Friday, October 25, 2024

गध्देगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi

  गद्येगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi 

गध्देगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi


दानधर्म करणे हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे. प्राचीन काळापासून ही पद्धत चालत आली आहे. एखाद्या व्यक्तीस, एखाद्या गावास किंवा मंदिरास दानधर्म म्हणून एखादे इनाम किंवा जमीन दिलेली असते. ते इनाम कोणी काढून घेवू नये. किंवा त्यावर जबरदस्ती कब्जा करु नये. म्हणून त्या ठिकाणी एक शिलालेख उभा केला जात असे. त्यास गद्येगळ असे म्हणतात.

हा शिलालेख कोरताना खालील भागात अभद्र वचन असते. ती एक शापवाणीच असते.

गद्येगळचे भाग :

गध्देगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi


गद्येगळचे तीन भाग पडतात.

• चंद्र , सूर्य व अमृत कलश :

गद्येगळ लेखनात वरील बाजूस चंद्र, सूर्य व अमृत कलश काढलेला असतो. याचा अर्थ असा की ही जमीन वा जागा जी दान केलेली आहे. ती आचंद्र - सूर्य जोपर्यंत आसमंतात आहेत. तोपर्यंत हे दिलेले दान अबाधित राहील. ते कोणीही राजा किंवा इतर व्यक्ती हिरावून घेवू नये.

मध्यभागी अमृत कलश असतो. त्यावरून दिलेले दान हे अमर आहे. असे सांगितले जाते.

• शिलालेख :

चंद्र, सूर्य, व अमृत कलश त्याच्या खाली शिलालेख असतो. सुरवातीस मंगलाचरण असते. व त्यामध्ये दिलेल्या दानाची माहिती दिलेली असते. की ती जागा किंवा इनाम कोणी व कोणाला दान दिले आहे. ते दान कशासाठी दिलेले आहे. याची सविस्तर माहिती लिहिलेली असते.

• अभद्रवचन शापवाणी :

शिलालेखात खालील बाजूस अभद्र असे अपशब्द लिहिलेले असतात. त्यामधे लिहिलेले असते. जो कोणी दिलेले दान मानणार नाही, व ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करील. त्याच्या आई, बहीण , पत्नी यासारख्या घरातील महिलांना गाढवाशी समागम करावे लागेल. किंव तशी वागणूक दिली जाईल.

हिंदू धर्मीय लोक आपल्या कुटुंबांना प्राणापलिकडे जपतात. त्यामुळे असे दान ते काढून घेत नाहीत.

• गाढव व स्त्री शिल्प :

शिलालेखाच्या खालील बाजूस एक गाढव व एक स्त्री यांचे शिल्प समागम करताना काढलेले असते. व असा दगड एक इशारा सूचनाही देवून दिलेले दान असलेल्या ठिकाणी उभारला जातो.

 अशा शिल्पाकृती दगडास गद्येगळ असे म्हणतात.

गध्देगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi


• गद्येगळ उभारण्याची प्रथा :

गद्येगळ हा उभा करण्याची प्रथा ही विशेषत शिलाहार राजांच्या काळात सुरू झाली. ती इसवीसनाच्या दहाव्या शतकात ही प्रथा सुरू झाली. ते इसवी सनाच्या १६ व्या शतकापर्यंत ती चालू होती.

• शिलाहार राजे, कदंब राजे यादव काळ व विजयनगर काळात विशेषत गद्येगळ लिहिले जात होते.

• महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, गुजरात राज्य व उत्तर कर्नाटक परिसरात असे गद्येगळ उपलब्ध आहेत. त्यातले काही मंदिरास केलेल्या दानधर्म कार्याविषयी आहेत. काही किल्याच्या परिसरात आढळतात.

• गद्येगळ ही एक शापवाणी आहे.

• गद्येगळ हे विशेषत मराठी, संस्कृत, फारसी भाषेत कोरलेले आढळले आहेत.

पहिला गधेगळ हा इसवी सन ९३४ साली शिलाहार राजवटीत काळातील आहे.

• सर्वात जास्त गधेगळ हे शिलाहार राजवटी मध्ये उभारले गेले होते.

• श्रवण बेलघोळ येथील एका गधेगळामध्ये शेवटी दानपत्र लिहिल्यानंतर असे लिहिले आहे की “ हे दान कुणी नाकरील अक्षरशः त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल.” असा उल्लेख आढळतो असे अनेक गधेगळ आहेत.

गध्देगळ विषयी माहिती Gadhegal information in Marathi


अशी आहे गधेगळ विषयी माहिती 

Gadhegal information in Marathi 

Sunday, October 20, 2024

सतीगळ / सतिकल्लू/ ledy stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती Satigal vishyi mahiti

 सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती

Satigal vishyi mahiti

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


सती

हिंदू धर्मीय देवताशिव शंकर यांची पत्नी सती त्यांचा पित्याने दक्ष राजाने केलेला शंकराचा अपमान सहन झाला नाही म्हणून तिने अंतरंग अग्नी प्रज्वलित करून स्वतःस दहन करून घेतले.


सती प्रथा :

आपल्या पतिवर नितांत प्रेम असणारी स्त्री आपल्या पती निधनानंतर त्याच्या जळत्या चितेवर स्वतःला जाळून आपला देह नष्ट करते. ती प्रथा म्हणजे सती प्रथा होय. यावेळी ती वेगवेगळे सौभाग्य अलंकार धारण करते. हिरवा शालू, हिरवा चुडा, कपाळी कुंकू, हातात बाजूबंद, पायात जोडवी व पैंजण, अशी आभूषणे धारण करून, आपली सर्व संपत्ती मागील व्यक्तींना व समाजास दानधर्म करून ती सती जाण्यासाठी तयार होते. यावेळी ती अग्नी ग्रहण करताना वेदना होऊ नयेत म्हणून तांबूल सेवन करते. ज्याने तिला गुंगी चढते. व ती सती जाते.या क्रियेस सहमरण किंवा अनुमरण सुध्दा म्हंटले जाते. अशा वेळी ढोलताशे वाजवले जातात.

• रामायण काळात ही प्रथा अस्तित्वात नव्हती. मात्र महाभारत काळात पांडू राजाची पत्नी माद्री सती गेली. हा प्रथम पौराणिक दाखला सती प्रथेचा दिसून येतो.

• पण ही प्रथा ऐच्छिक होती.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


सतिगळ :

एखादा वीर पुरुष मरण पावल्यास त्याच्या मागे त्याची पत्नी त्याच्या चितेवर स्वतला जाळून घेते. तिच्या स्मरणार्थ उभारलेली स्तंभ शिल्पाकृती म्हणजे सतीगळ होय.

सतीगळचे प्रकार :

• वीर पत्नी सतीगळ किंवा स्मृती शिळा : 

पती युद्धात मरण पावल्यास त्याची पत्नी सती जाते. ती वीरपत्नी सतीगळ होय.

• राज सतीगळ: 

एखादा राजा किंवा मंत्र्यांच्या मृत्य नंतर उभारलेली सतीगळ राजसती गळ होय. यामध्ये आपणास राज दरबार व इतर दासी शिल्पाकृती केल्या जातात.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


• एक सती गळ :

गावातील एखादी स्त्री आपल्या पती निधनानंतर त्याच्या चितेवर सती गेली असेल तर फक्त एक सतीगळ उभा केली जाते. यामध्ये एक शृंगार केलेला हात आशीर्वाद देत आहेत असा असतो.


• सतीगळावरील भाग :

विरगळ प्रमाणेच सतीगळचे भाग पडतात.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


वीरमरण व सती स्त्री :

हा सतीगळ स्तंभाचा खालील भाग आहे. यामध्ये सती जाणारी स्त्री बसलेली, व तिचा पती मृत झालेला झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. किंवा सती त्या मृत शरिरासमोर हात जोडून उभा आहे. अथवा ती चितेवर बसलेली व तिच्या पतीचा मृतदेह जवळ आडवा चितेवर असलेला दाखवला जातो.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


वीर शौर्य शिल्पाकृती :

सती जाणाऱ्या स्त्रीचा पती जर युद्धात मरण पावला असेल तर युद्ध प्रसंग कोरलेला सती शिळेवर पाहायला मिळतो. ही एक जोड स्मृतीशिळा असते.

स्वर्गारोहन :

वीर पुरुषावरील बाजूस आपणास वीर व त्याची पत्नी यांना स्वर्गात नेण्यासाठी अप्सरा घेवून जातानाचे दृश्य कोरलेले पाहायला मिळते.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


सती दंड : 

 स्वर्गारोहन या शिल्पाकृतीच्यावरती आपणास दंड काढलेला दिसून येतो. यामध्ये एक हात काढलेला दिसून येतो. त्या हातात बाजूबंद, चुडा व अंगठ्या अशी आभूषणे घातलेली आपणास पाहायला मिळतात. तसेच हातावर पुष्प, पान व सुपारी काहीवेळा कोरलेली असते. कुंकू करंडा देखील काढलेला पाहायला मिळतो. त्याखाली काहीवेळा अश्वारूढ स्त्री, किंवा वाघावर बसलेली स्त्री काढली जाते. तसेच पालखीत बसलेली स्त्री देखील काढली जाते. तसेच ती दानधर्म करत आहे असे दृश्य काढलेले असते.व हा काढलेला हात आशीर्वाद देत आहे. असे दृश्य कोरलेले पाहायला मिळते.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


• काही सतीगळमध्ये दोन किंवा चार हात देखील काढलेले असतात. ते जर लढावू वीराची दोन किंवा अधिक लग्ने झाली असतील तर त्या सतीगळीवर आपणास दोन किंवा जास्त हात काढलेले पाहायला मिळतात.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


स्वर्ग प्राप्ती : 

विरगळी प्रमाणेच सतीगळ मध्ये आपणास तिसरा टप्पा सतीगळीचा पाहायला मिळतो. यामध्ये एका बाजूस पुरोहित असतो व मध्यभागीं जर मरणारी व्यक्ती शैव पंथीय असेल तर शिवपिंड अन जर मृत वैष्णव असेल तर मध्यभागीं विष्णू शिल्प असते. व त्याच्या बाजूला आपणास वीर व त्याची पत्नी नमस्कार मुद्रेत देव पूजा करत असताना दाखवले जातात. त्यांना स्वर्ग प्राप्ती होते असे समजले जाते.


अमृत कलशारोहण : 

सतीगळ मध्ये देखील वरील शीर्षभागी आपणास अमृत कलश पाहायला मिळतो. त्या शेजारी चंद्र सूर्य कलाकृती कोरलेली दिसून येते. याचा अर्थ जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत ती सती व तिचा पती अमर राहणार आहेत. तसेच त्या दोघांना पुन्हा परमेश्वर भेटवतो. असे मानले जाते. अशा स्त्रिस सन्मान व देवरूप स्थान प्राप्त होते.

सतीगळ / सतिकल्लू/ ledy  stone या भौतिक साधना विषयी ऐतिहासिक माहिती  Satigal vishyi mahiti


सतीगळ कोठे पाहायला मिळते?

• भारत, जर्मनी, नॉर्वे, इजिप्त या ठिकाणी सतीगळ वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या पाहायला मिळतात.

• कल्हण याच्या राजतरंगीनी, बाणभट्टाचे हर्ष चरित्रमध्ये सतीप्रथेचा उल्लेख आढळतो.

• रामदेव राय राजाची पत्नी सती गेली होती. छत्रपति शिवाजी महाराज यांची पत्नी पुतळाबाई सती गेली होती. छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र शाहू महाराज यांची सकवारबाई, माधवराव पेशवे यांची रमाबाई, तसेच इंग्रज राजवटी मध्ये बर्नियर या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाहोर शहरात एक मुलगी सती गेलेली पहिली होती.

• पुढे लॉर्ड बेंटींग यांनी इसवी सन १८२९ साली सती प्रथा कायद्याने बंद केली.

• अशी आहे सतीगळ विषयी ऐतिहासिक माहिती.


Saturday, October 19, 2024

वीरगळ विषयी माहिती Hiro stone information in Marathi

 वीरगळी विषयी माहिती

Hiro stone information in Marathi

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• मराठी नाव : वीरगळ,

• कन्नड नाव : वीरकल्लू,

• मल्याळम नाव : तर्रा,

• इंग्रजी नाव : हिरो स्टोन ( Hiro stone)

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• विर उत्पत्ती : 

प्राचीन काळी आर्य भारतात आले. ते समूहाने राहत. त्यावेळी अन्न धान्य कमी असायचं. त्यावेळी अन्नाची गरज भागवण्यासाठी गायी , म्हशी पाळल्या जात. गाय ही जास्त काळ दूध देते. त्यामुळे त्या गाई या उदर निर्वाहाचे साधन असत. त्यांची एक समूह दुसऱ्या समुहापासून चोरी करत असे. त्यांचे व आपल्या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी समूहातील दणकट, भांडखोर, चपळ, धाडशी व लढावू मुलांना गायी व गावाचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली जात असे. ती मुले सराईत चोरांशी लढत . व गाई व आपल्या वसाहतीच्या संपत्ती व लोकांचे रक्षण करत.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi
वीरगळ विषयी माहिती Hiro stone information in Marathi


• शस्त्र शिक्षण व वीर :

ती लढावू मुले पुढे शास्त्र शुद्ध निरनिराळ्या नैसर्गिक प्राणी , पशू , पक्षी व अनेक धाडशी प्रसंगातून शस्त्र चालवणे व युद्ध करणे यासारख्या गतिविधि करू लागली. व यातून शूर वीरांची निर्मिती झाली. व पुढे हे वीर राज्य संरक्षणाचे काम करु लागले.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• वीरगती :

एखादा लढावू योद्धा जर शत्रू सैन्याशी लढताना मरण पावला, अथवा कोणतेही धाडशी समाज हिताचे कार्य करताना धारातीर्थी पडला. तर त्यास वीरगती प्राप्त होत असे.


वीरगळ : 

वीरगळ हा प्रकार कर्नाटक राज्यातून आलेला आहे.

लढाई व धाडशी कृत्य म्हणजे वाघाच्या हल्यातून एखाद्या गाईचे, माणसाचे रक्षण करणे, एखाद्या युद्धात मरण पावणे, एखाद्या समुद्री हल्यावेळी नावेतून शत्रूशी लढताना वीरमरण आले तर त्याच्या स्मरणार्थ एक दगड शिल्पकृती करून त्या वीराच्या जीवनातील प्रसंग कोरून उभा केला जातो त्यास वीरगळ म्हणतात.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi

• वीरगळीचे प्रकार :

• १) आयताकृती वीरगळ : 
फक्त समोरून किंवा एका बाजूने शिल्पाकृती केलेली असते.
• २) स्तंभ वीरगळ : 
चारही बाजूने कोरलेली असते. एखाद्या स्तंभासारखी असते.

• वीरगती नुसार वीरगळीचे प्रकार :

• वीरबळी वीरगळ : 
धाडशी कृत्य करताना एखादा वीर मरण पावल्यास उभा केली जाते.
• गोधन वीरगळ : 
गाईचे संरक्षण करताना मृत पावलेल्या विराची वीरगळ.

• पशू वीरगळ : 
वाघ, सिंह यांच्याशी लढताना आलेले वीरमरण त्याचे समरणार्थ उभा केली जाते.

• चौर्य वीरगळ : 
 चोरी करायला गावी आलेल्या दरोडेखोरांशी लढताना मरण पावलेला वीर त्याची वीरगळ,

• साधूची वीरगळ : 
धार्मिक स्थळ वाचवताना साधू, संत यांचे बलिदान त्याच्या स्मरणार्थ विरगळ उभारली जाते.

• डोली वीरगळ : 
लग्नविधी वेळी झालेल्या हल्यात तसेच डोली घेवून जाताना डाकू लुटेर्यांशी लढताना वीरमरण आलेल्या विराची वीरगळ,

• अश्वदल वीरगळ : 
एखाद्या घोडेश्वाराची वीरगळ.

• गजदल वीरगळ : 
हत्तीस्वाराचे स्मरणार्थ उभारलेली वीरगळ.

• परचक्र वीरगळ : 
परकीय आक्रमण आल्यावर लढाई करताना वीरगती प्राप्त झालेल्या वीराची वीरगळ.

• नाविक वीरगळ : 
समुद्री हल्ल्यावेळी लढताना किंवा धाडसी सागरी कार्य करताना वीरगती प्राप्त झालेल्या वीराची वीरगळ.

• द्वंद्व वीरगळ : 
 दोन विरांमध्ये लढाई द्वंद्व करताना आलेले वीरमरण.त्याचे स्मरणार्थ उभारलेली वीरगळ.

वीरगळीचे भाग :

विशेषत वीरगळीचे तीन, चार, पाच टप्पे असतात.

१)अमृत कलश 

 २)स्वर्ग प्राप्ती 

 ३)स्वर्ग रोहन 

 ४) वीर लढाई प्रसंग

 ५) वीरगती


• वीरमरण :

एखादा वीर मृत पावलेल्या वेळचा प्रसंग या ठिकाणी कोरलेला पाहायला मिळतो. हा वीरगळीचा खालील अंतिम टप्पा असतो.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• शौर्य प्रसंग / वीर प्रसंग :

 वीरगळीचा शेवटच्या टप्याचा वरील भाग होय. काही वीरगळीमध्ये हा अंतिम तळास असतो म्हणून याला तळाचा भाग म्हणतात. यामधे विराने केलेला पराक्रम कोरलेला असतो. जर एखादा वीर गाईची रक्षा एखाद्या वाघापासून करताना मृत झाला असेल. तर वीरगळीच्या पहिल्या टप्प्यात गाईच संरक्षण करताना व वाघाशी लढतानाचा प्रसंग कोरलेला पाहायला मिळतो.

• एखादा वीर पायदलातील असेल युद्ध करताना मृत झाला असेल. तर तो ढाल तलवार व भाला घेवून लढतानाचा प्रसंग कोरलेला दिसतो.

• एखादा वीर समुद्र किनारी असेल. व जहाजावर असेल. व परचक्र आल्यावर लढताना मृत पावला असेल तर आपणास जहाज व त्यातील लढणारे सैन्य प्रसंग वीरगळीच्या पहिल्या टप्प्यात कोरलेला दिसून येतो.

• एखादा वीर घोडेस्वार असेल व युद्धात मरण पावला असेल. तर घोड्यावर स्वार होऊन लढणारा वीर शिल्पाकृती मध्ये कोरलेला दिसून येतो.

• एखादा राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व मंत्री मरण पावला असेल तर त्या संबंधित रथ व त्याच्या हुद्या संबंधित रथ व इतर आयुधे कोरलेली पाहायला मिळतात.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• वीरगती व स्वर्गारोहन :

युद्ध प्रसंग व त्याच्या वरील हा टप्पा असतो. यामध्ये अप्सरा किंवा देवदूत त्या विरास धरून स्वर्गाकडे घेऊन जाण्यासाठी आलेला प्रसंग असतो. यामधे त्यांनी विरास पकडुन वर घेवून जातानाचा प्रसंग शिल्पाकृत केलेला दिसून येतो. एखादा वीर लढताना व कोणतेही समाजहिताचे रक्षण करत असताना मृत पावला असेल तर त्यास स्वर्ग प्राप्ती होते असे समजले जाते.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• स्वर्ग प्राप्ती : 

या स्वर्गारोहनच्या वरील बाजूस असणारा हा भाग आहे. यामध्ये एका बाजूस पुरोहित असतो. जो देव पूजा करत आहे. ज्याच्या हातात. घंटी व इतर पूजा साहित्य आहे. व तो पूजा करत आहे. त्या शेजारी शिवपिंडी किंवा विष्णू व इतर देवता शिल्पाकृती असते. जर मृत वीर शिव उपासक असेल. तर शिवपिंडी व विष्णू भक्त असेल तर विष्णूमूर्ती कोरलेली दिसून येते. व त्या शेजारी वीर हात जोडून नमस्कार करतो आहे. बसून वंदन करत आहे. अशी शिल्पाकृती दिसून येते.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


• अमृत कलश चंद्र सूर्य कलाकृती व मोक्ष प्राप्ती :

वीरगळीच्या वरील भाग हा अमृत कलश असतो. जो विराचे अमृत तुल्य कार्य दर्शवतो. हा कलश सर्वात वरील भागात असतो. याच्या शेजारी चंद्र व सूर्य कोरलेले आढळतात. जे या विराचे कार्य हे जो पर्यंत चंद्र, सूर्य आहेत. तोपर्यंत अमर राहील असे सुचिवतात. काही ठिकाणी कमल पुष्प, शरभ शिल्पे सुद्धा कोरलेले आढळतात. तसेच त्या लढावू विरास मोक्ष प्राप्ती होते असे समजले जाते.

विरगळ विषयी माहिती  Hiro stone information in Marathi


अशा वीराच्या सन्मानार्थ विरगळी उभारल्या जात असत. अशा अनेक विरगळी आपणास भारत देशात व आपल्या महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतात.

महाराष्ट्र राज्यातील वीरगळ असणारी ठिकाणे :

• कोल्हापूर जिल्हा : कसबा बीड. रायगड दिवेआगर : देगाव शिवमंदिर वीरगळ, मुंबई बोरिवली येथील एकसर वीरगळ,

• निमगिरी किल्ला पायथा गाव खांद्याचीवाडी येथे ४० वीरगळी आहेत. या ठिकाणी निरनिराळ्या वीरगळी पाहायला मिळतात.

शी आहे वीरगळ या ऐतीहासिक भौतिक साधनाची माहिती.Hiro stone information in Marathi


Saturday, October 12, 2024

ढाकगड किल्ल्याची माहिती Dhakgad Fort information in Marathi

 ढाकगड किल्ल्याची माहिती

Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सहयाद्री पर्वतातील डोंगराळ प्रदेशात आपणास ढाकगड किल्ला रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात अरण्यात पाहायला मिळतो.


• उंची : सरासरी समुद्र सपाटी पासून हा किल्ला २७००फूट उंचीवर हा किल्ला आहे.


ढाक गड किल्याकडे जाण्याचा प्रवाशी मार्ग:


• मुंबई येथून ठाणे- कल्याण – बदलापूर मार्गे - कर्जत – येथून सांडशी गावातून अरण्य वाटेने ढाकगडाकडे जाता येते.

• पुणे येथून पुढे पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळा – कामशेत – जांभवली गावातून अरण्य वाटेने ढाकगड किल्ल्यावर जाऊ शकतो.


ढाकगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:


• ढाकगड हा एक अरण्यातील किल्ला आहे. पुण्याहून कामशेत या ठिकाणी आल्यावर तेथून पुढे जांभवली गावात आल्यावर गावाच्या बाहेर असणाऱ्या ढाकवाडी मार्गावरून कोंडेश्वर या मंदिराजवळ येवून पोहोचतो.


• कोंडेश्वर् मंदिर :

अलीकडे जीर्णोद्धार झालेले हे मंदिर एक शिव मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक ओढा आहे. पावसाळी दिवसात हा ओसंडून वाहतो. मात्र उन्हाळा सुरू झाला की आटलेला असतो. हा ओढा पार करून आपण अरण्य वाटेने ढाकबहिरी या मार्गाने जाऊ लागतो. पुढे या वाटेने पुढे खूप चालत गेल्यावर जंगलातून आपण कळकराई सूळक्याजवळील जंगलात येतो. या ठिकाणी आपणास मार्ग दर्शक फलक पाहायला मिळतो. कळकराई सुळक्याजवळून जंगलातून आपण ढाकगड किल्ल्यावर जाऊ शकतो.

कर्जत कडून येताना सांडशी गावात आल्यावर अरण्य वाटेने आपण ढाक बहिरी या वाटेने जावे. पुढे जंगलात जागोजागी मार्गदर्शक बाण पाहायला मिळतात. या वाटेने पुढे एक पायवाट ढाकगडकडे तर दुसरी ढाक बहिरी लेण्या कडे घेवून जाते. या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो.

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• ढाक गड हा किल्ला अरण्यात असल्याने तो पाहायला जाताना एकटे जाऊ नये, एकत्र ग्रुपने जाणे चांगले.तसेच अरण्यात असल्याने खाण्याचे पदार्थ पश्चिमेकडून येताना सांडशीगावातून किंवा पूर्वेकडून येताना जांभवली गावातून खरेदी करून जाणे चांगले. पुढे या रान वाटेने आपण जंगल झाडी, पठार पार करत गडाच्या जवळ येऊन पोहोचतो

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• कात्याळ खोदीव पायरी मार्ग :

पूढे आपणास कात्याळ चढेल पायरी मार्ग लागतो. या वाटेने आपण गडावर जावून पोहोचू शकतो. हा किल्ला पाहायला जाताना स्थानिक एखादा व्यक्ती सोबत असेल. किंवा ज्याने या पूर्वी हा ट्रेक केला असेल ती व्यक्ती सोबत असेल तर उत्तम मार्गदर्शन मिळेल.

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• महादरवाजा :

गडाच्या उत्तर बाजूस आपणास एक भग्न दरवाजा पाहायला मिळतो. काळाच्या ओघात, तसेच परचक्र आल्यावर काही समाज कंटकांनी येथे नासधूस केल्यामुळे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. चौकटीची एक अर्धवट बाजू शिल्लक आहे.


• पाण्याची टाकी : 

किल्यावर एके ठिकाणी एकूण पाच जोड पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ज्यांची निर्मिती किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची गरज भागवणेसाठी केली गेली . त्यातील काही टाकी दहा फुटा पेक्षा खोल आहेत. तसेच आणखी काही अंतरावर आपणास अशी टाकी खोदलेली पाहायला मिळतात.

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• बांधकाम अवशेष :

 काही ठिकाणी आपणास बांधकाम केलेले चौथरे पाहायला मिळतात. यावरून तेथे रहिवासी वास्तूची कल्पना येते.

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• कोठार :

 किल्यावर राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या आहाराची गरज भागवण्यासाठी बांधले गेलेल्या कोठाराचे अवशेष देखील पाहायला मिळतात.

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


• भग्न शिव मंदिर : 

किल्यावर पूर्वी एक शिव मंदिर होते. हल्ली तिथे फक्त भग्न अवशेष पहायला मिळतात.

• विशाल तळे :

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


ढाकगड किल्यावर पूर्वी बांधलेले एक तळे देखील पाहायला मिळतें. जे गडावरील पाण्याची गरज पाहता खोदलेले होते. उन्हाळ्यात मात्र ते आटले जाते.

• तटबंदी : 

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi

ढाकगड किल्ल्याची माहिती  Dhakgad Fort information in Marathi


हा किल्ला सहयाद्री पर्वतातील उंच एक प्रस्तरावर असणारा किल्ला आहे. किल्ल्यावरील तटबंदी बऱ्याच ठिकाणी पडलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी सुस्थितीत ती आढळून येते.

• अरण्यात असल्याने हा किल्ला बराच दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे आता अवशेष देखील पाहताना अवघड जाते.

• या किल्ल्यावरून आपणास श्रीवर्धन गड, मनरंजन गड, कोंढाणे लेणी, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, इर्शाळगड, चंदेरी किल्ला, पदरगड, कोथळीगड, यांचे दर्शन घडते.


ऐतिहासिक महत्त्व :

भोर घाटातून होणारी व्यापारी वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्याची निर्मिती केली गेली. एक टेहळणीचा किल्ला म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. येथील ढाकबहिरी गुणांमुळे हा आदिम काळापासून मानवी वावर असणारा किल्ला आहे.

अशी आहे 

ढाकगड किल्ल्याची माहिती

Dhakgad Fort information in Marathi

Saturday, October 5, 2024

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी Dhak bahiri guha information in Marathi

 ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी

Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

• स्थान: 

महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्री पर्वतात ढाक बहिरी हे ठिकाण प्राचीन लेणी व गुहा हिंदू मंदीर पाहायला मिळते.


• उंची : 

समुद्र सपाटी पासून या ठिकाणाची उंची ही सरासरी समुद्र सपाटी पासून २७०० फूट उंचीवर हा किल्ला आहे.


ढाक बहिरी पाहण्यासाठी जाण्याचा प्रवाशी मार्ग:

• मुंबई येथून ठाणे – कल्याण – बदलापूर येथून पुढे कर्जत येथून दोन तासांचा पायी ट्रेक करत आपण ढाक बहिरीच्या पायथ्याशी पोहोचू शकतो.

• पुणे येथून पुढे पिंपरी चिंचवड मार्गे तळेगाव दाभाडे तेथून पुढे कामशेत येथून जांभवली गावातून राजमाची जवळील अरण्यातून ढाक बहिरीला जाता येते.


ढाक बहिरी या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे :

• सह्याद्री पर्वतात पुणे जिल्ह्यात मावळ प्रांतात कामशेत ठिकाण आहे. याठिकाणी आल्यावर जांभवली गावी जाण्याचा मार्ग विचारून आपण त्या गावी आपल्या वाहनाने जाऊ शकतो. तेथे पोहोचून आपले वाहन पार्किंग करून पुढे रान वाटेने ढाक बहिरीकडे जाऊ शकतो.


• कोंडेश्वर मंदिर:

 या गावातून पुढे लगेच आपणास कोंडेश्वर देवालय लागते. येथून पुढे आपणं ढाक बहिरीकडे जाऊ शकतो. हे एक शिवमंदिर आहे. नवीन पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आलेला असून अनेक हिंदू धर्मीय लोकांचे ते श्रध्दा स्थान आहे.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


• कळकराई डोंगराकडे :

या वाटेने सह्याद्री पर्वतात उगम पावलेले ओहोळ, नाले पाहत गर्द झाडीतून अरण्य वाटेने पठारी भागातून जंगलात रान वाटेने कळकराईच्या डोंगराजवळ येऊन पोहोचतो. वाटेत लागणाऱ्या निबीड अरण्यातून सह्याद्रीच्या सदाहरीत अरण्याची प्रचीती येते.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


• मार्गदर्शक फलक :

या ठिकाणी आपणास या ढाकबहिरी ठिकाणावर असलेल्या वेगवेगळ्या पॉइंटचे मार्ग दर्शन करणारा फलक लावलेला पाहायला मिळतो.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


• कळकराई खिंड :

मार्गदर्शक फलक पाहून आपण लगेचच तिथे असलेल्या खिंडीतून जाऊ लागतो. ही वाट अत्यंत चिंचोळी आहे. येथून जाताना आपणास खोल घळईतून जाण्याचा अनुभव मिळतो. ही घळई पार केल्यावर खाली उतरावे लागते. त्यासाठी घळईच्या तोंडावर लोखंडी सळई बांधलेली दिसून येते. तसेच एक दोरही बांधलेला पाहायला मिळतो. हा गिर्यारोहण करणाऱ्या गडप्रेमीनी चढाई व उतरणे सोपे व्हावे म्हणून बांधलेला आहे.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


• कात्याळ निसरडी वाट:

घळीतून खाली उतरून आल्यावर आपणास घळीच्या बाजूस ढाक बहिरी उंच डोंगर दिसतो. त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कडांच्या निसरट कात्त्याळ कड्याच्या बाजूने आपणास जावे लागते. पावसाळी दिवसात इकडे जाणे तसे कठीण असते. शेवाळलेल्या दगडाच्या उतराने जाणे अवघड असते.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


• गुहा :

भैरी देवालयाकडे जाताना आपणास उंच कड्यात खोदून तयार केलेल्या गुहा पाहायला मिळतात. या अती प्राचीन गुहा असून. या ठिकाणी निवाऱ्यासाठी यांची निर्मिती केली असावी.

यामधे शंभर , दोनशे माणसे सहज राहू शकतात. विश्रांती घेवू शकतात.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi
छ.शिव स्मारक 


• कात्रज कडून येणारी वाट व पायरी चढत मार्ग :

कात्रज कडून येणारी वाट याठिकाणी पायथ्याला येवून पोहोचते. कात्रज कडून येताना आपणास प्रथम सांडशी गावात यावे लागते. तिथे आपणास छत्रपती शिवरायांचे स्मारक लागते. तेथून अरण्य वाटेने आपण ढाक बहिरीच्या पायथ्यास येवून पोहोचतो. येताना वाटेत आपणास भग्न अवस्थेत असणारे प्राचीन मंदिर लागते. त्याठिकाणी मंदिर व इतर अवशेष पहायला मिळतात.

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


या वाटेने आल्यावर आपण पायथ्याशी दोन्ही वाटा मिळतात एक पुणे व दुसरी कर्जत वरून येथे येते. येथून समोर खडा पाषाण चढ दिसतो. ज्यामधे पायऱ्या खोदलेल्या आहेत. तसेच वर चढून जाण्यासाठी एक सळी जोडलेली आहे. जिच्या आधारे अनेक गिर्यारोहक येथे चढाई करत असतात.


• अरुंद वाट धोकादायक ठिकाणावर खडी चढाई केल्यावर एक पाय मावेल अशी अरुंद वाट जेथून खाली पडल्यास थेट खालील खडकावर पडू अशी जागा, याठिकाणी चढाई करून जाताना आपणास एक आडवी सपोर्टसाठी तार बांधलेली आहे.

• खडी चढाई : 

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


तारेच्या साहाय्याने आपण एक लाकूड बांधलेली जागा आहे. तिथं येतो. या ठिकाणी चढने अवघड आहे. अनेक दोर व तारा चढण्यासाठी सपोर्टला जोडलेल्या आहेत. त्या थेट मंदिर गुहे पर्यंत जोडलेल्या आहेत. या ठिकाणी असणाऱ्या लाकडावरून घरात कसे आपण सिडी लावून चढतो. तसे चढावे लागते.

• भैरवनाथ मंदिर गुहा :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


कठीण गिर्यारोहण करून आपण भैरवनाथ गुहेपर्यंत येवून पोहोचतो. या ठिकाणी शेंदरी रंगात रंगवलेली भैरवनाथ व अन्य हिंदू धर्मीय देवतांच्या मूर्ती गाभाऱ्यात पूजलेल्या दिसतात. गुहेच्या बाहेरील बाजूस देखील काही शिल्पाकृती देवी देवतांच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात. तसेच देवाची त्रिशूळ आधी आयुधे तिथं खोचलेली दिसून येतात.

• इतर गुहा :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


या ठिकाणी अनेक भक्तगण व अनेक गडप्रेमी येतं असतात. त्यांची राहण्याची व्यवस्था होईल अशा विशाल गुहा आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. गुहांच्या बाहेर दीड फूट उंचीची कात्याळ भिंत पाहायला मिळतें.

• पाण्याची टाकी :

ढाक बहिरी गुहा / ढाकचा भैरी  Dhak bahiri guha information in Marathi


या ठिकाणी गुहेत लागून आपणास आतील बाजूस खोदीव पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात. ज्यातील एक पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तसेच दुसरे खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी खोदली गेली असावीत. तसेच येथे काही भांडी देखिल पाहायला मिळतात. जी देवाच्या दर्शनासाठी येणारे भक्त, व गडप्रेमींसाठी जेवणं बनवण्यासाठी ठेवलेली पाहायला मिळतात.

• परतीचा प्रवास:

परतीचा प्रवास खुप अवघड आहे. कारण चढाई सोपी असली तरी उतरणे खुप अवघड आहे. धीर, धाडस व आवड असणारे भक्त व गिर्यारोहकच हे करू शकतात. सर्व सामान्य लोकांना हा ढाकबहिरी करने अवघड आहे.

ढाक बहिरी या गुहांची ऐतिहासिक माहिती :

ढाक बहिरी हे ठिकाण या प्रदेशातील आदिवासी लोकांचे दैवत आहे. त्यामुळे हे स्थान त्यांना अत्यंत प्रिय आहे. हे एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे याची निर्मिती आदिम काळापासून झालेली असावी. मात्र खोदकाम तसेच भूमिगत कात्याळ खोल्या, पाण्याच्या टाक्या या सातवाहन काळात खोदल्याच्या दिसून येतात. नंतर शिवकाळात थोडी डागडुगी झाली असावी. निबीड अरण्यात असल्याने हे ठिकाण परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहीले असावे.

गो. नि. दांडेकर या मराठी भाषेतील लेखकाच्या साहित्यात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो.

• अशी आहे ढाक बहिरी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती


ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी की जाणकारी Dhak bahiri guha information in Hindi

  ढाक बहिरी गुहा / ढाक का भैरी Dhak bahiri guha information in Hindi  • जगह: महाराष्ट्र राज्य में पुणे और रायगड जिले की सीमा पर सह्याद्री  ...