किल्ले मच्छिंद्रगड ( सांगली जिल्हा) संपूर्ण मराठी माहिती
Fort macchindragad information in Marathi
• स्थान : महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात मच्छिंद्रगड आपणास पाहायला मिळतो.
• उंची : या गडाची सरासरी उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे २५४५ फूट उंचीवर हा किल्ला आहे.
• मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी प्रवाशी मार्ग:
• मुंबई बेंगलोर हायवेने आपण कराड शहरात आल्यावर तेथून तासगाव रोडने शेणोली गावी आल्यावर तेथून पुढे डावीकडे मच्छिंद्रगड गावी येवून तेथून पुढे किल्ले मच्छिंद्रगडावर आपणास जाता येते.
• पुणे येथून आपण कराडला येऊन पुढे तासगाव रोडणे आपणं मच्छिंद्रगडावर जाऊ शकतो.
• मच्छिंद्रगडावर पाहण्यासारखी ठिकाणे:
• मच्छिंद्रगड गावी आल्यावर आपणास तेथून गड वाटेला जाता येते.
• बांधीव पायरी मार्ग:
मच्छिंद्र गडावर जाण्यासाठी आपणास एक बांधीव पायरी मार्ग आहे. जो चढण्यास सुलभ आहे. या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो.
• गडाची तटबंदी: काळाच्या ओघात गडाची तटबंदी ही नष्ट झालेली आहे.
• उद्ध्वस्त दरवाजा :
किल्याचा दरवाजा काळाच्या ओघात दूर्लक्षते मुळे नष्ट झालेला आपणास पाहायला मिळतो. दरवाजाच्या एका बाजूचा बुरूज नष्ट झालेला असून, दुसरीकडून अद्यापही तग धरून आहे.
• लहान मंदिर व दगडी व्हण :
गडावर आपणास एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते ज्यामधे नवनाथाची पूजा केलेली दिसते. बाजूला एक दगडी व्हण पाहायला मिळतो.
• समाधी :
गडावर प्रवेश करताच उजव्या बाजूला आपणास दोन समाध्या दिसतात. या प्राचीन युगपुरुषांच्या किंवा एखाद्या योध्याच्या असू शकतात.
• बुरूज व छत्री: समाधी खालील बाजूस पश्चिम टोकास बुरूज आपणास पाहायला मिळतो. याच परिसरात नवीन बांधकाम करून पर्यटकांसाठी एक छत्री उभारली आहे.
• दक्षिणेस असलेला पायरी मार्ग:
गडाच्या दक्षिण बाजूस बेरड गावावरून आलेला पायरी मार्ग पाहायला मिळतो. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपणास गडाच्या तटबंदी तसेच इतर बांधकाम वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.
• मच्छिंद्रनाथ देवालय :
गडाच्या मध्यभागी आपणास मच्छिंद्रनाथ मंदिर पाहायला मिळते. सुंदर दगडी चिरेबंदी बांधकाम असलेल हे मंदिर यावरील कळस नवीन आधुनिक पद्धतीने बांधला असून पुढे सभामंडप व आतील बाजूस गाभारा आहे. गाभाऱ्याची चौकट ही नक्षीदार असून त्यावर गणेश शिल्प कोरलेले आहे.गाभाऱ्यात नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ पुजस्थान पाहायला मिळते. तसेच त्या संप्रदायातील वेगवेगळी स्मृतिचिन्हे, आयुधे पाहायला मिळतात.
मंदिराच्या बाहेरील बाजूस तुळशी वृंदावने बांधलेले आहेत. आवारात एक वृक्ष असून त्याभोवती चिरेबंदी पार बांधलेला पाहायला मिळतो. या पारातील एका दगडावर आपणांस एक शिलालेख देखील पाहायला मिळतो. तो देवनागरी लिपीत आहे. तसेच अनेक शिल्पाकृती मंदिर आवारात पाहायला मिळतात.
• तोफा:
या किल्याच्या परिसरात दुर्ग संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने या परिसरात सापडलेल्या तोफांचे संवर्धन करण्यासाठी या मंदिराच्या परिसरात त्यांची डागडुजी करून ठेवलेल्या आपणास पाहायला मिळतात.
• भग्न इमारती :
मंदिराच्या बाजूस आपणास भग्न इमारती पाहायला मिळतात.
• मसोबा मंदिर :
गडावर मच्छिंद्रनाथ देवालया शेजारी आपणास मसोबा देवालय देखील पाहायला मिळतें.
• चोखामेळा मंदीर स्मारक :
गडवर आपणास मच्छिंद्रनाथ मंदिरा समोर काही भगन् अवशेष तसेच चोखामेळा यांचे स्मारक पाहायला मिळते.
• मंदिरा भोवताली तटबंदी :
मच्छिंद्र नाथ यांच्या मंदिराच्या आवारात आपणास नवीन बांधलेली दगडी चिरेबंदी तटबंदी तसेच पायरी मार्ग पाहायला मिळतो.
• विखुरलेली शिल्पे :
मंदिराच्या परिसरात आपणास भगं हिंदू धर्मीय शिल्पे आपणास विखुरलेली दिसून येतात.
• गुंफा :
या परिसरात काही गुंफा पाहायला मिळतात. त्यातील काही भूमिगत आहेत. त्याविषयी आपणास स्थानिक लोकांकडून माहिती मिळतें.
• लक्ष्मी पाण्याचे टाके :
किल्याच्या एका भागात आपणास पाण्याचे खोदीव टाके पाहायला मिळतें. जे येथील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधले गेले आहे. आजही येथील पाणी वापरले जाते. सभोवती दगडी बांधकाम केलेला कट्टा आहे. या टाक्यास लक्ष्मी पाण्याचे टाके असे नाव आहे.
• गोरक्षनाथ व महादेव मंदिर :
गडावर एक शिवमंदिर पाहायला मिळते. बाहेरील बाजूस नंदी व गाभाऱ्यात शिवलिंग असे सुरेख शिवलिंग मंदिर पाहायला मिळते. तसेच गोरक्षनाथ यांची मुर्ती देखील पाहायला मिळतें.
• चुन्याची घाणी :
किल्याचे बांधकाम करण्यासाठी जो दगडाचा सांधा जोडण्यासाठी लागणारा कच्चा माल करणारा चूना तयार करण्याची घाणी व त्यातील दगडी जाते पाहायला मिळतें.
• कोरडी विहीर :
शिवमंदिरापासून थोडया बाजूला आपणास एक कोरडी पडलेली विहीर देखील दिसून येते.
• बुरूज व टेहेळणी बुरूज:
या गडावर आपणास काही बुरूज पाहायला मिळतात. ते हल्ली ढासळलेले दिसून येतात. यापैकी काही टेहळणीसाठी बांधले गेले आहेत. तर काही किल्याच्या कमकुवत बाजूच्या रक्षणासाठी बांधले गेले असावेत असे समजते.
या गडाची फेरी करण्यास एक ते दोन तास लागतात.
• मच्छिंद्र गडाविषयी ऐतिहासिक माहिती :
• प्राचीन काळी या ठिकाणी गर्भगिरी पर्वत होता येथे मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ वस्तीस होते. मच्छिंद्रनाथ यांकडे सोन्याची वीट होती.त्यांनी मुद्दामच गोरक्षनाथांची परीक्षा घेण्यासाठी आपल्याला त्या विटेच्या विषयी मोह निर्माण झाल्याचे नाटक केले. तिचा मोह दूर करण्यासाठी गोरक्षनाथांनी ती वीट दूर फेकून दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथ यांनी लोळून शोक केला. तेव्हा भस्म टाकून गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी सोन्याचा डोंगर तयार केला. इथून अनुग्रह करून गोरक्षनाथ तेथून बत्तीस शिराळा या ठिकाणी गेले. ही घटना घडली ते ठिकाण हा गर्भगिरी पर्वत म्हणजेच मच्छिंद्रगड आहे.
• पुढे या परिसरात हिंदू धर्मीय राजे शिलाहार , चालुक्य, शक व यादव या राजांनी राज्य केले.
• पुढे सुलतान शाही काळात हे ठिकाण बहामनी राजवटीत होते.
• बहामनी काळानंतर हा प्रदेश आदिलशाहीत होता.
• पुढे शिवरायांनी हे ठिकाण स्वराज्यात दाखल करुन घेतले. व किल्याची डागडुजी केली.
• इसवी सन १६९३ मध्ये मुघलांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.व देवीसिंग या राजपूत किल्लेदाराची नेमणूक केली. १२ नोव्हेंबर १६९३ साली बादशहा औरंगजेब या ठिकाणी आला होता. तेव्हा किल्लेदार त्याच्या भेटीसाठी गेला होता.येथून पुढे औरंगजेब बादशहा वसंतगडाला गेला.
• इसवी सन १७५५ साली शाहू महाराज यांनी हा किल्ला जिंकून औंधच्या पंतप्रतिनिधीकडे सोपवला.
• इसवी सन १७६३ साली नारो गणेश व राघो विठ्ठल या राघोबा दांदांच्या सरदारांनी पेशवाईतील अंतर्गत संघर्षाच्या काळात आपल्या ताब्यात घेतला.
• पुन्हा काही अवधीतच पेशवा माधवराव यांनी हा किल्ला ताब्यात घेवून औंधच्या पंतप्रतिनिधीकडे सोपवला.
• इसवी सन १८१० साली अंतर्गत कलहातून पेशवाईतील सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
• इसवी सन १८१८ साली मराठा साम्राज्याच्या पाडावानंतर हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला.
• सध्या १५ ऑगस्ट १९४७ नंतर औंध संस्थान भारतात विलीन झाले त्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• या किल्ल्यावरून आपण सदाशिवगड, विलासगडाचे दर्शन घडते. पूर्वी हा किल्ला या प्रदेशाच्या टेहळणी करण्यासाठी उभा केलेला होता.
• अशी आहे किल्ले मच्छिंद्रगडाची माहिती.
Fort macchindragad information in Marathi