Sunday, September 29, 2024

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती Irshalgad Fort information in Marathi

 इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती

Irshalgad Fort information in Marathi

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात पनवेल व कर्जत तालुक्याच्या दरम्यान सह्याद्री पर्वतात माथेरान या थंड हवेच्या ठिकाणा जवळील डोंगर रांगेत इर्शालगड हा किल्ला आहे.

• उंची : या किल्ल्याची सरासरी समुद्र सपाटी पासून ३७०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.

इर्शाळगड किल्ला पाहायला जाण्यासाठीचा प्रवासी मार्ग :

• इर्शाळगड हे ठिकाण मुंबई पासून ६० किलोमीटर अंतरावर तर पुणे येथून १०० किलोमीटर अंतरावर आहे.

• कर्जत येथून ५० किलोमीटर अंतरावर इर्शाळगड आहे.

• मुंबई वरून येताना पनवेल येथे येऊन तेथून बस किंवा खाजगी वाहनाने इर्शाळगड पायथ्याशी असणाऱ्या चौक या गावी खाजगी वाहनाने जाता येते. तेथून पायी ट्रेक करत आपण गडावर जाऊ शकतो.

• पुणे येथून लोणावळा – खोपोली – खालापूर मार्गे आपण चौक गावी व तेथून पुढे आपण पायी गडावर जाऊ शकतो.

इर्शाळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे :

खाजगी वाहनाने आपण मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आल्यावर तेथे असणाऱ्या नम्रेवाडी किंवा चौक गावी येऊन गड वाटेस एखादी सुरक्षित जागा पाहून गाडी पार्क करावी. तेथून पुढे पायी चालत ट्रेकिंग सुरू होते. डोंगरी पायवाट चढेल भागाकडे म्हणजेच इर्शाळवाडीकडे घेवून जाते. जसजसे उंच चढून जावे तसे आपणास सुंदर हिरवागार निसर्ग रम्य परिसर व मोरबे धरणाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

 वाटेत जागा मिळेल तिथे विश्रांती घेत आपण इर्शाळवाडीकडे जाऊ लागतो. जाताना वाटेत निरनिराळ्या रंगाच्या छटा व आकाराच्या जैव विविधतेन नटलेल्या वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचे दर्शन घडते. पण या ठिकाणी जाताना आपणास गिरीभ्रमन करण्याची सवय असावी लागते. तसेच प्रवासात आपली पाण्याची बाटली असेल तर उत्तम, तसेच या परिसरात सरीसृप प्राणी आहेत. फुरसे ही विषारी सापाची जात या परिसरात पाहायला मिळतें. यासाठी तुमच्याकडे विष रोधक औषधे असणे गरजेचे आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• इर्शाळवाडी:

पायी चालत ट्रेकिंग करत आपण इर्शाळवाडी गावात येतो. सुंदर मातीची तसेच कुडाच्या भिंती असलेली घरे सुंदर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतात. या गावातून पुढे चालत गावाबाहेर असणाऱ्या छोट्याशा इर्शाळदेवी मंदिरा जवळ आपण येऊन पोहोचतो. ही या ठिकाणची ग्रामदेवता आहे. गडावर देवीचे मंदिर आहे. पण लहान मुले व वृध्द लोकांसाठी सोयीचे व्हावे म्हणून याठिकाणी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे.

• हल्ली झालेल्या भुस्खलनामुळे या गावातील घरांची मोठ्या प्रमाणत पडझड झाली आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi
भूस्खलन झाल्यावर इर्शाळगड 

• विशाल शिळा:

मंदिराच्या समोरच एक रान वाट ही गडाच्या दिशेने वरील बाजूस जाते. वाटेत डोंगराचे कडे तुटून खाली पडून गुहा निर्माण झालेली आहे. येथून आपण पुढे इर्शाळगड म्हणजेच इर्शाळ सुळक्याकडे जावू शकतो. जाताना वाटेत विशाल अशा शिळा पाहायला मिळतात. तेथून आपण वरील भागात गडाकडे जावू शकतो.

• सिडी मार्ग व पाण्याचे टाके:

पुढे आपणास तुटलेला पायरी मार्ग लागतो. त्या ठिकाणी आपणास वरील बाजूस चढून जाण्यासाठी गिरिदुर्ग प्रेमींनी सिडी लावलेली पाहायला मिळते. तिथेच एका बाजूस खोदलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते.

• कठीण चढाई व दोर :

पुढे जसे उंच जावे तसे चढाई अवघड होते. तेव्हा वरील बाजुस चढून जाण्यासाठी एक दोर बांधलेला पाहायला मिळतो. पण आपण चढाई करताना दोर व बाजूच्या दरडी मधील खाचेचा वापर करून चढाई करावी लागते.

• निढं :

उंच चढून गेल्यावर आपण निढ्या जवळ येवून पोहोचतो. निढं हे नैसर्गिक निर्मित भुरुप असते. उन, वारा, पाऊस यांच्या माऱ्याने डोंगराच्या मधील मऊ खडक झिजून झिजून पडतात व मध्यभागीं एक छिद्र पडते, व निसर्ग निर्मित अशी एक कमान तयार होते. जिथे एक निवारा स्थान तयार होते. हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. याचा वापर विश्रांती साठी मध्ययुगात सैनिक करत असत.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• पाणी टाके व अर्धवट गुहा:

निढ्याचे जवळच एक पाण्याचे टाके खडकात खोदलेले पाहायला मिळते. व डोंगराचा कडा तुटून एक अर्धवट गुहा निर्माण झालेली पाहायला मिळते.

• पाण्याचे टाके :

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

निढ्या जवळून एक वाट खालील दिशेला जाते. तिथे एका बाजूला आपणास आणखी एक पाण्याचे टाके खोदलेले दिसून येते. आजकाल त्यातील पाणी अस्वच्छ आहे. मात्र मध्ययुगात त्यांची स्वच्छता नियमित होत असे. व पिण्यासाठी व खर्चासाठी त्याचा वापर केला जात असे. हल्ली झालेल्या दुरावस्थेमुळे तिथे झाड उगवलेले दिसून येते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• उंच शिखरे :

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

निढं पाहून जेव्हा आपण वरील अवघड चढ चढून वर जातो. तेव्हा आपण शिखराजवळ येऊन पोहोचतो. ही या ठिकाणची सर्वात उंच जागा. पावसाळ्यात या ठिकाणी सूनकीची फुले पाहायला मिळतात. सुनकी म्हणजे सूर्यफूलाचे लहान रूप होय.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• इर्शाळदेवी मंदिर :

शिखर पाहून खाली उतरून आल्यावर निढ्याच्या खालील बाजूस आपणास एक मंदिर पाहायला मिळते. ही आहे गड देवता, इर्शाळदेवी. तिचे छोटेसे मंदीर पाहायला मिळते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• गुहा : इर्शाळदेवीचे दर्शन घेऊन थोडस खालील बाजूस आल्यावर एका बाजूला अवघड चढाई करून गेल्यावर आपणास एक भुयारी गुहा पाहायला मिळतें. जी मध्ययुगात या ठिकाणी राहणाऱ्या शिबंदीतील सैन्यासाठी तयार केली गेली असावी. हल्ली या ठिकाणी वटवाघळांची वस्ती असते.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• इर्शाळगड चढाई करणे थोडे अवघड आहे. गिरिभ्रमन करणारे तसेच गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी ती पोषक आहे.

• या ठिकाणाची बांधणी व स्थान पाहता हा किल्ला कल्याण परिसरात टेहळणीसाठी वापरला असावा. येथे. गडाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. मात्र याचे महत्त्व मध्ययुगात टेहळणीसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे.

इर्शाळगड किल्ल्याविषयी माहिती  Irshalgad Fort information in Marathi

• तुम्हाला जर इर्शाळगड ट्रेक करायचा असेल तर तुम्ही या परिसरातील अनेक ठिकाणांची सहल करू शकता. प्रथम ठाकूरवाडी येथे येऊन आपण प्रबळगड व कलावंतीण दुर्ग पाहून त्या परिसरात वस्ती करू शकतो. त्यानंतर पुढे बोरिची सोंड पाहून मधल्या वाटेने इर्शाळगडाला जावू शकतो. तेथून खाली मोरबे धरण पाहून पुढे पनवेलला जाऊन कर्नाळा किल्ला पाहून पुढे चंदेरी व म्हैसमाळ सुळका पाहून माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जावू शकतो. असा दोन चार दिवसांचा ट्रेक आपला होऊ शकतो. पण यासाठी गिरिदुर्ग पाहण्याची आवड व चढाईचे परिश्रम घेता आले पाहिजे.

इर्शाळगडाविषयी ऐतिहासिक माहिती:

• इर्शाळगड हा किल्ला नसून तो एक सुळका आहे. त्याचे स्थान पाहता रायगड , प्रबळगड तसेच इतर किल्याच्या परिसरात टेहळणी साठी हे स्थान विकसित केले असावे.

• इर्शाळ गडाच्या खालील बाजूस असणाऱ्या चौक गावी नेतोजी पालकर यांचा जन्म झालेला आहे.

• स्वराज्य स्थापन केल्यावर कल्याण भिवंडी जिंकून घेताना मे १६६६ साली छत्रपती शिवराय यांनी इर्शाळगड जिंकून घेतला, व टेहेळणीसाठी या जागेची निवड केली .

• तसेच प्रतिकूल काळात लष्कर व संपत्ती गुप्तमार्गे पाठवणी करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी. तसे पाहता या ठिकाणास ऐतिहासक पार्श्वभूमी नाही.

• अशी आहे इर्शाळगड किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती

Irshalgad Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

 निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती

Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• स्थान : 

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात पश्चिम घाट म्हणजेच सहयाद्री पर्वतात आपणास खांद्याच्यीवाडी येथे निमगिरी किल्ला व हनुमंत गड पाहायला मिळतो.

• उंची  :

या किल्ल्यांची सरासरी समुद्रसपाटी पासून उंची ही सुमारे ११०८मीटर आहे. व पायथा उंची ही सुमारे ३०० मीटर उंच हा किल्ला आहे.

निमगिरी व हनुमंतगडाकडे जाण्याचा प्रवाशी मार्ग:

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• मुंबई येथून आपण कल्याण तेथून पारगाव फाटा येथून आपण पुढे खांद्याचीवाडी येथे जाऊ शकतो. तेथून गडावर जाता येते.

• पुणे येथून पुढे जुन्नर येथे आल्यावर तेथून खांद्याच्यावाडीला बसने जाता येते. मात्र खाजगी वाहनाने प्रवास करणे चांगले. पारगावफाट्यावर आल्यावर तेथून आपण खांद्याचीवाडी येथे व नंतर गडाकडे जाऊ शकतो.

निमगिरी किल्ला व हनुमंतगड याठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे:

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• आपल्या खाजगी वाहनाने आपण पारगाव फाट्यावर आल्यावर तेथे चौकशी करून निमगिरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला येतो. तेथून पुढे आल्यावर आपणास एक दिशादर्शक पाटी पाहायला मिळते. त्यावर वसेवाडी, तळेरान व निमगिरी गावांना जाणाऱ्या दिशादर्शक फलकाच्या पुढे आल्यावर एक कमान लागते. त्या कमानीतून थोडे पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपणास एक छोटीशी नदी लागते. नदीचा पूल पार केल्यानंतर पुढे गेल्यावर आपणास खांद्याचीवाडी हे गाव लागते. आपली गाडी गावातील मराठी शाळेच्या आवारात आपण पार्किंग करून गडाकडे जाऊ शकतो.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• काळूबाई मंदीर : 

खांद्याची वाडी गावातील शाळेजवळ आपण वाहने पार्क करून जेव्हा पुढे गडाकडे जाऊ लागतो. त्यावेळी आपणास ग्रामदैवत काळूबाईचे मंदिर लागते. मंदिराकडे जाताना आपणास बाहेरील चौथरा पाहताना त्याचे खांब हे प्राचीन मंदिराच्या खांबणीचे बनवलेले दिसून येतात. त्यावरून या ठिकाणी पूर्वी अत्यंत कोरीव मंदिर होते. ते जाणवते. या मंदिराचे अलीकडे नूतन बांधकाम झाले आहे. बाह्य मंडप व गाभारा असे स्वरूप पाहायला मिळतें. गाभाऱ्यात कालेश्वरी देवीची मुर्ती पाहायला मिळते. जी कित्येक जणांची कुलदेवता, तसेच ग्रामदेवत आहे.

• वीरगळ :

ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन पुढे रान वाटेने गडाच्या दिशेने जाऊ लागल्यावर काही पावलांवर आपणास गर्द झाडीतून जाताना आपल्या उजव्या हातास एक वाट लागते. त्या वाटेने पुढे गेल्यावर आपणास एका सरळ रेषेत ४० विरगळी पाहायला मिळतात. या विरगळी ऐतिहासिक आहेत. या प्राचीन काळी युद्ध व परकीय आक्रमण तसेच आलेल्या संकटात जो आपल्या राज्याचे संरक्षण करताना धारातीर्थी पडतो. त्या विराच्या स्मरणार्थ वीरगळ हिंदू संस्कृतीत उभारण्याची प्रथा आहे. अशा या वीरगळ पाहताना आपणास त्या वीरांचे स्मरण करून देतात.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• हनुमंत मंदिर :

या परिसरात आपणास हनुमंताचे एक भग्न अवशेष असलेले मंदिर पाहायला मिळते. हनुमंताची मुर्ती पाहायला मिळते. तसेच या परिसरातील वीरगळी जवळील परिसरात शिवपींड व गणेश मुर्ती देखील पाहायला मिळते.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• खिंडीचे दिशेने :

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

वीरगळ पाहून मागील वाटेस पुन्हा येऊन पुढे गडाच्या खिंडी कडे जाताना वाटेत आपणास माहिती फलक पाहायला मिळतो. त्या जवळून आपण पुढे गडाकडे रान वाटेने वाटचाल करू लागतो. या वाटेने गड पायथ्याशी येवून पोहोचतो.

• खिंडीकडे :

गडाच्या कात्याळ वाटेने आपण दोन गडाच्या खिंडीत येवून पोहोचतो.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• खोदीव पायरी मार्ग :

खिंडीत आल्यावर आपणास खोदीव पायरी मार्ग लागतो. ज्या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो. चढून जाण्यासाठी या मार्गावर लोखंडी रॉड लावण्यात आले आहेत. या वाटेने आपण चांगल्या पायरी मार्गानें गडाच्यावरील माची सारख्या भागाकडे जावू शकतो.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• भग्न दरवाजा :

या पायरी मार्गानें वर चढून जाताना आपणास वाटेत भग्न दरवाजा असलेली जागा पाहायला मिळते. तेथील लाकडी अडसर लावण्याची जागा पाहिल्यावर याचा अंदाज येतो. हल्ली येथे दरवाजा नाही आहे.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• पहारेकऱ्यांसाठी देवड्या:

गडावरील शिबंदीत असणारे पहारेकरी यांच्या निवाऱ्यासाठी देवड्या खोदलेल्या पाहायला मिळतात. या देवडीचे निरीक्षण केल्यावर आपणास असे जाणवते की याठिकाणी तुटलेला पायरी मार्ग वरील बाजूस आहे. जो पूर्वी या देवडीत वरून खाली उतरून येण्यासाठी बनवला गेला असावा. तसेच या कात्याळ खोदिव देवडीवरील बाजूने पाणी गळू लागले. तर ते पाणी निचरा होऊन जाण्यासाठीची योजना खाच मारून तयार केल्याचे दिसून येते.

• पायरी मार्ग :

देवडी पाहून खोदीव पायरी मार्गाने आपण गडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो.

• पाण्याची टाकी :

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

 गडाच्या माथ्यावरुन आपणास गडभर्मंती करताना पाण्याची विशाल खोदीव् टाकी जागोजागी खोदलेली पाहायला मिळतात. ज्या मध्ये मुबलक पाणी आपणास पाहायला मिळते. गडावर अधिवास करणाऱ्या गडकरी व इतर अधिकारी, तसेच शिबंदीतील माणसे यांच्या पिण्याच्या पाण्याची व खर्चाच्या पाण्याची सोय करण्यासाठी खोदली गेली असावीत. यातील दगड काढून ते तटबंदी व गडावरील इतर वस्तू बांधण्यासाठी वापरले असावेत. अशी जागो जागी आपणास आठ ते नऊ पाण्याची टाकी खोदलेली पाहायला मिळतात.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• बांधकाम वास्तूंचे अवशेष :

गडावर आपणास काही बांधलेल्या वास्तूचे चौथरे दिसतात. त्यावरून रहिवासी वास्तूची कल्पना येते.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• तीन लेणी विस्तृत गुहा :

• निमगिरी गडावर आपणास तीन सलग्न अशा गुहा पाहायला मिळतात. ज्यामधे खोल्या केल्याचे आपणास आढळून येतात. यामधील एक गुहा मुजलेली आहे. तर एका गुहेतील आतील बाजूस आणखी सलग्न भूमिगत खोली असल्याचे आपणास दिसून येते. या सातवाहन कालीन गुहा असल्याचे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• भग्न मंदिर :

निमगिरी गडावर भ्रमंती करत असताना आपणास एका भग्न मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. दगडी चौकट व काही भिंतीचे अवशेष शिल्लक आहेत. आतील बाजूस शिवपिंडी व इतर हिंदू धर्मीय देवतेच्या मूर्ती पाहायला मिळतात. यामधील काही भग्न झालेल्या दिसून येतात. हे एक शिवमंदिर आहे. हे जाणवते. मंदिरावरील दगडांच्या कलाकुसरीवरुन तत्कालीन लोकजीवनाची व संस्कृतीची माहिती मिळते.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• निमगिरी या किल्ल्यास अजिंक्यगड या नावाने देखील ओळखले जाते.

• या किल्ल्यावरून आपल्याला पिंपळगाव धरण, हडसर किल्ला, चावंड किल्ला, सिंधोळा किल्ला, भोजगिरी, तारामती शिखर, दौंड्या डोंगर (ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सिडनी वरून आलेले विमान अपघात ग्रस्त झालेले होते.) या ठिकाणांचे व परिसरातील सहयाद्री पर्वतातील डोंगराळ प्रदेशाचे दर्शन घडते.

• हनुमंत गड:

किल्ले निमगिरीचे दर्शन घेऊन आपण पायरी मार्गाने थोडे खाली आल्यावर आपणास एक माची सारखा भाग लागतो. त्या ठिकाणा वरून हनुमंतगडाकडे जाण्यासाठी एक वाट दिसून येते. सदर वाट ही अवघड थोडीशी आहे. पण येथून खाली उतरून थोडेसे चढून गेल्यावर आपणास हनुमंतगडाच्या पायऱ्या पाहायला मिळतात. या कोरलेल्या पायरी मार्गाने आपणास हनुमंत गडावर जाता येते.

• पाण्याची टाकी :

आपणास गडावर जोड पाण्याचे विशाल टाके पाहायला मिळते. जे किल्ले निमगिरी पेक्षा मोठे आहे. त्यावरून आपणास तत्कालीन पाणी साठवण व्यवस्थेविषयी माहिती मिळते. अशा स्वरूपाची तीन चार टाकी या किल्यावर खोदलेली आहेत.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• वाडा :

किल्यावर आपणास एके ठिकाणी वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. हा वाडा विशाल असा होता. याला चार बुरूज होते. हल्ली भिंतीचे व बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. वरील छत काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.

निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती  Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

• किल्ले निमगिरी व किल्ले हनुमंत गड ही जोड किल्ल्यांची जोडी एका खिंडीने एकत्र जोडली गेली आहे. हा किल्ला प्राचीन भोकरदन – जुन्नर - नाणेघाट – ते कल्याण – सोपारा या व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी उभारलेल्या किल्यांमधील एक किल्ला आहे. या वाटेवर नारायण गाव ते जुन्नर तसेच कोकण भागात देखरेख करण्यासाठी अनेक किल्ले उभारलेले पाहायला मिळतात. प्राचीन सातवाहनांच्या काळापासून या किल्ल्यांची उभारणी केली गेली होती.

• निमगिरी व हनुमंतगड किल्याविषयी ऐतिहासिकविषयक माहिती :

• किल्ले निमगिरी व हनुमंतगड हे किल्ले सातवाहान काळात उभारले गेले. या परिसरावर शक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार , यादव या राजवटींनी राज्य केले.

• नंतर सुलतान शाही, बहामनी सत्ता, अहमदनगरची निजामशाही, मुघल बादशहा, यानंतर हिंदवी स्वराज्यात हा किल्ला होता. पुढे इंग्रजी सत्तेत हा किल्ला होता.

• आता इसवी सनाच्या १९४७ सालापासून स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात हा किल्ला आहे.

अशी आहे निमगिरी किल्ला व हनुमंत गड किल्याविषयी ऐतिहासिक माहिती

Nimgiri Fort and Hanumant Fort information in Marathi

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती Bhàiravgad Fort भैरवनाथ मंदिर

 भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती

Bhàiravgad Fort information in Marathi (moroshicha Bhairavgad)

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• स्थान:

महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पश्चिम घाटात म्हणजे सह्याद्री पर्वतात आपणास मोरोशी गावाजवळ आपणास हा किल्ला पाहायला मिळतो.

• उंची : हा किल्ला समुद्र सपाटी पासून सरासरी ११४५ मीटर उंचीवर आहे.

भैरवगड किल्ला पाहायला जाण्यासाठी प्रवाशी मार्ग :

• भैरवगड हा किल्ला मुंबई पासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. तर पुणे येथून १४५ किलोमीटर अंतरावर आहे.

• या ठिकाणी येण्यासाठी मुंबई येथून – कल्याण तेथून पुढे अहमदनगरकडे जाणारी माळशेज घाटातून जाणार्या बसने मोरोशी गावी उतरुन आपण या किल्ल्याकडे जाऊ शकतो.

• पुण्याकडून येताना आपणास पुणे – राजगुरूनगर येथून पुढे जुन्नर मार्गे माळशेज घाटातून पुढे मोरोशी गावी व तेथून पुढे किल्ल्याकडे जाऊ शकतो.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

• सह्याद्री पर्वतात उत्तर विभागात आपणास ठाणे व अहमदनगर अन् पुणे किल्याच्या सीमेवर माळशेज घाट व नाणे घाट यांवर पहारा देत उभा असलेला एक सह्याद्री पर्वतातील मावळा म्हणून मोरोशीच्या भैरवगडाचा उल्लेख केला जातो.

सह्याद्री पर्वत व दख्खनचे पठार हे अग्निजन्य खडकाचे बनले आहे. आपण भूगोलात शिकलेल्या प्रस्थरभंग भिंतीचे उत्तम उदाहरण म्हणजे मोरोशीच्या भैरवगड किल्लास पाहू शकतो.

माळशेज घाटातून जाणारा कल्याण व अहमदनगर या घाट रस्त्यावर आपणास मोरोशी हे गाव कोकणच्या बाजूस घाट उतरणी वर लागते. या ठिकाणी आपणास राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. येथून पुढे कच्च्या वाटेने आपण भैरवगड किल्ला पाहायला जाऊ शकतो. किल्ला पाहायला जाण्यापूर्वी मोरोशी परिसरात असणाऱ्या मंदिराचे दर्शन गिर्यारोहक घेतात.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• भैरवनाथ मंदिर:

हा किल्ला पाहायला जाण्यापूर्वी या किल्ल्यास ज्या देवाच्या नावाने नाव पडले त्या देवतेचे मंदिर या परिसरात आहे. साध्या पद्धतीने बांधणी केलेले हे मंदिर बाहेर सभामंडप व आतील बाजूस गाभारा आहे. गाभार्यात आपणास सुकाई देवी, विठलाई देवी,लक्ष्मी देवी, वाघजाई देवी, भैरवनाथ देवता अन् जोगेश्वरी देवीची मूर्ती पाहायला मिळतें. देवाचे दर्शन घेऊन पुढे गडरोहण करण्यासाठी गिर्यारोहक जातात.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort
छोटेसे शिव मंदिर 

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort
भैरवनाथ देवस्थान 

• टायटॅनिक पॉइंट:

या वाटेने पुढे जाताना हिरव्या वनराईतून वाट काढत आपण अर्ध्या तासात उंच डोंगरावर येतो. त्या ठिकाणी आपणास एक पॉइंट पाहायला मिळतो. तो आहे टायटॅनिक पॉइंट या पॉइंट वरून सुंदर सह्याद्री पर्वतातील रमणीय ठिकाणांचे दर्शन घडते. या ठिकाणी दरीतून येणाऱ्या वाऱ्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. व् परिसरातील अनेक ठिकाणे पहाता येतात.ते ही धुके व पाऊस नसताना.

• विस्तृत पठार :

टायटॅनिक पॉइंट पाहून थोडे वरील बाजुस आल्यावर आपणास विस्तृत पठारी भाग लागतो. या ठिकाणी आपणास पावसाळ्यात उंच वाढलेले गवत पाहायला मिळते. तर उन्हाळ्यात ते कापल्यावर विस्तृत पठारी प्रदेश पाहण्याचा आनंद मिळतो. या परिसरात अनेक झाडे ही पाहायला मिळतात.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• गड भिंत पायथा :

विस्तृत पठार पाहिल्यावर आपण थोडा खडा चढ चढून वर आल्यावर प्रस्तर भिंतीच्या पायथ्याशी येतो. एका बाजूस खोल दरी तर दुसरीकडे उंच काळ्या अग्निजन्य बेसाल्ट खडकाची निसर्ग निर्मित भिंत आपणासमोर उभी पाहायला मिळते.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• बंधिस्त खांब टाके:

या ठिकाणी आपणास बांधिस्त खांब पाण्याचे टाके पाहायला मिळतें. ज्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• भुयारी खोली :

या ठिकाणी भिंती पासून थोडया उंचीवर एक खडक खोदून तयार केलेली खोली गुहा पाहायला मिळते. या ठिकाणी पूर्वी शिबंदीतील मावळ्यांना राहण्यासाठी या गुहा खोलीची निर्मिती केलेली दिसते.

• पायरी मार्ग:

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

आता खरी किल्ल्याची चढण सुरु होते. किल्ला चढण करताना आपल्यासोबत गिर्यारोहण करण्याचा अनुभव असला पाहिजे. कारण हा किल्ला सर्व सामान्य लोकांना सर करणे अत्यंत अवघड आहे. या किल्याचा पायरी मार्ग काही ठिकाणी आखूड इतका की एकच पाय ठेवता येईल असा आहे. तर काही ठिकाणी रुंद आहे. एका बाजूला खोल दरी, जरासा तोल गेला तर आपण दरीत कोसळू शकतो. या साठी किल्ला चढताना दोर असणे आवश्यक आहे. हा पायरी मार्ग थोडा पुढे उंचीवर असणाऱ्या गुहे पर्यंत पोहोचवतो.

• कात्याळ गुहा :

या मार्गाने पुढे गिर्यारोहण करत वरील बाजूस आल्यावर मध्येच आपणास एक गुहा लागते. या गुहेत वाकून खाली बसून सरपटत प्रवेश करावा लागतो. आतमध्ये आल्यावर थोडा विसावा मिळतो. या गुहेतून पुढे चढून वरील बाजूस असलेल्या पायरी मार्गास लागता येते.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• पायरी मार्ग :

गुहेतून आपण वर चढून वरील पायरी मार्गास लागतो. हा मार्ग इंग्रजी झेड अक्षरासारखा आहे. या मार्गावर काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या पाहायला मिळतात. या मार्गाने आपण गिर्यारोहण रस्सीच्या साहाय्याने वर जाऊ शकतो. मात्र गिर्यारोहण करणारेच हा मार्ग चढू शकतात.

• कातळ गुहा : 

पुढे किल्याच्या वरील बाजूस आपणास आणखी एक कातळ गुहा पाहायला मिळते.

• गड माची पाणी टाके :

पुढे गडाच्या वरील भागात आल्यावर थोडीशी सपाट माची सारखी जागा आहे. तिथे आपणास गडाच्या माचीवर एक पाण्याचे टाके पाहायला मिळतें.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• राजवाडा व वास्तू अवशेष:

गडाच्या वरील बाजूस आल्यावर आपणास एका वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. यावरून गडावरील राहणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी निवास वास्तू किंवा एखादा वाडा बांधलेला पाहायला मिळतो.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• गडाचा माथा बालेकिल्ला :

पायरी मार्गाने आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. त्या ठिकाणी आपणास निवडुंग उगवलेले पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आल्यावर आपण संपूर्ण परिसराचे दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी कोणतीही वास्तू पाहायला मिळत नाही. कारण या किल्याची चढाई करने अत्यंत अवघड आहे. या किल्याची निर्मिती ही फक्त परिसरातील घाटमार्गावर तसेच प्रदेशातील ठिकाणांवर पाहणी करण्यासाठी याची निर्मिती झाल्याचे आपणांस समजते. आपणास फक्त थोडीशी जागा या ठिकाणी पाहायला मिळते ती ही चढून गेल्यावर विश्रांतीसाठी .

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

• या ठिकाणाहून आपण कोकणकडा, आजोबा डोंगर, हरिश्चंद्रगड, अलंग, मलंग, कुलंग, बोराटीची नाळ नाणांचा अंगठा, जीवधन किल्ला, गोरखगड पाहता येतो.

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगड किल्ला (मोरोशीचा किल्ला) विषयी ऐतिहासिक माहिती  Bhàiravgad Fort

भैरवगडाविषयी ऐतिहासिक माहिती :

• भैरवगड हा जुन्या व्यापारी मार्गावर हा किल्ला टेहेळणी साठी बांधला गेला आहे.यावरून या किल्याची निर्मिती ही सातवाहन काळात झाल्याचे जाणवते.

• पुढे चालुक्य,यादव अशा अनेक सत्ता या प्रदेशावर राज्य करत होत्या. पुढे मुस्लिम शासक तसेच मराठा स्वराज्य व नंतर साम्राज्य असा प्रवास या किल्याचा झाला असावा.

• सध्या हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.

• अशी आहे भैरवगड किल्याविषयी ऐतीहासिक माहिती.

ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...