेज घाटाच्या डावीकडील बाजूस असणाऱ्या उंच गिरिशिखरातील अती ऊतुंग किल्ला हरिश्चंद्र होय.
• हरिश्चंद्र गडाची उंची :
समुद्र सपाटी पासून हा किल्ला ४६७० फूट / १४२४ मीटर आहे.
• हरिश्चंद्रला जायचे कसे?
• विस्तृत उंच विस्तार असल्याने अनेक मार्गांनी या किल्यावर जाता येते.
• मुंबई पासून १३० किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्र आहे.
• पुण्यापासून ११० तर नाशिकहूनही ११० किलोमीटर अंतरावर आहे.
• कल्याण व मुंबईहून आपण माळशेज घाट मार्गाने खुबी फाट्यावरून आत खिरेश्र्वर गावी यावे. तेथून आपण हरिश्ंद्रगडावर जाऊ शकतो.
• नाशिक कडून येताना घोटी गावाजवळून संगमनेर मार्गावरील राजूर येथून पाचनई गावी यावे येथून सरळ मार्गाने आपण हरिश्चंद्रगडावर जाऊ शकतो.
• नळीची वाट ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील बेलपाडा या ठिकाणी आल्यावर अजस्त्र सहयगिरी सुळक्यांचे दर्शन घडते. त्यातील एका उंच कड्याच्या कात्याळी कड्याच्या वाटेचा ट्रेक आहे. जो फक्त गिर्यारोहक चढू शकतात. त्या मार्गे जाणे अत्यंत अवघड आहे. दोर व गिर्यारोहण करताना लागणारे साहित्य आवश्यक आहे. व चढण्याचा अनुभव ही हवा.
• खिरेस्वर मार्गे जाणारी वाट ही प्रथम मुंबई जुन्नर राज्यमार्गावरून माळशेज जवळील खुबी फाट्यावर उतरून पूढे खिरेश्वर येथे आल्यावर तेथून दोन वाटा आहेत. पहिली तोलार खिंडीतून जाणारी वाट गडावरील मंदिरापर्यंत जाते. तर दुसरी वाट जुन्नरच्या बाजूच्या दिशेने जाते.
खिरेश्वर येथे प्राचीन मंदिर आहे.
• तोलार खिंड मार्ग हा देखील गिर्यारोहण करून जावा लागतो.
• या किल्याचा व ठिकाणाचा विस्तार मोठा असल्याने येथे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण पाचनई वाट सुलभ व सोपी आहे.
• हरिश्चंद्र गडावर पाहण्यासारखी ठिकाणे:
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले गेलेले ठिकाण म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हरिश्चंद्र गडावर जाण्याचा अत्यंत सुकर मार्ग म्हणजे पाचनई गावातून जाणारी वाट होय. पाचनई गावातील चेक नाक्यावर आल्यावर प्रवेश पावती फाडून आपण पुढे वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ठिकाणी आपली गाडी पार्क करून गडाच्या दिशेने चालत गेल्यावर पायरी मार्ग लागतो.
• पायरी मार्गाने पुढे चालत गेल्यावर अरुंद अशा उंच सखल भागातून वर गडाच्या दिशेने जाता येते. पुढे जाताना एक लाकडी पूल देखील लागतो. पुलाखालून जाणारा ओढा हा गडाच्यावरील भागाकडून आलेला आहे.
• ओढा पार करून गडाच्या वरील भागात आल्यावर आपणास अनेक ठिकाणी राहण्यासाठी बांधलेल्या खोलीसारख्या झोपड्या पाहायला मिळतात. तेथून पुढे आपण पठारावर जाऊ शकतो.
• हरिश्चंद्रेश्वर मंदिर :
गडाच्या वरील पठारी भागात आल्यावर आपणास हेमाडपंथी बांधणी असणारे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ते संपूर्ण या परिसरात आढळणाऱ्या काळया पाषाणात बांधले गेले आहे. तसेच या ठिकाणी लहान मोठी अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. इसवी सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजा झांज याने हे बांधले आहे. मंदिराच्या आतील गर्भगृहात शिवलिंग पाहायला मिळते. या परिसरात असणाऱ्या अनेक म्हणजे गोदावरी ते भीमा या नद्यांच्या दुर्गम अशा प्रत्येक नदीच्या उगमावर त्याने म्हणजे झांज राजाने शिवमंदिर बांधले आहे.
मंदिरात अनेक लहान कोठ्या दिसतात. त्यातील बऱ्याच कोठीत व तळघरात आपणास पाणी पाहायला मिळते. जे अत्यंत निर्मळ आहे. अमृतासमान आहे. पिण्याच्या योग्य आहे. अत्यंत सुरेख कलाकुसर, रेखीवता, नाजूक शिल्पशैली आपणास पाहायला मिळते. याठिकाणी असणाऱ्या या कोठ्यातील काही कोठ्या राहण्याची, तर काही पाण्याची गरज भागवतात. यातील एका कोठीच्या गुंफे मध्ये चांगदेव ऋषींनी १४०० वर्षे तपश्चर्या केली होती. तसेच त्यांनी तत्वसार नावाचा एक ग्रंथ ही लिहिला होता.
• हरिश्चंद्र देवालयातील शिल्पकला अत्यंत बारकाव्याने फक्त छिन्नी हातोडा वापरून केली गेली आहे.
• मंदिराच्या समोरच मंदिराच्या भिंतीस लागून एक ओढा आहे. तो तारामती शिखराच्या वरून आलेला आहे. तो मंगळगंगेचा उगम या नावाने ओळखला जातो. जो खालील भागात असलेल्या लाकडी पुलाखालून जातो.
• पुष्करणी तलाव :
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या जवळच एक खोदीव तलाव पाहायला मिळतो. संपूर्ण कात्याळात खोदलेला हा तलाव त्याच्या बाजूने असणाऱ्या खोल्यांच्या रचनांमुळे निराळा दिसतो.
• पुष्करणी शेजारी असणाऱ्या लांबलचक देवड्यांमध्ये पूर्वी अनेक देवतांच्या मूर्ती होत्या. सध्या त्या रिकाम्या आहेत.
• दरीतील गुहा केदारेश्वर मंदिर :
मंदिराच्या पुढील बाजूस थोडे अंतर चालत गेल्यावर एक दरीचा भाग लागतो. त्याठिकाणी काही कात्याळी गुहा आढळतात. त्यातील एक गुहा अत्यंत विशाल आहे. त्या ठिकाणी भिंती कात्याळशिल्प पहायला मिळते. मध्यभागी पाणी असून त्याच्या मधोमध विशाल शिवलिंग पाहायला मिळते. शिवलिंगाच्या भोवती चार खांब होते. त्यातील तीन खांब तुटलेले आहेत. एक अस्तित्वात आहे. हे चार खांब चार युगाचे प्रतीक मानले जातात. सतियुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. सध्या कलियुग चालू आहे. म्हणून एक खांब शिल्लक आहे. असे मानले जाते. मध्यभागी असणाऱ्या विशाल शिवलिंगाच्या दर्शनास अनेक लोक जातात. या ठिकाणी अत्यंत थंड पाणी आहे. व मध्यभागी शिवलिंग.
अनेक पर्यटक व भाविक येथे दर्शन घेत असतात.
• कोकण कडा :
केदारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे आपण काही अंतर चालून गेल्यावर गडाच्या पश्चिम बाजूस कोकणाकडे एक आकर्षक कोकण कडा पाहायला मिळतो. सदर कडा हा ९१४ मीटर उंचीवर असून मध्यभागी अंतर वक्र अशी याची रचना आहे. ऊन, पाऊस, वाऱ्याच्या माऱ्याने या बाजूच्या खडकाची झीज होऊन अशा आकर्षक रचना तयार झालेल्या आपणास पस्तरांची पाहायला मिळते. या ठिकाणी उभे राहिल्यावर कोकणातील कल्याणच्या प्रदेशाचे दर्शन घडते. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी रॉड उभारले आहेत. तसेच आपणास दरीचा रोमहर्षक देखावा पाहायचा असेल तर तो कड्यावर झोपून घेऊ शकतो. वारंवार ऊन पावसाच्या माऱ्याने या ठिकाणी चिरा पडल्याचे आढळतात. व कडा धोकादायक झाल्याची चिन्हे दिसून येतात.
• कोकण कड्यावर आल्यावर आपणास सुरेख प्रस्तर सौंदर्य व यु अकराच्या दऱ्या व त्यात दबा धरुन बसलेली झाडी पाहिल्यावर मन प्रसन्न होते.
• कोकण कड्याचा आकार नागाच्या आकाराचा असल्याने त्यास नागफणी कडा देखील म्हणतात.
• हरिश्चंद्र धबधबा :
गडाच्या वरील भागातून येणारे पाणी उंच कड्यावरून पडताना पाहिले की मन प्रसन्न होते. या पाण्याच्या मार्गात अनेक रांजणखळगे तयार झाले आहेत. भर उन्हाळ्यात देखील उपयुक्त पेयजल इथल्या खळग्यातून मिळते.
• हरिश्चंद्र गडावर लहान मोठी अनेक मंदिरे व वास्तू पाहायला मिळतात.
• गुहा :
हरिश्चंद्र गडावर अनेक ठिकाणी आपणास गुहा पाहायला मिळतात. यामध्ये प्राचीनकाळी अनेक साधू संत तपश्चर्या करत असत. चांगदेव ऋषींनी १४०० वर्ष तपश्चर्या केली होती.
• गुहांमध्ये अनेक सुंदर हिंदू देवदेवतांची शिल्पाकृती व मुर्त्या येथे पाहायला मिळतात.
• हरिश्चंद्र गडावरील अती उंच शिखरात तारामती शिखर येते. त्याची सरासरी उंची ४८५० फूट असून या ठिकाणी उभे राहून कोकण तसेच घाटमाथ्यावर दर्शन घडते
• हरिश्चंद्र गडाच्या आसपास जंगली परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यामध्ये करवंद, मरुवेल, पांगळी, कुडा, कारवी, गारवेल, धायटी अशा अनेक प्रकारच्या तसेच प्राणी देखील आढळतात. त्यामध्ये रानडुक्कर, बिबळे, ससे, तरस, रानमांजरे व भेकरे यासारखे प्राणी आढळतात
• हरिश्चंद्रगडाविषयी ऐतिहासिकदृष्ट्या माहिती:
• हरिश्चंद्रगड हा अती प्राचीन काळापासून मानव अस्तित्व असणारा गड आहे.
• हिंदू अग्निपुरान व मत्स्य पुराणात या ठिकाणाचा उल्लेख आहे.
• या ठिकाणी बरेच वर्ष आदिम महादेव कोळी समाजाच्या लोकांनी राज्य केले आहे.
• आदिवासी कोळी समाजाकडून हा किल्ला मोगलांनी जिंकून घेतला.
• पुढे इसवी सन १७४७ ते ४८ या काळात हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. व या ठिकाणी किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नेमणूक केली.
• या किल्याचा शेवटचा किल्लेदार रामजी भांगरे हा होता. जे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते.
• पुढे हा किल्ला इसवी सन १८१८ साली मराठ्यांकडून इंग्रजांनी जिंकून घेतला.
• सध्या हा किल्ला इसवी सन १९४७ साला नंतर स्वतंत्र भारताचा भाग आहे.
• अशी आहे. हरिश्चंद्रगडा विषयीची माहिती
Harishchandra Fort information in marathi
No comments:
Post a Comment
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l